कॉमनवेल्थ गेम्स - शब्बाश इंडिया !!

Submitted by जग्या on 4 October, 2010 - 23:43

नमस्कार मंडळी !!

नमनात धडा भर न घालता सरळ मुद्द्याला च हात घालतो. तसे आपण सर्व भारतीय विलक्षण देश प्रेमी. पण , आपल्या देशाला शिव्या घालायला पण आपण मागे नसतो बरका. उदा. रस्ते चांगले नाहीत ,वाढते लोड-शेडींग , पगार कमी ट्याक्षेस जास्त या सारखे विषय निघाले कि आपण देशाचे वाभाडे च काढतो.

पण जेवढ्या पोट-तिडकीने आपण आपल्या देशाला नावे ठेवतो , तेवढेच देशाने काही चांगले केले तर तोंड भरून कौतुक करतो का हो ?? विचारा... विचारा .... विचारून बघा स्वताहाला ...उत्तर आपोआपच मिळेल.

सध्या अशीच एक चांगली घटना भारतात घडत आहे. कॉमनवेल्थ गेम्स. होय हो , हि तीच स्पर्धा आहे जिच्यात मैदानात खेळ सुरु व्हायच्या आधी मैदान बाहेरच्या वादंगा नि जास्त रान उठले. काही शेफार्लेल्या देशांनी दहषद वादाच्या सावटा चा गव-गावा केला , तर कोणी गलीछ्य व्यवस्थापनावर तोंड सुख घेतले. इथे माणसांची माकड चेष्टा कमी पडली म्हणून कि काय दिल्ली तील माकडांनी आयोजकांना सालो कि पळो करून सोडले. आणि हे सगळे निस्तरतंय तो पर्यंत स्टेडीयम जवळ चा पूल कोसळला.

एकंदर काय .... नकटीच्या लग्नाला येणार नाहीत त्याहून तिप्पट विघ्ने या स्पर्धेला आली. तुम्ही आम्ही यातून काहि चांगले उद्भवेल याची अशाच सोडली होती. पण, या वेळी मात्र भारताने दुर्दैवाचा दणका द्यायच्या ऐवजी परत एकदा सुदैवाचा धक्का दिला ...... तो हि एकदम सुखाद .. [ अगदी " गार-गार वाटतंय हो" असे म्हणायला लावणारा]. दिल्ली मध्ये कॉमनवेल्थ गेम्स ची एका दिमाख दार सोहळ्याने सुरुवात झ्हाली ... आणि काय झ्हाक्कास झ्हाला हो तो सोहळा . "विविधतेत एकता " या विषयाचे एक संयुक्तिक संगीतमय सादरी कारण होते ते. उत्तम संगीत , धमाकेदार न्य्रुत्य आणि आधुनिक तंत्रज्ञाना च्या वापर करून आपण संपूर्ण जगाला भारताची संस्किती च दाखवली जणू . ज्या कोणी भारतीयाने ते बघितले त्याचे उर अभिमानाने भरून आले.

जे पोलीस खाते लाच खोरी साठी आपल्या बोलण्या खाते , त्याने उत्तम सौरक्षण व्यवस्था केली. जे राजकारणी भ्रष्टाचारा साठी आपल्या शिव्या-शाप खातात , त्यांनी सामनज्यस्य दाखवून कोणतेही वाद विवाद निर्माण केले नाहीत [ टच वूड - मी तर लाकूड हातात धरूनच हे सदर लिहित आहे]; अन आयोजक आणि कलाकार मंडळीनी तर अप्रतिम च कामगिरी केली .

परिणाम - जी परदेशी प्रसार माध्यमे आपले च फुकट पास घेऊन आत्तापर्यंत आपली तोंड भरून निंदा करत होती , तीच आता आपल्या कौतुकाचे पोवाडे गात आहेत .
मग आपण सर्व का बरे या कौतुकाच्या पोवाड्याला कोरस द्यायला मागे आहोत . मान्य आहे कि "मेरा भारत माहान" अजून जरी झ्हाला नसला तरी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन तिथ पर्यंत नेणारे एक पाउलाच आहे.

