महानुभव पंथाविषयी माहिती हवी आहे.

Submitted by जिप्सी on 1 December, 2010 - 10:49

चक्रधरस्वामींच्या महानुभव पंथाविषयी थोडी माहिती पाहिजे आहे.
आमच्या गावी (मु.पो.फलटण, ता. फलटण, जिल्हा सातारा) महानुभव पंथाचे "श्रीकृष्णाचे" एक अतिशय सुंदर मंदिर आहे. मी एक-दोनदा तेथे गेलो होतो, त्यावेळी तेथे मला काळ्या साड्या परीधान केलेल्या महिला त्या मंदिराची देखभाल करताना दिसल्या. याचे काहि खास कारण आहे का? असे ऐकले अहे कि, हा पंथ मानणारे पहाटे ३-६ च्या दरम्यान नामस्मरण करतात आणि अमावस्येच्या रात्री दर्शन घेणे पवित्र मानतात (चुभुद्याघ्या). याचे काहि खास कारण आहे का? हा पंथ मानणार्‍या लोकांविषयी आणि या पंथाविषयी थोडी माहिती हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यादवराज्यांच्या कारकीर्दीत बाराव्या शतकात माहाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला . सर्वांसाठी खुल्या असणा-या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला. महानुभाव नावाने जरी हा पंथ आज ओळखत असला तरी त्याची महात्मा ,अच्युत, भटमार्ग , परमार्ग अशी नावे आहेत . महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. श्री. चक्रधर हे स्वतः गुजराती भाषीक अस्ले तरी ते मराठी अविरत बोलत व आपल्या तत्व्ज्ञानाचा मराठी भाषेत त्यांनी प्रसार केला.( महानुभाव पंथाबाबत जास्त सविस्तर माहिती मराठी विश्वकोश खंड १२ , मधे दिलेली आहे.)