अभ्यास हा शाळेत शिकवण्याची आणि कंटाळा करण्याची गोष्ट आहे असा एक एकूण सूर दिसतो ना आपल्याकडे? बडबडगीते, बालगीते सुद्धा अभ्यासाला अगदी दुष्ट ठरवतात, शाळेला वाईट अस लेबल लावून टाकतात. आता एवढी नकारात्मक तयारी झाल्यावर बऱ्याच जणांचा शाळा आणि अभ्यास अगदी नावडीचा झाला तर काय नवल?
मग आपल्याला याबद्दल काय करता येईल असा शोध घेतल्यावर जाणवलं कि अभ्यासाला अभ्यास हे नावं न देता खेळासारख रूप दिलं तर कदाचित मुलांना ते आवडेल. अर्थातच हे काही माझं संशोधन नाही. इंटरनेटवर केलेल्या शोधाच मला समजलेलं सार समजा हव तर. त्या नुसार आपल्याला काय करता येईल असाही विचार केला. मग जाणवलं कि अगदी लहान असतानाच खेळताना गोष्टीची कारणं शोधायची सवय लावली, माहिती शोधायची आवड लावली तर अशा गोष्टींची आवड मुळातूनच निर्माण होईल आणि नंतर अभ्यास हा परीक्षेपुरता न राहता काहीतरी नवीन शिकण्यासाठी करायचा असा विचार होईल.
आता या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करायला माझ्याकडे काही आधार वगरे नाही. पण अशा गोष्टी करून तरी पाहाव्या या उद्देशाने घरी काही गोष्टी करते. ते खेळ इथेही कुणाला उपयोगी येतील या उद्देशाने इथे संकलन करतेय.
अर्थातच तुम्ही असे काही प्रयोग , गंमती करत असाल तर ती माहिती तुमच्याकडूनही इथे आली तर हा प्रयोग खऱ्या अर्थाने बहरेल. तुमच्या प्रयोगाची माहिती देताना मी खाली दिलेला साचा वापरलात तर माहिती वापरणे आणि शोधणे सोप्पी जाईल. काही खेळ / प्रयोग अगदीच सोप्पे वगरे वाटतील पण लहान मुलांसाठी ते फारचं गमतीशीर असतात असा अनुभव आहे.
या मालिकेच चे नावं "मज्जाखेळ"
स्वरूप:
एका प्रकारच्या खेळासाठी एक धागा. त्याचे थोडेसे व्हेरिएशन असतील तर त्याचं धाग्याच्या प्रतिसादामध्ये लिहिता येतील. पण फार फरक असतील तर नवीन धागा काढूयात.
-----------याच मालिकेत नविन धागा काढताना --------------
धाग्याच नावं: मज्जाखेळ [वयोगट]:खेळाचे नावं
वयोगट:
[१-३][३-५][५-७][७-१०]असे ठरवा. १० वर्षाच्या पुढेही कोणी काही प्रयोग / खेळ करत असेल तर लिहिले तरी हरकत नाही.
उदा:
मज्जाखेळ [३-५]: वाफेचे पाणी
थोडी सुरुवातीची माहिती
वयोगट:
साहित्य:
कृती:
अधिक टिपा:असल्यास
मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची पालकांनी दिलेली उत्तरे: असल्यास
-----------------------------------------
यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सुचवा. त्याप्रमाणे करता येतील. मी पहिला मज्जाखेळ टाकतेय इथे. तो पाहून साधारण स्वरूप कळेल.
अॅडमीन, अशा प्रकारचे धागे काढले तर चालेल ना? काही प्रॉब्लेम असल्यास कृपया सांगा.
------------------
एकत्रित संकलन
# मज्जाखेळ [३-५]: वाफेचे पाणी
# मज्जाखेळ [३-१०]: गोष्टी बनवा
# मज्जाखेळ [३-५]: रैना ने लिहिलेला खेळ
# मज्जाखेळ [१-३]: आको माको
# मज्जाखेळ [१-३]: बांगड्या /प्लास्टिक रिंग्स ओवणे
# मज्जाखेळ [३-५]: मोठे मणी ओवणे
# मज्जाखेळ [३-५]: पत्त्यांचे खेळ
# मज्जाखेळ [3-5]/[5-7]: बटाट्याचे रोप
मंजिरी, प्रियदर्शनी तुमच्या
मंजिरी, प्रियदर्शनी तुमच्या सल्ल्यानुसार जुना धागा बंद करुन इथे चालु केलाय.
छान धागा आहे.
छान धागा आहे. http://www.arvindguptatoys.com/toys.html ह्या वेबसाईटवर मुलांसाठी वेगवेगळे छान खेळ, खेळणी इत्यादी मिळतील.