चला तर मग .... जे चांगले आहे त्याला चांगले म्हणूयात .... शाब्बास इंडिया म्हणून भारताचे कौतुक करूयात .........वेल डन इंडिया..... स्पर्धेसाठी शुभेच्या !!

[ त.टी - या वेळेस जरा बरा दिसणारा वाघ सरकारने मास्कोट म्हणून निवडून देशाची लाज राखली हे इथे नमूद करणे गरजेचे आहे :)]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुमोदन जग्या. सोहळा खरेच छान झाला. तो बारका तबला वाजवणारा मुलगा तर काय गोड ग बाई.
त्याची माहिती रीडिफ वर आहे. बिन्द्रा, राजवर्धन साइना विजय कडून अपेक्षा आहेत. बघुया.

@ अश्विनी मामी , ऋयाम - अनुमोदन. खरे आहे तुमचे. यावेळी भारता कडून खुप अपेक्षा आहेत पदाकाच्या. सेंचुरी व्हावी अशी इच्चा आहे !!
@ रुपाली - हो रुपाली जी. पदक खाते उघडले ...ते ही पहिल्याच दिवशी. कित्ती सही ना !! त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुध टेस्ट पण जिंकलो. क्या बात है .....

भारत अगदी फॉर्ममध्ये. मात्र मिडियाने आधी जेवढी बदनामी केली,तेवढं कौतुक नाहि केलं. उद्घाटन सोहळ्यापेक्शा बिग बॉसबद्दलच जास्त दाखवत होते.
आणि खेलगावच्या अपुर्‍या तयारीकरीता किती टिका केली ह्या लोकांनी.पण आता तयार असलेले आलिशान खेलगाव कोणीच दाखवत नाहि.
काहि परदेशी अ‍ॅथलीट्सच्या म्हणण्यानुसार मागच्या मेलबॉर्नपेक्षा ईथली राहण्याची सोय नक्किच बरी आहे.
पण तरीही, गो ईंडिया...

जग्या, मस्तच लिहिलंय Happy अगदी खरं बोललात!!!!! नावे ठेवायला आपण अगदी सरसावून पुढे असतो, पण कौतुक करतांना थोडे हातचे राखुनच... असो, पण ज्या वेगाने CWG चे सगळे काम झाले ते अगदी आश्चर्याचा सुखद धक्काच देणारे होते...

आधीचे ते ताणाचे दिवस आठवतात... बरखा दत्त अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेत होती...ह्या सगळ्या अनागोंदीच्या कारभाराची नक्की कारणे काय याचा उहापोह चालला होता... किरण बेदी यांनी अतिशय संयत मुद्दे मांडले होते... त्या म्हणाल्या होत्या... हा problem आहे diluted responsibility चा!!!! कोणा एकावर पूर्ण जबाबदारी नसल्यामुळे सगळेच दुसर्‍यावर ढकलून मोकळे झाले आहेत, बाकी काही नाही...

तसे आपले देशवासी अतिशय कष्टाळू म्हणून जगभर ज्ञात आहेत... वेळेची फिकीर न करता ते काम पूर्ण करुन देतात आणि जिथे योग्य supervisor असेल, तिथे कामाचा दर्जा पण चांगला असतो. CWG चे शेवटचे काही दिवस मान-पाठ एक करुन काम करणार्‍या आणि ते यशस्वीपणे पूर्णत्वास नेणार्‍या आपल्या जवानांना आणि सर्वांनाच माझा सलाम!!!!! Happy

दिवस मान-पाठ एक करुन काम करणार्‍या आणि ते यशस्वीपणे पूर्णत्वास नेणार्‍या आपल्या जवानांना आणि सर्वांनाच माझा सलाम!!!!! >> १००% अनुमोदन.

सोहळा मस्तच झाला!!

