Baby Mama पाहिला. टिना फे अन एमी पोह्लर चे नाव वाचून अपेक्षा होत्या पण काही खास वाटला नाही! नन्तर मग लेकीला नवीन आणून दिलेला टिन्कर बेल पाहिला तो मात्र अगदी बेष्ट होता! मस्त कथा, क्यूट कॅरॅक्टर्स!!
Submitted by maitreyee on 3 November, 2008 - 12:18
गोलमाल रीटर्नस पाहिला..... पहिल्या गोलमालची सर नाहीये... शर्मन जोशीला मिस केलं.... पण आपला श्रेयस तळपदे भाव खाउन जातो... एकुणच यथतथा...
हा चित्रपट "आज कि ताजा खबर" या जुन्या चित्रपटावर बेललेला आहे. त्यात किरण कुमार आणि असरानी होरो होते. म्हणजे चालला नव्हता हे ओघाओघाने आलेच. पण त्यावर बेतलेला मराठीत आलेला फेका फेकी मात्र धम्माल होता. अशोक सराफ, लक्षा, चेतन दळवी, उदय टिकेकर, सविता प्रभुणे, निवेदिता जोशी, अजय वढावकर... अशी तगडी कास्ट होती त्यात. मला तो फार आवडला होता. आणि त्याचमुळे कदाचित गोलमाल रिटर्नस पाहताना ती मजा आली नाही. आता हिंदी म्हणुन त्यानी कथेला खुनाची फोडणी वगैरे देऊन चित्रपट चट्पटीत करायचा प्रयत्न केलाय.. पण भट्टी म्हणावी तशी जमली नाहीये. लक्षात राहण्यासारखा एकही प्रसंग नाहीये... फक्त पहील्या चित्रपटाप्रमाणे यातही संजय लिला भंसालीच्या चित्रपटांवर तोंडसुख घेण्यात आलेय...
त्यामुळे ज्यानी फेकाफेकी पाहिला नाहीये ते एकदा पाहु शकतील....
गॉड ने बनायी जोडी की काय चित्रपट येतोय त्याचे कथासुत्र "shall we dance" वरुन ढापले आहे असे माझे स्पष्ट आणि प्रामाणिक (एक)मत आहे हा चित्रपट १२ डिसेंबरला थेटरात येणार आहे.
Submitted by तृप्ती आवटी on 13 November, 2008 - 12:42
काही दिवसांपुर्वी US मध्ये IFC चॅनेलवर "Born In Brothel" पाहिला. ही एक डॉक्युमेंट्री आहे. कलकत्त्याच्या रेड लाईट एरीयात वाढणार्या मुलावर हा चित्रपट आहे. Zana Briski ही फोटोग्राफर त्या भागातल्या बायकांबद्दल अभ्यास करायला गेली होती. तिथे तिने त्या बायकांची मुले पाहिली. एक प्रयोग म्हणुन तिने काही मुलांना कॅमेरा दिला आणि फोटो काढायला शिकवले/ सांगितले..... Amazing photos आहेत. त्याच बरोबर त्यांची त्या फोटोबद्दलची समज बघुन मला माझी लाज वाटली. ह्या बरोबरच त्या मुलांचे आणि त्या बरोबर आजुबाजुच्या माणसांचे life दाखवले आहे. MUST SEE सिनेमा आहे आणि त्या मुलांनी काढलेले फोटोही.
.....................................
Ciderellaच्या पोस्ट वरुन आठवले: ते "माँ का लाडला बिगड गया"हे हॅमरींग गाणे पाहुन "दोस्ताना" बहुधा I Now Pronounce You Chuck & Larry वरुन घेतला असावा असे वाटते.
टाईमपास आहे....
धो धो हसायला येणार नाही पण हसायला येईल...
उत्तरार्धात थोडा ताणल्यासारखा ही वाटेल...
अभिषेक जॉन आणि बॉबी ठीक ठाक...
प्रियांका जबरदस्त दिसते...
शिल्पा शेट्टी उगाचंच...
फार विचार वगैरे न करता दोन अडीच तास घालवायचे असतील तर आणि तरंच बघा....
आणि आनंदी लोक आणि त्या संबंधीचे विनोद घरच्यांना पचत असतील तर घरच्यांबरोबर ही बघू शकता...
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !
