ती आणि तो ३ : http://www.maayboli.com/node/20463
ती आणि तो ४ : http://www.maayboli.com/node/20685
सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत अनु मॅड्मची एक्स्प्रेस एकदम फुल स्पीड मधे धाड धाड करत ऑफिसला येउन एन्ट्रान्सला स्वॅप करण्यात मग्न होती.
"मेरे ख्वाबो मे जो आये आके मुझे छेड जाये उससे कहो कभी सामने तो आये" असे अनु आपले गुणगुणत गेट मधुन निघणार आणि तोच त्याची एन्ट्री झाली . अनु त्याच्याकडे नुसते बघतच राहीली. उजळ प्रसन्न चेहरा , चेहरर्यावर एक स्मितहास्य , फिकट आकाशी रंगाचा लायनिंगचा शर्ट , ब्लॅक रंगाची ट्राउझर , हातात बॅग आणि स्वारी अनुला धडकली. अनु मनातल्या मनात म्हणाली , " यार ये तो सही मे सामने आ गया , देवाने अगदीच क्वीक रिस्पॉन्स दिला आपल्याला........" तो तिला हसुन सॉरी म्हणत आपल्या मार्गे निघुन गेला आणि अनु तिथेच शॉक लागल्यासारखी कितीतरी वेळ उभी होती. शेवटी त्या धक्क्यातुन सावरुन आपल्या डेस्कवर जाउन बसली.
अनिकेत नेहमीप्रमाणे त्याच्या जागेवर आधिच आलेला होता, कामात होता, आणि अनुची नाश्त्यासाठी वाट बघत होता. अनु येताच त्याने नेहमीप्रमाणे तिला गुड्मॉर्निंग म्हटले पण अनु मॅडम आज वेगळ्याच विश्वात होत्या त्याच्या गुडमॉर्निंगला उत्तर त्यांनी दिलेच नाही , त्या कसल्यातरी विचारात होत्या, तब्बल दोन तासांनी तिने त्याला गुडमॉर्निंग म्हटले, मग अनिकेत आणि ती नाश्त्याला गेलेत.अनिकेत विचारात होता हिला झालेतरी काय , नेहमी हिच्या बडबडीने आपल्या दिवसाची सुरुवात होते आज ही एक शब्ददेखील स्वत:हुन बोलत नाहीये . तिचा अबोलपणा अनिकेतला अस्वस्थ करीत होता .
नाश्त्याहुन आल्यावर अनुला एक मस्त सरप्राईज मिळाले , सकाळपासुन ज्याच्या विचारात होती तो चक्क तिच्यासमोरच्या अगदीच जवळच्या डेस्कवर बसलेला होता. अनु आता गालातल्या गालात हसली , तिची कळी आता खुलली होती . कोणी बघोना बघो पण अनिकेत अनुच्या चेहर्यावरची ती गुलाबी लाली ओळखली होती. पण त्याने विचार केला अच्छा मॅड्म कुछ तो गडबड है ,सकाळी अगदीच गुमसुम होती ही आणि आता अचानक कशी काय हिची कळी खुलली ? तो जरा गोंधळला पण त्याला खुप काम होते आणि कामासाठीच कंपनीच्या दुसर्या बिल्डिंगमधे जावे लागणार होते , त्याने अनुला लंचला भेटण्याचे सांगुन तो चटकन निघाला.
अनु आता रोज त्याच्याकडे लपुनछपुन बघत असे, त्याच्या येण्याजाण्याकडे तिचे लक्ष लागलेले असे.त्याचे नाव सुहास होते, हे त्याच्या टीमच्या लोकांच्या त्याल संबोधण्यावरुन कळाले. तो नावाप्रमाणेच होता , सतत स्मितहास्य त्याच्या चेहर्यावर असायचे, त्याच्या मोठाल्या चश्म्याखाली असलेले त्याचे डोळे जणु काही बोलत असत .अनुला त्याचे विलक्षण आकर्षण वाटत असे. रोज त्याच्या येण्याच्या वेळेला एन्ट्रान्सकडे बघत बसणे आणि तो आला म्हणजे त्याला हळुच एक गोड स्माईल देणे याचा तिला जणु एक छंदच लागलेला होता. सुहासराव आपल्या जागेवर स्थानापन्न झाले की अनुचा दिवस सुरु होत असे. त्यातल्या त्यात अनिकेत महाराज काही दिवसांपासुन समोर बसत नव्हते , ते आपल्या कामाच्या निमित्ताने कधी ही बिल्डिंग कधी ती बिल्डिंग असे भटकत होते त्यामुळे तिला दिवसभर बोलायला पण कोणी नसे त्यामुळे अनुला कामादरम्यान जितका वेळ रिकामा मिळत असे तो पुर्ण वेळ अनु मॅम सुहासला बघण्यात व्यतीत करीत असत. टोटल १००% डेडिकेशन!!!!!
अनुला पहिल्यांदा आयुष्यात असे वाटत होते , कोणी आवडले होते. ती एक जाणिव , तो अनुभव तिच्यासाठी खुप नवा होता , इतके दिवस तिला कधीच कोणाबद्दल असे वाट्ले नव्हते पण हे आजकाल जे ती अनुभवत होती ते खुप गोड वाटत होते. रोजचेच आपले विश्व तिला नविन वाटत होते ,कधी आरशात नाही बघणारी अनु आजकाल स्वतःच्या दिसण्याकडेही लक्ष देउ लागली होती . अगदी जो जीता वही सिकंदरच्या आमिर खान प्रमाणे अनु अगदी हवेत उडत होती ....."पेहला नशा पेहला खुमार नया प्यार है नया इंतिजार ...करलु मै क्या अपना हाल्...मेरे दिले बेकरार...."
