
तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी
प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा. तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.
हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश. ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.
मंजू चाले आता तसेच करेन. मी
मंजू चाले आता तसेच करेन. मी पण अॅडमिनना सांगितले होते. पण अजुन काहीच नाही ग सुधारणा (दु:खी बाहुली).
येस्स्स.. मला माहीतेय हा
येस्स्स.. मला माहीतेय हा मासा..
यम्मी लगतो.
मी मोठ्या उत्साहाने रविवारी
मी मोठ्या उत्साहाने रविवारी मांदेली विकत घेण्यासाठी बाजारात गेले , पण ताजी मासळी कशी घ्यायची हे माहित नसल्याने न घेताच परत आले. कृपया माशांची माहिती टाकताना ते ताजे आहेत का, हे कसे ओळखावे ते सुद्धा लिही. म्हणजे माझ्या सारख्या नवशिक्यांना मदत होईल
मासे घरी आणल्यावर लगेच मीठ लावून ठेवावेत की पाण्यात बुडवून ठेवावेत?
मासे घेताना त्याची गालफडं
मासे घेताना त्याची गालफडं उघडुन बघावीत. आतले 'कल्ले' लाल असतील तर मासा ताजा असतो. बरेच वेळा सुरमयी किंवा तत्सम माशांच्या 'कल्ल्यांना" गुलाल किंवा तसाच रंग लावतात, त्यामुळे हात लावुन बघावा.
मांदेली पिवळीधमक दिसावी म्हणुन बरेचदा हळदीच्या पाण्यात देखिल बुडवतात.
पापलेटं घेताना गालफड दाबले असतां आतुन पांढरे पाणी आले तर ती चवीला मस्त असतात. पण ईथेही चलाखी केली जाते, जसे तांदळाच्या पेजेचे पाणी भरणे.
कुर्ल्या (खेकडे) घेताना शक्यतो अमावास्येच्या आसपास घ्यावेत म्हणजे भरलेले असतात. तसेच त्यातही मादी असेल तर चविष्ट.
एखाद्या कोळणीकडुन नेहमी मासे घेत असाल तर तुम्हाला समोरुनच चांगले मासे दिले जातात. तुम्हाला माश्यांमधलं कळतयं असं कोळणीला कळलं की मग फसवणुक नाही होत असा माझा अनुभव आहे.
ईतर अनुभवी लोकं सांगतीलच याबद्दल!
मासे जर तुम्हाला फ्रीज मधे ठेवुन नंतर खायचे असतील तर घरी आणुन साफ करा आणि तसेच न पाणी लावता फ्रीजर मधे ठेवा. बाहेर काढल्यावर नॉर्मल तापमानाला आल्यावर धुवुन घ्या. असे केल्याने त्याची चव विशेष बिघडत नाही आणि तळताना वासही येत नाही.
लगेच करायचे असल्यास साफ करुन , पाण्यात धुवुन मग त्याला मीठ-हळद लावा. (म्हणजे आम्ही तसंच करतो)
धन्यवाद भ्रमर कठीणच काम
धन्यवाद भ्रमर
कठीणच काम दिसतय.
भ्रमा, हे सगळ आणि मासे बनवण
भ्रमा, हे सगळ आणि मासे बनवण जमलय की नाही ते बघायला टेस्टर म्हणूनपण कोणालातरी बोलावायला लागत ना रे ?
अम्या, मी येईन तुझ्या घरी
अम्या, मी येईन तुझ्या घरी टेस्टर म्हणुन.
भ्रमर अगदी योग्य माहीती दिली
भ्रमर अगदी योग्य माहीती दिली आहेस.
खेकड्यांच्या बाबतीत अजुन एक म्हणजे खेकडे उलटे करुन दाबुन बघायचे जर दाबले गेले तर ते पोकळ असतात. टण्क बघुन घ्यायचे. भ्रमर आमच्याकडे कामवाली येते त्यांचा चिंबोरीचा धंदा आहे. ती म्हणते की अमावस्या वगैरे अस काही नसत. खेकडी कधी भरलेली कधी पोकळ असतातच. ती नेहमी बघुन घ्यायची भरलेली. आणि मी विचारल की लाखेची कशी बघायची ? तर धंदेवाईक उत्तर दिल. ते आम्हालाच कळत. :रडकी बाहुली:
कोणताही मासा नरम नसला पाहीचे. कल्ले लाल बघुन घ्यायचे. हल्ली बोंबलांच्या दातांना तर लाल कलर लावुन ठेवल्याचे बर्याचदा आढळते. पण बोंबील चांगला कडक आणि तुकतुकीत असायला हवा.
