२६ जानेवारी २०१० ला मी सकाळी झुम चॅनल चालु केले आणि तेवढ्यात एक गाणे दिसले. "फिर मिले सुर मेरा तुम्हारा." हे ऐकुन मन आठवणीत गुंतले. पहिल्यांदा आठवले ते मिले सुर मेरा तुम्हाराचे बोल. आणि त्या नंतर लगेच एका पाठोपाठ दुरदर्शनच्या सगळे कार्यक्रम आठवले.
दुरदर्शन १५ सप्टें. १९६० ला पहिल्यांदा सुरु झाले. पण पहिल्यांदा ते फक्त सातच शहरात दिसत होते. नंतर १९८२ ला ते देशभर दिसायला सुरुवात झाली.(विकिपेडीया वरुन साभार.).
माझा जन्म १९८६ चा. मला अजुनही आठवत आहे की मी त्यावेळेस ४ ते पाच वर्षाचा असेल आमच्या गावात आमच्याकडे पहिला टि.व्हि. होता आणि तो माझ्या आजोबांनी मुंबईवरुन आणला होता. त्यावेळेस आमच्या तीन मजली घरावर ७० फुट वर तो अॅटेंना लावावा लागायचा कारण प्रक्षेपण फक्त मुंबईवरुन असायचे. त्यावेळेस रामायण आणि महाभारत लागायचे. सगळा गावं आमच्याघरी ते बघायला १० ते १२ दरम्यान असायचा. फार अप्रुप वाटायचं त्यावेळेस सगळी लोक घरी आल्यामुळे. तो टि.व्हि. हि भारी होता क्राऊन कंपणीचा शटरवाला त्याला कुलुपही टाकता यायचं. तो टि.व्हि. जवळपास मी १० वी ला येईपर्यंत चालु होता. त्यावेळेस लोकांना टि.व्हि. हा प्रकार माहित नव्हता, त्या मुळे ते रामच पात्र दिसलं कि त्याला नमस्कार करायचे. तुम्हाला सांगतो तुम्हाला हसु येईल कदाचीत पण अक्षरशः रामायनात रामाने रावणाला मारले होते त्यावेळेस लोकांनी आमच्या घरी नारळ फोडुन आनंद व्यक्त केला होता.
(आंतरजाला वरुन साभार.)
नंतर नंतर मला जसे जसे कळु लागले मग दर रविवारी रंगोली नावाचा कार्यक्रम सुरु झाला. त्या वेळेस हिंदी मुव्हीजची गाणी फक्त याच कार्यक्रमात बघायला भेटायची. त्यामुळे मी शनिवारी शाळा असुन मी लवकर उठत नव्हतो पण रविवारी मात्र पहाटेच ५ ला उठायचो आणि टि.व्हि. लावुन बसायचो. मग चालु व्हायचे ते वंदेमातरम ते झाले की मी दात घासुन ,दुध पिऊन तयार व्हायचो. मग लागायचे ते ugc countrywide classroom मग ते ही पाहयचो. कारण त्यात विज्ञानाचे प्रयोग दाखवायचे. मग ७ वाजे पर्यंत तेच चालु असायचे. त्यानंतर ७ च्या हिंदी बातम्या लागायच्या आणि ७:१५ ला रंगोली चालु व्हायची.
'मेरे सपनो कि राणी कब आयेगी तु' हे गाणे त्या वेळेस पहिल्यांदा मी इथेच ऐकले आणि आवडले (अजुनही हेच गाणे म्हणत आहे हि गोष्ट वेगळी ). ह्या कार्यक्रमाची खासीयत म्हणजे सगळा परीवार बसुन बघु शकतो अशीच गाणे लावने. अजुनही रंगोली असेच गाणे लावते ते सगळ्यांना बघता येतील.ती चालायची ८:१५ पर्यंत. नंतर मी सगळ आवरुन परत ११ वाजता टि.व्हि. समोर बसायचो. त्यावेळेस तो "भारत एक खोज" कार्यक्रम संपत आलेला असायचा. लहान असल्यांमुळे त्या कार्यक्रमापेक्षा मला कार्टुन जास्त आवडायची. मग मी हा हि कार्यक्रम नियमाने पाहत होतो. ११ वाजता आगमण व्हायचे ती मिकी माऊस चे आणि त्या नंतर डक टेल्सचे (हे मला अजुनही खुप आवडते). खुप धमाल करायची हे चौघे मिळुन.
काही काळानंतर एक नविन मालिका सुरु झाली. तुम्हाला आठवते का ती मालिका खुप हिट झाली होती ती बघ बरं आठवुन जरा....... आठवली??... नाहि मी सांगतो.