Submitted by अँकी नं.१ on 15 November, 2008 - 18:27
मानसिक आजार / विकृती / उपचार या विषयांवरचे काही इंग्रजी सिनेमे पाहिले...
१- The Notebook
romantic सिनेमा आहे... चांगला आहे... मानसिक आजार झालेल्या एका वृद्धेला हॉस्पिटल मधला एक वृद्ध एक कथा वाचून दाखवतो... श्रीमंत नायिका-गरीब नायकाची... फिल्लमबाजांना कथेचा लगेच अंदाज येईल... पण overall taking छान आहे...
अजय देवगण चा U Me aur Hum याच्यावरच बेतलेला होता...
२- Memento
हा thriller आहे... अपघात आणि सूडापायी मनोविकृती आलेला नायक आणि त्यानी आरंभलेलं खुनाचं सत्र... हा पण छान आहे...
आमिर खान चा आगामी गझनी याच्यावरूनच घेतलाय...
३- Eternal Sunshine of The Spotless Mind
जिम कॅरी आणि केट विंस्लेट चा सुंदर अभिनय, सशक्त आणि original कथा...
love @ 1st sight नंतर मतभेदांनी बिथरलेली नायिका एका agency च्या उपचारांनी नायकाला मनातून पुसुन टाकते...
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून नायक पण तोच उपचार करवून घेतो... पण त्यात त्याला परत तिच्यावरचं प्रेम जाणवतं... पण आता खूपच उशीर झालेला असतो... की नसतो...
अप्रतीम सिनेमा आहे... जरूर बघा....
खरंतर तीन्ही बघायला हवेत...
पण वेळ नसेल तर Eternal Sunshine.... तरी बघाच....
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 24 November, 2008 - 16:53
मैत्रेयी,
सिनेमा पाहिला आहात का...?
short term memory loss आहेच
पण मनोविकार / मनोविकृती पण आहे... (रहस्यभेद करत नाही... पण अस्तित्वात नसलेल्या सॅम ची कथा नायक सांगतो... ही विकृतीच ना...)
पाहिला नसेल तर जरूर पहा...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 24 November, 2008 - 18:14
विनय पाठकची प्रमुख भुमिका असलेला दसविदानिया बघितला. बहुदा बकेट लिस्ट वर आधारित आहे. मी बकेट लिस्ट अजुन बघीतला नाहीये. मरण्यापुर्वीच्या दहा इच्छा एक सामान्य क्लर्क असलेला माणुस कसा पुर्ण करतो यावर आहे हा सिनेमा. विनय पाठकचे काम मला आवडले. सिनेमा पण चांगला वाटला. रजत कपुर, रणवीर शौरी यांना फारच कमी काम आहे त्यामानाने सौरभ शुक्लाचा रोल जरा मोठाय.
यातली १-२ गाणी पण श्रवणीय आहेत. मला सोनु निगमने गायलेले 'आवारा राही गुमशुदा, बनके क्यो घुमे लापता' आवडलं.
Submitted by रूनी पॉटर on 25 November, 2008 - 14:35
दसविदानिया बघितला. छान सिनेमा आहे. अवश्य बघा. hats off to vinay pathak!!! मला वाटत बकेट लिस्ट वरुन कल्पना उचलली असेल पण प्रत्यक्षात बराच वेगळा आहे. काही प्रसंग फार touchy आहेत. फार लिहीत नाही पण नक्की बघणेबल.
किस्ना , युव्वराज सारखे चित्रपट बनवुन पैसा आणि वेळ फुकट घालविण्यापेक्षा तुमच्या "व्हिस्लिंग वूड" मधे होतकरु आणि कर्तुत्ववान तरुणाना शिष्यव्रुती द्या.
तुम्हाला दुवा तरी मिळेल.
आपला (यादे, किस्ना, युव्वराज, सौदागर, परदेस, ताल इ पुर्वीचा ) चाहता..
Submitted by mansmi18 on 25 November, 2008 - 13:15
मेमेन्टोमध्ये मानसिक विकृती नाही. मेमरी लॉस वरच आहे तो. हो, मी पाहिलेला आहे ७-८ वर्षांपूर्वी.
इटर्नल.. पण मानसिक उपचारांवर आहे असं नाही म्हणता येणार. पाहिलाय. रोमांस-कॉमेडी-सायन्स फिक्शन आहे.
