जुन्नरच्या गप्पा

Submitted by admin on 23 May, 2008 - 01:20

जुन्नरबद्दलच्या गप्पा

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा आपला ग्रुप कार्यरत आहे तर.
ग्रामिळीं भागात आता पुष्कळ कामांसाठी शिथिलता मिळाली असेल नाही ।
सुखरूप राहा सर्वांना सदिच्छा ।

नमस्कार प्रतिभा, छान व सुखरूप म्हणायला हरकत नाही । परिस्थिती मला वाटते सर्वत्रच गंभीर आहे नाही का। तरी मला वाटते काही ठिकाणी
चित्र पूर्णपणे उघडले नाही आहे अद्याप । जसं तिकडे पूर्ण देशात ,संपूर्ण संक्रमणित व्यक्तीची संख्या म्हणे ३0-३५००० तर आमच्याकडे
मृतांचाच आकडा २५०००च्या वर गेलाय । १००च्या वर डॉक्टर परिचारिका बळी पडलेत त्यामुळे काळजी तर आहेच परंतु परिस्थिती एका कडेवर
किंव्हा वळणावर पोहोचल्याची चिंन्ह दिसू लागली आहेत म्हुणुन दिलासाही वाटतोय ।सुरुवातीचे काही दिवस लोकांची झुंबड असायची
सुपरमार्केट मध्ये काही स्वार्थीनीं तर ५-६ महिन्यांचा साथ करवत स्टोर्स मधील शेल्फ्स खाली केल्या ।
परंतु अगदी अल्पवेळात परिस्थितीवर काबू आला व सर्वसामान्यांच्या जिवातजीव आला । कधी नव्हे ते आपण सहज लिहीत असलेले वाक्य
'आय होप these few लाईन्स विल find यु इन गुड हेल्थ ' कितीतरी महत्वाचे होऊन बसलेय ।
काळजी घ्या या सुखरूप राहा !

नमस्कार अमोल ! कॅपगजा धन्यवाद माहिती दिल्यबद्दल.
जुन्नर तालुक्यात सध्या तरी परीस्थिती कण्ट्रोल मधे आहे.
ग्राम पन्चायत काळजी घेत आहे, शहरातुन गावी गेलेल्या लोकाना काहि दिवस शाळेत ठेवत आहेत.
खरी चिन्ता मुम्बई मधे आहे, लोक अजुनही सिरीयस दिसत नाहित काही भागात.
सरकार तरी कुठे कुठे पोचणार ना ?

नमस्कार जुन्नरकर्स. कसे आहात सगळे?

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने , यात्रा पुन्हा जोमात अन जोशात होणार असे वाटत असताना....पुन्हा तिसरी लाट...

नमस्कार सतीश. सगळे सुरळीत सुरू होणार असे वाटत असतानाच पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

व्हाटसऍप सौजन्य : . बळीराजाचं दुसरं घर 'खळं'

आपल्या जुन्नर तालुक्यात तब्बल पाच धरणे झाली आणि प्रत्येक शेतात पाणी पोहचले. ऊस, कांदा, केळी या मुख्य पिकांबरोबरच तरकारी मोठ्या प्रमाणात शेतात दिसू लागली. शेती पद्धत बदलत असताना पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आणि शेतक-याचे 'खळे' मात्र जवळ-जवळ गायबच झाले. शेतावरचे 'खळे' म्हणजे बळीराजाचे दुसरे घरच असायचे. पावसाळ्याचे चार महिने वगळता बळीराजाचा बहुतांश वेळ हे 'खळं' आणि त्याच्या शेजारील कोपीत किंवा मांडवात जायचा. बाजरी, ज्वारी, हरबरा, भुईमूग, गहू, मूग, तूर ही पिकं निघाली की या खळ्याभोवती अतिशय नीटपणे रचून ठेवली जायची. बाजरी किंवा ज्वारीच्या पेंढ्याची एखाद्या छोट्या मंदिरासारखी मोठ्या कौशल्याने आकर्षक आणि सुबक 'सुडी' उभारली जायची. महिने दोन महिने आहे त्या स्थितीत ही पिकं उन्हात तापू दिली जात. तोपर्यंत शेतकरी पुन्हा शेत नांगरणी करून जमीन तापायला ठेवायचा.

