तो अमावस्येचा दिवस

Submitted by असो on 20 December, 2010 - 11:51

"शू "

"आवाज करू नकोस."
"इतके दिवस काढलेस ना ? आता हा एकच. "
,
,
,
,
" हलू नकोस रे. पडून रहा. आवाज नको.
आजचा दिवस महत्वाचा... आज अमावस्या आहे. सावध"

"तो यायची वेळ झाली."

" लपून बसा "

" आला रे "

"सावध. झोपू नकोस "

" काय करतोय बघू का ?"

" नाही. गप्प पडून रहा.."

" आवाज झाला तर आपण कुठय हे त्याला कळेल. मग तो आपला शोध घेईल"

" वेळ जात नाही.."

" जाईल ..."

"आजचं एक जागरण फक्त..धीर धरा... "

"एक प्रहर उलटला का रे ?"

" संयम ठेवा.. बाहेर धोका आहे..."

"हम्म. त्याला आपला संशय आलाय.. आपण त्याला दिसून उपयोग नाही "

" आणि वेळ टळल्यावर ?"

" मग तो काहीच करू शकणार नाही .. "

"बस आता एक प्रहर राहीला.."

" उतरू खाली ? "

" नाही. अजून धोका आहे"

,
,
,
,
,
,

" या रे बाहेर.."

" आता धोका नाही ?"

" नाही. आता दोका टळला . सूर्य बुडाला बघ...!
अमावस्येचा एव्हढा दिवस आपण संयमाने ढकलला..."

"आता रात्र...अमावस्येची !!!"

" हा ! हा !! हा !!!
म्हणजे आता आपलच राज्य आहे......... तुटून पडा त्याच्यावर ....."

"शिकार सुटता कामा नये "

" नाही सुटत....तो आता खरच काहीच करू शकणार नाही .....!!"

आणि अमावस्येच्या रात्रीच्या प्रतिक्षेत असणारं माळ्यावरच्या भूतांचं ते टोळकं दाहक सूर्याची किरण नाहीशी होताच त्या नव्या भाडेकरूच्या रक्ताचा घोट घ्यायला बाहेर पडलं...

***************

.

अनिल सोनवणे

गुलमोहर: 

एक अति लघु भूतकथा लिहायचा प्रयत्न होता. साफ फसलेला आहे हे प्रतिक्रियांवरून लक्षात आलं. स्पष्टपणाबद्दल सर्वांचे आभार.. तसदीबद्दल क्षमस्व !

अनिल, भूतकथेत असायला पाहिजे तो थरार / अंगावर काटा उभा करणारा प्रसंग अजिबातच नाही दिसला त्यामुळे तसं झालं असेल Happy पुलेशु.

प्रामाणिकपणा आवडला अनिल. चुकलेलं असतानाही आपलंच घोडं पुढे दामटण्यापेक्षा तुम्ही ही जी खिलाडू वृत्ती दाखवलीत, ती खरंच आवडली.
पु.ले.शु. Happy

मला पण जाणवल ते. भूत कोण आहे हा उल्लेख न करता वाचकांवरच सोडून द्यायचा प्रयत्न होता.. अर्थात तो धक्का काही जोरकस नव्हता म्हणून कथा फसली. पुढच्या वेळी भरपाई होईल याची खात्री देतो... Happy धन्यवाद

मला आवडले हे लेखन ! अमा'वा'स्या असा शब्द असावा असे वाटते.

भूतनाट्यछटा!

पण अर्धवट राहिल्यासारखी वाटली!

जिवंत संवाद वाटले.

जिवंत संवाद वाटले.>> बेफिकीरांना अनुमोदन.