मेमेन्टो मधे नायक अस्तित्वात नसलेल्या सॅम ची गोष्ट सांगत असतो...
स्वतःच बायकोचा खून केलेला असताना इतरांवर सूड उगवतो...
ही विकृती नाही का?
इटर्नल... रोमॅंटिक आहे हे मान्य... पण आठवणी पुसणे हा मी मानसिक उपचारच समजतो...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 25 November, 2008 - 14:02
इट्रनलचा शेवट फार सुंदर आहे.
क्युब हा सिनेमा पाहिलेले कोणी इथे आहेत काय? पाहिला असेल तर तर तो नक्की काय प्रकार होता ते कळावे,तो सिनेमा पहिल्यावर मी दोन दिवस पार भंजाळलो होतो.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
नुकताच १९७४ चा तनुजा चा 'हमराही' चित्रपट पाहिला ह्या चित्रपटात तनुजा Computer & Ele. Engg असते. १९७४ मध्ये भारतत 'संगणक, होता आणी संगणकाचि पदवी ही हे मला ठाव नव्हत. म्हणजे माझ्या जन्मा अगोदर देशात संगणक आला व्हाता तर.
१९७८ च्या शशी कपुर, राखी, हेमा आणी मोठा ब च्या 'त्रिशुल' मध्ये शशि कपुर राखीला Computer बोलावत असतो.
*****************************
काल 'गंगा जमना सरस्वती' पाहिला मोठा ब, मिथुन, मिनाक्षि, जया यांचा ह्या चित्रपटात प्राण्यांना किति अक्कल असते ते बघितल.
१. जया वर जबरदस्ति होत असतांना 'नागोबा' येतात व दुश्मन की आखो में डंक मारतात.
२. मोठा ब, मगरिंच्या तोंडि लटकलेला असतांना परत नागोबा येतात व ब च्या विनंतिचा मान राखुन आपले सु-प्रताप दाखवितात.... ब ला मगरींच्या पासुन वाचिवतात.
नागोबा की सापोबा कुणाला ठाउक पण कुठलासा सरपटी प्रकारातला प्राणी ज्याला कानेंद्रिय असतात. व good- mad, bad-man चा सेन्स ही असतो.
चित्रपटाच्या शेवटि... नेमकी त्या वेळी... जेव्हा कुणाच्या तरी मदतिची गरज असते... जेव्हा व्हिलन हिरोला टिपणार असतो... 'मगरोबा' दुश्मन वर झपाटतात व त्याला तोंडात घेतात.
सध्याच्या तणावभर्या परिस्थितीत दोन हलकेफुलके सिनेमे...
आपण मरणार हे समजल्यावर एका कॉमन मॅन आयुष्याकडून असलेल्या १० अपेक्षा... १० आकांक्षा... काय असतात आणि तो त्या कशा पुर्या करतो याची कहाणी... विनय पाठक चा जबरदस्त अभिनय आणि त्याला इतरांनी दिलेली मोलाची साथ यामुळे सिनेमा एक सुखद अनुभव देउन जातो...
ओये लक्की... चा पहिला शॉट पाहिला आणि एकदम शंका आली... की हा 'catch me.. if you can' ची कॉपी असणार...
पण अभय देओल वर अपेक्षा असल्यानी.. तो ही भूमिका कशी निभावतो ते बघायला म्हणून पुढे बघणं सुरू ठेवलं...
जसा जसा सिनेमा उलगडायला लागला.... तसं तसं जाणवायला लागलं की हे वेगळं रसायन आहे..
हा सिनेमा प्रेक्षकांना बुद्धी आहे असं समजून बनवलाय... परेश रावल ची तिहेरी भूमिका काहितरी सुचवण्यासाठी आहे...
सर्व सहायक कलाकारांनी अफलातून काम केलंय... मग तो लक्की चा 'बंगाली' मित्र असो अथवा 'डॉली'...
अभय देओल चा आणखी एक तगडा परफॉर्मंस आहे... अत्तापर्यंतच्या त्याच्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळा... आजच्या 'हीरो' च्या जमान्यात अभय देओल ला 'ऍक्टर' म्हणायला हरकत नाही... त्याच बरोबर तरूण लक्की चं काम करणारा मुलगा पण झकास आहे...
