दुरदर्शन माझ्या आठवणी :- भाग-१...

Submitted by किश्या on 21 December, 2010 - 01:21

२६ जानेवारी २०१० ला मी सकाळी झुम चॅनल चालु केले आणि तेवढ्यात एक गाणे दिसले. "फिर मिले सुर मेरा तुम्हारा." हे ऐकुन मन आठवणीत गुंतले. पहिल्यांदा आठवले ते मिले सुर मेरा तुम्हाराचे बोल. आणि त्या नंतर लगेच एका पाठोपाठ दुरदर्शनच्या सगळे कार्यक्रम आठवले.

दुरदर्शन १५ सप्टें. १९६० ला पहिल्यांदा सुरु झाले. पण पहिल्यांदा ते फक्त सातच शहरात दिसत होते. नंतर १९८२ ला ते देशभर दिसायला सुरुवात झाली.(विकिपेडीया वरुन साभार.).

माझा जन्म १९८६ चा. मला अजुनही आठवत आहे की मी त्यावेळेस ४ ते पाच वर्षाचा असेल आमच्या गावात आमच्याकडे पहिला टि.व्हि. होता आणि तो माझ्या आजोबांनी मुंबईवरुन आणला होता. त्यावेळेस आमच्या तीन मजली घरावर ७० फुट वर तो अ‍ॅटेंना लावावा लागायचा कारण प्रक्षेपण फक्त मुंबईवरुन असायचे. त्यावेळेस रामायण आणि महाभारत लागायचे. सगळा गावं आमच्याघरी ते बघायला १० ते १२ दरम्यान असायचा. फार अप्रुप वाटायचं त्यावेळेस सगळी लोक घरी आल्यामुळे. तो टि.व्हि. हि भारी होता क्राऊन कंपणीचा शटरवाला त्याला कुलुपही टाकता यायचं. तो टि.व्हि. जवळपास मी १० वी ला येईपर्यंत चालु होता. त्यावेळेस लोकांना टि.व्हि. हा प्रकार माहित नव्हता, त्या मुळे ते रामच पात्र दिसलं कि त्याला नमस्कार करायचे. तुम्हाला सांगतो तुम्हाला हसु येईल कदाचीत पण अक्षरशः रामायनात रामाने रावणाला मारले होते त्यावेळेस लोकांनी आमच्या घरी नारळ फोडुन आनंद व्यक्त केला होता.

(आंतरजाला वरुन साभार.)

नंतर नंतर मला जसे जसे कळु लागले मग दर रविवारी रंगोली नावाचा कार्यक्रम सुरु झाला. त्या वेळेस हिंदी मुव्हीजची गाणी फक्त याच कार्यक्रमात बघायला भेटायची. त्यामुळे मी शनिवारी शाळा असुन मी लवकर उठत नव्हतो पण रविवारी मात्र पहाटेच ५ ला उठायचो आणि टि.व्हि. लावुन बसायचो. मग चालु व्हायचे ते वंदेमातरम ते झाले की मी दात घासुन ,दुध पिऊन तयार व्हायचो. मग लागायचे ते ugc countrywide classroom मग ते ही पाहयचो. कारण त्यात विज्ञानाचे प्रयोग दाखवायचे. मग ७ वाजे पर्यंत तेच चालु असायचे. त्यानंतर ७ च्या हिंदी बातम्या लागायच्या आणि ७:१५ ला रंगोली चालु व्हायची.
'मेरे सपनो कि राणी कब आयेगी तु' हे गाणे त्या वेळेस पहिल्यांदा मी इथेच ऐकले आणि आवडले (अजुनही हेच गाणे म्हणत आहे हि गोष्ट वेगळी Happy ). ह्या कार्यक्रमाची खासीयत म्हणजे सगळा परीवार बसुन बघु शकतो अशीच गाणे लावने. अजुनही रंगोली असेच गाणे लावते ते सगळ्यांना बघता येतील.ती चालायची ८:१५ पर्यंत. नंतर मी सगळ आवरुन परत ११ वाजता टि.व्हि. समोर बसायचो. त्यावेळेस तो "भारत एक खोज" कार्यक्रम संपत आलेला असायचा. लहान असल्यांमुळे त्या कार्यक्रमापेक्षा मला कार्टुन जास्त आवडायची. मग मी हा हि कार्यक्रम नियमाने पाहत होतो. ११ वाजता आगमण व्हायचे ती मिकी माऊस चे आणि त्या नंतर डक टेल्सचे (हे मला अजुनही खुप आवडते). खुप धमाल करायची हे चौघे मिळुन.

