रविवारी लोकसत्ता वाचताना नजर खिळली ते ९ व्या पानावर. काय होतं असं त्या पानावर? हो, एका पुस्तकाचे विश्लेषण. आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार व विश्लेषक संदीप वासलेकर यांच्या `एका दिशेचा शोध' या पुस्तकातील काही अंश छापून आले होते. त्यांनी दिलेली उदाहरणे अनो़खी आहेत. वाटर्लू सारख्या छोट्या गावात आपल्या उद्योगाचा साम्राज्य निर्माण करणारा ब्लेकबेरीवाला जिम बाल्सिली असो वा सतत युद्धाच्या छायेत असणा-या प्रदेशात टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण करणारा इस्रायलचा उद्योगपती स्टेफ हायमर दोघेही आपल्या जागी ग्रेट्च. बाल्सीलीने मोठमोठ्या देणग्या देऊन आंतरराष्ट्रीय संबंधावर उच्च दर्जाचे केंद्र स्थापन केले, तर टेफेन औद्योगिक केंद्रामध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात वाव दिला जातो. ही दोन उदाहरणे वाचून आपल्या देशातील उद्योजकांशी तुलना करण्याचा मोह होतो. टाटा उद्योगसमूह व इन्फोसिस सारखे काही मोजके अपवाद वगळता सगळीकडे निव्वळ अंधार दिसतो. हे जणू आपल्या बदलत्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिक आहे. निव्वळ ओरबाडत राहण्यापेक्षा समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून जर उद्योजकांनी समाजाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला तर अवघ्या देशाचे चित्र निराळे दिसेल.
डोंबिवली सारख्या छोट्या शहरात जन्मलेला, साध्या विमानाचा आवाज आला तर उत्सुकतेने पाहण्यासाठी घराबाहेर धावणारा `तो' , आज सकाळचा नाश्ता एका देशात, दुपारचे जेवण एका देशात तर रात्रीचे जेवण तिस-याच देशात करतो. सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला व मराठी माध्यमात शिकलेला हा तरुण पन्नास हून अधिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आंतरराष्ट्रीय विषयावर सल्ला देतो. ही जणू एखाद्या परिकथेत शोभणारीच गोष्ट आहे. पण वासलेकरांनी ते सिद्ध केले आहे ते अपार कष्ट, अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर. त्यांचे अवघे जीवन भारतीय विशेषतः मराठी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. `एका दिशेचा शोध' या त्यांच्या आगामी पुस्तकातून असेच त्यांचे अनुभव आपल्याला वाचावयास मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.
लवकरच येत आहे...
Submitted by प्रमोद सावंत on 11 October, 2010 - 12:04
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Private - accessible only to group members
शेअर करा
हे पुस्तक कधी प्रकाशित होणार
हे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे आणि प्रकाशक कोण आहेत कळू शकेल का?
१७ ऑक्टोबरला सदर पुस्तक
१७ ऑक्टोबरला सदर पुस्तक बाजारात येणार आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून कोणत्याही बुक स्टॉलवर ते दस-यापासून उपलब्ध होईल.
मस्त आहे धागा.
मस्त आहे धागा.
वर्षा, हे पुस्तक मायबोलीच्या
वर्षा,
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागातूनही विकत घेता येईल.
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी
हे पुस्तक मायबोलीच्या खरेदी विभागातूनही विकत घेता येईल>>>>>>>>>कसं करायचं?
हसरी, हा दुवा बघा -
हसरी,
हा दुवा बघा - http://kharedi.maayboli.com/shop/home.php
प्रकाशकांच्या यादीसाठी हा दुवा - http://kharedi.maayboli.com/shop/manufacturers.php
वर उल्लेखलेलं पुस्तक अजून खरेदी विभागात नाही. ते लवकरच उपलब्ध करून दिलं जाईल.
धन्यवाद.
धन्यवाद.
धन्यवाद प्रमोद व चिनूक्स.
धन्यवाद प्रमोद व चिनूक्स.
पुस्तकाच्या मते चौथी औद्योगिक
पुस्तकाच्या मते चौथी औद्योगिक क्रांती संपूर्ण जगाला ज्ञात आहे. भारतीय तरुण मात्र काही प्रमाणात या मोठ्या विकासाविषयी अनभिज्ञ आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पाठपुरावा केल्यास, आपण शैक्षणिक, रोजगार आणि स्वयंरोजगार सारख्या उदयास येणाऱ्या नवीन क्षेत्रात संधी निर्माण करु शकतो. म्हणून तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे व संघटीत होऊन चौथी औद्योगिक क्रांती कशी आणता येईल यावर चर्चा करावी.
- एका दिशेचा शोध या पुस्तकाचे लेखक संदीप वासलेकर यांनी पुस्तकाच्या अनुषंगाने भारतीय तरुणांना दिलेला संदेश.
प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे
`एका दिशेचा शोध' हे पुस्तक
`एका दिशेचा शोध' हे पुस्तक आता सर्वत्र उपलब्ध आहे. राजहंस प्रकाशनाचे हे पुस्तक २५० रुपयामध्ये उपलब्ध आहे.