सिनेमाचा शेवट परत एकदा कॅच मी... किंवा बंटी और बबली च्या अंगानी जातो का? अशी धास्ती होती.. पण तो तसा जात नाही... एका वेगळ्याच वळणावर सिनेमा संपतो...
नक्की बघावेत असे दोन्ही सिनेमे....
मझ्याकडून दोन्ही सिनेमांना ५ पैकी ३.५ तारे...
दस्विदानिया मधल्या कैलाश खेर च्या एका गाण्याची सुरुवात त्याच्याच 'तेरी दीवानी' च्या सुरुवातीच्या चालीत आहे...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
Submitted by अँकी नं.१ on 29 November, 2008 - 11:17
कुणी देशद्रोही पाहिला आहे काय? अत्यंत 'विनोदी' आहे असे कळते.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
Baby Mama
Baby Mama पाहिला. टिना फे अन एमी पोह्लर चे नाव वाचून अपेक्षा होत्या पण काही खास वाटला नाही! नन्तर मग लेकीला नवीन आणून दिलेला टिन्कर बेल पाहिला तो मात्र अगदी बेष्ट होता! मस्त कथा, क्यूट कॅरॅक्टर्स!!
गोलमाल
गोलमाल रीटर्नस पाहिला..... पहिल्या गोलमालची सर नाहीये... शर्मन जोशीला मिस केलं.... पण आपला श्रेयस तळपदे भाव खाउन जातो... एकुणच यथतथा...
हा चित्रपट "आज कि ताजा खबर" या जुन्या चित्रपटावर बेललेला आहे. त्यात किरण कुमार आणि असरानी होरो होते. म्हणजे चालला नव्हता हे ओघाओघाने आलेच. पण त्यावर बेतलेला मराठीत आलेला फेका फेकी मात्र धम्माल होता. अशोक सराफ, लक्षा, चेतन दळवी, उदय टिकेकर, सविता प्रभुणे, निवेदिता जोशी, अजय वढावकर... अशी तगडी कास्ट होती त्यात. मला तो फार आवडला होता. आणि त्याचमुळे कदाचित गोलमाल रिटर्नस पाहताना ती मजा आली नाही. आता हिंदी म्हणुन त्यानी कथेला खुनाची फोडणी वगैरे देऊन चित्रपट चट्पटीत करायचा प्रयत्न केलाय.. पण भट्टी म्हणावी तशी जमली नाहीये. लक्षात राहण्यासारखा एकही प्रसंग नाहीये... फक्त पहील्या चित्रपटाप्रमाणे यातही संजय लिला भंसालीच्या चित्रपटांवर तोंडसुख घेण्यात आलेय...
त्यामुळे ज्यानी फेकाफेकी पाहिला नाहीये ते एकदा पाहु शकतील....
मॅडगास्कर
मॅडगास्कर २ पाहीला. ठिक आहे ऐकदा पाहन्यासारखा. पण वॉव फॅक्टर थोडे कमी पडले.
ओह ओह.. मी
ओह ओह.. मी आत्ता चाल्लीए मादागास्करला.. बघु कसा वाटतोय..
गॉड ने
गॉड ने बनायी जोडी की काय चित्रपट येतोय त्याचे कथासुत्र "shall we dance" वरुन ढापले आहे असे माझे स्पष्ट आणि प्रामाणिक (एक)मत आहे
हा चित्रपट १२ डिसेंबरला थेटरात येणार आहे.
प्रोमो
प्रोमो पाहिले त्याचे. शाहरुख चा कसला बावळ्ट्ट अवतार अन त्याहून येडपट नाच आहे त्या 'हौले हौले हो जायेगा प्यार' गाण्यात!!
शाहरुख
शाहरुख चांगलाच म्हातारा दिसतो आता. त्याने वडिल भावाची (हे वडिल, भावाची किंवा वडिलभावाची कसेही वाचा
) भुमिका करायचे दिवस आलेत.