या लेखापेक्षा तुमचा आधीचा "भुवभुवाट" हा लेख मस्त होता. Happy

भूत कोण आहे हा उल्लेख न करता वाचकांवरच सोडून द्यायचा प्रयत्न होता.. अर्थात तो धक्का काही जोरकस नव्हता म्हणून कथा फसली. >>>>> काही हरकत नाही. शेवटपर्यंत 'आता काय होणार' असे वाटत राहिलेच ना? आणि मग काही घडलेच नाही हा ट्विस्टही होताच की! Proud Light 1

भूत नसलेली भूतकथा लिहिण्यात तर खरी कसोटी. मी खुप खुप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक रशियन का कोणीसा सिनेमा पाहिला होता. त्यात केवळ दोन पात्र. ते दोघे कसला तरी शोध घ्यायला निघालेले. सबंध सिनेमाभर हेच. पण एक अनामिक भिती साचून राहिलेली. कधीही काहीही होऊ शकते असे सतत वाटायचे. आणि नाही घडले म्हणून हायसेही वाटायचे. काही नेहेमीचे भितीदायक प्रकार न दाखवता दिग्दर्शकाने कमाल केली होती.

अनिल मित्रा, (घाबरवलंस)
मी ही कथा आपल्या ई७२ वर वाचत होतो..."शिर्षक" वाचुन भयपटा ची कल्पना आलेलिच...पहीला शब्द वाचुन मी सुध्दा 'शु' झालो आणि अधिर होउन वाचु लागलो संवादाच्या ओळ्या अगदी "जिवंत" वाट्त होत्या..आणी मी आण्खी वेग वाढ्वुन वाचु लागलो "पुढे काय" जाणण्यासाठी आणि.......एकदम ही ओळ लागली "आता रात्र...अमावस्येची !!!" वाट्लं चला "मेन" कथा आत्ता सुरु झाली.....!
आणी वाचता वाचता क्षणातच "अनिल सोनावणे" वाचल गेलं....मी खरंच घाबरलो... हे काय्य...?? Wi-Fi तुट्ला तर नाही? (खुप मेहनतीअंती भेट्लेला सिग्नल) खुप घाबारलो मोबाईल मध्ये बिघाड झाला का काय? खरंच...! स्क्रोल करुन पाहुलागलो नि "किल्लर" चा प्रतिसाद दिसला.. एक सफेद आडवी लांब कोरी ओळ आणी हे Uhoh ....सेम माझ्या मनाची अवस्था. क्षणभर वाट्लं तो मलाच बघ्तोय.....!

डिटेल देण्याचं कारण असं की, तुझ्यात भयकथा लिहण्याचि 'क्षमता' आहे, आकर्षित करण्याचि कला आहे. यात शंका नाही. पण तुझ्या कथेत तु जे जाणतोस ते सगळेच 'वाचक' तर नाही समजु शकत ना..मित्रा.
म्हणुन थोडा विस्तार् कर...प्रसंग वाढ्व..."लघुकथा" (आहेच ही लघुकथा समजलो मी. कथेतली दोन्ही पात्रे (भुतांचीटोळ्की+मनुष्य) आणी प्रसंग लक्षात आली आहेत माझ्या.) असुदे.. पण......... "कथा"... तरी दे...!

राग नसावा ही अपेक्षा!

अमित :या लेखापेक्षा तुमचा आधीचा "भुवभुवाट" हा लेख मस्त होता>>> अनुमोदन Happy
(सरंडरपणा आवड्ला)

पु.ले.शु.

अनिल तुमची खिलाडू वृत्ती आवडली. Happy

या लेखापेक्षा तुमचा आधीचा "भुवभुवाट" हा लेख मस्त होता>>>>>> अनुमोदन Happy

चातक.. नो प्रॉब्लेम. व्यवस्थित आहे प्रतिक्रिया..
मामी.. वाळवंटात आंब्याच झाड दिसल Happy

ए अरे पण मित्रांनो एक गोष्ट तर मान्य कराल ना ?.. प्रत्येक भूतकथा भयकथा नसते. ( आठवतोय का द घोस्ट ? क्ल्यू देऊ ?.. डेमी मूर . आणि एक डव भूताचा.)

मित्रा, कल्पना जबरदस्तच आहे. अजुन थोडी फुलवावी लागेल. अश्विनीने म्हंटल्याप्रमाणे तो थरार जाणवत नाहीये. फार लवकर संपवलीत Happy