उद्घाटन सोहळ्यापेक्शा बिग बॉसबद्दलच जास्त दाखवत होते.>> Sad

कालची मेडल टॅली......
५ गोल्ड,५ सिल्वर,२ ब्राँझ..
आणि आज त्यात अजुन भर पडलीय...
गो इंडिया गो....

सोहळा छानच होता.
या निमित्ताने दिल्लीत बरेच चांगले वाईट बदल घडलेत.
दिल्ली मेट्रो दक्षिण दिल्लीमध्ये पोचली हा त्यातला सगळ्यात मोठा बदल. रस्त्याने माझ्या घरापासून गुडगावला जायला एरवी दीड तास अन सकाळच्या वेळी २-२.५ तास लागायचे, तोच प्रवास मेट्रोने ५५ मिनिटात होतो.
दिल्ली पोलिस, चक्क सगळ्यांशी हसून बोलताहेत. रोज सकाळी मेट्रो स्टेशनवरचा सुरक्षा अधिकारी, पोलिस अधिकरी वैगरे लोक हसून गुड मॉर्निंग म्हणतात, सामानाची सुरक्षा तपासणी होईपर्यंत चक्क चहा घेणार का म्हणून हसून विचारतात हा माझ्यासाठी खूप मोठा सुखद धक्का आहे. Happy
वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, मेट्रोमध्ये इथल्या सार्वजनिक वाहतूकीचं कौतूक करणारे पर्यटक, युनिफॉर्म घातलेले हसतमुख स्वयंसेवक यासारख्या गोष्टींमूळे खरंच खूप छान वाटतं.
वाईट फक्त गेम्समूळे गरीब -कष्टकरी जनतेला जे त्रास होताहेत त्यामूळे वाटंत. फेरीवाले,रस्त्यावरचे भिकारी, फुगे विकणारे, हातगाड्यांवर सामान विकणारे, पानपट्टी / चहा चे अनेक ठेलेवाले यांचे काम पोलिसांनी बंद केलेय. यातिल बरीचशी जनता आपल्या गावी किंवा दिल्ली बाहेर नोयडा, गुडगाव वैगरे भागात गेलिये.

राष्ट्रकुल स्पर्धांबद्दल आणखी एक धागा?
http://www.maayboli.com/node/19927 हे पण आहे. पण ते गप्पांचे पान आहे, तेव्हा इथेच लिहिलेले बरे!
स्पर्धांचा उद्घाटन समारंभ चकाचक होतोय म्हटल्यावर मिडियाचा त्यातला रस ओसरला (याला म्हणतात नतद्रष्ट्)...आता तरी ते या स्पर्धेच्या बातम्या देताहेत की क्रिकेटचे गुर्‍हाळ लावताहेत?
पण प्रेक्षकांनी मात्र या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा जास्त आवडीने पाहिला.
आयपीएल-३, टी२० विश्वचषक, फुटबॉल विश्वचषक यापेक्षा या सोहळ्याला जास्त टीव्ही रेटिंग मिळाले. बीबीसीवर याला बीजिंग ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याइतकेच तर स्काय न्युजवर त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षक मिळाले.
संदर्भ :http://www.business-standard.com/india/news/opening-ceremony-telecast-dr...
या सगळ्या समारंभाला आणि स्पर्धेला दृष्ट लागू नये म्हणून कलमाडी साहेब सतत काळी तीट लावत फिरताहेत. एकदा त्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा उल्लेख अबुल कलाम आझाद असा केला तर प्रिन्स चार्ल्सची प्रिन्स डायना की हो केली!
तशीही राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारताची कामगिरी चांगली होत आलीय. गेल्या २००६ ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत भारत चौथ्या स्थानावर होता आणि समशेर जंग (शूटिंग) हा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला होता. यंदा दुसरे स्थान्(ऑसी) पाठोपाठ मिळवायचा विचार आहे, आणि बरेच नवे खेळही असल्याने तेही भारताच्या पथ्यावरच पडेल.
रच्याकने राज्यवर्धन सिंग राठोडने या स्पर्धेसाठी क्वालिफाय केलेले नसल्याने तो स्पर्धेत दिसणार नाही, पण स्पर्धेचे मार्केटिंग करताना मात्र दिसेल.