काही
काही दिवसांपुर्वी US मध्ये IFC चॅनेलवर "Born In Brothel" पाहिला. ही एक डॉक्युमेंट्री आहे. कलकत्त्याच्या रेड लाईट एरीयात वाढणार्या मुलावर हा चित्रपट आहे. Zana Briski ही फोटोग्राफर त्या भागातल्या बायकांबद्दल अभ्यास करायला गेली होती. तिथे तिने त्या बायकांची मुले पाहिली. एक प्रयोग म्हणुन तिने काही मुलांना कॅमेरा दिला आणि फोटो काढायला शिकवले/ सांगितले..... Amazing photos आहेत. त्याच बरोबर त्यांची त्या फोटोबद्दलची समज बघुन मला माझी लाज वाटली. ह्या बरोबरच त्या मुलांचे आणि त्या बरोबर आजुबाजुच्या माणसांचे life दाखवले आहे. MUST SEE सिनेमा आहे आणि त्या मुलांनी काढलेले फोटोही.
.....................................
Ciderellaच्या पोस्ट वरुन आठवले: ते "माँ का लाडला बिगड गया"हे हॅमरींग गाणे पाहुन "दोस्ताना" बहुधा I Now Pronounce You Chuck & Larry वरुन घेतला असावा असे वाटते.
दोस्ताना
दोस्ताना पाहिला...
टाईमपास आहे....
धो धो हसायला येणार नाही पण हसायला येईल...
उत्तरार्धात थोडा ताणल्यासारखा ही वाटेल...
अभिषेक जॉन आणि बॉबी ठीक ठाक...
प्रियांका जबरदस्त दिसते...
शिल्पा शेट्टी उगाचंच...
फार विचार वगैरे न करता दोन अडीच तास घालवायचे असतील तर आणि तरंच बघा....
आणि आनंदी लोक आणि त्या संबंधीचे विनोद घरच्यांना पचत असतील तर घरच्यांबरोबर ही बघू शकता...
_______
स्वस्थ खा आणि मस्त रहा !
आनंदी लोक
आनंदी लोक >>> शब्द आवडला.
मानसिक
मानसिक आजार / विकृती / उपचार या विषयांवरचे काही इंग्रजी सिनेमे पाहिले...
१- The Notebook
romantic सिनेमा आहे... चांगला आहे... मानसिक आजार झालेल्या एका वृद्धेला हॉस्पिटल मधला एक वृद्ध एक कथा वाचून दाखवतो... श्रीमंत नायिका-गरीब नायकाची... फिल्लमबाजांना कथेचा लगेच अंदाज येईल... पण overall taking छान आहे...
अजय देवगण चा U Me aur Hum याच्यावरच बेतलेला होता...
२- Memento
हा thriller आहे... अपघात आणि सूडापायी मनोविकृती आलेला नायक आणि त्यानी आरंभलेलं खुनाचं सत्र... हा पण छान आहे...
आमिर खान चा आगामी गझनी याच्यावरूनच घेतलाय...
३- Eternal Sunshine of The Spotless Mind
जिम कॅरी आणि केट विंस्लेट चा सुंदर अभिनय, सशक्त आणि original कथा...
love @ 1st sight नंतर मतभेदांनी बिथरलेली नायिका एका agency च्या उपचारांनी नायकाला मनातून पुसुन टाकते...
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून नायक पण तोच उपचार करवून घेतो... पण त्यात त्याला परत तिच्यावरचं प्रेम जाणवतं... पण आता खूपच उशीर झालेला असतो... की नसतो...
अप्रतीम सिनेमा आहे... जरूर बघा....
खरंतर तीन्ही बघायला हवेत...
पण वेळ नसेल तर Eternal Sunshine.... तरी बघाच....
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
memento : यात
memento : यात मानसिक विकार कुठेय, short term memory loss होतो त्या हीरो ला.
मैत्रेयी, स
मैत्रेयी,
सिनेमा पाहिला आहात का...?
short term memory loss आहेच
पण मनोविकार / मनोविकृती पण आहे... (रहस्यभेद करत नाही... पण अस्तित्वात नसलेल्या सॅम ची कथा नायक सांगतो... ही विकृतीच ना...)
पाहिला नसेल तर जरूर पहा...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
विनय
विनय पाठकची प्रमुख भुमिका असलेला दसविदानिया बघितला. बहुदा बकेट लिस्ट वर आधारित आहे. मी बकेट लिस्ट अजुन बघीतला नाहीये. मरण्यापुर्वीच्या दहा इच्छा एक सामान्य क्लर्क असलेला माणुस कसा पुर्ण करतो यावर आहे हा सिनेमा. विनय पाठकचे काम मला आवडले. सिनेमा पण चांगला वाटला. रजत कपुर, रणवीर शौरी यांना फारच कमी काम आहे त्यामानाने सौरभ शुक्लाचा रोल जरा मोठाय.