वयोगट: [३-५] साहित्य:
वयोगट: [३-५]
साहित्य: काटेचमचेसुर्यांचा सेट (घरात असतो तो) ४ काटे, ४ मोठे चमचे, ४ छोटे चमचे, चार सुर्या असा सेट असतो नेहमीचा.
कृती: पोरांना बसवून त्यांचे पॅटर्न्स करायला शिकवायचे. म्हणजे प्रत्येकी एक हा एक सेट, दोन काटे दोन चमचे हा दुसरा असे..
अधिक टिपा:
मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची पालकांनी दिलेली उत्तरे:
http://www.astro.caltech.edu/~aam/fun/set.html. हे आश्चिग यांनी सुचवले.
तो खेळ नवर्याने मुलीसाठी मॉडिफाय केला वरील खेळासाठी warm up म्हणून. मुलीची एक मैत्रिण आहे, त्या दोघींना बसवुन खेळणे चालू केले आहे. अजून या पोरींना नियम समजत नाहीयेत. (एक गंमत- यांना समजा ६ वेळा टाळ्या वाजवायला सांगीतले तर त्या एकतर दोन्तीन वाजवतात, किंवा ८-९-१०, दिलेल्याआकड्याबरहुकुम थांबणे ही प्रक्रिया त्यांना अजून पुरेशी समजत नाही, किंवा आम्हाला सांगत येत नाही.)
हळु हळु या वर दिलेल्या दुव्यावरील खेळ खेळायला शिकवायचे आहे. वरील लिंक वरचा खेळ प्रिंट करुन त्यातली कार्ड कापून घ्यायची.
छान धागा, सवडीने ऍडते
छान धागा, सवडीने ऍडते
खुप मस्त धागा
खुप मस्त धागा
अभि तो टाईम है... लेकिन मार्क
अभि तो टाईम है... लेकिन मार्क करके रखन पडेगा... बाद मे उपयोगी पडेगाहीच...
[वयोगट ५ ते ७] मधील मुलांना
[वयोगट ५ ते ७] मधील मुलांना बेरजा चटचट करणे त्रासाचे वाटते. त्यांना पत्तेही खेळयला आवडतात.
पत्ते खेळतांना बेरीज करणे यासाठी हा पत्त्यांचा खेळ. ६ पानांत ४०.
एकावेळी ३ ते ५ मुले. सुरुवातीला एक एक करत ६ - ६ पाने वाटायची. एक पान उताणे टाकून बाकीच्या पानांची गड्डी मध्ये उपडी ठेवायची. हातातील पानांच्या संख्येची बेरीज करायची. यासाठी एक्क्याला १ गुण, दुर्रीला २, याप्रमाणे दश्शीला १० गुण. चित्रांना ० गुण. हातातील गुण मोजल्यानंतर ते बरोबर ४० करण्या साठी किती गुण अजून हवेत ते पहाणे. क्रमाने खालून एक पान, उताणे हवे असल्यास, नाहीतर गड्डीतून एक पान घेणे व नको असलेले एक पान टाकणे. हातात ६ पानेच उरली पाहिजेत. ज्याच्या हातात गुण ४० होतील त्याने तसे जाहीर करून आपली पाने खाली टाकावीत. इतरानी ती बरोबर की चूक ते तपासावे. बरोबर असल्यास त्याची पाने मधल्या गड्डीत मिसळवून ठेवावीत व इतरांनी एक खेळाडू शिल्लक राहीपर्यंत खेळ चालू ठेवावा.
नंतर पुन्हा सर्व पत्ते पिसून नवा खेळ चालू होईल. सुरुवातीला खेळताना एखादी मोठी व्यक्ति असल्यास छोट्यांना बेरजेत आवश्यक तेथे मदत करू शकते. जरूरी वाटल्यास मुले बेरजा पाटीवर किंवा कागदावर करू शकतात. पण तोंडी केल्या उत्तम. तोंडीहिशेबाची सवय होते.
सगळ्यांना धन्यवाद. मी
सगळ्यांना धन्यवाद.
मी रैनाच्या खेळाचा नविन धागा केलाय.
रविंद्र , कृपया तुम्ही पण नविन धागा करणार का?
४-५ प्रकारच्या डाळी (राजमा,
४-५ प्रकारच्या डाळी (राजमा, छोले, आख्खे उडिद, मसूर, तुर इ) एकत्र करुन त्या निवडायचा खेळ खेळायचो आम्ही पूर्वी. सध्या याचा कंटाळा आलाय. आधी रंगाप्रमाणे डाळी वेगवेगळ्या करायला सांगायचो. नंतर नंतर नावं सांगून. सुरवातीला मोठ्या आकाराच्या डाळी /कडधान्ये दिली. तसंच एकाच रंगाची एकच डाळ द्यायचो आधी, जसं तुर आणि हरबरा यापैकी एकच. नंतर मात्र लहान डाळी पण वापरल्या.