नियोजित खळ्याची जागा पूजन करून खळं बनवायला सुरूवात होत असे. यात्रेच्या कुस्ती आखाड्यासाठी जेवढी गोल जमीन घेतात तेवढीच गोल जमीन खणून, पाण्याने शिंपून, चोपून, व्यवस्थित शेणाने सारवले की 'खळं' तयार व्हायचं. खळ्याच्या बरोबर मध्यभागी विधिवत पूजा करून, खोबरं व गुळाचा नैवेद्य देऊन एक मजबूत 'मेढ किंवा तिडवा' खांब रोवला जात असे. या खळ्याच्या मध्यभागी बाजरी - ज्वारीची कणसं कापून टाकली जात असे. एक दोन दिवसांनी त्यावरून मधल्या खांबाला दोन - चार - सहा बैल बांधून गोल फिरवले जात. याला 'मळणी' असे म्हणत. शक्यतो मळणीला सुर्योदयापुर्वी किंवा सुर्यास्तापूर्वी सुरूवात होत असे, जेणेकरून बैलांना आणि शेतक-यांना उन्हाचा त्रास होऊ नये. या बैलांच्या मागे गोल फिरणे, त्यांचे शेण धरणे, आजूबाजूला गेलेली कणसे पुन्हा बैलांच्या पायाखाली सावरून टाकणे ही कामं मुलं आवडीने करायची. बरेचदा ही कामं दोन - तीन शेतकरी एकत्र येऊन आलटून - पालटून एकमेकांकडे करत असत. ज्याच्याकडे मळणीचे काम असेल त्याचे घरी सर्वांना एकत्र स्नेह-भोजनाचा मस्त बेत असायचा. मळणी झाल्यानंतर हवेच्या दिशेने धान्याची उपनणी व्हायची अन् मोत्याच्या दाण्यांची रास उभी रहायची. या दिवशी बळीराजाचा चेहरा पौणिमेच्या चंद्राप्रमाणे प्रसन्न होत असे. यासाठीच त्याने रात्र॔-दिवस झटून घामाच्या धारांचा अभिषेक आपल्या काळ्या आईला केलेला असतो. त्या दिवशी तो आनंदाने खळ्यावर धान्याच्या राशीपुढे डोकं टेकवून नतमस्तक व्हायचा, राशीच्या बाजूला समाधानाने झोपायचा.

या सर्व चार-सहा महिन्यांचा कालावधी बळीराजा आणि त्याच्या जनावरांचा मुक्काम खळं, कोपी आणि मांडवातच होई. एक थंड पाण्याचा मडका किंवा केळी, कंदील, कुत्रा, काठी हे त्याचे सोबती होते. कधीतरी झोपण्यासाठी बाज किंवा खाट असायची. मीसुद्धा काही वेळा असा शेतावर झोपलोयं. निरभ्र आकाशाकडे पहात, चांदण्या मोजत असताना कधी झोप लागे कळतही नसे, सकाळी ऊन तोंडावर आले की जाग येई. शेतात झोपताना शांतपणे न्याहळलेले विस्तीर्ण आकाश आणि चांदणं, शहरात आल्यावर फक्त आपल्या खिडकी एवढे लहान झाले आहे. शेतात कंदीलाच्या प्रकाशात केलेल्या अभ्यासाने अनेकांची आयुष्य ऊजळून टाकली होती. वीज आली अन् आम्ही कंदील विसरलो. तसे शेतात पाणी आल्याने 'खळं' गायब झाली आणि आमची 'कुत्रा' या मित्रावरची माया आटली. शेतीच्या एका नव्या पर्वाला सुरूवात झाली...पण एका अलौकिक आनंदाला आम्ही कायमचे पारखे झालो. आज सर्वत्र बिबट्यांची दहशत असल्याने रात्री-अपरात्री घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.....बाहेर झोपणे तर दूरच!

प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे पुण्यात निधन !!!

जुन्नरचे एक अनमोल व्यक्तीमत्व !!!