यातली १-२ गाणी पण श्रवणीय आहेत. मला सोनु निगमने गायलेले 'आवारा राही गुमशुदा, बनके क्यो घुमे लापता' आवडलं.
दसविदानिय
दसविदानिया बघितला. छान सिनेमा आहे. अवश्य बघा. hats off to vinay pathak!!! मला वाटत बकेट लिस्ट वरुन कल्पना उचलली असेल पण प्रत्यक्षात बराच वेगळा आहे. काही प्रसंग फार touchy आहेत. फार लिहीत नाही पण नक्की बघणेबल.
सुभाष घई
सुभाष घई याना नम्र सूचना..
किस्ना , युव्वराज सारखे चित्रपट बनवुन पैसा आणि वेळ फुकट घालविण्यापेक्षा तुमच्या "व्हिस्लिंग वूड" मधे होतकरु आणि कर्तुत्ववान तरुणाना शिष्यव्रुती द्या.
तुम्हाला दुवा तरी मिळेल.
आपला (यादे, किस्ना, युव्वराज, सौदागर, परदेस, ताल इ पुर्वीचा ) चाहता..
मेमेन्टोम
मेमेन्टोमध्ये मानसिक विकृती नाही. मेमरी लॉस वरच आहे तो. हो, मी पाहिलेला आहे ७-८ वर्षांपूर्वी.
इटर्नल.. पण मानसिक उपचारांवर आहे असं नाही म्हणता येणार. पाहिलाय. रोमांस-कॉमेडी-सायन्स फिक्शन आहे.
मेमेन्टो
मेमेन्टो मधे नायक अस्तित्वात नसलेल्या सॅम ची गोष्ट सांगत असतो...
स्वतःच बायकोचा खून केलेला असताना इतरांवर सूड उगवतो...
ही विकृती नाही का?
इटर्नल... रोमॅंटिक आहे हे मान्य... पण आठवणी पुसणे हा मी मानसिक उपचारच समजतो...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
त्याला
त्याला आठवत नसते हो काही! त्या सगळ्या कृतीच्या मागे मेमरी लॉस आहे.
बर, तुमचंच खरं!
मी
मी मेमेन्टो बघून ३-४ वर्षे झाली, पण असं आठवतय की २ लोक त्याचा अन त्याच्या मेमरी लॉस चा उपयोग करून घेतात इतरांचा काटा काढायला.
बर जाऊ द्या झालं
New Terminator poster is
New Terminator poster is animated
http://www.traileraddict.com/trailer-news/110
cool concept.
इट्रनलचा
इट्रनलचा शेवट फार सुंदर आहे.
क्युब हा सिनेमा पाहिलेले कोणी इथे आहेत काय? पाहिला असेल तर तर तो नक्की काय प्रकार होता ते कळावे,तो सिनेमा पहिल्यावर मी दोन दिवस पार भंजाळलो होतो.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
नुकताच
नुकताच १९७४ चा तनुजा चा 'हमराही' चित्रपट पाहिला ह्या चित्रपटात तनुजा Computer & Ele. Engg असते. १९७४ मध्ये भारतत 'संगणक, होता आणी संगणकाचि पदवी ही हे मला ठाव नव्हत.
म्हणजे माझ्या जन्मा अगोदर देशात संगणक आला व्हाता तर. 
१९७८ च्या शशी कपुर, राखी, हेमा आणी मोठा ब च्या 'त्रिशुल' मध्ये शशि कपुर राखीला Computer बोलावत असतो.
*****************************
काल 'गंगा जमना सरस्वती' पाहिला मोठा ब, मिथुन, मिनाक्षि, जया यांचा ह्या चित्रपटात प्राण्यांना किति अक्कल असते ते बघितल.
१. जया वर जबरदस्ति होत असतांना 'नागोबा' येतात व दुश्मन की आखो में डंक मारतात.
२. मोठा ब, मगरिंच्या तोंडि लटकलेला असतांना परत नागोबा येतात व ब च्या विनंतिचा मान राखुन आपले सु-प्रताप दाखवितात.... ब ला मगरींच्या पासुन वाचिवतात.