मला नीट बघता आला नाही, उदघाटन सोहळा. एन डी टि व्ही वर तो लाईव्ह दाखवायला बंदी होती म्हणे.( आणि मला फक्त तेच चॅनेल दिसते )
तो हेलियम बलून वगैरे मला नीट कळला नाही. (तो कसा आणला गेला मैदानात, त्याचा वापर कसा केला वगैरे ) कुणी सांगू शकेल का ? आणि ते मेंदीचे हात वगैरे काय होते ?
यू ट्यूब वर नाही दिसला, झाला का अपलोड ?
खेळाडूंनी सुरवात तर चांगली केलीय.

भान , सानी ,वृषा, रोहित ,अल्पना , भरत, दिनेशदा - वेळात वेळ काढून सदर वाचून प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद.
आजचे दिन विशेष- कधी न्हवे ते आपल्या पदक खात्यात सुवर्ण पदाकान ची संख्या रौप्य अणि कांस्य पदाकान पेक्षा जास्त आहे . काय सोनेरी दिवस आहे नई Lol
आत्तापर्यंत भारताची आजची मेडल टयाली-
सुवर्ण -१०
रौप्य - 7
कांस्य -3

एशियाड, राष्ट्रकुल आणि आता ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या देशाचा खेळाडू पोडियमवर उभा आहे, तिरंगा वर चढतोय, राष्ट्रगीताची धून वाजतेय ही अनुभूती काही वेगळीच आहे. काल वेटलिफ्टर के रवी कुमारचे डबडबलेले डोळे पाहिले, आणि लिअँडरचा अशाच कुठल्यातरी क्षणीचा अश्रूंनी भिजलेला चेहरा आठवला.
तशीच आठवली बीजिंगमधून अभिनव बिंद्राचा सुवर्णक्षण कव्हर करणारी NDTV 24X7 ची रडून डोळे लाल झालेली आणि ओरडून घसा बसलेली वृत्तप्रतिनिधी.
बिंद्रामात्र ती संपूर्ण अंतिम फेरी आणि नंतरचे काही तास बधीर मनस्थितीत होता(म्हणूनच जिंकला बहुधा)!

जग्या, खरयं सर्व अडथळे पार करीत दिमाखदार सोहळ्याने कॉमनवेल्थची सुरुवात झालीय. आपल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करायला सुरूवात केलीय.

साधारणत: आयोजक पचका करतात तर खेळाडू शान वाढवतात असेच घडते आपल्याकडे. हीच बातमी पाहा ना
"सुवर्ण पदकविजेत्या रेणू बालाचा अपमान"
रेणूला स्पर्धा संपताच भारतीय ऑलिंपिक समिती आणि राष्ट्रकुलचे आयोजक विसरुन गेले होते.

रेणूला घरी जाण्यासाठी वाहन व्यवस्था केलेली नव्हती. त्यामुळे ती स्पर्धा संपल्यानंतर स्व-खर्चाने रिक्षा करुन घरी गेली. रात्री उशिरापर्यंत हा सगळा प्रकार उघडकीस आला. मात्र एवढी मोठी चूक करुनही भारतीय ऑलिंपिक समिती आणि राष्ट्रकुलचे आयोजक यांच्यापैकी कोणालाही माफी मागावी, असे वाटले नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6704704.cms

>>तशीच आठवली बीजिंगमधून अभिनव बिंद्राचा सुवर्णक्षण कव्हर करणारी NDTV 24X7 ची रडून डोळे लाल झालेली आणि ओरडून घसा बसलेली वृत्तप्रतिनिधी.
<<

आगदी खरयं ऑफिसच्या कँटिनमध्ये असताना ही बातमी कळाली व एकच जल्लोष झाला होता. पदक प्रदान समारोहणात आपले राष्ट्रगीत वाजवले जात असताना डोळ्यात पाणी आलेले. तो क्षण खरच रोमांचक होता.