चंद्रकांता... आठवली का? त्यातला तो यख्खु पिताजी म्हणनारा. क्रुर सिंग? आठवला का? त्यावेळेस ती रवीवारी सकाळी ९ ला सुरु व्हायची. मी त्यावेळेस ४ ला होतो. हि मालिका आठवण्याच कारण म्हणजे मी ४ ला आम्हाला त्यावेळेस बोर्ड होता आणि रविवारी पेपर असल्यामुळे मला ती मालिका पाहता आली नव्हती तर मी रडलो होतो की मला पेपर नाही द्यायचा म्हणुन.
(आंतरजाला वरुन साभार.)
ह्या मालिकेवर आम्ही खेळ खेळायचो. कोणी क्रुर सिंग तर कोणि तो राजकुमार होत होता आणि आमची एक मैत्रीन तिला आम्ही चंद्रकांता बनवायचो. आणि मी राजकुमार होत होतो (तिला अन मला बरेच दिवस नवरा बायको म्हणुन चिडवत होते ).
मग वाट बघायची ती मराठी पिक्चरची जो लागतो ४ वा वाजता. अजुनही लागतो. पण त्या वेळेस त्या पिक्चरची मजाच काही और होती. त्या नंतर ७ च्या बातम्या. ह्या लागल्या की सगळे घरचे, शेजारपाजारचे यायचे जगाशी तो एकमेव संबध होता. आम्हा लहान मुलांना त्या वेळेस गोंधळ करण्यास सक्त मनाई असायची. त्या वेळेस बातम्या सांगायला यायचे अनंत भावे, वांसती वर्तक. अनंत भावे यांना खुप दाढी होती म्हणुन मी त्यांना भुप्पा म्हणायचो. ह्या बातम्या झाल्या की नंतर बघण्यासारखा एकच कार्यक्रम तो म्हणजे
सुरभी
ह्या मधुन पुढे आले ती रेणुका शहाणे आणि सिध्धार्थ काक. १९९२ पासुन यांनी आख्या भारतातल्या रसीकांवर राज्य केलें. हाच तो पहीला कार्यक्रम होता ज्या मधे ए. आर. रेहमाण यांची प्रथम दखल घेण्यात आली होती. ह्या कार्यक्रमामुळे भारताचे बरेच माहित नसलेल्या कला, ठिकाणे, कला, व्यक्ती प्रसीद्ध झाल्या. ह्याच music तर अजुनहि मनाला भुरळ पाडते.
ह्या झाल्या सगळ्या रविवारच्या मालिका. आता पाहुयात सोमवारच्या मालिका. तुम्हाला पहीली डेलीसोप माहिती आहे का? कुठली बरं??????
आठवतेय सोम. ते शुक्र. लागायची ती... दररोज सकाळी ११ वाजता. ती होती शांती. मंदिरा बेदीची मालिका.
कौंटुंबीक ऊहापोह आणि इस्टेटी साठी भांडणे हेच चालायचे सगळे त्यात. चार दिवस सासुचे झक मारते हि मालिका पाहिल्यावर. फार किचकट पण फार सुपर डुपर हिट त्याकाळची. मला आठवत नाही पण शांतीने सुध्धा ४ नवरे बदलले होते वाटतं.
मंदिरा बेदी वरुन आपली मराठी हिरोईन विसरुन कशी चालेल ती दुरदर्शन मधुनच पुढे आली ती म्हणजे पल्लवी जोशी. तिची मालीका तुम्हाला आठवते का त्यात पल्लवी जोशी आणि आपला आर. माधवन होता??
नाही आठवत ती मालीका म्हणजे "सी हॉक्स".
ह्या मालिके मधुन हे दोघेही पुढे आले. मालिकेचं खास वर्णन म्हणजे हि नौदलाच्या आयुष्यावर होती. ह्या मधुन देशप्रेमाचा संदेश दिला जायचा. ह्या मालिकेमुळे माझ्या मनात तरी नौदला विषयी अभीमान वाढला होता. कारण नौदल काय असतं ते ह्याच मालिके मुळेच कळाले.
आता ज्यांना फक्त डिटेक्टीव टाईप कथा आवडायच्या त्यांच्यासाठी ब्योंमकेश बक्षी नावाची एक मालिका होती.काय सॉलीड होती माहीती आहे का? आताच्या C.I.D. मालिकेला ती एकच मालिका छप्पन वेळेस तरी विकत घेईल. रजीत कपुर च्या अभीनयाने ते पात्र अगदीच खरे वाटत होते. ह्याचे काही भाग युट्युब वर आहेत. ते पाहिल्यावर आपल्याला अनुभव येईलच.