म्हणतात ना कधी कधी काही मोजके क्षण आयुष्याला असली सोनेरी झालर देउन जातात की संपुर्ण आयुष्य त्या प्रकाशाने उजळुन निघते..... अनुला त्याची प्रचिती अनपेक्षितपणे आली. सोमवार , सकाळचे १० वाजलेले सगळे ऑफिस हळुहळू भरु लागले होते.अनुला सकाळी सकाळी खुपच काम आलेले , इतके की तिला आजुबाजुचे अजिबातच भान नव्हते . तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्या खुर्चीमागे आले , आणि तिला गुडमॉर्निंग म्हटले अनुने न बघताच गुडमॉर्निंग म्हटले आणि पुन्हा कामात मग्न झाली ,तिला वाटले शेजारच्यांपैकी कोणीतरी म्हटले असावे.. आणि एकदम एक पुरुषी हात समोर आला ज्यात काही छान छान चॉकलेट्स होती , अनु चॉकलेट्ससाठी वेडी होती ती खुप खुष झाली आणि तिने एकदम सगळेच चॉकलेट्स आपल्या हातात घेतली पण जेव्हा ती थॅन्क्यु म्हणण्यासाठी वळली तेव्हा ती जागच्या जागी थिजलीच !!! वळताच अनुला दिसले सुहासने ती चॉकलेट्स तिला दिली होती आणि तो तिच्याकडे बघुन हसत होता..........
सुहास : तुझे नाव अनु ना?
अनु: अं , हो, म्हणजे माझे नाव अनुष्का ..Hi
सुहास : hi, मी सुहास. मी इथे नव्यानेच आलो आहे . मी एक वर्ष ऑनसाईटला होतो. आज त्याचे हे चॉकलेट्स...
अनु: थँक्स, पण तुम्ही मला ओळखत नाहीत ना??
सुहास : अगं , मग त्यात काय झाले , तु माझी शेजारी ना ??? आणि मी तुला चॉकलेट्स साठी भांडताना पाहिलेय टीममेट्सशी!!!!!!!
अनु (मनात ): सही आहे ह्याचेपण आपल्याकडे लक्ष आहे .याला पण मी आवडते की काय!!!!!
अनु : अगदी तसे काही नाही आहे....मला चॉकलेट्स आवडतात , पण मी त्यासाठी म्हणुन नाही चिडवत त्यांना , आणि भांड्त नाही मुळी ती तर माझ्या ट्रीटची वसुली असते!!!!!!
सुहास : हो का? छान.... तू फ्रेशर आहेस का गं ? या वर्षीच जॉईन झालीस का??
अनु : हो , पण तुम्हाला कसे ते कळाले ?
सुहास : अग तुझ्या बोलण्यावरुन , चेहर्यावरुन आणि त्यातच तू मागील वर्षी इथे नव्हतीस मी होतो तेव्हा !
अनु: ..थँक्स फॉर द चॉकलेटस..
सुहास : ए , काही पण काय ! डोन्ट से थॅक्स . इट्स गुड टु टॉक टु यु!!! चल बाय.
अनु : बाय
अनु अजुनदेखील धक्यात होती , हे स्वप्न होते की खरेच तो आपल्याशी बोलत होता? तो बोलत होता तेव्हा त्याचे शब्द जणु मोरपिसाप्रमाणे तिच्या मनावर फिरत होते . तो किती गोड छान बोलतो आणि विशेष म्हणजे त्याचेदेखिल आपल्याकडे लक्ष आहे. मी पण त्याला तितकीच आवडत असेल का जितका तो मला आवडतो? त्याचा अप्रोच पण किती छान आणि साधा होता !!! तो किती क्युट आहे ना!!! अनु आता पुर्णपणे त्याच्याच विचारामधे होती. ..सुहास ..सुहास्..सुहास.......
क्रमशः
किती दिवसांनी भाग आला . मला
किती दिवसांनी भाग आला . मला तर वाटलेले कि कथा अर्धवटच सोडली तुम्ही. नवीन भाग मस्त आहे. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.
मुकद्दर का सिकंदर नव्हे जो
मुकद्दर का सिकंदर नव्हे जो जीता वोहि सिकन्दर
धन्यवाद अर्निअस......मी चुक
धन्यवाद अर्निअस......मी चुक सुधारली ती.
किती दिवसांनी भाग आला. मला तर
किती दिवसांनी भाग आला. मला तर वाटलेले कि कथा अर्धवटच सोडली तुम्ही. नवीन भाग छान आहे. पुढचा भाग लवकर पोस्ट करा.
शुभदा
chhan aahe. Pudhacha bhag
chhan aahe. Pudhacha bhag lavkarat post karav hi vinanti
मस्तय कथा.........पुलेशु
मस्तय कथा.........पुलेशु
हर्षिता फारच छान कथा चालली
हर्षिता
फारच छान कथा चालली आहे. कुपया मोठे भाग टाका.
पुलेशु
very nice story!! y dont u
very nice story!! y dont u complete it??
छान कथा चालली आहे.पुधल भग ?
छान कथा चालली आहे.पुधल भग ?
As ardhi ka thevli Katha ...
As ardhi ka thevli Katha ... Purn kra plz
katha ardhavat ka thevli ...
katha ardhavat ka thevli ....please complite.