ईंद्रा - मला ट्रेकिंगची फार आवड आहे.... तुला
मी - मला ... उंचीवरून खाली बघण्याची मला भिती वाटते... ट्रेकिंग मला तरी नाही जमणार..
ईंद्रा - त्यात काय एवढ... मी तुला नक्की घेऊन जाणार एकदातरी....
*************************************************
मायबोलीवर राजमाची ट्रेकची चर्चा होऊ लागली आणि मला साडेपाच वर्षापुर्वीचा वरील संवाद आठवला.. ट्रेकींग आणि मी हे गणित माझ्याकडून तरी सुटत नव्हत, पण ईद्र म्हणाला "अग.. लहान मुलांचा तर आहे ट्रेक, फार अवघड नाही आहे, तुला जमेल... श्रीशैलला पण जमेल ... ".
तेव्हा मोठ्या उत्साहात मी म्हणाले जाऊयात....
पण जसा जसा ट्रेकचा दिवस जवळ येऊ लागला तस तशी माझ्या मनातली भिती आणखीनच वाटू लागली.. आदल्या दिवशी रात्रीपर्यंत हो नाही हो नाही चाललच होत... त्या भितीतच सगळ सामान भरल गेल... आणि .......
जाण्याच्या दिवसाची सकाळ उजाडली... पटापट तयार होऊन मी , ईंद्र, श्रीशैल आणि माझी भाची असे आम्ही बाहेर पडलो तर आम्हच्या घरासमोरच ट्रेकला जाण्याची बस आली होती... श्रीशैलचा उत्साह तर बघण्याजोगा होता... त्याचे आजोबा त्याला म्हणाले... " श्रीशैल मी पण येऊ का रे डोंगर चढायला.. " तर हा लगेच अनुभवी ट्रेकर असल्यासारखे भाव चेहर्यावर आणून म्हणतो कसा... " नको..... तुम्ही घाबराल... "
गाडी समोर उभीच होती... आत आल्यावर पुर्वा नावाच्या छोट्याश्या गोड मुलीने मस्त हसून स्वागत केले.. श्रीशैलच्याच वयाची होती ती... तीला बघून मनात म्हटल , चला कोणीतरी आहे श्रीशैल बरोबर.. .
विचार करता करता नाहूर स्टेशन जवळ आलो , तिथे आधीच ट्रेकींगवाल्यांची एक बस आली होती.. दोन्ही बस मध्य सगळ्या सामानांची मांडणी केली आणि दिन्ही बसेस अखेर लोणावळ्याच्या मार्गाला लागल्या.....
गाडि सुरू होताच मायबोलीवरच्या गप्पा सुरू झाल्या... आणि त्या गप्पांतच आम्ही सगळे रबाळ्याला पोहोचलो... पोहचताच क्षणी तिथे मस्त गरम गरम उपमा आणि चहा असा सुटसुटीत नाश्ता पार पडला , आणि परत आमची गाडी मार्गाला लागली... पोटात बर्यापैकी भर पडली असल्यामुळे गाडीत सगळ्यांचे गळे फुलू लागले... लहान मुलांचा ट्रेक म्हणून सुरूवातीला लहान मुलांची गाणी झाली... आणि नंतर नंतर तर.. विन्याच्या लावण्या ...असुदे, गिरिविहार. आनंद केळकरांनी गायलेली गाणी.... काय बर ... हा.... सुहाना सफर....... ओर ये मौसम जवा.... आणि त्या भन्नाट आरत्या.... याने तर गाडीत
जाण आली... आनंद केळकरांना तर वारंवार सांगावे लागे... अरे अरे हा लहान मुलांचा ट्रेक आहे ....
विनय तर अर्जुनाला जसा ईतर काही न दिसता फक्त पक्षाचा डोळा दिसतो , तस त्याच्या प्रत्येक गाण्यात घारूअण्णाचा उल्लेख होता...खुप मजा येत होती. या मजेतच लोणावळा आला आणि सुर्यकिरण गाडीत आला... आणि काही वेळाने खंडाळ्याजवळच्या कामत हॉटेलजवळ आमची गाडी थांबली, तिथे सगळ्यांची वेगवेगळ्या गटांमघ्ये विभागणी झाली... आणि परत आमची गाडी डायरेक्ट राजमाची गावाजवळ येऊन थांबली.
अति उत्साहात गटांची विभागणी आणि मोजणी पार पडल्यावर आम्ही मार्गाला लागलो... पहिला गृप निघाला तो लहान मुलांचा आणि शेवटपर्यंत पहिलाच राहिला... बरीच पायपीट झाल्यावर आम्ही एका ओढ्याजवळ पोहोचलो , थोडा पायाला थंडावा लागला, आणी परत पुढच्या मार्गावर... जवळजवळ अडिच तासाची पायपीट केल्यावर अखेर आम्ही आमच्या मुक्कामावर पोहोचलो... हुश्श......