काही काळानंतर एक नविन मालिका सुरु झाली. तुम्हाला आठवते का ती मालिका खुप हिट झाली होती ती बघ बरं आठवुन जरा....... आठवली??... नाहि मी सांगतो.
चंद्रकांता... आठवली का? त्यातला तो यख्खु पिताजी म्हणनारा. क्रुर सिंग? आठवला का? त्यावेळेस ती रवीवारी सकाळी ९ ला सुरु व्हायची. मी त्यावेळेस ४ ला होतो. हि मालिका आठवण्याच कारण म्हणजे मी ४ ला आम्हाला त्यावेळेस बोर्ड होता आणि रविवारी पेपर असल्यामुळे मला ती मालिका पाहता आली नव्हती तर मी रडलो होतो की मला पेपर नाही द्यायचा म्हणुन.

(आंतरजाला वरुन साभार.)

ह्या मालिकेवर आम्ही खेळ खेळायचो. कोणी क्रुर सिंग तर कोणि तो राजकुमार होत होता आणि आमची एक मैत्रीन तिला आम्ही चंद्रकांता बनवायचो. आणि मी राजकुमार होत होतो (तिला अन मला बरेच दिवस नवरा बायको म्हणुन चिडवत होते Wink ).

मग वाट बघायची ती मराठी पिक्चरची जो लागतो ४ वा वाजता. अजुनही लागतो. पण त्या वेळेस त्या पिक्चरची मजाच काही और होती. त्या नंतर ७ च्या बातम्या. ह्या लागल्या की सगळे घरचे, शेजारपाजारचे यायचे जगाशी तो एकमेव संबध होता. आम्हा लहान मुलांना त्या वेळेस गोंधळ करण्यास सक्त मनाई असायची. त्या वेळेस बातम्या सांगायला यायचे अनंत भावे, वांसती वर्तक. अनंत भावे यांना खुप दाढी होती म्हणुन मी त्यांना भुप्पा म्हणायचो. ह्या बातम्या झाल्या की नंतर बघण्यासारखा एकच कार्यक्रम तो म्हणजे

सुरभी

ह्या मधुन पुढे आले ती रेणुका शहाणे आणि सिध्धार्थ काक. १९९२ पासुन यांनी आख्या भारतातल्या रसीकांवर राज्य केलें. हाच तो पहीला कार्यक्रम होता ज्या मधे ए. आर. रेहमाण यांची प्रथम दखल घेण्यात आली होती. ह्या कार्यक्रमामुळे भारताचे बरेच माहित नसलेल्या कला, ठिकाणे, कला, व्यक्ती प्रसीद्ध झाल्या. ह्याच music तर अजुनहि मनाला भुरळ पाडते.

ह्या झाल्या सगळ्या रविवारच्या मालिका. आता पाहुयात सोमवारच्या मालिका. तुम्हाला पहीली डेलीसोप माहिती आहे का? कुठली बरं??????
आठवतेय सोम. ते शुक्र. लागायची ती... दररोज सकाळी ११ वाजता. ती होती शांती. मंदिरा बेदीची मालिका.

