महाराष्ट्र आपला सर्वास्न म्हणजे सर्वांचं राज्य आणि आपण सर्व मायबोलीकर कुणी मराठवाडा ,कुणी विदर्भ ,कुणी प.महाराष्ट्राचे ,तर कुणी कोकणाचे आणि कुणी "खानदेशातले " या राज्यात आपल्याला बोली भाषेत प्रचंड बदल दिसून येतो .म्हणजे साधं १ की. मी . वर देखील भाषेतील बदल जाणवतो . अश्याच आमच्या खानदेशात देखील अहिराणी भाषा असली तरी तिच्या छटा दर किमी ला बदलतात आणि एक वेगळाच रंग आणि गोडवा तिच्यात दिसून येतो .चला मग सफर करूया याच प्रमाण मराठीतल्या अहिराणी रूपांची]
अहिराणी उच्चार - मराठी अर्थ
१ .बोयले १. च्यायला (बय-बाई)
२. बोगणं २. पातेलं
३.उरतीन ३. भांड्यांची उतरंड
४. भांशीन ४. चुल्ह्याचा ओत
५. कुश्ताय ५. कुलूप
६. बुंग्र ६. छिद्र
७. बख्खार ७. उनाड
८. बट्तोड ८. उनाड, खोडकर
९. तीर्सिंग्राव ९.चिडखोर
१०. घुमी १०. न बोलणारी ,अबोल
११.देड शाना ११. दीड शहाणा
१२.पोलकं १२. ब्लाउज
१३. झंपर १३.ब्लाउज
१४. बोख्लं १४.भिंतीतलं मोकळ कपाट
१५. कुटाणा १५. त्रास
१६. उप्पाद १६. उपद्व्याप
१७.सानं १७. भिंतीवरचा किंवा धाब्याचा झरोका
१८.उखल्ला १८. उकिरडा
१९.भू १९. पुष्कळ
२०.तुळशी बिन्द्रावन २०.तुळशी वृंदावन
छान माहिती. अजून वाचायला
छान माहिती. अजून वाचायला आवडेल.
तीर्सिंग्राव (तिरसिंगराव),
तीर्सिंग्राव (तिरसिंगराव), घुमी/घुमा आणि कुटाणा नगरकडे पण खूप ऐकायला मिळतात.
लफंगा भाऊ बख्खार नही बाख्खर
लफंगा भाऊ बख्खार नही बाख्खर आणि बट्तोड नही बाट्टोड.
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
मध्य प्रदेश, गुजरात अन
मध्य प्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राच्या सीमेवरचा हा खानदेश. तापीकाठी वसलेला. सहाजिकच, हिन्दी, मराठी अन गुजराती भाषांचं मिश्रण असावं असं वाटणारी ही अहिराणी भाषा आहे.
साहेबराव ,प्रादेशिक भाषेच्या
साहेबराव ,प्रादेशिक भाषेच्या अभ्यासकांसाठी तुम्ही फार मोठे काम करत आहात .लगे रहो .