Submitted by webmaster on 30 May, 2008 - 02:09
भारतीय कस्टम्स विभागाच्या नियमाबद्दल माहिती अथवा आपले प्रश्न / अनुभव ईथे लिहु शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतीय कस्टम्स विभागाच्या नियमाबद्दल माहिती अथवा आपले प्रश्न / अनुभव ईथे लिहु शकता.
लॅपटॉप
लॅपटॉप खरतर एकच नेणे अलाउड आहे. आणि शिवाय २५००० पर्यंत काहिहि नेउ शकता.
पण आत्ताच आमच्या ओळखिचे दोघे देशात गेले ते २ लॅपटॉप घेउन गेले त्यांना तरी न अडवल्याने काहि प्रॉबलेम आला नाहि.
Kuroos2k किंवा
Kuroos2k किंवा कुणिही,नविन लॅपटोप अमेरिकेतून देशात न्यायला काहि प्रॉब्लेम नाही ना कृपया कन्फ़र्म करू शकाल का?
धन्यवाद
दुबई मध्ये
दुबई मध्ये इश्यु झालेले काही पासपोर्ट्स परत मागवले आहेत. "rpo.pune@mea.gov.in" इथे पासपोर्र्ट नम्बर पाठवुन "validity" चेक करा. Z ने सुरु होनारे पासपोर्ट परत मागवले आहेत
२ लॅपटॉप
२ लॅपटॉप नेता येतात (कुठूनही - कोठेही)
१ पर्सनल आणि १ ओफिशीयल. १ लॅपटॉप चेक इन करवा लागतो, आणि ओफिशीयल लॅपटॉप हा कंपनीचा लॅपटॉप आहे ह्याचे कंपनीच्या लेटरहेड वर छापलेले पत्र बरोबर असावे लागते.
मी अनेक वेळेला २ लॅपटॉप बरोबर घेउन प्रवास केलेला आहे.
Central Board of Excise and
Central Board of Excise and Customs चे नियम येथे दिलेले आहेत. http://www.cbec.gov.in/customs/cs-act/formatted-htmls/cs-rulef.htm
मित्रांनो
मित्रांनो मी भारतात सुट्टीसाठि जाणार आहे, मला माहिती हवी होति कि भारतात जाताना किती सोने घेवुन जाउ शकतो.
भारतातून
भारतातून परदेशात जाण्यासाठी कोणते वॅक्सिन्स घ्यावे लागतात ? पुण्यात यलो फिवरचा डोस कुठे मिळतो का?
>>
>> मित्रांनो मी भारतात सुट्टीसाठि जाणार आहे, मला माहिती हवी होति कि भारतात जाताना किती सोने घेवुन जाउ शकतो.
Who can import gold as baggage?
(a) Any passenger of Indian origin (even if a foreign national except Pakistani / Bangladeshi national).
(b) Any passenger holding a valid passport issued under the Passport Act, 1967.
Conditions
(i) The weight of gold (including ornaments) should not exceed 10 Kgs. per passenger.
(ii) Such passenger is coming to India after a period of not less than six months of stay abroad. However, short visits during these six months shall be ignored if the total duration of such short visits does not exceed 30 days and the passenger has not availed of the exemption under this scheme, at the time of such short visits.
(iii) The duty is payable by the passenger in convertible foreign currency at the rate of Rs.255 per 10 gms. if the imported gold is in the form of tola bars. However, if the imported gold is in the form of gold bars (other than tola bars) bearing the manufacturer's or refiner's engraved serial numbers and weight expressed in metric units, and on gold coins, the duty will be Rs.102 per 10 gms.
(iv) Ornaments studded with stones and pearls will not be allowed to be imported under the scheme mentioned above.
(v) The passenger can either bring the gold himself at the time of arrival or import the same within fifteen days of his arrival in India as unaccompanied baggage. There is no restriction of the sale of the gold in India.
(vi) The passenger can also obtain the permitted quantity of gold from Customs bonded warehouse of State Bank of India and Metals and Minerals Trading Corporation subject to conditions (i) and (iii). He is required to file a declaration in the prescribed Form before the Customs Officer at the time of arrival in India stating his intention to obtain the gold from the Customs bonded warehouse and pay the duty before clearance.
Note :
1. The jewellery, which is in addition to the jewellery otherwise allowed without payment of duty, only is liable to payment of duty under the above mentioned scheme for import of gold/silver.
2. Import of gold by concealment in baggage coupled with no declaration will lead to confiscation along with imposition of fine/penalty and the offender may also be arrested.
http://www.geocities.com/indiancustoms/baggagerule/indian.htm
http://indiacustoms.blogspot.com/2008/01/import-of-gold-silver.html
>> भारतातून
>> भारतातून परदेशात जाण्यासाठी कोणते वॅक्सिन्स घ्यावे लागतात ? पुण्यात यलो फिवरचा डोस कुठे मिळतो का?
