तुम्हीच नाव सुचवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 October, 2010 - 06:36

समुद्रकिनारी फिरायला गेले असताना हे झाड माझ्याकडेही लक्ष द्या म्हणून ओरडत होतं.
ह्याच्यावर निसर्गाचाच कोप झालाय. जे पाणी हे ह्या झाडांसाठी जीवन असत तेच पाणी ह्याचा अंत पाहू लागलय. सागरलाटांनी ह्या झाडांची मुळ आपल्या हद्दीत घ्यायला सुरुवात केलेय.

XX.JPGXX1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप हि घेती
भिडे काळोख प्राणाला, दिशांचे भोवरे होती
देहाचे फूल मी माझ्या, तूझ्या पायी कसे ठेवू ?

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप हि घेती
भिडे काळोख प्राणाला, दिशांचे भोवरे होती
देहाचे फूल मी माझ्या, तूझ्या पायी कसे ठेवू ?

..............

नदीला पुर आलेला.....नदीला पुर आलेला.....

विन्या ते झाड पडणार नाही.. वरती नारळांनी धरून ठेवलयं.

कठडा नाही बांधता येईल.. एखादी जुनी मुर्ती ठेवून छानसं छोटेखानी मंदीर बांधल तर नक्कीच वाचेल ते झाड. अंधश्रद्धेने लोकांचं भलं होत नाही तर निदान झाडाचं तरी भलं होईल.

"लुटले मला लाटांनी, माझीच पाती घेऊन
मज ठेविले उपाशी, माझीच माती घेउन

इथली जमिन पिकते, माझ्याच श्रीफळांनी
मज केले हद्दपार, माझ्याच त्या मुळांनी"

सुक्या पटल.
आर्या, विरा मस्त.
मुक्तेश्वर जिटीजी करुन टाकायला लागेल माती.

कुंपणाने शेत खाल्ले, साद गेली वाहूनी...
वाकला माझा कणाही, दोस्त असले पाहूनी

सावली दिली तुला मी, तू मला दूर्लक्षिले
कोण कुठला जागू, तरीही मन त्याचे जागले

सॉरी... जागू नावामुळे "तो" जागू असं वाटलं... बदलून लिहिते. Happy धन्स लोकहो!!

कुंपणाने शेत खाल्ले, साद गेली वाहूनी...
वाकला माझा कणाही, दोस्त असले पाहूनी

सावली दिली तुला मी, तू मला दूर्लक्षिले
कोण कुठली जागू, तरीही मन तिचे जागले

>>>किरू, न हसता चूक दाखवून देता येते ना?
मंदार, मी मोहिनीच्या पोस्टीवर हसलोय.. लक्षात आलं का?

Pages