भारतात असताना मी ऑलिंपिक्स अगदी टक लावून बघत असे. जिमनॅस्टीक्स, डाइव्ह, सिंक्रोनाइज्ड स्विमिंग हे तर अगदी आवडते खेळ. त्यावेळी विजेत्यांच्या देशांची राष्ट्रगीते वाजवताना, ते खेळाडू किती भावनावश होत असत.
अगदी खरे सांगतो, त्यावेळची आपली कामगिरी बघून, आपल्या देशाला हि कधी संधी मिळेल, असे स्वप्न सुद्धा कधी बघितले नव्हते.

योग्य ती संधी दिली गेली, तर आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाही, हे खरे आहे.

राष्ट्रकुलचं उद्घाटन www.dailymotion.com वर आहे. तीथे शोधलं तर संपुर्ण मिळेल. किंवा रात्री इथे लिंक्स देतो.

मला तरी खुप आवडलं Happy

मिडीया नेहमीप्रमाणेच मागे होता स्तुती करण्यात.

इतर खेळात यश मिळतंय याचा आनंद असूनही, अजून हॉकीमध्ये आपली अस्मिता गुंतल्यासारखी वाटते. ऑस्ट्रेलियाबरोबर हरल्याचं [२ वि.५] पाहून वाईट वाटलं. शिवाय,पाकिस्तान विरुद्धचा सामना अजून व्हायचाच आहे.
<<योग्य ती संधी दिली गेली, तर आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाही, हे खरे आहे.>> हे आता सिद्ध होतंयच. नेमबाजीतल्या दोन पदक विजेत्या मराठी मुलींची मुलाखत आत्ताच पाहिली. खरंच अभिमानास्पद व आनंददायी !

cwgrunnear.JPG आत्ताच दिल्लीत धावण्याच्या शर्यतीत पदक मिळवलंय ! आता चार पैसे मिळवावे म्हणून इथं आलोय. हल्ली इथं "रनर"ना मागणी आहे असं कळलं !!

जिम्नॅस्टिक्स फ्लोर एक्झरसाइझ मधे भारताला ब्राँझ. जिम्नॅस्टिक्स मधे भारताला मिळालेले गे पहिले आंतरराष्ट्रीय पदक असावे (सार्क मधे नसेल तर)

@ भरत जी - कार्टून छान आहे. आमच्या बरोबर शेयर केल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणाला ते खरे आहे. सार्क मधे जिम्नॅस्टिक्स नसते. जिम्नॅस्टिक्स मधे भारताला मिळालेले गे पहिले आंतरराष्ट्रीय पदक आहे. खुप सही बातमी आहे. माज्हे लक्ष सेना नेहवाल च्या कामगिरी कड़े पण लागुन आहे. मुलगी नक्की सुवर्ण घेणार Happy

जग्या,कार्टुन भाऊंनी दिले आहे!
जिम्नॅस्टिक्स मधे आणखी एक पदक आले.
भारतीय महिला पैलवान हम भी कुछ कम नही म्हणतात. काल एका ऑलिंपिक पदकविजेतीला चीत केले गेले.
पण हे काही अनपेक्षित धक्के :
पेस भूपती पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत बाद.
ट्रॅप आणि डबल ट्रॅप दोन्हीत भारताकडे विश्वविक्रमवीर असूनही सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक हुकले. धनुर्विद्य पुरुष सांघिक ब्राँझपदकावर समाधान.
हे काही चांगले अनपेक्षित निकालः
बॅडमिंटन सांघिक (ज्वाला-दिजु जिंकले असते तर फायनल आणखी रंगली असती )आणि टेबल टेनिस महिला सांघिक मधे रौप्यपदक.
पॅरॅ जलतरणात (सुवर्ण?) पदक.