इथल्या doctors (pediatrician) ला सांगा ... they will send your kids for assesment and then refer some medical course on maleria which needs to be taken before 30 days you go to India.
पुण्यात
पुण्यात यलो फिवरचा डोस कुठे मिळतो का >>> दिनेशदांना विचारा
The weight of gold
The weight of gold (including ornaments) should not exceed 10 Kgs. per passenger>>>
ओके कुणाकुनाला आपले सोने भारतात पोचवायचे आहे? मी कस्टम फी भरायला तयार आहे.
वर
वर लिहिलेल्या २ लॅपटॉप च्या नियमाविषयी अजून माहिती मिळू शकेल का ? मी गूगल केलं पण काही फारसं मिळालं नाही.
कंपनी लेटर काय फॉर्मॅट मध्ये असावं ?
hi masya mulacha I-94ani
hi
masya mulacha I-94ani visa jan9 la expire zala ahe.ata ithe extend karne shakye nahi mhun mi india trip karat ahe.mala konisagel ka restamping sathi kay procedure asal.plz lavkar replay deyva.ani mi h4 war ahe ani mi masa pan extend karat ahe.sadhya chya condition warun h4 sathi kahi problem yeal ka?plz..............its urgent.
मी २
मी २ लॅपटॉप घेऊन गेलो आणि आलो. कोणीही विचारले नाही. बंगलोर विमानतळावर तर सामान मिळाले की ते परत पट्ट्यावर पण घालावे लागत नाही त्यामुळे प्रश्नच आला नाही.
अमेरिकेतल्या एका कंपनीने
अमेरिकेतल्या एका कंपनीने भारतातल्या एका सेवाभावी (charity) संस्थेला देणगी म्हणून बरीच महागडी औषध यंत्रणा देऊ केली आहे. भारतात हे पोचल्यावर सोडवून घ्यायला काय कागदपत्रे लागतील? तसेच ड्यूटी भरावी लागेल का? यासंबंधी कोणाशी संपर्क करावा?
स्वाती, ही साईट
स्वाती,
ही साईट पहा.
http://www.cbec.gov.in/cae1-english.htm
यावर अधिकृत माहिती मिळेल. कोणाशी संपर्क करावा तेही मिळेल बहुतेक.
आज हा बाफ अचानक दिसला.
आज हा बाफ अचानक दिसला. मध्यंतरी पुण्यातील कोथरुड येथील अंधशाळेच्या मुलींसाठी काही लो व्हिजन उपकरणे एका अमेरिकास्थित मायबोलीकरणीने अमेरिकेतून भारतात आणली. त्याबाबतचा अनुभव :
अंधशाळेच्या मुख्याध्यापिकांनी मला व सुनिधीला अनेकदा सांगितले होते की त्यांच्या येथे अनेक मुलींना अंधुक किंवा थोडीशी दृष्टी आहे. भारतात त्यांच्यासाठी मिळणार्या लो व्हिजन उपकरणांचे प्रकार मर्यादित आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारची भिंगे, रीडर्स, अलार्म्स इत्यादी येतात. तर अमेरिकेत ही उपकरणे सहज उपलब्ध होऊ शकतात, तेव्हा अमेरिकेतले कोणी मायबोलीकर ही उपकरणे अंधशाळेला देणगीदाखल देऊ शकतील काय?
ते आवाहन आम्ही मायबोलीकरांसमोर व संयुक्ता सदस्यांसमोर ठेवले होते. एका संयुक्ता मायबोलीकरणीने तशी तयारी दाखवली परंतु कस्टम्सच्या नियमांबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. अंधशाळेच्या मुख्याध्यापिकांच्या बोलण्यात आले होते की अंधशाळेला देणगीदाखल ज्या वस्तू परदेशातून येतात त्यांना कस्टम्स ड्यूटी माफ असते. त्या एका विधानाच्या आधारावर आम्ही चौकशी करायला सुरुवात केली, आंतरजालावरही माहिती हुडकायला सुरुवात केली.
Page no. 65, 66 & 67 : http://rehabcouncil.nic.in/pdf/con_CG.pdf
त्यानुसार हे कळाले की अंधशाळेसाठी मागवण्यात येणार्या किंवा देणगी म्हणून आणलेल्या वस्तूंना भारतात कस्टम्सना कोणतेही शुल्क/कर आकारण्यात येत नाही. मात्र त्यासाठी अंधशाळा किंवा त्यांच्या संस्थेच्या चेअरमन अथवा सेक्रेटरीचे त्यांच्या लेटरहेडवर त्यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी तसे निवेदन देणारे पत्र लागते.
