घरात leakage होत असल्यास खर्च कसा वाटून घ्यावा ?

Submitted by ऊर्जा on 20 November, 2010 - 17:24

आम्ही रहात असलेल्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅटमध्ये आमच्या बाथरुममधून leakage होत आहे. आमची सोसायटी व तिचे बांधकाम नवीन आहे ( तीन-चार वर्षं जुने. ) अशा वेळी दुरुस्तीचा खर्च कशा प्रकारे वाटून घेतला जावा ?
हे विचारण्याचे कारण म्हणजे जरी आमच्या घरातून गळत असले तरी तो construction मधील दोष आहे. आमचा दोष नाही. ( आमच्या बाथरुमला टाईल्स फुटल्या आहेत किंवा फरशी हलत आहे असे काही असते तर हा प्रश्न मी इथे विचारलाच नसता. ते काम आम्ही आमच्या खर्चानेच करुन घेतले असते. )
दुसरे म्हणजे मी आणि माझा नवरा लहानपणापासून ज्या सोसायट्यांमध्ये वाढलो त्या दोन्ही ठिकाणी खर्च ज्या घरात गळत आहे आणि ज्यांच्या घरातून गळत आहे अशा दोघांनी अर्धा खर्च करावा असा नियम होता. त्या नियमाला धरुन आम्ही आमच्या खाली राहणार्यांना अर्धा खर्च द्यायची तयारी दाखवली. त्यावर त्यांचे उत्तर पूर्ण खर्च तुम्हीच करायला हवा असा आहे आणि भांडायची खुमखुमी आहे.

ह्या संदर्भात हाऊसिंग सोसायटीचा काही लिखित नियम आहे का ? आम्हाला आमची दोन्ही बाजूंनी कोंडी नको आहे. उद्या वरच्यांच्या घरातून आमच्या घरात गळले आणि त्यांनी तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही बघून घ्या असं म्हटलं तर आम्हाला दोन्हींकडून भूर्दंड पडेल. आम्ही सोसायटी कमिटीला ह्या बाबतीत एक नियम घालून द्या अशी गळ घातली आहे. त्यावर त्यांनी सर्व सभासदांकडून सजेशन्स मागवल्या आहेत.

ह्याच विषयाला धरुन गच्चीतून खालच्या फ्लॅटमध्ये होणारे leakage किंवा बिल्डिंगच्या बाहेरच्या पाईपमधून होणारे / आतल्या पाईपमधून बाहेरच्या भिंतीवर होणारे leakage हा खर्च कसा वाटून घेतला जातो ?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा काही नियम वगैरे आहे की माहित नाही. पण मलाही अशा आडमुठ्या शेजा-यांचा अनुभव आलाय. Happy

मी सिडकोने बांधलेल्या घरात राहते. पावसाळ्यात अख्ख्या कॉलनीतच गळते. कॉलनीत रो हाऊसटाइप रचना आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये फक्त पहिल्या मजल्यावर मी आणि खाली एक कुटूंब एवढेच. माझ्या डोक्यावरच्या गच्चीवरुन गळत होते तेव्हा त्याचा त्रास खालच्या कुटूंबाला पण होत होता तरी त्यांनी गच्ची रिपेरिंगचे पैसे द्यायचे नाकारले. मला त्रास जास्त म्हणुन मी पैसे खर्च करुन रिपेर केले. माझ्या हॉलसमोरच्या गच्चीतुन त्यांच्या घरात गळते, त्यांना घर विकायला काढायचेय म्हणुन शेवटी गळती रिपेर करायचे त्यांनी ठरवले. अर्थातच माझ्याकडे अर्ध्या पैश्यांची मागणी केली. मीही नकार दिला. लगेच सोसायटीकडे तक्रार. सोसायटीवाले घरी आल्यावर मी त्यांना माझी बाजु सांगितल्यावर, बिल्डींगच्या बाहेरील कामाचा खर्च दोघांनीही वाटून घ्यावा असे त्यांचे मत पडले. वरच्या कामाचे पैसे मला द्यावेत म्हणजे खालच्या कामाचा अर्धा भार मी उचलेन असे त्यांनी खालच्या शेजा-यांना कळवले Happy आतही काही गळती असेल आणि ती बिल्डिंगच्या बांधकामामुळे असेल तर दोघांनीही खर्च वाटुन घ्यावा असा सर्वसाधारण नियम आहे असेही ते म्हणाले. अधिकृतरित्या काय आहे ते मात्र मलाही माहीत नाही.

