हा पक्षी कोणता?

Submitted by साधना on 17 December, 2010 - 22:43

राजस्थान ट्रिपवर गेले होते तेव्हा मी रणकपुर मंदिरात फोटो काढायला थांबले. सोबतचे पुढचे एक देऊळ पाहायला निघुन गेले. माझे फोटो झाल्यावर बाहेर गेटजवळ येऊन सोबत्यांची वाट पाहात उगीचच निर्हेतुक कॅमेरा चालवत असताना अचानक एका गर्द पानांच्या झाडावर हा दिसला. जशी पोज दिसतेय तसाच बसलेला. झाडाच्या दुस-या बाजुला जाणे शक्य नव्हते. पोज बदलेल म्हणुन वाट पाहिली पण त्याने माझ्या मागणीकडे दुर्लक्ष करुन दोन्-चार मिनिटातच तिथुन प्रस्थान केले. मला आधी भारद्वाज वाटला पण तो काळा आणि पंख मातीचे लाल असे असतात. मग हा कोण?

p.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला देखील अजून नाव मिळालेले नाही .. Sad मी हे फोटो २ वर्षापूर्वी रणकपुर जवळील थंडी-बैरी या ठिकाणी घेतलेले आहेत...

दोघांचेही फोटोज अप्रतिम आले आहेत....... ह्या पक्ष्याचा आवाज हा एखाद्या "प्रिंटिंग मशीनच्या आवाजासारखा" असतो. नेमका ब्लँक झालोय... नाव काही केल्या आठवत नाहिये.... पण आठवेल. आठवले की लगेच टाकतो........ Happy

एक्झॅक्टली वर्षू..... यु आर राईट..... मी आपला उगाच आपल्या बुध्दीला ताण देत होतो....... नेटवर बघायची सवय नाहिये...... यु आर राईट........ हा ट्री - पायच आहे...... याचा आवाज वर म्हटल्याप्रमाणे "प्रिंटिंगमशिनच्या आवाजासारखा असतो...... याचे वास्तव्य उत्तर भारतात जास्त असते..... Happy धन्स वर्षू....... नाव आठवतच नव्हते...... !!!!

भुंगा.. Happy
आम्ही मागच्या जल्मीचे जाळ्यात अडकलेले मासे अस्णार Proud
सार्खं जाळ्यावर बसण्याची सवय हाय Lol

http://www.maayboli.com/node/16371 << या आधी सुद्धा मायबोलीवर या पक्षाचे प्रकाशचित्र त्याचा इंग्रजी नावासहीत टाकले होते. याला मराठी नाव तिथेही दिसले नाही. Uhoh

टकाचोर असे त्या पक्षाचे नाव आहे. संदर्भासाठी इथे क्लिक करा सगळ्या पक्षांची फोटोसहीत मराठी-इंग्रजी नावे कळती.
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

भारतिय माहितीचे नाव "ट्री-पाय" असेच आहे....... आपल्याकडे सर्वच्यासर्व पक्ष्यांना पर्यायी नावे नाहीत..... काही पक्ष्यांची ईंग्रजी नावेच प्रचलित आहेत.....

सुकि..... मस्त लिंक दिलीस..... आताच एका पक्षीमित्राला फोन करून विचारले त्यानेही "टकचोर" असे नाव सांगितले..... तुम्ही सगळे महाजाल एक्सपर्ट्स आहात..... Happy

अरेच्या.... मलाही आठवलं.....ह्या ट्री-पाय ला ''टको'' असं म्हणतात.

माहितीबद्दल सर्वांचे आभार.सूर्यकिरण, लिन्कबद्दल आभार.
रणकपूर परिसर याचा खास आवडीचा आहे किं काय !

ग्रेट.. माझे गुगलुन झाले पार पण मिळाला नाही.

मी golden and white winged bird गुगलत होते. त्यात सतत सातभाईसारखे लहान पक्षी दिसत होते Sad

टकाचोर नाव मीही ऐकलेय पण बघितला नव्हता कधी.. पक्क्या भटक्याचा फोटो आवडला. एवढी लांबलचक शेपुट मी तिथेही पाहिली नव्हती. मी फोटो अंदाजाने घेतला होता, पक्षी नीट दिसत नव्हता आणि दुपारच्या वेळेस स्क्रिनवरही काही दिसत नव्हते. घरी आल्यावर फोटो नीट पाहिला. Happy

साधना पक्षी आणि त्याचि पोझ सुंदर आहे ग. मधला रंग भारद्वाज सारखाच दिसतो. आमच्याकडे येतात भारद्वज.

>>> एवढी लांबलचक शेपुट मी तिथेही पाहिली नव्हती.

टकाचोर साधारणपणे साळुंकीच्या आकाराचा असतो. पण त्याची शेपटी सुमारे ३० से.मी. लांब असते.

Pages