गरम गरम जेवण , उकड्या तांदळाची भाकरी अस मस्त जेवण झाल्यावर जरा आराम करायला पडतो न पडतो तोपर्यंत कवितांनी पुढच्या कामाची रुपरेषा सांगितली. तीन साडे तीन ला पावसाने हजेरी लावली आणि मी आणि श्रीशैल न जाण्याचा विचार करताक्षणीच पाऊस थोडा कमी झाला, पण हवेत गारवा बराच असल्यामुळे ईंद्र म्हणाला श्रीशैलबरोबर मी थांबतो तु आणि अपुर्वा जाऊन या... आम्ही सगळ्यांबरोबर निघालो, थोड्या अंतराने एका मंदिराजवळ येऊन पोहचलो. तिथून पुढे आम्ही मनोरंजन गडावर चढण्यासाठी निघालो. जस जस वर चढत होतो तस तशी आम्हा दोघींना भिती वाटू लागली, अजून थोड अजून थोड करता करता आणि मनाला समजावता एका वळणावर आलो , ते वळण बघताच मी आणि अपुर्वा फक्त रडायचो बाकी होतो, आमचा आरडाओरडा ऐकून विश्वेष नवरे आमच्या मदतीला आले आणि त्यांनी आम्हाला ट्रेकचे धडे देता देता वळणावरून पुढे सरकवले, आम्ही दोघीहि घाबरत घाबरतच जात होतो. छोट्यांचा उत्साह तर बघतच राहिलो, सगळ्यांच्या पुढेच... गडावर एका टप्प्यावरून आम्हि मुक्कामाला असलेले घर दिसत होते, तिथून आम्हाला ईद्राने पाहिले, तोपर्यंत पाऊसही कमी झाला होता.
परत निघताना मात्र परत त्या वळणावरून जायचा विचार करूनच मला त्या थंडाव्यातदेखील घाम फुटत होता, तेवढ्यात कोणीतरी बोलले आपण दुसर्या मार्गाने जायच आहे, तसा जीवात जीव आला. मी आणि अपुर्वा ऐकमेकींशी बोलत असताना एक लहान मुलगा आम्हाला मिश्किलपणे बोलला.. " काय काकू तुम्ही एवढ्या घाबरताय... हा तर चिंधी ट्रेक आहे.... " आम्हि ऐकमेकींकडे बघतच राहिलो... चिंधी..
आम्ही तिथून निघेपर्यंत ईंद्र श्रीशैलला घेऊन आला देखील....
गावात आल्यावर मस्त चहा झाल्यावर परत सगळ्यांची मैफल जमली, अंताक्षरी सुरू झाली , मैफिलीत रंग चढतच होता पण आमचा सूर बहुतेक जेवण बनवणार्या काकींच्या कानावर गेला आणि त्यांना वाटल आम्हाला भूक लागली असेल म्हणून त्यांनी लगेचच जेवणाची मांडणी केली. नाचणीची भाकरी, पिठल , वरण भात, असा बेत होता. अधून मधून घारुअण्णा काहिजणांना भाकरी आणि पिठल्याबरोबर कांदा आणि मिरची कशी टेस्टी लागते याची माहिती देत होते..
जेवण आटोपल्यावर आम्ही बायका मुले अंथरूणात गाढ झोपण्याच्या तयारीत होतो, पण खोलीत विक्स आणि बामाचा घमघमाट सुटला होता, तर बाहेर घारूअण्णा चहाची मागणी करत होते, सगळे दमले होते तरीही बाहेर चर्चेला बहार येत होती. जवळ जवळ एक वाजेपर्यंत गप्पागोष्टि चालूच होत्या. ईकडे माझ्या पायाचे तुकडेच पडायचे बाकी होते, पायाचे दुखणे बघून उद्या श्रीवर्धन गडावर जाऊया कि नको याचा विचार करता करताच झोप लागली.
सकाळी आमच्या कॅप्टनने सगळ्यांना ठरलेल्या वेळेत उठवलेच. सकाळच्या मस्त गार हवेत गरम गरम चहा आणि बिस्किटे संपवून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. परत त्याच मंदिरापाशी सगळे जमल्यावर परत एकदा काऊंडाऊन झाले, आणि गडावर मिळणार्या नाश्ताची म्हणजेच मस्त पुरणपोळीची घोषणा झाली, तसे आम्ही चढायला सुरूवात केली.... आमच्या दोघीची परत तीच अवस्था ... थोड्या उंचीवर गेल्यावर माझ्यासोबत बाजूचा डोंगर चालतोय अस वाटत होत. बिचारा माझा नवरा श्रीशैलला खांद्यावर आणि मला सांभाळत चढत होता. मी तर त्याचा हात घट्ट पकडलेला होता. सगळे मात्र बिनधास्तपणे चढत होते. अखेर शेवटच्या टप्प्यावर आलो, ठरल्याप्रमाणे पुरणपोळीचा बेत मांडला गेला, प्रत्येकाला पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार आणि लोणच दिले. पुरणपोळीबरोबर + लोणच अस काँबिनेशन मी पहिल्यांदाच चाखल होत. छान लागत होत हे मात्र नक्की.