हॉकी - भारत- ४, स्कॉटलंड -०.
कालचा सामना आपल्या संघाला योग्य वेळी लय सांपडतेय असा दिलासा देणारा होता. आज [?] भारत वि. पाकिस्तान !
सर्वच खेळातील आपल्या स्पर्धकाना शुभेच्छा.

या वेळेच्या कॉमनवेल्थ गेम्स मधली भारताची आत्तापर्यंत ची घौड-दौड खूप थक्क करणारी आहे. इथे अमेरिकेत बसून ते निट अनुभवायालाच मिळत नई. भारतात एकंदर वातावरण आणि स्पर्धे बद्दल ची उस्तुकता खूप सही असेल नई ??

हॉकी - रंगतदार सामन्यात भारत ७ वि. पाकिस्तान ४.
भारत उपांत्य फेरीत !
पदकांच्या जोरावर भारत दूसर्‍या स्थानावर !! ज्याच्यासाठी भारतातील प्रत्येक क्रिडाप्रेमी कित्येक दशकं आसुसलेला होता, तें प्रत्यक्ष घडताना पहाण्याचा आनंद ज्या नवीन खेळाडूनी, प्रशिक्षकानी दिला त्याना मनापासून धन्यवाद.
घोडदौड अशीच चालू राहू दे !

क्रिकेटमुळे ईच्छा असूनही दिल्लीतले खेळ बघता येत नाहीत. तरीपण काश्यप वि. चौथा सीडेड मुहम्मद हसीम [मलेशिया] यांचा रंगतदार बॅडमिंटनचा सामना पाहिला. १९-२१,२१-१९ व २१-१६ असा हा सामना काश्यपने जिंकला.
भारताच्या महिला संघाला ४००मी. रिले शर्यतीत सुवर्ण पदक !!! अभिनंदन.

बॅडमिंटन- सानिया वि. ईगलस्टाफ [स्कॉटलंड] उपान्त्य सामना रंगला. आत्ताच सनियाने २१-११ व २१-१७ असा हा सामना जिंकला. आदर्शवत टेंपरॅमेंट व अप्रतिम ड्रॉप शॉटसचं सानिया नेहवालचं प्रदर्शन ! अभिमानास्पद कामगिरी करणार सानिया इथं आणि इतरत्र ! अभिनंदन !

हॉकी - भारत ५ वि.इंग्लंड ४. शेवटच्या १५ मिनीटांपर्यंत १-३ पिछाडीवर असून बरोबरी साधत टायब्रेकरमध्ये भारताने विजेय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता गांठ बलाढ्य औस्ट्रेलियाशी.
सचिन व लक्ष्मण याना भारतीय संघाला ऑसीजविरुद्ध प्रेरणा द्यायला अंतिम सामन्याला हजर रहाण्याचं खास आमंत्रण द्यावं लागेल !;-):डोमा:

भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन !
>>सचिन व लक्ष्मण याना भारतीय संघाला ऑसीजविरुद्ध प्रेरणा द्यायला अंतिम सामन्याला हजर रहाण्याचं खास आमंत्रण द्यावं लागेल
Happy
भाऊ नमसकरजी ह्यासाठी कार्टून काढाच Happy

एक चांगला बदल : आधी भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोचल्याचे समाधान मानायचे, आम्ही आमचे १०० टक्के दिले असे सांगायचे. आता रौप्य किंवा कांस्यपदक मिळाले तरी समाधानी नाहीत, मी आणखी चांगले करू शकले असते असे म्हणतात.
१०० मीटर्स पुरुष व महिला रिले यात कांस्यपदक तर ४०० मीटर्स रिलेत महिलांना सुवर्णपदक. थाळाफेकीत तिन्ही पदके भारतीय महिलांना!

सिध्दार्थजी, प्रयत्न केलाय, गोड मानून घ्या !
hockystick.JPG
ऑसीजविरुद्ध अंतिम सामन्यासाठी हॉकी स्टीक्स ऐवजी आता क्रिकेट बॅट वापरायच्यात तुम्हाला ? अन,
त्याही इंडियाच्या क्रिकेट संघाच्या !

Pages