धन्यवाद साधना Happy
माझ्या हॉलसमोरच्या गच्चीतुन त्यांच्या घरात गळते, त्यांना घर विकायला काढायचेय म्हणुन शेवटी गळती रिपेर करायचे त्यांनी ठरवले. अर्थातच माझ्याकडे अर्ध्या पैश्यांची मागणी केली. >>> निदान अर्ध्या पैशांचीच मागणी केली. आमच्या केसमध्ये पूर्ण खर्च तुम्हीच करा म्हणून भांडत आहेत. आम्हाला गंमत वाटते ती ही की त्रास त्यांना होतोय तेव्हा त्यांची बाजू लंगडी आहे पण तरी आमच्यावरच अरेरावी चालली आहे.
माझ्या सासुबाई तर सांगतात की बिल्डिंग जुनी झाल्यावर त्यांच्या घरात जेव्हा वारंवार गळत असे तेव्हा त्या आपल्या खर्चाने वरच्यांच्या बाथरुममध्ये व्हाईट सिमेंट लावून घेत असत. किती वेळा त्यांच्याकडून खर्च घ्यायचा म्हणून.
चांगुलपणा दाखवला तर समोरचा अजूनच त्रास देतो असा अनुभव येतो. असो.

माझा stand तर चुकत नाही ना असं आता त्यांच्या अरेरावीमुळे वाटू लागले म्हणून इथे विचारले. leakage हा हाऊसिंग सोसायट्यांमधला कॉमन प्रॉब्लेम. पण बहुतेक मायबोलीकर सोसायटीत राहणारे नसून स्वतःच्या प्रायव्हेट बंगल्यांत राहणारे असावेत म्हणूनच इथे कुणी मदतीला येत नाहीये Happy

माझा stand तर चुकत नाही ना असं आता त्यांच्या अरेरावीमुळे वाटू लागले म्हणून इथे विचारले

अजिबात चुकत नाहीये असे मला तरी वाटते. माझा शेजारी फुफ्फुसाच्या आजाराने पिडलाय. घरात कायम ऑक्सिजन लाऊन बसलेला असतो. असे असुनही नेहमीच जोरजोरात आरडाओरडा करतो. त्याच्या आजाराला घाबरुन आम्ही नेहमी गप्प बसायचो. उगाच प्रत्युत्तरे केली आणि म्हातारा चिडुन ओरडायला लागला आणि त्यातच कसला अ‍ॅटॅक आला तर उगाच आपल्या डोक्यावर पाप Happy या वेळी मात्र मी अजिबात न घाबरता त्याच्यावर आवाज चढवुन बोलल्यावर निमुटपणे खाली गेला. Happy

तरी बरे, दोन्ही पोरे बाहेर आहेत, त्यामुळे अगदी गणपतीपासुन लक्ष्मीपुजेवगैरेची सगळी मदत आम्हीच करतो. माझा नवरा तर पुजेला केळीचे खांब आणुन बांधण्यापर्यत तिथेच असतो Happy एवढी मदत करुनही भांडायला मात्र सदा तयार.

ऊर्जा, आमच्या घरात गळत होते तेव्हा आम्ही आणि वरच्यांनी खर्च हाफ - हाफ वाटुन घेतला होता. पण त्यासाठी त्यांच्या बरेच मागे लागावे लागले होते. त्यापूर्वी एकदोनदा आमच्याच खर्चाने वर व्हाईट सिमेंट लावून घेतले होते. आमच्या वर स्वतः मालक रहात नाही. तर भाडेकरु असतात. ते बाथरुम अ‍ॅसिड्ने धुत आणि व्हाईट सिमेंट निघुन जात असे. आता निम्मातरी खर्च आपल्यालाच करायला लागतो हे कळल्यावर मालक सुधारला आणि आता तो भाडेकरुंना समज देतो.
आमच्या सोसायटीत, घरात गळत असेल तर दोघांनी मिळुन काहिही करा, सोसायटी काहीच करणार नाही असे सांगतात. अगदी कोणी खर्च करायचा असा काहिही नियम नाही लावता येणार असे सांगितले होते.
आणखी एक, हे काम खात्रीच्या माणसाकडुन करुन घ्या. आणि पुन्हा लिकेज झाले तर पुन्हा येउन फ्रीमधे करावे लागेल हे लिहुन घ्या. काही जण तशी ग्यारंटी देतात. नाहीतर हे काम सारखेसारखे करावे लागते.

