नमस्कार मंडळी !!
नमनात धडा भर न घालता सरळ मुद्द्याला च हात घालतो. तसे आपण सर्व भारतीय विलक्षण देश प्रेमी. पण , आपल्या देशाला शिव्या घालायला पण आपण मागे नसतो बरका. उदा. रस्ते चांगले नाहीत ,वाढते लोड-शेडींग , पगार कमी ट्याक्षेस जास्त या सारखे विषय निघाले कि आपण देशाचे वाभाडे च काढतो.
पण जेवढ्या पोट-तिडकीने आपण आपल्या देशाला नावे ठेवतो , तेवढेच देशाने काही चांगले केले तर तोंड भरून कौतुक करतो का हो ?? विचारा... विचारा .... विचारून बघा स्वताहाला ...उत्तर आपोआपच मिळेल.
सध्या अशीच एक चांगली घटना भारतात घडत आहे. कॉमनवेल्थ गेम्स. होय हो , हि तीच स्पर्धा आहे जिच्यात मैदानात खेळ सुरु व्हायच्या आधी मैदान बाहेरच्या वादंगा नि जास्त रान उठले. काही शेफार्लेल्या देशांनी दहषद वादाच्या सावटा चा गव-गावा केला , तर कोणी गलीछ्य व्यवस्थापनावर तोंड सुख घेतले. इथे माणसांची माकड चेष्टा कमी पडली म्हणून कि काय दिल्ली तील माकडांनी आयोजकांना सालो कि पळो करून सोडले. आणि हे सगळे निस्तरतंय तो पर्यंत स्टेडीयम जवळ चा पूल कोसळला.
एकंदर काय .... नकटीच्या लग्नाला येणार नाहीत त्याहून तिप्पट विघ्ने या स्पर्धेला आली. तुम्ही आम्ही यातून काहि चांगले उद्भवेल याची अशाच सोडली होती. पण, या वेळी मात्र भारताने दुर्दैवाचा दणका द्यायच्या ऐवजी परत एकदा सुदैवाचा धक्का दिला ...... तो हि एकदम सुखाद .. [ अगदी " गार-गार वाटतंय हो" असे म्हणायला लावणारा]. दिल्ली मध्ये कॉमनवेल्थ गेम्स ची एका दिमाख दार सोहळ्याने सुरुवात झ्हाली ... आणि काय झ्हाक्कास झ्हाला हो तो सोहळा . "विविधतेत एकता " या विषयाचे एक संयुक्तिक संगीतमय सादरी कारण होते ते. उत्तम संगीत , धमाकेदार न्य्रुत्य आणि आधुनिक तंत्रज्ञाना च्या वापर करून आपण संपूर्ण जगाला भारताची संस्किती च दाखवली जणू . ज्या कोणी भारतीयाने ते बघितले त्याचे उर अभिमानाने भरून आले.
जे पोलीस खाते लाच खोरी साठी आपल्या बोलण्या खाते , त्याने उत्तम सौरक्षण व्यवस्था केली. जे राजकारणी भ्रष्टाचारा साठी आपल्या शिव्या-शाप खातात , त्यांनी सामनज्यस्य दाखवून कोणतेही वाद विवाद निर्माण केले नाहीत [ टच वूड - मी तर लाकूड हातात धरूनच हे सदर लिहित आहे]; अन आयोजक आणि कलाकार मंडळीनी तर अप्रतिम च कामगिरी केली .
परिणाम - जी परदेशी प्रसार माध्यमे आपले च फुकट पास घेऊन आत्तापर्यंत आपली तोंड भरून निंदा करत होती , तीच आता आपल्या कौतुकाचे पोवाडे गात आहेत .
मग आपण सर्व का बरे या कौतुकाच्या पोवाड्याला कोरस द्यायला मागे आहोत . मान्य आहे कि "मेरा भारत माहान" अजून जरी झ्हाला नसला तरी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन तिथ पर्यंत नेणारे एक पाउलाच आहे.
चला तर मग .... जे चांगले आहे त्याला चांगले म्हणूयात .... शाब्बास इंडिया म्हणून भारताचे कौतुक करूयात .........वेल डन इंडिया..... स्पर्धेसाठी शुभेच्या !!
[ त.टी - या वेळेस जरा बरा दिसणारा वाघ सरकारने मास्कोट म्हणून निवडून देशाची लाज राखली हे इथे नमूद करणे गरजेचे आहे :)]
आदर्शवत टेंपरॅमेंट व अप्रतिम
आदर्शवत टेंपरॅमेंट व अप्रतिम ड्रॉप शॉटसचं सानिया नेहवालचं प्रदर्शन
>>
साईना नेहवाल हो...
सानिया नाही...
<<सानिया नाही...>> सॉरी,
<<सानिया नाही...>> सॉरी, क्षमस्व, माफ करा !