कौंटुंबीक ऊहापोह आणि इस्टेटी साठी भांडणे हेच चालायचे सगळे त्यात. चार दिवस सासुचे झक मारते हि मालिका पाहिल्यावर. फार किचकट पण फार सुपर डुपर हिट त्याकाळची. मला आठवत नाही पण शांतीने सुध्धा ४ नवरे बदलले होते वाटतं.
मंदिरा बेदी वरुन आपली मराठी हिरोईन विसरुन कशी चालेल ती दुरदर्शन मधुनच पुढे आली ती म्हणजे पल्लवी जोशी. तिची मालीका तुम्हाला आठवते का त्यात पल्लवी जोशी आणि आपला आर. माधवन होता??
नाही आठवत ती मालीका म्हणजे "सी हॉक्स".

ह्या मालिके मधुन हे दोघेही पुढे आले. मालिकेचं खास वर्णन म्हणजे हि नौदलाच्या आयुष्यावर होती. ह्या मधुन देशप्रेमाचा संदेश दिला जायचा. ह्या मालिकेमुळे माझ्या मनात तरी नौदला विषयी अभीमान वाढला होता. कारण नौदल काय असतं ते ह्याच मालिके मुळेच कळाले.

आता ज्यांना फक्त डिटेक्टीव टाईप कथा आवडायच्या त्यांच्यासाठी ब्योंमकेश बक्षी नावाची एक मालिका होती.काय सॉलीड होती माहीती आहे का? आताच्या C.I.D. मालिकेला ती एकच मालिका छप्पन वेळेस तरी विकत घेईल. रजीत कपुर च्या अभीनयाने ते पात्र अगदीच खरे वाटत होते. ह्याचे काही भाग युट्युब वर आहेत. ते पाहिल्यावर आपल्याला अनुभव येईलच.

नेक्श्ट आहे ते मालगुडी डेज. ह्या बद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही हि मालिका सगळ्यांनाच माहिती आहे. तरीहि थोडेसे सांगतो. आर. के. नारायन यांच्या लेखणीतून उतरेलं एक एक पात्र म्हणजे त्या काळातील एका एका गावातील एक एक नमुना होता.

हे पात्र आठवत असेलच तुम्हाला???
नाव सांगता येईल का तुम्हाला....

क्रमश...........

**************************************************
तळटीप :- अनंत भावे यांच्याबद्दल जे काही लिहले आहे त्या बद्दलं मी त्यांची माफी मागतो. ती एक माझी लहानपणची आठवण होती. ती आजही मनावर कोरलेली आहे. मला तुम्हाला शेअर करावी वाटली म्हणुन सांगीतली. त्यांच्या बद्दलं माझ्या मनात आजही आदर आहे.

गुलमोहर: 

किश्या, प्रचंड धन्यवाद ! जुन्या आठवणी ताज्या केल्या.
शांती लागायची तेव्हा आमची दहावी बोर्डाची परिक्षा चालू होती. दु. २ ला पेपर संपला की आम्ही सायकली हाणत शक्य तितक्या लवकर घर गाठायचो. Proud आता हसू येतं, काय होतं त्यात एवढं ?
याक्कु क्रुरसिंग Lol मोठ्या भावाशी मी जीव खाऊन भांडत असायचे आणि तो फक्त " याक्कु " करून विकट हास्य करायचा. आणखीनच तीळपापड व्हायचा.
जाऊ दे.....तू आठवण काढलेल्या सगळ्या मालिका माझ्या दिल से आहेत. माझा प्रतिसाद म्हणजे एक स्वतंत्र लेखच होईल अशाने. Happy

सह्ही.

सही रे किश्या...एकदम बालपणात घेऊन गेलास... सही
अरे त्या मालिका विसरला का? शक्तिमान,अलिफ लैला,सुराग,मोगली (जंगल बुक),हिमॅन.............
अजुन कोणाला आठवतय का बघा?

