युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम
हिरो:
तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब
तुझ्या डोईचे केस हाय लांब
तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग
तू कोनाची प्वार हाय सांग ||१||
हिरोईन:
तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब
वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब
माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम
माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२||
हिरो:
तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं
पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चालन्यानं
वळख द्यावी घ्यावी, विचारपुस करावी
म्हनून पोरी सांग तूझं नाव नाव नाव
पोरी सांग ग तूझं नाव ||३||
हिरोईन:
नाव गाव इचारनारा तू एकलाच न्हाई
सार्या गावाला मी ओळखून हाई
इचारपुस करनारं कितीक आलं कितीक गेलं
तू जातूस इथून, का काढू पायाची व्हान व्हान व्हान?
काढू का पायाची व्हान? ||४||
हिरो:
आगं गावचा पाटील इथंला मी हाय
वाड्यावर ग माझ्या काय कमी न्हाय
उस धा एकरी, केला द्राक्षबाग मळा
तालूक्यात हाय मोठं माझं रान रान रान
हाय मोठं ग माझं रान ||५||
हिरोईन:
तुझा मोठा वाडा बँकेत गहान हाय
जळला उस तुझा अन द्राक्ष गोडच न्हाय
तुझी तोंडपाटीलकी लई बास झाली
तुझ्या रानात न्हाय एकाबी झाडाचं पान पान पान
रानात न्हाय एकाबी झाडाचं पान ||६||
हिरो:
तुझ्या बापाचा जावई मी ग होईन
मिरवत येवून तुला घेवून मी जाईन
प्रिती तुझी माझ्यावर, मला माहीत हाय
हो माझी रानी, ऐक देवून कान कान कान
रानी ऐक देवून कान ||७||
(इथे हिरो हिरोईनच्या कानाजवळ जातो अन कानात बोलून तो त्याच्या चेहर्याच्या नकली दाढी मिशा काढून टाकतो. नंतर पुढे.........)
हिरोईन:
आत्ता ग बया, तुमी हाय काहो
जवळ नका येवू आसं, कुनी बघल नाहो
लग्नामधी घ्या माझं नावं
मी जशी तुमची सिता अन तुमी माझं राम राम राम
मी सिता अन तुमी माझं राम ||८||
हिरो:
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
ढिंग च्याक......ढिंग च्याक.......ढिंग च्याक......ढिंग...
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/१०/२०१०
दादा धोंडके.............
दादा धोंडके............. धन्य.
राव, तुम्मी बी सिल्वर ज्युबिली मारनार बगा........ आएच्यान सांगतो.......![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
दर्जाहीन रतीब चालू आहे!
दर्जाहीन रतीब चालू आहे!
हॅ हॅ हॅ दर्जा ठरविणारे
हॅ हॅ हॅ
दर्जा ठरविणारे तुम्ही विचारवंत दिसतात. अशा विचारवंतांना आम्ही फाट्यावर मारतो. म्हणजेच रतीब चालूच राहील.
कविता चुकीची आहे, जमली नाही, फालतू आहे असे म्हटले असते तर काही वाईट वाटले नसते. अन त्यावर मी प्रतिक्रियाही दिली नसती किंवा माझे चुकले असे मान्य केले असते. पण दर्जा ठरविण्याचा दर्जा तुम्हाला कोणी दिला?
तुर्तास तुम्ही तुमचे नाव सार्थ ठरविले आहे. रतीबाचा दर्जा तुमच्यावर bumrang प्रमाणे उलटला आहे.
येकदम वास्तववादी मनजे
येकदम वास्तववादी मनजे कर्र्या कुर्या पिक्च्रर मन्दी गानी फिट होन्यासारका हाय
जमल राव!!!!!!!!
(No subject)
अहो पाषाणभेद, तुम्ही जेंव्हा
अहो पाषाणभेद,![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुम्ही जेंव्हा तुमची एखादी साहित्यकृती पब्लिक फोरम वर टाकता तेंव्हाच त्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार तुम्ही स्वताहुन समस्त वाचकवर्गाला दिलेला असतो!