चल्ताय बॉस...
चल्ताय बॉस...
आजची संध्याकाळ पण सोनेरी :
आजची संध्याकाळ पण सोनेरी : टेटे पुरुष दुहेरीत आणि मुष्टियुद्धात २(आतापर्यंत) सुवर्णपदके.
काय छान अभिमानास्पद यश
काय छान अभिमानास्पद यश मिळवते आहे आपली कॉमनवेल्थ स्पर्धांतली टीम. सगळ्या स्पर्धकांचं कौतुक आणि अभिनंदन. Way to Go!
भाऊ नमसकरजी, सहीच
भाऊ नमसकरजी, सहीच
..
..
बॅडमिंटन -सायनाला सुवर्णपदक,
बॅडमिंटन -सायनाला सुवर्णपदक, दुहेरीतही सुवर्ण;
हॉकी - ऑसीजकडून भारताचा दारूण पराभव. भारताला रौप्य.
कॉमनवेल्थची यशस्वी सांगता.
सर्व खेळाडूंचं व संबंधितांचं अभिनंदन !
राहुल गाधीला कल्माडी नी का
राहुल गाधीला कल्माडी नी का thanks केले ते कळले नाही
however congrat to all
however congrat to all players. I have high regards for them
कॉमनवेल्थ गेम बर्यापैकी फॉलो
कॉमनवेल्थ गेम बर्यापैकी फॉलो केले. पण ह्या धाग्यावर अजिबातच लिहिलं गेलं नाही.
काल सायनाला सुवर्णपदक मिळाल्यावर फार्फार आनंद झाला. दुसरा नंबर मिळवला तर...... प्रत्येक देश यजमान असताना सर्वोत्तम कामगिरी करतो. आपणही परंपरा सुरु ठेवली.
बिंद्रामात्र ती संपूर्ण अंतिम फेरी आणि नंतरचे काही तास बधीर मनस्थितीत होता(म्हणूनच जिंकला बहुधा)! >>>> मयेकर, अगदी अगदी.. रौप्यपदक मिळवलेला चिनी खेळाडू भारताच राष्ट्रगीत सुरु असताना पूर्णवेळा अश्रु ढाळत होता पण हे साहेब मात्र अगदी शांत निश्चल..
ती बातमी इथल्या रात्री ११ च्या आसपास आली होती. ऐकून मी रात्रभर झोपूच शकलो नाही..
<<राहुल गाधीला कल्माडी नी का
<<राहुल गाधीला कल्माडी नी का thanks केले ते कळले नाही>> दिले नसते, तर " कां नाही केले " हा प्रश्न खरोखर उचित ठरला असता !
<<प्रत्येक देश यजमान असताना सर्वोत्तम कामगिरी करतो. आपणही परंपरा सुरु ठेवली. >> इथंही
क्रिकेटसारखी "होम पीच अॅडव्हांटेज"ची भानगड असते कीं घरच्या हवामानाचा व प्रेक्ष़कांच्या पाठींब्याचा फायदा होतो ? कांहीही असो, कामगिरी अभिमानास्पद !
भाऊ फरक नक्कीच पडतो.. एकूणच
भाऊ फरक नक्कीच पडतो.. एकूणच भारताची कामगिरी चांगली झाली... अर्थात काही खेळात आपण खूपच मागे आहोत आणि ते बघताना प्रकर्षाने जाणवत होते.. पण जे आहे ते हे ही नसे थोडके असे म्हणायला हरकत नाही..
भाऊ, भानगड कसली.. ? घरच्या
भाऊ, भानगड कसली.. ?
घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना, जवळ जवळ १०० % पाठिंबा असताना प्रत्येक जण सर्वोत्तम द्यायचा जास्तित जास्त प्रयत्न करतो आणि त्यामुळेच चांगली कामगिरी होते.
स्पर्धेच्या आयोजकांमधील
स्पर्धेच्या आयोजकांमधील कामचुकार, भ्रष्ट, नालायक लोक वगळुन, ज्यानी ज्यानी ही स्पर्धा यशस्वी करायला प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या सगळ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन.
विशेष अभिनंदन भारतीय सैन्याचे..तो कोसळलेला पादचारी पुल ५ दिवसात, (अतिशय कमी खर्चात) बांधला.
प्रत्येक प्रोजेक्ट नंतर पोस्ट इम्प्लीमेंटेशन ऑडीट असते तसे आता सरकारने आत्मपरीक्षण करायची आवश्यकता आहे. झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणुन जर आता शिथिल राहिले तर हा ढिसाळपणा प्रत्येक वेळी होत राहिल.
काही
काही फोटो
http://www.boston.com/bigpicture/2010/10/the_xix_commonwealth_games.html
Pages