खूप वेळ जातो या खेळात. पण डाळी नाका-तोंडात घालू नये म्हणून लक्ष द्यावं लागतं. (आयामला कच्च्या डाळी खायच्या नाहीत हे पक्कं डोक्यात ठसवलं गेल्यामूळे त्याच्यावर खूप लक्ष ठेवायचि गरज नाही पडत. मी माझं काम करताना तो हे डाळी निवडण्याचं काम उत्साहाने करतो. त्यात हे मला मदत म्हणून करतोय असं त्याला वाटत असल्याने स्वारी अजून खूश. )
रविंद्र , कृपया तुम्ही पण
रविंद्र , कृपया तुम्ही पण नविन धागा करणार का? >>>
कसा करायचा? थोडे मार्गदर्शन मिळावे.
रस्त्यातून चालताना/प्रवासात/
रस्त्यातून चालताना/प्रवासात/ डॉ. कडे वेटिंग असल्यास मुले बर्याचदा काही वेळाने कंटाळतात (अॅटलिस्ट सानिका तरी कंटाळते :P) तेव्हा आम्ही असे काही खेळ खेळतो
रस्त्यातून जात असू तर तिने बाईक्स आणि मी रिक्षा मोजायच्या कोणाच्या १० मोजून आधी होतात त्याला एक पॉईंट, गरजे प्रमाणे मोजायच्या वस्तू बदलत जातात. कधी एखादा भौमितीक आकार, कधी इमारतींचे मजले, कधी रस्त्यावरचे ट्रॅफिक सिग्नल्स, कधी भाजीवाल्या त्यातही कधी पालेभाजीवाली वेगळी नी फळभाजीवाली वेगळी (हे मंडईत असलो तर) त्यात तिचा वेळ मस्त जातो नी रिक्षाने जाऊयात, पाय दुखले, कंटाळा आलाची भुणभुण करायच ती विसरते
डॉ. कडे असताना तिथल्या वस्तुंमधून असच काही मोजत बसतो
कधी कधी र्हाईमिंग वर्ड्स/ यमक जुळणारे शब्दांचा खेळ खेळतो त्यातून दोन ओळींची कविता करायचा खेळ होतो.
कालच तिला दिलेला शब्द होता "माऊ" त्यावर तिने भाऊ, खाऊ, जाऊ हे शब्द सांगितले आणि ओळीत पण बसवले
एक होती माऊ
तिला झाला भाऊ
तिच्याकडे जाऊ
खाऊया खाऊ
रस्त्यातून चालताना/प्रवासात/
रस्त्यातून चालताना/प्रवासात/ डॉ. कडे वेटिंग असल्यास मुले बर्याचदा काही वेळाने कंटाळतात <<< खरय.. ह्यावर आम्ही स्पेलींग्जच्या अंताक्षरीचा खेळ खेळतो.
पूर्वी साधे शब्द घेऊन खेळायचो... मग शेवटी येणार्या अक्षरानंतरच अक्षर घेऊन, मग आधीच अक्षर घेऊन.. कधी कधी फक्त क्रियापद घेऊन... कधी देश, गाव, राज्य वगैरे त्यातून गाव, राज्य देश ही संकल्पना पक्की होते. कधी कधी मी मराठी शब्द पण मुलगा इंग्लीश शब्द असही.
कुठे बसाव लागल तर (डॉ.कडे वगैरे ), त्या खोलीतल्या वस्तूंची नाव म्हणजे ए बी सी डी वरुन सुरु होणार्या वस्तू कोणत्या आहेत ते सांगण वगैरे खेळतांना वेळ चांगला जातो.
मस्त धागा ! सवडीने खेळ
मस्त धागा ! सवडीने खेळ लिहिते..
कविता, धनश्री, मितान, प्लिज
कविता, धनश्री, मितान, प्लिज प्लिज नविन धागे उघडून लिहा ना. वर मी लिहिलय तशी धाग्याची नावं करा. नंतर मी इथे ओरिजिनल पोस्ट मधे त्याच्या लिंक टाकेन, म्हणजे या एकाच पानावरून सगळे खेळ सापडतील. इथे प्रतिसादांमधे लिहिले की खुप पानं झाल्यावर काही सापडत नाहीत.
अग हे काही स्पेसिफिक खेळ
अग हे काही स्पेसिफिक खेळ नाहियेत ना त्यामुळे काय धागा करणार? हा खेळ म्हणजे त्यावेळी जे समोर असेल त्या प्रमाणे वस्तू बदलत ग्रुप करायला लावणं, इंग्रजी मधले र्हाईमिंग वर्ड्स असतातच अभ्यासा मधे तसेच मराठीतले शोधायला लावणं (यमक हा शब्द मी नंतर सांगितला तिला) आणि त्यातूनच एखादी कवितेची ओळ रचणं वगैरे. गोष्टींचही तसच.