तुमच्या बाथरूम मधून गळत असेल तर तुम्हीच पैसे देऊन करून घ्यायला हवे. तुमच्यामुळे त्यांना किती त्रास? कन्स्ट्रक्षन दोष असेल तरी तुम्ही आता त्या जागेचे मालक ना?

अश्विनी, तु म्हणतेस ते बरोबर आहे तात्विकदृष्ट्या. पण मुळ बांधकामातला दोष काय आपण मुद्दामहुन सांगुन करुन घेतलेला नाही. उद्या हिच्या घरात गळायला लागले आणि वरचे म्हणाले, बांधकामातला दोष आहे, आमची काय चुक?? तुमच्या घरात गळतेय, तुम्हाला हवे तर दुरुस्त करा नाहीतर गळती पाहात बसा, तर काय करणार?? मुंबईत तरी असा खर्च वाटुन घ्यायची पद्धत आहे.

आणि ज्यांना भांडायची खुमखुमीच आहे, त्यांना मुद्दाम सहकार्य का करावे? कोणी प्रेमाने मागेल तर मी माझ्या पुढ्यातले ताटही देईन, पण मुद्दाम भांडणा-यांसमोर का म्हणुन नमावे?

>>>> पण बहुतेक मायबोलीकर सोसायटीत राहणारे नसून स्वतःच्या प्रायव्हेट बंगल्यांत राहणारे असावेत म्हणूनच इथे कुणी मदतीला येत नाहीये Lol Lol Lol
तसच काही नसावं, पण असा प्रश्न कुणाला पडलाच नसेल तर उत्तर काय देणार कप्पाळ?
पण माझ्यापुरत मी सान्गतो, मी झोपडपट्टी पासून लाकडी डुगडुगती चाळ ते कॉन्क्रीटची चाळ ते सरकारी कॉलनीज ते स्वतन्त्र बन्गल्यापर्यन्त सगळीकडे राहिलो आहे.
असे प्रश्न आले असता, खर्च समान्/विषम प्रमाणात वाटून घेण्याची पद्धत बघितली आहेच पण ज्याच्या इथे (वरच्या मजल्यावर) दुरुस्ती करणे आवश्यक आहे ते खर्चातील वाटा दूरच राहीला, दुरुस्तीसच परवानगी देत नसल्याची उदाहरणे देखिल माहित आहेत. Proud
सबब, माझ्यामते तरी समोरचा कसा आहे (व आपली क्षमता काय आहे) त्यावरुन काय कसे वागायचे हे ठरवावे. सपशेल लोटान्गण ते नाठाळाचे माथी हाणा काठी इथवर सर्व पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही अमकेच असेच वागा असा सल्ला इथे सार्वजनिक फोरमवरच काय, कुणी वकिल पैसे घेऊन देखिल "नेमका" असा सान्गणार नाही. ते तुमचे तुम्हालाच परिस्थितीसापेक्ष ठरवावे लागेल.
तरीही, माझ्यामते तुम्हाला पुढील पर्याय उपलब्ध आहेत.
१) अर्ध्या अर्ध्या (वा विषम) प्रमाणात खर्च वाटून घेण्याची मागणी करत रहाणे.
२) सर्व खर्च स्वतःच करुन कटकट कायमची मिटवणे.
३) खर्चाचे विसरा, फ्लॅटच्या आत पाऊल तर ठेवा (दुरुस्तीला), तन्गड मोडून ठेविन हा स्टॅण्ड घेणे Proud
४) गाठीशी पैसा जास्त असेल (अन धमक असेल), तर दुरुस्ती स्वखर्चाने करायला काढून, वर्षसहामहिने काम रेन्गाळवुन नुस्त्या गळण्या ऐवजी "शॉवरचा" अभिषेक खालच्यान्ना घालणे. Biggrin
(विसू: याला "विकृती " म्हणत नाहीत, होना, हे सान्गायला लागते, नैतर कै कै येडच्यापान्ना केवळ हा शब्दच तेवढा अर्थाविना माहित अस्तो, बसतात बोम्बलत! Proud )
याव्यतिरिक्त उपायही जाणकार माबोकर सान्गु शकतील असा विश्वास आहे.
कळावे.

