४ कोवळ्या कैर्या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.
१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.
यम्मी. तोंपासु.. पण कैरी
यम्मी. तोंपासु..
पण कैरी मिळायला अजुन अवकाश असेल ना!!
हो गं सायली. परवा कोलंबीची
हो गं सायली. परवा कोलंबीची उडदमेथीची कृती लिहिली तेह्वा, अशीच शाकाहारी कृती करता येते का असे तिथे विचारले होते, म्हणून लिहिली.
वा! काय झक्कास पाकृ आहे. पण
वा! काय झक्कास पाकृ आहे. पण कैऱ्यांची अजून निदान महिनाभर तरी वाट पहावी लागेल.
छान! कैरीची वाट पहायला लागणार
छान! कैरीची वाट पहायला लागणार आता!
एकांकडे खाल्ली आहे पण कृती
एकांकडे खाल्ली आहे पण कृती माहीती न्हवती. आता कैर्या मिळाल्या की करुन बघेन.
खुप छान लागते कैरीची उडदमेथी.
बांगड्याची उडदमेथी ऐकली आणि
बांगड्याची उडदमेथी ऐकली आणि खाल्ली आहे... हे नवीनच. बायकोला सांगतो वाचायला
वाचायला> का करायला?
वाचायला>
का करायला?
चेतन, मासळीमध्ये उडदमेथी
चेतन, मासळीमध्ये उडदमेथी बांगडे,कोलंबी, कर्ली ह्यांची करतात आणि शाकाहारीमध्ये कैरी,आंबाडी ह्यांची करतात.
>>कैरीच्या सालांची मस्त चटणी
>>कैरीच्या सालांची मस्त चटणी होते
कृती टाक ना!!!
बाकि वरील पाककृती छान!! करेन नक्की!!
वा मस्त तोंपासु. ही साधारण
वा मस्त तोंपासु. ही साधारण रायत्यासारखीच कृती झाली ना.
नाही गं रायतं कुठे? ही आमटी
नाही गं रायतं कुठे? ही आमटी आहे, भातावर घेऊ शकतेस.
रायत्याला एवढं वाटप कोण करेल?
छान वेगळी कृती कैरीची, ह्या
छान वेगळी कृती कैरीची, ह्या सीझनला करणार नक्की. कोणी केलीत तर फोटो येऊद्या.
कन्सिस्टन्सी आमटीसारखी पातळ ठेवायची होय, ओके.
वेगळी कृती! बाळकैर्या
वेगळी कृती! बाळकैर्या आणल्यावर करुन बघणार!
मस्त, माझी आजी करायची असली,
मस्त, माझी आजी करायची असली, चुली वर्च्या आंबेमोहोराच्या भातावर ............... अशक्य लागते
रोचीनने विचारलेली कैरीच्या
रोचीनने विचारलेली कैरीच्या सालांच्या चटणीची कृती इथेच देते, सोपी आहे.
सालं किंचितश्या तुपावर जराशी परतून घ्यायची. मग सालं, थोडं खोबरं, ३- ४ ओल्या मिरच्या, थोडी साखर - १ छोटा मसाल्यातला चमचा वगैरे, मीठ असं वाटून घ्यायच. झाली चटणी.
मस्त कृती. आई अशीच कोवळी
मस्त कृती. आई अशीच कोवळी भेंडी फोडणीत परतून त्याची पण उडीदमेथी करते. बरोबर थोडं तूप घालून शिजवलेला भात . यम्मी यम्मी इन माय टमी
सेम टू सेम करायची का? माहित
सेम टू सेम करायची का? माहित नव्हतं आता करुन बघेन.
अर्रे मस्तच. टुक टुक. मला तर
अर्रे मस्तच.
टुक टुक. मला तर मिळाल्या कैर्या आज. आधी हे पाहीले असते तर आणखी आणल्या असत्या. मी आजच एका कैरीचा मेथाम्बा/कायरस केला. उद्या एक कैरी किसून बेडेकर लोणचं मसाला घालून तक्कू करणार होते. बघते आता हे करुन त्याऐवजी.
मी केली ही काल. ही रेसिपी आणि
मी केली ही काल. ही रेसिपी आणि ही रेसिपी - http://food-forthought.blogspot.com/2006/05/jihva-for-mangoes-1-uddameth... असे रेफर करून केली. मस्त झालेली एकदम.
फोटो का नाही टाकला शैलजा?
फोटो का नाही टाकला शैलजा?
मस्त रेसिपी आहे, अगदी तोंपासू...
मी टाकते थोड्यावेळात फोटो
मी टाकते थोड्यावेळात फोटो
तुला कैरी कुठे मिळाली मिनोती?
तुला कैरी कुठे मिळाली मिनोती? ब्लॉग कोणाचा? पाहते. धन्यवाद.
टाक फोटो.
दक्षिणा, अगं नोव्हेंबरात कैर्या कुठल्या मिळायला, फोटो टाकायला? मिनोती टाकेल आता.
ब्लॉग एका मैत्रिणीचा आहे
ब्लॉग एका मैत्रिणीचा आहे
आमच्याइथे कैर्या बरेचदा मिळतात. परवा गटगला कैरीची डाळ करायला म्हणून आणलेली एक कैरी ऑलमोस्ट पिकली होती मग ती हवाबंद डब्यात ठेवून दिली होती हीच उडदमेथी करेन म्हणून. शेवटी काल मुहुर्त लागला.
ओके. फोटो टाका आता
ओके. फोटो टाका आता
घ्या फोटो -
घ्या फोटो -
कैरी सह्हीच शिजलीये की
कैरी सह्हीच शिजलीये की बघूनही तोंडाला पाणी सुटलं!
माझ्या पण तोंपासु... स्लर्प!
माझ्या पण तोंपासु... स्लर्प!
फोटो पाहिल्यावर असं वाटतंय की या पदार्थाला पुण्यात (ले कोके) मेथांबा
का कायतरी म्हणतात बहुतेक..
जाणकार प्रकाश टाकतीलंच.
मी जाणकार नाही पण जे माहिती
मी जाणकार नाही पण जे माहिती आहे ते सांगते. मेथांब्याला खोबरे, उडद डाळ नसते. लाल मिरची आख्खी घालतात आणि वाटलेली नसते.
हा मेथांबा नाही. मेथांब्यात
हा मेथांबा नाही. मेथांब्यात तांदूळ,धने इत्यादी नसतात. तसंच गूळ जेवढ्यास तेवढा असतो. आणि मेथांब्याला खार/रसही भरपूर असतो.
मिनोतीच्या फोटोने जीभ शब्दशः चाळवली.
अरे पण हे आमटीच्या
अरे पण हे आमटीच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे करायचे ना? की दोन्ही पद्धतीने होते?
Pages