अल्बोर्ग पोर्ट, डेन्मार्क...

Submitted by सेनापती... on 9 October, 2010 - 14:02

आमची बोट तब्बल ४ वर्षांनी 'ड्राय डॉक' मध्ये दुरुस्तीसाठी आणली आहे. कामाचा नुसता गोंधळ सुरु आहे. बोटीच्या प्रोपेलर पासून सर्वत्र काम सुरु आहे. हैदोस घातलाय नुसता १०० - १२० जणांनी. प्रत्येक डेक वर काम सुरु आहे.

१.

'वेस्टर्न रिजेन्ट' 'ड्राय डॉक' मध्ये...

२.

३.

४.

जवळच असलेले चर्च..

५.

पोर्ट मध्ये असलेल्या 'विंड मिल्स'...

अजून काही फोटो टाकीन नंतर... Happy

गुलमोहर: 

मी शिपि आहे पण मी मर्चंटनेव्हीमध्ये नाहीये. जहाज बांधणी मध्ये पण नाहीये.

सिझ्मिक / साऐसमिक (Seismic Vessel) प्रकाराबद्दल ऐकले आहे का? ह्या प्रकारच्या बोटी खोल समुद्रात तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधतात.

सेनापती, खरेच लिही.
या क्षेत्राबद्दल मराठीत फारसे लिहिलेले नाहीच. एम टी आयवा मारु पहिल्यांदा वाचली, त्यावेळी काही शब्दांचा अर्थ विचारावा लागला होता.

सिझ्मिक / साऐसमिक (Seismic Vessel) या बद्दल लिहाच मला पण नवीन माहिते मिळेल नाहीतर आम्हाला फक्त कंटेनर आणि बल्क कार्गो Vessel बद्दल माहिते आहे.

सिझ्मिक / साऐसमिक (Seismic Vessel)>>> ऐकलेच नाहिये कधी. आता कधी लिहिणार???? बोटी वरुनच का जमिनीवर आल्यावर? पण लेखाची वाट पहातो आम्ही सगळे. कृपया लिहिण्याचे योजावे. उद्याचा संकष्टीचा मुहुर्त धरायला हरकत नाही, नाही का? Proud

सेनापती,

दुबई, बहरीन येथील DRY DOCKING FACILITIES सोडून ईतक्या दूर DENMARK

ला गेलात ?

बाकी, तुम्ही छान अभ्यास पुर्ण लिहीता, असेच लिहीत रहा !

दुबई, बहरीन येथील DRY DOCKING FACILITIES सोडून ईतक्या दूर डेन्मार्क ला गेलात ?

म्हणजे? बोट नॉर्थ-सी मध्ये आहे आणि वर्षभर तिथेच प्रोजेक्ट असेल तर कशाकरता बोट दुबईपर्यंत मोबिलैझ करायची? जवळचे योग्य पोर्ट बघून तिथेच शिरणार न... Proud

क्या बात है सेनापती!! म्हणजे आता या विषयावर पण काही अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळणार तर आम्हाला.. Happy ( पण लक्षात असू द्या तूमच्या बाकिच्या लेखमालिका पण तूम्हाला पूर्ण करायच्या आहेत, त्यात सवलत मिळणार नाही....)

रोहण्णा, वा! मस्तच आहेत छाचि. येऊदे साद्यंत वर्णन!
अवांतर: माझ्या नोकरीची सुरुवातच आयएनएस नीलगिरीवर झाली होती...भारतात(मुंबई डॉकयार्ड)मध्ये बांधलेली पहिली हेलीकॉप्टरवाहू युद्धनौका(फ्रिगेट)...जलावतरणाआधीच्या तपासणीसाठी...मी त्यावर फक्त दीड-दोन महिने होतो...इलेक्ट्रॉनिक्स मेंटेनेन्स टीममध्ये....त्यावेळी ड्रायडॉक वगैरे पाहिल्याच आठवतेय...पण फारशी माहिती घ्यावी असे तेव्हा वाटले नव्हते.

<< माझ्या नोकरीची सुरुवातच आयएनएस नीलगिरीवर झाली होती >> बोटीचा पाण्याखालचा न दिसणारा भाग ड्रायडॉकमधेच दिसतो, तसंच माबोकरांचे अदृश्य पैलूही इथं उघड होताहेत ! Wink

आयवा मारू आता घेऊन वाचावीच लागेल.. Wink

देव काका... काय म्हणताय.. Happy हे नव्याने कळले.. 'अवांतर' असे कशाला लिहिताय? धाग्याशी निगडीत आहे ना ते.. Happy

बोटीचा पाण्याखालचा न दिसणारा भाग ड्रायडॉकमधेच दिसतो, तसंच माबोकरांचे अदृश्य पैलूही इथं उघड होताहेत>>>> Happy

सेनापती उर्फ सरखेल, या वरती खरंच अजून लिहा. वाचायला आवडेल.

एवढा मोठा किनारा असूनदेखील भारतामधे ड्राय डॉकच्या सुविधा फार कमी आहेत.

दुबई, बहरीन येथील DRY DOCKING FACILITIES सोडून ईतक्या दूर डेन्मार्क ला गेलात ?>>>

हे वाचून सहज आठवलं. पप्पा जहाज घेऊन कलकत्त्याला गेले होते. काही प्रॉब्लेममुळे त्याना श्रीलंकेजवळ तीन चार दिवस अँकर घालून रहावं लागलं होतं. ते ऐकून आईची एक मैत्रीण म्हणे "अय्या, असे कशाला वळसा मारून गेले? इथे नागपूरवरून जाता येतं की कलकत्त्याला. गीतांजली एक्स्प्रेस तशीच जाते" Uhoh

कित्ती मोट्ठी बोट आहे ही... वॉव, सर्वत्र पसरलेल्या पाण्यावर ह्या महाकाय बोटीत तरंगायला जामच मजा येत असणार ...
लिही रे वाचत आहोत Happy

Pages