अनिल अवचट एक बाबा माणूस

काही माणसे तुम्हाला त्यांच्या लिखाणातून भेटतात,काही जण त्यांच्या कलेतून.त्यातूनच ते तुम्हाला आपलेसे वाटायला लागतात.त्यांच्या लिखाणाची शैली तुम्हाला भावते.त्यातला आशय,प्रामाणिकता तुम्हाला कुठेतरी भिडते.त्यांचे सामाजिक कार्य बघून तुम्ही नतमस्तक होता.अनिल अवचट हे असे व्यक्तिमत्त्व होते.त्याचे लेख वाचून या माणसाला एकदा भेटायला हवे असे सारखे वाटायचे.त्यांच्या लेखाच्या शेवटी असलेला त्यांच्या पत्रकार नगर मधील घरी जावे,त्यांना इतर म्हणतात तसे बाबा म्हणून संबोधावे अशी भावना होती.त्यांचे लेख वाचून,त्यांचा शुभ्र दाढीतील फोटो व त्यातले निरागस हास्य बघून त्यांच्या बद्दल त्यांची अशी एक इमेज तयार झाली होती.हा माणूस सहृदयी तर असणारच पण सच्चा,प्रामाणिक,दिलदार माणूसही असणार याची खात्री पटायची.शाब्दिक सहजता हा त्यांच्या लिखाणाचा वेगळा पैलू होता.एखादी गोष्ट व व्यक्तिचित्रण ते इतक्या सहजतेने करायचे की ती न बघितलेली,न भेटलेली व्यक्ती देखील आपलीशी वाटायला लागायची.छोटे छोटे प्रसंग शब्दातून इतक्या समर्थपणे सांगायचे की त्याला लालित्यपूर्ण लिखाणाचा आव आणायची गरज नसायची.
पाच सात वर्षा पूर्वी दुबईत पहिले मराठी जागतिक साहित्य संमेलन झाले होते. त्या निमित्ताने मराठीतल्या काही नामवंत साहित्यिकांना आमंत्रित केले होते. त्यात अनिल अवचट ही होते.रशीद हायस्कुल हॉलच्या प्रवेशद्वारा जवळ येत असताना अनिल अवचट यांचा पाय घसरला.त्यांना थोडा मुका मार लागला.लगेच अम्ब्युलन्स बोलावल्या गेली आणि त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रशीद हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले.त्यावेळी तिथे उपस्थित असलेले तमाम मराठी चॅनेलचे प्रतिनिधी कुठल्या तरी ब्रेकिंग न्युज ची वाटच बघत होते.त्यांनी फटाफट आपले कॅमेरे ऑन केले आणि रिपोर्टर ब्रेकिंग न्युज द्यायला लागले.काही क्षणातच महाराष्ट्रातील त्या चॅनेल वर ब्रेकिंग न्युज झळकली की "सुप्रसिद्ध साहित्यिक अनिल अवचट अत्यवस्थ"!खरे तर तसे काहीही झाले नव्हते.दोन दिवसात अवचट यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.पण अवचटांनी ही गोष्ट देखील फार गांभीर्याने घेतली नाही आणि आपल्या कामास लागले.
पुलं आणि सुनीता बाईंनी अनिल अवचट आणि त्यांच्या पत्नी सुनंदा अवचट यांच्या व्यसनमुक्ती केंद्रास देणगी दिली आणि मुक्तांगण हे समर्पक नावही सुचवले.या व्यसनमुक्ती केंद्रातून किती जण व्यसन मुक्त झाले असतील आणि कित्येक कुटुंब सावरले गेले असतील ते केवळ या अवचट दाम्पत्याने स्वीकारलेल्या समाजकार्याच्या व्रता मुळे.सरकार दरबारी येणाऱ्या अडचणी,अशा व्यसनी लोकांची समाजा कडून होणारी हेटाळणी,तिरस्कार हे सर्व झेलणे हे सोपे काम नसते.समाजातल्या सर्व थरातील माणसांवर निरपेक्षपणे प्रेम करणे हे ही सोपे नसते.त्यासाठी मनात एक वेगळीच माया असावी लागते. अवचट यांच्या सहवासात आलेल्या माणसांचे नशीब थोर की त्यांना असा निरपेक्ष मैत्री करणारा,मायेचा ओलावा असलेला 'बाबा' मिळाला.त्यांच्या पत्नीचे अकाली कॅन्सर ने जाणे हे त्यांनी सहन केले.तिचे मुक्तांगण चे कार्य पुढे चालू राहिले ते त्यांच्या मुलींमुळे.अशा सामाजिक कार्यातून त्यांच्यातील साहित्यिक घडला. डॉक्टर असूनही मुक्त पत्रकारितेला वाहून घेतल्याने वंचितांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यातला लेखक सतत कार्यरत राहीला.सध्याच्या संभ्रमावस्थेच्या काळात अवचट यांच्या सारख्या व्यक्तीचे जाणे हे आपल्या समाजाचे न भरून येणारे नुकसान आहे.राजकीय भाषेत याला पोकळी म्हणतही असतील.पण दिवसेंदिवस खालावत जाणाऱ्या निराशाजनक परिस्थितीत माणसे जगत असताना अनेकांच्या जीवनात देवदूत बनून आलेल्या,अंधारमय आयुष्यात आशेचा किरण दाखवणाऱ्या अनिल अवचट यांच्या सारख्या कलाकारांची अकाली एक्झिट चटका लावून जाणारी आहे.गेल्या काही काळात पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राने सिंधुताई सपकाळ यांच्या रूपाने आईची माया गमावली आणि आता कर्तव्यदक्ष 'बाबा' ही गेला.ज्यांच्या समोर आदराने झुकावे आणि चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा अशी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत.त्यांचा पुस्तकातून,लेखनातून ते यापुढे भेटत राहतीलही पण त्यांचे ते बासरी वादन,त्यांची फोटोग्राफी आणि बाल गोपाळाना इतक्या मायेने,तन्मयतेने पण सहजपणे ओरिगामी शिकवणे हे मात्र कधीच अनुभवता येणार नाही.याचे शल्य मात्र कायम राहील.
प्रशांत कुलकर्णी
अबुधाबी

WhatsApp Image 2022-12-26 at 21.08.41.jpegWhatsApp Image 2022-12-26 at 21.08.42.jpeg

रविवारी वडगाव कांदळी मधील यात्रेला जाण्याचा योग आला. बैलगाडा शर्यत/बारी अनेक वर्षानंतर अनुभवली - पहायला खूपच मेहनत करावी लागली . उत्साह खूपच होता, तोबा गर्दी होती....