किश्या, सगळ्या मालिका आठवल्या... अरे, तुला ती जंगल जंगल बात चली है आठवली की नाही? ती तर आम्ही खूप एंजॉय करायचो... Happy
अनंत भावे आजही तस्सेच आहेत... पण वयामुळे थकलेत... कुठेही भेटले रस्त्यात तर लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं कोंबतात हातात... प्रेमळ आजोबा... Happy

किश्या अरे काय नॉस्टॅल्जिक केलंस गड्या..स्वाभिमान, बहाद्दूर शहा जफर्,थोडासा आसमान्,घुटन्,अजनबी, फौजी,सर्कस्,कॅप्टन व्योम, शक्तिमान, या सगळ्या माझ्या आवडत्या सिरियल्स होत्या ..अजूनही खोटं वातेल पण मी नित्य नियमाने फक्त आणि फक्त दूरदर्शनचबघते काही जुन्या सिरियल्स DD bharati वर दाखवतात रसिकांनी त्याचा लाभ जरूर घ्यावा...

किश्या, मस्तच लेख. धन्स. सगऴ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ब्योम्केश बक्षी अन मालगुडी डेज फेमस सिरीयल्स होत्या. त्यातल्या त्यात रंगोली, छायागीत या सारखे सदाबहार गाण्यांचे कार्यक्रम पहायला मजा यायची. तिकडे रंगोली हेलनचं.. "पिया तू अब तो आ.. जा.. " सुरू झालं कि इकडे चहातल्या खारी बटरांची आत्महत्या व्हायची अन शेवटी चहाने कुठलाही पुरावा मागे ठेवला असेल? हा प्रश्न पडायचा.

सह्याद्री वाहीनीवर बालचित्रवाणी, चित्रगीत, दामिनी, इन्स्पेकटर, अन सातच्या बातम्यांच ते म्युजिक आजही लक्षात आहे रे. Happy

दुरदर्शनची ती ओल्ड विंटेज ट्युन अन तांत्रिक बिघाडामुळे दाखवला जाणारा तो व्यत्ययचा हलता फलक सगळ्याची आठवण झाली बघ. Wink

दुरदर्शनवर शोले,नमकहराम्,शेहनशाह, दिवार, हाथी मेरे साथी, संतोषी माँ, क्रांती.. या सारखे सिनेमे प्रक्षेपित व्हायचे तेव्हाची मजा आजकालच्या मल्टिप्लेक्समधे नाही अनुभवता येत रे.

किश्या..मस्तच रे..खूप मजा आली.. प्रचंड माग्गे घेऊन गेलास..
अजून एक सिरिअल यायचे नं ... रजनी, ये जो है जिन्दगी..
अजून एक गाणं लागायचं अ‍ॅनिमेटेड' एक तितली.. अनेक तितलियां'...
आठवलं हे गोड गोड गाणं?????

किश्या, तुमच्या आठवणी बर्‍याच पुढच्या काळातल्या.
पहिल्यांदा केवळ दिल्लीपुरतेच प्रक्षेपण असायचे.
१९७२ साली मुंबईला दूरदर्शन दिसू लागले. (विकिपिडीयावर चूकीचे वर्ष दिलेय का ?)
रंगीत प्रक्षेपण त्यानंतर आले.
बातम्याही आधी ७.३० ला असायच्या. ९ ला हिंदी आणि १० ला इंग्रजी. मग राष्ट्रिय प्रसारणाचा दट्ट्या बसला. साडेआठ ते दहा पर्यंत ते कार्यक्रम असायचे.
असो मी यापुर्वी लिहिले होते सविस्तर सगळे.

वर्षू, ये हुई ना बात.
रजनी, मशहूर महल, विक्रम वेताळ, तितलिया, इंद्रधनुष, ये जो है जिंदगी, खानदान (हि पहिली मालिका )
श्वेतांबरा (पहिली मराठी सलग कथानकाची मालिका.)