एवढ्या वर आलो आता परत एवढ खाली जावे लागणार या भितीनेच माझ्या पायाला घाम फुटायला लागला. उतरताना तर आणखीनच मजा. मी तर नवर्याचा हात ईतका घट्ट पकडलेला होता की लग्नाच्या वेळेला सप्तपदी चालतानापण पकडला नव्हता. मला तर नक्कि वाटतय ईंद्राला तर सत्तरपदी चालल्यासारखा वाटला असेल, आणि यापुढे मला ट्रेकला आणायचे की नाही याचाही विचार केला असणार.
श्रीशैलचा तर शाही ट्रेक होता, मस्त बाबांच्या खांद्यावर बसून होता.
खाली उतरेपर्यंत अकरा वाजले होते. गावातच असलेले मंदिर आणि तलावाकडे जायचे ठरले पण मी काही गेले नाही. दुपारचे जेवण झाल्यावर बच्चेकंपनींसाठी पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सोपस्कर पार पडला. बाकिच्यांना थेपले आणि पुरणपोळ्या यांचा वाटप करण्यात आला.
परतीच्या वेळेला मात्र परत अडिच तासाची तंगडतोड होणार म्हणून जरा नाराजीच होती , पण ईलाज नव्हता. निघायच्यावेळी घारुअण्णांनी शिवाजी महाराजांचे स्मरण करून आणि जण गण मन गीत सादर करून परतीच्या प्रवासाला निघालो. सगळ्या बच्चेकंपनीला सुमो आणि झायलो गाडीत कोंबून सगळे ओढ्याच्या दिशेने निघाले. मी तर कित्येक वेळेल्या त्या चढलेल्या गडांकडे बघत बघतच चालले होते आणि आश्चर्य व्यक्त करत होते.
ओढ्यापाशी मजा करतो न करतो तोवर ढगांनी डरकाळी फोडली, जोरदार पाऊस येण्याची शक्यता वाटत होती म्हणून सगळ्यांनी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. बसजवळ पोहचायच्या आधीच पावसाने हजेरी लावली. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे दोन्ही बसेस खंडाळ्याच्या दिशेन धावल्या. काही वेळाने एका ठिकाणी आम्ही थांबलो, आणि तिथे मस्त गरम गवती चहाची पात टाकलेला चहा अगदी छानश्या कपातून मिळाला. आणि तिथून मुंबईच्या दिशेने दोन्ही बसेस निघाल्या...
***********
मी आजपर्यंतच्या आयुष्यात केलेला पहिला ट्रेक हा नक्कीच अविस्मरणीय आहे. भितीच्या वेळी आपण देवाची आठवण काढतो, पण मायबोलीकर आणि ईतर ट्रेकर्स असल्यामुळे मला खरच देवाचीहि आठवण झाली नाही. सगळ्या टिमवर्कसअचे मनापासून आभार....
आणि पुढच्या लहान मुलांच्या ट्रेकसाठी तर नक्कीच यायला आवडेल.
तळटिप : वृत्तांत लिहायचा पहिलाच प्रयत्न गोड मानून घ्या रे सगळ्यांनो...
>>हा तर चिंधी ट्रेक आहे... >>
>>हा तर चिंधी ट्रेक आहे... >>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलाय वृ, आवडला
छान लिहिलंय . जुई, तुझा
छान लिहिलंय :).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जुई, तुझा पहिलाच वृतांत भारी आहे
मी तर नवर्याचा हात ईतका घट्ट पकडलेला होता की लग्नाच्या वेळेला सप्तपदी चालतानापण पकडला नव्हता. मला तर नक्कि वाटतय ईंद्राला तर सत्तरपदी चालल्यासारखा वाटला असेल>>>>:फिदी:![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मग, आता तरी भिती गेली कि नाही
मग, आता तरी भिती गेली कि नाही ?
चिंधी ट्रेक आणि सत्तरपदी >>
चिंधी ट्रेक आणि सत्तरपदी >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नीता, झक्कास जमलाय वृत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा... चार प्रतिसाद ....
अरे वा... चार प्रतिसाद ....
धन्यवाद
दिनेशदा भिती बर्यापैकी कमी झाली हे मात्र नक्की....
लय भारी वृत्तांत. नवर्याला
लय भारी वृत्तांत.