खर्चाचे विसरा, फ्लॅटच्या आत पाऊल तर ठेवा (दुरुस्तीला), तन्गड मोडून ठेविन हा स्टॅण्ड घेणे

हा एकदम जबरदस्त Proud

धन्यवाद सर्वांना Happy
अश्विनीमामी, खरे पाहता concrete slab च्या मधून पाणी गळलेच नाही पाहिजे. ते गळतेय ह्याचाच अर्थ तो बांधकामातील दोष आहे. दुसरे म्हणजे ती slab आम्ही दोघे share करतो. त्रास त्यांनाही ( खरे तर त्यांनाच ) होतो आहे त्यामुळे अर्धा खर्च त्यांनी उचलायला हवा. खरं तर limbutimbu ह्यांनी लिहील्याप्रमाणे आपल्या घरात दुरुस्ती करु द्यायला त्रास देणार्यांचीच संख्या जास्त असते. ते चुकीचे आहे हे मला मान्य आहे.
प्रत्येक सोसायटीमध्ये ह्या बाबतीत नियम हवा हे निश्चित. आम्हाला दोन्हीकडून धोपटून घ्यायची हौस नाही.

सोसायटीच्या मेन्टनेन्स विभागाकडुन करून घ्यायचं अर्थात ज्यात तुम्ही (सोसायटी) दर महा रक्कम जमा करत असता.

आमच्या सोसायटीत खर्च निम्मा निम्मा करायचा असा नियम आहे. बाहेरच्या भिन्तीचा किन्वा टेरेस गच्ची इथे problem असेल तर खर्च सोसायटी करते. आमच्या बाथरुम मध्ये गळत होते म्हनुन वरच्यान्ना सान्गितले तर त्यान्नी थोडा वेळ घेतला पन सगळा खर्च त्यान्नीच केला. निम्मा खर्च मी देतो म्हन्ट्ले पन त्यान्नी घेतले नाहित. आमच्या खिडकी जवळ मधमाश्यान्नी घर केले. ते पेस्ट कन्ट्रोल करायच्या वेळी सगळ्यान्ना दार खिडक्या बन्द करा म्हनुन सान्गायला गेलो तर चेअरमन 'हे इमारतिच्या बाहेरचे काम आहे असे सान्गुन सोसायटीच्या खर्चाने ते काम करुन घेतले.

यशवन्त.. कुठची हो ही सोसायटी.. नशिब चांगले आहे तुमचे..

बाकी लिंबूंना अनुमोदन.

उर्जा, सध्या आमच्याकडे लिकेज आहे आणि ते घर ताब्यात घेतले तेंव्हापासून होते. बिल्डरशी फॉलो अप करून फायदा झाला नाही, सोसायटीने देखील दखल घेतली नाही.

दोघेही कामाला.. कधी देशात तर कधी विदेशात.. त्यामुळे आम्हीदेखिल विशेष तगादा लावला नाही. सध्या रंगकाम काढले तेंव्हा हा प्रश्ण पुन्हा एकदा ऐरणीवर आला.सोसायटीने कोणतीही अधिकृत पहाणी न करता "हा तुमचा आणि वरच्यांचा प्रश्ण आहे.. तुम्ही सोडवा" असे कळवले आहे. मी माझ्या खर्चाने वरच्याच्या घरात काम करून घेतले.. कारण वरचा माणूस लिंबूंच्या पोस्टीतला ३रा गट.. आणि आम्हाला वेळ नव्हता.. अजुनही थोडेसे लिकेज आहेच नि ते पावसात अजुन वाढेल..

आम्ही सोसायटीला मेंटनन्स देणे बंद केले आहे. जोपर्यंत लिकेज थांबणार नाही.. मेंटेनन्स देणार नाही..
सध्या आम्ही विदेशी आहोत.. त्यामुळे अजुन ताशे वाजणे सुरू झाले नाहीये... पण आम्ही ऐकून घेतो आणि ऐपत राखून आहोत म्हणून सोसायटी आणि वरच्या फ्लॅटमधला दोघेही माजास आलेले आहेत.. Angry