मासे घरी नेले की साफ करुन त्याला मिठ हळद लावुन ठेवले तरी चालतात. फिर्ज मध्ये ठेवायचे असतील तर भ्रमर ने सांगितल्याप्रमाणे तसेच ठेवले तर चव टिकुन राहते. पण बर्याच वेळेला आपल्याला आयत्यावेळी करायचे असतात मग त्यावेळेसाठी साफ करुनच ठेवलेले बरे.
कोलंबीच्या डोक्याचे कोसे जर सुटले नसतील तर त्या अगदी ताज्या कोलंब्या असतात.
अनुभवी कमेंट्स आल्या!! कर्ली
अनुभवी कमेंट्स आल्या!!
कर्ली घेताना रुंद असल्यास चविष्ट असते असा अनुभव. सुरमयीबाबत देखिल तोंड निमुळते असल्यास चव खास नसते असा माझा अनुभव आहे.
कोण बोलवतय आतां मासे खायला??
जागूsssss तुझ्या घरी यायलाच
जागूsssss तुझ्या घरी यायलाच लागेल एकदा. मान न मान मै तेरा.......
नीलु, भ्रमर मेहमान बनुन याच
नीलु, भ्रमर मेहमान बनुन याच एकदा.
नक्की नक्की जागु!!
नक्की नक्की जागु!!
खेकड्यांच्या बाबतीत अजुन एक
खेकड्यांच्या बाबतीत अजुन एक म्हणजे खेकडे उलटे करुन दाबुन बघायचे जर दाबले गेले तर ते पोकळ असतात.
म्हणजे बनवते. माशांच्या बाबतीत मला दुस-या कोणी ते साफ केलेले चालत नाहीत. मग ते नीट साफ केलेले नसणार असेच वाटत राहते. म्हणुन हॉटेलात मासे खायचे मी टाळते.
देवा... त्या जिवंत खेकड्यांना उलटे करुन कोण दाबुन पाहिल?? कोळणीकडेच मेलेले खेकडे मी खाणार नाही. मला खेकडे खुप आवडतात पण त्यांची जाम भिती वाटते म्हणुन घरी आई वगैरे आली कीच मी खेकडे आणुन तिच्याकडुन करुन घेते. मी खेकडे सोडुन बाकी सगळे मासे स्वतः साफ करुन बनवु शकते
आणि मी विचारल की लाखेची कशी बघायची ?
आता हे काय असते ते सांगाल का जागुतै...
>>खेकडी कधी भरलेली कधी पोकळ
>>खेकडी कधी भरलेली कधी पोकळ असतातच. >> आकारने जितका लहान खेकडा,तितका तो भरलेला आणि चविष्ट. मोठ्या आकाराचा बर्याचदा पोकळ असू शकतो.
कालच खेकडे आणले. भरलेले होते.
कालच खेकडे आणले. भरलेले होते. म्हणजे माझी अमावास्येची थिअरी चुकीची होती. काल आणलेले खेकडे भरपूर मोठे आणि तरीही भरलेले होते. जागुने सांगितल्याप्रमाणे मी ते उलटे करुन दाबुन बघुन आणले होते. कहर म्हणजे काल कोळीणबाईने "डेंगे" (नांग्या) मोडल्याच नव्हत्या. मलाच घरी ते काम करावं लागलं.
लाखेची म्हणजे काय हे जाणुन घ्यायची मलाही उत्सुकता आहे.
साधना, भ्रमर लाखेची म्हणजे ती
साधना, भ्रमर लाखेची म्हणजे ती चिंबोरी नुसती भरलेली नसुन त्यातील अंडी (अंड्यासारखे दिसत नाही) म्हणजे लाख शिजवल्यावर केशरी होऊन अगदी वडीसारखी घट्ट होते. खायला चविष्ट तसेच तेवढीच उष्णही असते.