नवर्याला सुनवायची ही संधी साधायला पाहिजे होतीस पण![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खुप खुप मजा लिहायची राहिलीच
खुप खुप मजा लिहायची राहिलीच वेळे अभावी...
मस्त लिहिलाय वृतांत....
मस्त लिहिलाय वृतांत....
जुई, माझा पीसी बोंबललाय
जुई, माझा पीसी बोंबललाय नाहीतर तुझ्या या वृतांतासाठी काही परफेक्ट फोटो होते माझ्याजवळ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जिप्सी माझ्याकडे काही फोटो
जिप्सी माझ्याकडे काही फोटो वगैरे नाही आहेत रे... तुझा पिसी बोंबलायचा थांबला कि पाठव रे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त गं जुई! पहिल्या वहिल्या
मस्त गं जुई! पहिल्या वहिल्या ट्रेकबद्दल अभिनंदन!
मी तर नवर्याचा हात ईतका घट्ट
मी तर नवर्याचा हात ईतका घट्ट पकडलेला होता की लग्नाच्या वेळेला सप्तपदी चालतानापण पकडला नव्हता. मला तर नक्कि वाटतय ईंद्राला तर सत्तरपदी चालल्यासारखा वाटला असेल>>>> अगदी अगदी... मागून येणार्या नवरे कं.ने संधी साधून (की पाहून) अगदी हाच टोमणा मारला होता :d
वृत्तांत वाचून सगळी धमाल परत एकदा अनुभवायला मिळाली... मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकास वृत्तांत. फांदीवर
झकास वृत्तांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फांदीवर झोपलेलं पिल्लू तुमचं आहे तर. फार गोड आहे. स्टाइलीत झोपलंय.
>>>" नको..... तुम्ही घाबराल... "![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
जुई.. सहिये वृत्तांत...
जुई.. सहिये वृत्तांत...
चिंधी ट्रेक, सत्तरपदी, " नको..... तुम्ही घाबराल... " >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वृत्तांत वाचून सगळी धमाल परत
वृत्तांत वाचून सगळी धमाल परत एकदा अनुभवायला मिळाली... मस्त >>>> धम्माल= सत्तरपदी ना![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त वृत्तांत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नीता, मस्त वृत्तांत तू नक्की
नीता, मस्त वृत्तांत
तू नक्की पुढचाही ट्रेक करणार.
मस्तच , जुईताई. आवडला
मस्तच , जुईताई. आवडला वृत्तांत
... बाकी लग्नाआधी सत्तरपदी मी गड उतरताना अनुभवली अन त्यात सोनटक्के कॅप्टनची टोमणा मंत्रावली सुद्धा. श्रीशैल , दमला कि खाली बसायचा, पायाला माती लागते आहे, चिख्खल आहे हि कारणं मस्तच होती त्याची. पण गड्याचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसला नाही.
व्वा! मस्त वृत्तांत!
व्वा! मस्त वृत्तांत!
-'बेफिकीर'!
मस्तच गं...... फोटो पाहीजे
मस्तच गं......![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फोटो पाहीजे होते ग मजा आली असती....
धन्यवाद सगळ्यांना.... <<फोटो
धन्यवाद सगळ्यांना....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<फोटो पाहीजे होते ग मजा आली असती.... >> हो रे पण काय करणार माझ्याकडे एकहि फोटो नाही आहे , राजमाची ट्रेकचे ईतरांनी दिलेले फोटो टाकले असते, पण काय आहे ना, एकतर मी हा वृत्तांत ऑफिसमध्ये बसून लिहत होते, ईतर बरिच कामे पण होती , आणि मला ते अपुर्ण वगैरे कस काय लेखन ठेवता येते , किंवा आधी लिखाण करून नंतर प्रकाशित कस करायच हे खरच माहित नाही आहे, म्हणून जेवढा पटापट लिहता आला तेव्हढाच प्रकाशित केला, मनात म्हटल एवढ्या मेहनतीने लिहला आहे, परत काँप्युटर हँग झाला , किवा काहि प्रॉब्लेम झाला तर मी केलेली मेहनत पाण्यामध्ये... म्हणून...
मस्त वृत्तांत जुई..अगदी
मस्त वृत्तांत जुई..अगदी खुसखुशीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असेच बघता बघता सत्तर ट्रेक
असेच बघता बघता सत्तर ट्रेक होऊदेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जल्ला असे बघता बघता सत्तर
जल्ला असे बघता बघता सत्तर ट्रेक झाले असते तर न्युटन ने सत्तर लॉ नसते लिहिले... :p
इंद्रा..
इंद्रा..![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त जुई! आणि पुलेशु देखिल
मस्त जुई! आणि पुलेशु देखिल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जुये... ही आख्खी माबो
मस्त जुये...
![8.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u7885/8.jpg)
ही आख्खी माबो टीम...