नागोबा की सापोबा कुणाला ठाउक पण कुठलासा सरपटी प्रकारातला प्राणी ज्याला कानेंद्रिय असतात. व good- mad, bad-man चा सेन्स ही असतो.
चित्रपटाच्या शेवटि... नेमकी त्या वेळी... जेव्हा कुणाच्या तरी मदतिची गरज असते... जेव्हा व्हिलन हिरोला टिपणार असतो... 'मगरोबा' दुश्मन वर झपाटतात व त्याला तोंडात घेतात.
पुण्यातली
पुण्यातली मगर पण अशीच कोणाच्या तरी मदतीला धाऊन गेली असेल...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
दस्विदानि
दस्विदानिया आणि ओये लक्की लक्की ओये...
सध्याच्या तणावभर्या परिस्थितीत दोन हलकेफुलके सिनेमे...
आपण मरणार हे समजल्यावर एका कॉमन मॅन आयुष्याकडून असलेल्या १० अपेक्षा... १० आकांक्षा... काय असतात आणि तो त्या कशा पुर्या करतो याची कहाणी... विनय पाठक चा जबरदस्त अभिनय आणि त्याला इतरांनी दिलेली मोलाची साथ यामुळे सिनेमा एक सुखद अनुभव देउन जातो...
ओये लक्की... चा पहिला शॉट पाहिला आणि एकदम शंका आली... की हा 'catch me.. if you can' ची कॉपी असणार...
पण अभय देओल वर अपेक्षा असल्यानी.. तो ही भूमिका कशी निभावतो ते बघायला म्हणून पुढे बघणं सुरू ठेवलं...
जसा जसा सिनेमा उलगडायला लागला.... तसं तसं जाणवायला लागलं की हे वेगळं रसायन आहे..
हा सिनेमा प्रेक्षकांना बुद्धी आहे असं समजून बनवलाय... परेश रावल ची तिहेरी भूमिका काहितरी सुचवण्यासाठी आहे...
सर्व सहायक कलाकारांनी अफलातून काम केलंय... मग तो लक्की चा 'बंगाली' मित्र असो अथवा 'डॉली'...
अभय देओल चा आणखी एक तगडा परफॉर्मंस आहे... अत्तापर्यंतच्या त्याच्या भूमिकांपेक्षा एकदम वेगळा... आजच्या 'हीरो' च्या जमान्यात अभय देओल ला 'ऍक्टर' म्हणायला हरकत नाही... त्याच बरोबर तरूण लक्की चं काम करणारा मुलगा पण झकास आहे...
सिनेमाचा शेवट परत एकदा कॅच मी... किंवा बंटी और बबली च्या अंगानी जातो का? अशी धास्ती होती.. पण तो तसा जात नाही... एका वेगळ्याच वळणावर सिनेमा संपतो...
नक्की बघावेत असे दोन्ही सिनेमे....
मझ्याकडून दोन्ही सिनेमांना ५ पैकी ३.५ तारे...
दस्विदानिया मधल्या कैलाश खेर च्या एका गाण्याची सुरुवात त्याच्याच 'तेरी दीवानी' च्या सुरुवातीच्या चालीत आहे...
_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!
कैलाश
कैलाश खेरचा नरेन्द्र चंचल होणार म्हणजे....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
काल 'Sorry Bha'i
काल 'Sorry Bha'i पाहिला या चित्रपटाला "मां कसम" हे नाव जास्त योग्य होत्..चित्रपट कसा आहे हे ज्याच त्याने बघुन ठरवाव :)...I hv no comments
'युवराज'... सुभाष घई चा नसता काज...बघतांना मेंदुला येते खाज..वाट्त कोणाच मु देखाथा आज
काहि directorस ला बघणार्यांना डोक नाहि अस का वाटत???? Family Family, Relation चा नसता ढोल वाजनवुन लोकांना पकवतात. तेच तेच फालतु emotional drame
'Sorry Bhai' मी
'Sorry Bhai' मी पाहीला. मला थोडा weird वाटला.
बोमन इरानी चं काम एकदम मस्त.
दसविदानीया मात्र खुप छान आहे.
'उलाढाल'
'उलाढाल' एकदम भिकार आहे. कोणी फुकटसुद्धा बघू नका!
कुणी

Pages