(वरडू दे अंगावरती जे सुचले आहे)

Submitted by ३_१४ अदिती on 19 November, 2010 - 01:15

प्रेरणा

वरडू दे अंगावरती जे सुचले आहे
जरी मला आवडले विडंबन सुचले आहे/धृ/

वळवळणारे किडे कधी रोखता न येते
मनात असुनी शब्द रोखणे शक्य न होते
काव्याचे भेंडोळे मला कधी का पचले आहे?/१/

कवनांचा हा पूर, त्रास देऊनी छळतो
'उपाय' विडंबन एकच मजला कळतो
जाणूनी हे सत्य मी नाचले आहे/ २ /

शब्दखुणा: 

सूर्यकिरणांनी बरोबर ओळखलं आहे. बरेच दिवस मायबोलीवरही काहीतरी लिहावं असं ठरवत होते; आज सकाळी सकाळी कविता/प्रेरणा दिसली आणि माझ्या गद्य स्वभावामुळे ती काही नीटशी पोहोचली नाही. म्हणून मग स्वतःसाठी पेश्शल कविता बनवली. आता कविता समजत नाही याचं मला वाईट नको वाटायला.

अदिती