मासे १६) मांदेली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 November, 2010 - 02:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी

क्रमवार पाककृती: 

प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा. तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर आहे.
अधिक टिपा: 

हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश. ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).

ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही पहा मांदेली. दिसताहेत ना गोल्डफिश सारखी.
Mandel.JPG

अश्याप्रकारे साफ करुन घ्यायची.
Mandel1.JPG

मिठ मसाला आणि इतर जिन्नस लावुन ठेवलेली मांदेली.
Mandel2.JPG

तव्यात तळत असलेली मांदेली. मस्त वास सुटलाय तळण्याचा.
Mandel3.JPG

तळून फस्त करण्यासाठी तयार असलेली मांदेली.
Mandel4.JPG

व्वा छान्...........................सगळे गीळूनच टाकतो................आत्ताच

जागूताई तुम्ही खानावळ चालवता का??.........
असल्यास कळवावे....त्वरीत.

मत्स्याहारलोभी......
चातक

जागमाते, मस्त भुकावलोय हे वाचुन. मी आता नक्की हादडून येणार जवलपासहून. Proud

बादवे, गोल्डफिश फार वेगळे गं http://www.maayboli.com/node/19197 वर चेकून बघ (माझी रीक्षा) Biggrin

असुदे अरे मी गोल्डफिशसारखे दिसतात म्हटलय. आणि खादाडीचे गोल्डफिश म्हटलय.
चातक, अमी, भ्रमर, दिनेशदा धन्स.

आह्हा.. तोंपासु .. Sad इकडे मांदेली मिळत नाही ...
कुरकुरीत तळून काट्यासकट फस्त करावीत Happy

जागू, मस्तच. आता भारतात येइन तेव्हा मांदेली पहिल्यांदा आणणार आहे. थँक्स.
आम्ही पण आक्खा मासा गिळायचो.

अरारारा! नेमकी जवणाच्या वेळी वाचली ही कृती - इथे व्हेज चिली अन टाको बार आहे जेवणात Sad

ढिगाने फस्त करायचो आम्ही मांदेली !

जागू तुमच्या नेहेमीच्या मसाल्याची सविस्तर कृती लिहा प्लीज - शक्य असल्यास १०० ग्रॅम मिरच्यांच्या प्रमाणात लिहा म्हणजे इथे ट्राय करायला सोपं पडेल Happy

मस्त दिसत्येय मांदेली.

जागू, तुझा तवा कसला आहे ग? मध्ये खोलगट नाही आहे न? कधी त्यावर तळलेलं चिकटून बसलेलं दिसलं नाही.

मला तरी सपाट अ‍ॅल्युमिनियमचा तवा दिसतोय. तो चांगला तापवला तेल घालायच्या आधी की सहसा काहि चिकटत नाही. मासा घातला की दोन मिनीटे त्याला हलवू, डिचवू नये, राग येतो त्याला. मग आम्ही नाही जा म्हणत चिकटतो Proud

धन्स जागू मांदेली टाकल्याबद्दल. आता देशात जाईन तेंव्हा कोणाकडे तरी मांदेलीसाठी नंबर लाऊन ठेवावा लागेल मला.

जागू तोंपासु .. काय मस्त दिसताहेत वॉव Happy
मग आम्ही नाही जा म्हणत चिकटतो>> Lol
सिंडरेला हा तरी काट्यासकटच खायचा. मस्त लागतो कुर्कुरीत.

दक्षीणा, सुमेधा, वर्षू, प्रिती, मनस्विनी, दिपान्त, फुलपाखरू, सावली धन्यवाद.
मेधा लिहेन दोन तिन दिवसांत पाच किलोच्या प्रमाण आहे माझ्याकडे आईने दिलेल ते तिच्याकडूनच ग्रॅम मध्ये करुन घेईन.
आर्च तो तवा अ‍ॅल्युमिनियमचा आहे. फार खोलगट नाही. आणि मनस्विनी सांगतेय त्याप्रमाणे तवा आधी चांगला तापुन मग त्यात तेल सोडून मासे टाकायचे म्हणजे चिकटत नाहीत. जर वाटण लावल असेल तर रवा किंवा तांदळाच पिठ लावायच म्हणजे चिकटत नाहीत.

आउटडोअर्स मलाही असच वाटतय तिची हजेरी नाही लागली अजुन इथे. कापलेले मासे बघुन कदाचित धुम ठोकली असेल तिने.

मासा घातला की दोन मिनीटे त्याला हलवू, डिचवू नये, राग येतो त्याला. मग आम्ही नाही जा म्हणत चिकटतो

मासा घातला की दोन मिनीटे त्याला हलवू, डिचवू नये, राग येतो त्याला. मग आम्ही नाही जा म्हणत चिकटतो
Lol

मनस्विनी बांगडे टाकले आहेत आधीच.
रावस वेळ मिळाल्यावर टाकतेच.
सुरमई आणि कर्ली आख्खी मिळाल्यावर टाकेन.

चातक पाकृवर फोटो टाकण्याची सुविधा नाही. त्यामुळे प्रतिसादात फोटो टाकावे लागतात.>>>>>

जागू, प्रतिसादाच्या विन्डोमध्ये फोटोची लिंक घे, मग ती लिंक कट कर आणि पाककृती संपादित करून तिथे पेस्ट कर.

ही अडचण मी 'नविन मायबोली अशी सुधारता येईल' मध्ये लिहिली होती, पण त्याची अजून दखल घेतलेली नाहीये Sad

Pages