किश्या....काय मस्त आठवणी ताज्या केल्यास रे....शांती बघुन तर मंदीरा बेदी सारखी उलट्या बाणाची टिकली पण लावुन जायचो शाळेत आम्ही Proud
तेहकीकात पण एक मस्त सिरीयल होती...सॅम डिसल्वाचा रोल काय उठवलेला विजय आनंदनी!
चंद्रकांताने तर वेडच लावलं होतं सगळ्यांना...माझ्या आठवणीत अजुन हम लोग,नुक्कड,सर्कस,सैलाब,देख भाई देख,राजा और रँछो,छायागीत,चित्रहार,इम्तीहान...लिस्ट गोज ऑन यार...सगळ्या अजरामर सिरीयल आणि कार्यक्रम होते हे Happy

दिलं की उत्तर >>

शुभंकरोती | 21 December, 2010 - 16:01
स्वामी.......S.........S...............S...............S

जुन्या दूरदर्शन मालिकांवर पूर्वी झालेली चर्चा ..
http://www.maayboli.com/node/13857

मागिल दोन रविवार ठरवून रंगोली कार्यक्रम बघितला... तीच ती लज्जत... मजा आ गया!

तुम्हाला पहीली डेलीसोप माहिती आहे का? कुठली बरं??????
आठवतेय सोम. ते शुक्र. लागायची ती... दररोज सकाळी ११ वाजता. ती होती शांती. मंदिरा बेदीची मालिका. >>>
यावर मात्र आक्षेप किश्या... दुरदर्शनवर मी पाहिलेली (या आधीही डेलीसोप आल्या असतीलच... जाणकारांनी मार्गदर्शन करावे) पहिली डेलीसोप म्हणजे 'हमलोग' त्या नंतर 'दरपण' दर मंगळवारची विनोदी मालिका 'ये जो है जिंदगी'

रविवारची स्टार ट्रॅक, एक दोन तीन चार, स्पायडरमॅन, तसेच DD1 वरील जाएंट रॉबट बघाण्यासाठी कित्ती तरी क्लास बुडविला होता :p

मराठी कार्यक्रमात 'गजरा' खूप धम्माल आणयचा...

छायागीत आणि चित्रहार ऐकणारे कानसेन तर अफाट होते..

अरे माझ्या प्रश्नाचे कोणिच उत्तर देत नाही....
बहुतेक कुणालाच ते पात्र माहीत नाही वाटतं.. >>> तो स्वामी आहे रे... आता तर तो मराठीत पण येतो डबडून :d

दिनेशदा.... Link please Happy

किश्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.
माझ्या लहानपणी आमच्याकडे टीवी नव्हता. घरमालकाकडे टीव्ही त्यांच्या घराला मागुन एक दरवाजा त्या दरवाज्यासमोर बसल की दिसायच थोड थोड. पण तेही नसे थोडके व या गोष्टीच इतक आकर्षण होत की टीव्ही पहायला त्यांच्या दारात समोर जागा मिळावी म्हणुन त्यांची छोटी छोटी कामे करणे, त्यांची मुले सांभाळणे हे नेहमी चालायच.
रविवारी सगळ्यांना रामायण बघायच असल की हे मुद्दाम दार उघडायचे नाहीत. गंमतीचा भाग म्हणजे त्यांच्याकडे ब्लॅक & व्हाईट टीव्ही होता व त्यावर रंगीत भारताचा नकाशा असलेली काच होती त्यामुळे तो रंगीत टीव्ही. मग कालांतराने आमच्याकडेही टीव्ही आला पण ते दिवस, गुडघ्याला रग लागेपर्यंत दुकानाच्या दारासमोर उभे राहुन बघितलेल्या मॅचेस कधीच विसरणार नाही.

