Submitted by ३_१४ अदिती on 19 November, 2010 - 01:15
वरडू दे अंगावरती जे सुचले आहे
जरी मला आवडले विडंबन सुचले आहे/धृ/
वळवळणारे किडे कधी रोखता न येते
मनात असुनी शब्द रोखणे शक्य न होते
काव्याचे भेंडोळे मला कधी का पचले आहे?/१/
कवनांचा हा पूर, त्रास देऊनी छळतो
'उपाय' विडंबन एकच मजला कळतो
जाणूनी हे सत्य मी नाचले आहे/ २ /
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
बै नमस्कार.. पोचल्यांव काय
बै नमस्कार.. पोचल्यांव काय इकडे पण....
नीधप बै चाच हातगूण.
नीधप बै चाच हातगूण.
मस्त पण ओळखीचा वास येतोय
मस्त
पण ओळखीचा वास येतोय ह्या विडंबनात ! विकिच ना ?
मस्त
मस्त
सूर्यकिरणांनी बरोबर ओळखलं
सूर्यकिरणांनी बरोबर ओळखलं आहे. बरेच दिवस मायबोलीवरही काहीतरी लिहावं असं ठरवत होते; आज सकाळी सकाळी कविता/प्रेरणा दिसली आणि माझ्या गद्य स्वभावामुळे ती काही नीटशी पोहोचली नाही. म्हणून मग स्वतःसाठी पेश्शल कविता बनवली. आता कविता समजत नाही याचं मला वाईट नको वाटायला.
अदिती
तै... आलासा कै हितं पण.... लै
तै... आलासा कै हितं पण....
लै भारी नमनालाच सेंचुरी