व्याख्या

Submitted by जयदीप. on 14 December, 2010 - 00:31

कधी काळचे 'दु:ख'
आज तितके बोचत नाही...
काल वाटायचे जे 'सुख'
ते आज सुखवत नाही.....
कधी काळच्या 'गप्पा'
आज रम्य वाटत नाहीत...
कधी आवडणारी 'गाणी'
आज ऐकवत नाहीत...

सुख मिळत असेल आज तुला...
असेल कधी दु:खही....
असतील आवडती गाणी....
आणी रम्य गप्पाही....

कधीतरी कळेल तुला....
प्रभाव बदलत्या काळाचा....
शब्द तेच, अर्थ तेच....
व्याख्या मात्र बदललेल्या.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

<<कधी काळचे 'दु:ख'
आज तितके बोचत नाही...
काल वाटायचे जे 'सुख'
ते आज सुखवत नाही.....>>.........ह्या ओळी खूप पटल्या. Happy