कैरीची उडदमेथी

Submitted by शैलजा on 26 November, 2010 - 11:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती: 

१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो गं सायली. परवा कोलंबीची उडदमेथीची कृती लिहिली तेह्वा, अशीच शाकाहारी कृती करता येते का असे तिथे विचारले होते, म्हणून लिहिली.

एकांकडे खाल्ली आहे पण कृती माहीती न्हवती. आता कैर्‍या मिळाल्या की करुन बघेन.
खुप छान लागते कैरीची उडदमेथी. Happy

चेतन, मासळीमध्ये उडदमेथी बांगडे,कोलंबी, कर्ली ह्यांची करतात आणि शाकाहारीमध्ये कैरी,आंबाडी ह्यांची करतात.

छान वेगळी कृती कैरीची, ह्या सीझनला करणार नक्की. कोणी केलीत तर फोटो येऊद्या.
कन्सिस्टन्सी आमटीसारखी पातळ ठेवायची होय, ओके.

रोचीनने विचारलेली कैरीच्या सालांच्या चटणीची कृती इथेच देते, सोपी आहे.

सालं किंचितश्या तुपावर जराशी परतून घ्यायची. मग सालं, थोडं खोबरं, ३- ४ ओल्या मिरच्या, थोडी साखर - १ छोटा मसाल्यातला चमचा वगैरे, मीठ असं वाटून घ्यायच. झाली चटणी.

मस्त कृती. आई अशीच कोवळी भेंडी फोडणीत परतून त्याची पण उडीदमेथी करते. बरोबर थोडं तूप घालून शिजवलेला भात . यम्मी यम्मी इन माय टमी Happy

अर्रे मस्तच.
टुक टुक. मला तर मिळाल्या कैर्‍या आज. आधी हे पाहीले असते तर आणखी आणल्या असत्या. मी आजच एका कैरीचा मेथाम्बा/कायरस केला. उद्या एक कैरी किसून बेडेकर लोणचं मसाला घालून तक्कू करणार होते. बघते आता हे करुन त्याऐवजी.

तुला कैरी कुठे मिळाली मिनोती? ब्लॉग कोणाचा? पाहते. धन्यवाद.
टाक फोटो. Happy
दक्षिणा, अगं नोव्हेंबरात कैर्‍या कुठल्या मिळायला, फोटो टाकायला? मिनोती टाकेल आता.

ब्लॉग एका मैत्रिणीचा आहे Happy
आमच्याइथे कैर्‍या बरेचदा मिळतात. परवा गटगला कैरीची डाळ करायला म्हणून आणलेली एक कैरी ऑलमोस्ट पिकली होती मग ती हवाबंद डब्यात ठेवून दिली होती हीच उडदमेथी करेन म्हणून. शेवटी काल मुहुर्त लागला.

माझ्या पण तोंपासु... स्लर्प! Happy
फोटो पाहिल्यावर असं वाटतंय की या पदार्थाला पुण्यात (ले कोके) मेथांबा
का कायतरी म्हणतात बहुतेक.. Uhoh
जाणकार प्रकाश टाकतीलंच.

मी जाणकार नाही पण जे माहिती आहे ते सांगते. मेथांब्याला खोबरे, उडद डाळ नसते. लाल मिरची आख्खी घालतात आणि वाटलेली नसते.

हा मेथांबा नाही. मेथांब्यात तांदूळ,धने इत्यादी नसतात. तसंच गूळ जेवढ्यास तेवढा असतो. आणि मेथांब्याला खार/रसही भरपूर असतो.

मिनोतीच्या फोटोने जीभ शब्दशः चाळवली. Happy

अरे पण हे आमटीच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे करायचे ना? की दोन्ही पद्धतीने होते?

Pages