आणि जर प्रतिकुल प्रतिसाद पचत नसतील तर आपल्या कविता वहीतच ठेवा आणि गोग्गोड प्रतिसादाची हमी देणार्यांनाच दाखवा
जेंव्हा एखादीच कविता जमलेली नसते तेंव्हा तुम्ही सुचवलेले शब्द वापरणे संयुक्तिक ठरते... पण जेंव्हा नियमितपणे टुकार कविता पोस्ट केल्या जात असतील तर त्याला दर्जाहीन रतीब नाही तर काय म्हणणार?
आणि जाता जाता....
माझ्या नावावर शाब्दिक कोटी करण्याचा तुम्ही केलेला प्रयन्त तुमच्या कवितेइतकाच फालतू आहे.
हाहा बुमरँग
हाहा बुमरँग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आपल्याला आवडले बॉ हे गीत
आपल्याला आवडले बॉ हे गीत![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
...
...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो बुमरँगराव जावूद्या. तुमचा
अहो बुमरँगराव जावूद्या. तुमचा राग आलेला नाही.
>>> कविता चुकीची आहे, जमली नाही, फालतू आहे असे म्हटले असते तर काही वाईट वाटले नसते. अन त्यावर मी प्रतिक्रियाही दिली नसती किंवा माझे चुकले असे मान्य केले असते.
मी वरचे लिहीलेले तुम्ही वाचलेले दिसत नाही. कवितांना वाईटसाईट म्हटले असते तरी चालले असते. मी तेवढा सहनशील आहे. मला राग येत नाही. माझे पॉझीटीव्ह निगेटिव्ह गुण मला माहीत आहेत. अन ते मी मानतो. फक्त कविता/ गाणे (ते मग कोणाचेही असो) यांचा दर्जा ठरविण्याचा अधीकार केवळ एका व्यक्तिला नसतो.पुर्ण समूहाद्वारे ती प्रक्रीया आपोआप होत जाते.
ही कविता अन मागच्या कविता केवळ ग्राम्य भाषेत आहे म्हणून तुम्ही दर्जाहिन आहे असे म्हणता काय?
अहो, जर १०० कविता लिहील्या तर त्यातल्या १०च चांगल्या होवू शकतात हे मलाही मान्य आहे. जे आहे ते आहे हे मी मानतो. पण केवळ दर्जा हा शब्द वापरण्याला माझा आक्षेप आहे अन तो राहील.
याच दरम्यान माझे एक नाट्यगीत येवून गेले. त्याला श्री. निल्या यांनी अप्रतिम चाल लावलेली आहे. त्याची चाल त्यांनी स्वःताहोवून उत्स्पूर्तपणे लावलेली आहे.
ती येथे ऐका:
http://mimarathi.net/node/3756#comment-46575
http://www.misalpav.com/node/14678#comment-244350
मुळ तूनळीवरची साखळी ही आहे:
http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&feature
जर चांगला दर्जा हाच निकष असता तर हे घडले असते का? म्हणजे फक्त काही लोकांचेच गाणे कविता येवू शकतात इतरांच्या नाही असे तुम्हाला वाटते का? की मी केवळ लागोपाठ कविता लिहीतो म्हणून तुम्ही म्हणता आहात? (लक्षात घ्या माझा रतीब या शब्दावर आक्षेप मुळीच नाही. मी खरोखर एप्रिल पासून दर एकदोन दिवसाआड कविता लिहीत आहे. आता सुचतात तर लिहीतो अन टाकतो येथे काय करणार? अन मी प्रतिक्रियांचीही अपेक्षा ठेवत नाही.) असो. फारच विषयांतर झाले.
अवांतरः आता कदाचित माझ्या कविता फार येणार नाहीत. (कारण नंतर सांगतो. तुमचे कारण नाही पण १५ तारखेनंतर मला वेळच राहणार नाहीए.)
कमाल आहे बाई लोकांची, काही कस
कमाल आहे बाई लोकांची, काही कस आवडत कुणास ठाउक?
छान आहे कविता.
छान आहे कविता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पाभेदादा आवडले बरं का हे ही
पाभेदादा आवडले बरं का हे ही ...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
म्हणजे गाणेही आणि प्रतिसादही