किश्या मस्त लेख. येवुदेत. हमलोग, बुनियाद विसरु नकोस

मस्त आठवणी
डीडीज कॉमेडी शो आणि लॉरेल हार्डी आठवतय का कोणाला ?? धम्माल होत एक्दम
डक टेल्स आणि मालगुडी डेज एव्हर ग्रीन

प्रतीसादा बद्दल सर्वाचे मनापासुन आभार..
या आधी सुध्धा काही लेख आले असतील पण मी माझ्या कळण्यातल्या मालिका आणि माझ्या आठवणी शेअर करत आहे... बहुतेक मि जन्माला यायच्या आधी पासुन दुरदर्शन पाहत असाल.....
पण माझ्या आठवणी मी फक्त या निमित्याने ताजी करत आहे.
धन्यवाद पुन्हा एकदा...

साप्ताहिकी

गजरा

छायागीत

चित्रहार

बातम्या

द वर्ल्ड धिस वीक

ज्ञानदीप

किलबील

ये जो है जिंदगी

हमलोग

बुनियाद

नुक्कड

अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रम न दिसणे

आणि...

... व्यत्यय ...

अशा अनेक आठवणी जाग्या केल्यात.

उत्तम लेख!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

अरे मी यक्कूसारखाच दिसायचो (दिसतो) त्यामुळे शाळाभर यक्कू... यक्कू म्हणत फिरायचो...!!! आमच्या गावतही चारपाचच टेव्या होत्या. सोप्यात जत्रा भरायची त्या लोकांच्या. पण तो काळ खूपच चांगला होता. अती तेथे माती म्हणतात तशी आजकाल टीव्हीची, चॅनल्सची, आणि बघणारांचीही माती होऊ लागलिये. चंद्रकांताची भव्यता आज कुठल्याच मालिकेत दिसत नाही. स्दोदित गाणी चालू असल्याने चित्रहार वगैरे जुनाट कार्यक्रम वाटू लागलेत. कधी कधी भेटणार्‍या पाहुण्याचं कौतूक होतं. या रोजच्या मढ्याला कोण रडणार? रविवारशिवाय पिच्चर नजरेला पडायचा नाही तेव्हा बुरसाट पिक्चरही धमाल वाटायचे आता तेच चित्रपट लागले की टीव्ही फोडावासा वाटतो.

खूप छान लेख लिहीलास. अभिनंदन!

आमच्याकडे १९८२ च्या आशियाड्च्या निमित्ताने टीव्ही आला. तेव्हा सोसायटीत टीव्ही असलेली घरे मोजकी असायची. आणि आम्ही मुले एकेक दिवशी एकेका घरी छायागीत, शनिवार रविवारचे सिनेमे पहायला जायचो.
घरी टीव्ही आल्यावर काही दिवस कौतुकाने आमची माती आमची माणसे, आवो मारी साथे, संता कुकडी (गुजराती किलबिल) यासकट सगळे कार्यक्रम पहायचो.
रविवार सकाळ भक्ती बर्वेंसोबत साप्ताहिकीने व्हायची.
बातम्यांमध्ये माशी हजेरी लावायची.
गजरा, विजया मेहतांनी केलेले स्मृतिचित्रे, चिमणराव ........
गेले ते दिन गेले.

चान्गले लिहीलय सगळ्यान्नी!

शुक्रवारचे तबस्सुमचे "फुल खिले है गुलशन गुलशन" कसे काय विसरता?
अन तो मुलखावेगळ्या माणसान्च्या (अगदी रस्त्यावरील भिकार्‍याचीदेखिल) मुलाखती घेणारा कोण बर कमलेश्वर की अशाच कायश्या नावाचा? (साला मेमरी किती कच्ची हे माझी) नावात कमल होत येवढ आठवतय, बघतो आठवल की सान्गतो! Happy
अन पल्लवी जोशीची पहिली मालिका ऐन्शीच्या आसपास होती, नाव विसरलो
छे: गेले ते सोन्याचे दिवस गेले! आता आलाय चौविसतास नुस्ता धान्गडधिन्गा!

Pages