साधना अग शक्यतो कोळणीकडे मेलेले खेकडे नसतातच आणि दिसले तरी कधी घ्यायचे नाहीतच. कोळणीला जिवंत खेकड्याचे सगळे पाय काढून द्यायला सांगायचे मग ते नाही चालत. आणि अजुन तुला भिती वाटत असेल तर जिवंत खेकडे नेउन फ्रिजरमध्ये टाकायचे ४-५ तासांत मरतात मग काही वाटत नाही. मी निवट्यांच तसच करते. निवट्या निवडण्याच धाडस मला कधीच होत नाही. कारण त्या हातात घेतल्यावर पटकन उडी मारतात.
अच्छा, म्हणजे मी काल लाखेची
अच्छा, म्हणजे मी काल लाखेची खाल्ली!
नुसत्या पायाची भिती नसते, नांग्या मात्र लई डेंजरस.
तर जिवंत खेकडे नेउन
तर जिवंत खेकडे नेउन फ्रिजरमध्ये टाकायचे ४-५ तासांत मरतात मग काही वाटत नाही. >>> मग ते सुरवातीला कुडकुडत फ्रीजर मधे चालत नाहीत का? अगदी गारठले की मरत असतील पण पहिली काही मिनिटं?
व्हॉट इज निवट्या?
खेकड्यांवरील ही उपयुक्त चर्चा
खेकड्यांवरील ही उपयुक्त चर्चा वेगळ्या धाग्यावर का नाही हलवत? शोधायला बरे पडेल
अश्वे , तुला कशाला हव्यात
अश्वे , तुला कशाला हव्यात निवट्या , आँ ... ???

)
( तुझं सामान्य ज्ञान वाढव हो ,माझी काही हरकत नाही .
अमे, मांदेली आणलीस का ते सांग
अमे, मांदेली आणलीस का ते सांग आधी.
अश्वे तुझ्या ज्ञानासाठी
अश्वे तुझ्या ज्ञानासाठी सांगते. चिंबोर्या प्लॅस्टिकच्या पिशवित घट्ट गाठ मारुन फ्रिजरमध्ये टाकायच्या. म्हणजे नाही पळत त्या.
निवट्या मी कधी खाल्ल्य नाहीत.
निवट्या मी कधी खाल्ल्य नाहीत. आधी त्यांच्या "गाथनी" यायच्या बाजारात. असं ऐकलय की त्या तव्यावर टाकल्या तरी उडतात. खरं का गं जागु??
नाही रे भ्रमरा, त्यानंतर
नाही रे भ्रमरा, त्यानंतर मार्केटाकडे फिरकायला वेळच मिळाला नाही.
आश्वे तू आणि चक्क
आश्वे तू आणि चक्क ईथे????
जागू तू चिंबोर्यांची रेशिपी टाकलीयस का? आणि आमंत्रणाबद्दल धन्स
आधी त्यांच्या "गाथनी" यायच्या
आधी त्यांच्या "गाथनी" यायच्या बाजारात
किती वर्षांनी हा शब्द ऐकला. वाडीला असताना गाथनी पाहिलेल्या - गेले ते दिन गेले........
जागू मस्त रेसिपी ..काय यम्मी
जागू मस्त रेसिपी ..काय यम्मी दिसतायत मासे

मला आवड्तात पन ते साफ करायला आणि त्याला हात लावायचे म्ह्ट्ले कि कसे तरी होते .
पन आता करुन बघनार एकदा
मसाला कसा करतात ग याचा ? ते
मसाला कसा करतात ग याचा ? ते हि सांग ना प्लिज ?
मग ते नीट साफ केलेले नसणार
मग ते नीट साफ केलेले नसणार असेच वाटत राहते. >>>>>>>>>> अगदी बरोबर !
अगं संपदा, जागूच्या कुठल्याही
अगं संपदा, जागूच्या कुठल्याही बाफवर जरी तो खाद्यपदार्थ मला निषिद्ध असला तरी मी येतेच
तरी ते निवट्या काय आहे ? मासा की अजून काही? ते उडतं किंवा उड्या का मारतं?
Pages