Submitted by नरेंद्र गोळे on 6 December, 2010 - 00:23
(चालः आचार्य अत्रेंचे "कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता" हे नाट्यपद)
प्रश्न माझी माता
प्रश्न माझा पिता
प्रश्न बंधू, सखा, सोयराची
प्रश्न देती रीती
प्रश्न दिवस राती
प्रश्न माझी भीती, नेहमीची
प्रश्न, कोण मी? हा
प्रश्न ओळखीचा
प्रश्न जीवनाचा, निरुत्तर
------------------------------
उत्तर ही माता
उत्तर हा पिता
उत्तर हा भ्राता, लाभलेला
उत्तरच रीती
उत्तर गतीही
उत्तरा न भीती, यत्नकर्ते
उत्तरा मी बद्ध
उत्तराने सिद्ध
उत्तरा समृद्ध, घडवेन मी
पूर्वप्रसिद्धी: २१/०४/२००९ http://nvgole.blogspot.com/
गुलमोहर:
शेअर करा