त्यात कोण व्यक्ती त्या वस्तू आणणार आहे, कोठून आणणार आहे ते नमूद करावे लागते. अंधशाळेसाठी त्या वस्तू आहेत हेही लिहावे लागते. त्या पत्रात देणगीदाखल देण्यात येणार्या वस्तूंचे तपशील, नग, त्यांची किंमत (या केसमध्ये डॉलर्स मध्ये) हे नमूद करायला लागते. त्याचबरोबर त्या वस्तूंच्या खरेदीच्या पावत्याही जवळ बाळगणे इष्ट ठरते. तसेच सहा महिन्यांच्या आत त्या वस्तूंचा वापर व्हावा लागतो.
[ Where any such institution is scheduled to begin function only after the importation of the goods specified above the exemption shall not apply in respect of the goods imported by that insitution, unless an undertaking in writing is given by the President or Secretary of that Institution that it will begin to function within a period of six months from the date of importation
of the goods.
Provided that in any particular case, the aforesaid period of six months may, on sufficient cause being shown, be extended by the Collector of Customs concerned such further period as, he may deem fit.
Where goods have been purchased out of donations received abroad in foreign exchange, the institution has been permitted to maintain an account abroad by the Reserve Bank of India for the purpose of receiving funds donated overseas. ]
त्यानुसार आम्हाला अंधशाळेकडून तसे पत्र मिळाले, जे स्कॅन करून त्या माबोकरणीला इमेल केले. मग तिने त्या पत्राची प्रिंट-आऊट, पावत्यांची प्रिंट-आऊट व कस्टम्स ड्यूटी एक्झम्प्शनचा जो नियम आहे त्याची प्रिंट-आऊट असे काढून स्वतःबरोबर ठेवलेच, शिवाय गरज पडल्यास तिच्याजवळ त्यांची सॉफ्ट कॉपीही होती. प्रत्यक्षात त्या वस्तू वजनाने अतिशय हलक्या असल्याने एका लहान खोक्यात आरामात मावल्या व त्या वस्तू काचेच्या असल्यामुळे तिने त्या हँड लगेजमधूनच आणल्या. कस्टम्सवाल्यांनी तिला कोठेही अडवले नाही.
गेल्या काही दिवसात भारतात
गेल्या काही दिवसात भारतात गेलेल्या लोकांकडून असं ऐकलय की दागिने (खरे-खोटे) घेऊन येणार्या लोकांना कस्टम्स मधे अडवणूकीचे बरेच प्रकार होताहेत (ताटकळत ठेवणे, सामानाची तपासणी आणी अर्थातच पैसे). ह्याविषयी मा.बो,करांचा काही अनुभव?
हो मला जानेवारी मध्ये गेले
हो मला जानेवारी मध्ये गेले असताना थांबवुन ठेवले ़ म्हणे तुमच्या ब्यागेत सोन्याच्या बर्याच चेन्स दिसत आहेत ़़़़ ़
सातू, धन्यवाद
सातू, धन्यवाद (प्रतिसादाबद्दल). पुढे काय झालं ते सांगू शकाल का?
काहि नाहि माझ्याबरोबर छोटे
काहि नाहि माझ्याबरोबर छोटे पिल्लु होत तरीहि लोके जास्तर थांबवुन ठेवले ़ ़ दोन्हि बॅगा उचकल्या व मग जा म्हणले पैसे नाहि मागीतले पण
बहूदा आम्ही काही नेऊच नये
बहूदा आम्ही काही नेऊच नये ह्या निष्कर्षावर येतोय. तो मनस्ताप नको वाटतो.
गेल्या खेपेला आम्हाला
गेल्या खेपेला आम्हाला अडवलेले. सगळे दागिने बावळट सारखे एकाच पिशवीत एकत्र ठेवलेले.
मामाने जुजबी प्रश्न विचारून सोडले. नवरा- बायको- मुल - लग्न - भारतातूनच घेतलेले इ. टेप ऐकवली.
पुढच्यावेळेस दागिन्याच्या पावत्या बरोबर ठेवा अस म्हणाला. ते शक्य असेल तर घेऊन जा. काहीच न नेता शक्य असेल तर तेच करा.
NRI असाल तर भारतीय पैसे अजिबात बरोबर ठेवू नका. RBI ची बंदी आहे. मध्ये एकाला बराच त्रास झालेला किस्सा वाचलेला.
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/NRIs-foreigne...
अमितव, धन्यवाद! मोलाचा सल्ला.
अमितव,
धन्यवाद! मोलाचा सल्ला. नक्कीच काळजी घेऊ.