नेक्श्ट आहे ते मालगुडी डेज. ह्या बद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही हि मालिका सगळ्यांनाच माहिती आहे. तरीहि थोडेसे सांगतो. आर. के. नारायन यांच्या लेखणीतून उतरेलं एक एक पात्र म्हणजे त्या काळातील एका एका गावातील एक एक नमुना होता.
हे पात्र आठवत असेलच तुम्हाला???
नाव सांगता येईल का तुम्हाला....
क्रमश...........
**************************************************
तळटीप :- अनंत भावे यांच्याबद्दल जे काही लिहले आहे त्या बद्दलं मी त्यांची माफी मागतो. ती एक माझी लहानपणची आठवण होती. ती आजही मनावर कोरलेली आहे. मला तुम्हाला शेअर करावी वाटली म्हणुन सांगीतली. त्यांच्या बद्दलं माझ्या मनात आजही आदर आहे.
कसल्या मस्त आठवणींणा उजाळा
कसल्या मस्त आठवणींणा उजाळा दिलास
ये जो है जिंदगी, नुक्कड,
ये जो है जिंदगी, नुक्कड, मनोरंजन आणि सर्कस या मालिका तर कासिक होत्या. ये जो है.. हा भारतिय टीव्हीवरचा सर्वात हास्यस्फोटक शो असेल.
कुंदन शहा आणि अजीज मिर्झा सारखे दिग्दर्शक दूरदर्शनेच दिले ऐसा भी होता है आणि त्याचं पुढच विस्तारित रूप म्हणजे सुरभि हे देखील आवडलेले शोज. स्टार ट्रेक या मालिकेने रविवार सकाळी दूरदर्शन सुरू केलं. ते संपल कि यूएफओ मग दर्पण ( नंतर कथासागर) असा क्रम असायचा. रामायण सुरू झाल्यावर मात्र दूरदर्शन एकदम लोकप्रिय झालं. महाभारताच्या वेळी तर सकाळी ९ वा रस्ते ओस पडलेले असायचे.
रविवारचं आमचं क्रिकेट या मालिकांमुळेच बंद पडलं.
कसल्या मस्त आठवणींणा उजाळा
कसल्या मस्त आठवणींणा उजाळा दिलास>>अनुमोदन
"शाहरुख खान" चा "सर्कस" कुणाला आठवतोय का...????
दुरदर्शन वरच लागायचा ना..???
हो चातक आठवत आहे फक्त मी इथे
हो चातक आठवत आहे फक्त मी इथे ती लिहली नाही....
"शाहरुख खान" चा "सर्कस"
"शाहरुख खान" चा "सर्कस" कुणाला आठवतोय का...???? >>> सर्कस मधे शाहरूखची एंट्री फार उशिरा होती... त्याने काम केलेली पहिली मालिका 'फौजी' तर खूपच आवडायची.
कुणाला ती आनंदी गोपाळ मालिका
कुणाला ती आनंदी गोपाळ मालिका आठवते का? मराठीतली....
ति माझ्याकडुन लिहायची विसरी... आज सकाळ पेपर मधे त्या मालिकेवर लेख आला आहे.. म्हणुन आठवली
शब्दांच्या पलीकडले आणि
शब्दांच्या पलीकडले आणि प्रतिभा आणि प्रतिमा , शरदाचे चांदणे हे कार्यक्रम पण खूप सुंदर होते. श-प मध्ये नवीन गीते सादर केली जायची. सर्वस्व तुजला वाहुनी, काही बोलायाचे आहे, माझ्या मातीचे गायन ही गीते प्रथम इथेच सादर झाली होती.
रविवारी संध्या ५ च्या सुमारास
रविवारी संध्या ५ च्या सुमारास एक आजादी कि कहानी म्हणुन लहान मुलांसाठी एक सिरीयल असायची.
चित्र स्वरूपात स्वातंत्र्य लढ्या ची गोष्ट सांगायचे. फार छान माहिती सांगायचे (दाखवायचे).
आणखी एक कार्टून सदृश सिरीयल होती रात्री ला दाखवायचे, "History of Mankind" असंच काहीतरी, त्यात माणसाचे उगम, त्याचे राहणीमान कसे बदलत गेले ते दाखवले होते.
कोणाला आठवतं का ??? अंदाजे २८-३० वर्षा पुर्वी / दरम्यान चे हे दुरदर्शन वरील कार्यक्रम.
अंदाजे २८-३० वर्षा पुर्वी>>
अंदाजे २८-३० वर्षा पुर्वी>> नाही हो त्या वेळेस मी जन्मलो नव्हतो
बरचसं ऐकून आहे... त्यातल्या
बरचसं ऐकून आहे... त्यातल्या ब-याचशा मालिका सब, सहारा आदि वाहीन्यांवर न चुकता पाहील्या. हेवा वाटला त्या काळाचा.
Pages