गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग ५)

Submitted by निमिष_सोनार on 17 September, 2010 - 12:14

ते प्रसिद्ध संगितकार मन मोकळे करु लागले, "संगीत कसे बनवायचे हे मला समजेचना. अशी भावना मी आयुष्यात प्रथमच अनुभवतो आहे. जे काही मी आतापर्यंत बनवले ते मला आठवते आहे. पण मी जेव्हा एखादी नवी रचना करायला सुरुवात करतो आहे, तेव्हा माझ्या लक्षात आले की..." असे म्हणत ते कुठेतरी शून्यात हरवल्यासारखे वाटत होते, त्यांचे मन कोठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. हताश मनाने ते पुन्हा सांगू लागले, "ह्म्म, माझ्या लक्षात आले की, मला स्वर आठवत नाहीत.. सूर, लय, ताल, सगळे हरपले आहे... आ जगाचा तालच काहीतरी बिघडतो आहे. मी सन्यास घेतो आहे. मला काही सूचत नाही. त्यापेक्षा मी सैन्यात जाणे पसंत करीन..." असे म्हणून त्यांनी पत्रकाराला थप्पड मारली आणि ते संतापून निघून गेले.
प्रतिक्रीया अतिशय अनपेक्षीत अशी होती. बहुतेक संगितकारांचा हाच अनुभव होता.
राहुल हे सर्व डॅनियलशी बोलता बोलता टी.व्ही. वर बघत होता.
चित्रकार सुरेश संत यांची खंत सुद्धा अशीच काहीतरी होती. चित्र काढणेच त्यांना जमेना. चित्र काढायला कागद घेतला की मेंदू काही नवे रचनात्मक सुचवण्यापलीकडे गेल्या सारखा त्यांना वाटत होता. कुंचल्याने अक्षरशः वेडया वाकड्या रेघोट्या मारता येण्या पलिकडे त्यांना काही करता येत नव्हते. त्यांनी सगळे कागद भराभर फाडून टाकले. कूंचल्यांचे तुकडे केले.
काय ते चित्र काढायचे? काहीतरीच काय?
...अभिनय क्षेत्रांतले कलाकार अभिनय विसरले. अभिनया सारखी निरर्थक गोष्ट दुसरी कुठ्ली नाही असे त्यांना प्रकर्षाने जाणवत होते.
साहित्यिक लेखन कला विसरत चालले. टि.व्ही. वर ज्योतिषी वेगवेगळे तर्क लढवू लागले आणि एकमेकांशी सुद्धा लधू लागले. परिणाम हळू हळु जाणवायला लागला होता.
राजकारणात पक्षनेते एकमेकांवर शाब्दीक चिखलफेक करूलागले. नंतर पावसात बाहेर येवून एकमेकांवर खरोखरीचा चिखल फेकू लागले. एकमेकांना मारहाण करू लागले.
बर्‍याच लोकांनी आपापल्या धार्मिक स्थळांत जाऊन प्रार्थना सुरु केल्या. पण प्रार्थनेत मन रमेचना.
शनी प्रभावीत लोकांना वैराग्य घ्यावेसे वातू लागले, काही पाताळयंत्री डावपेच आखू लागले.
मंगळ प्रभावीत लोक शस्त्रे घेवून एकमेकांवर धावून गेले.
मानवातील कला हरपली होती. शुक्र ग्रहच नाहीसा झाला होता व कसा झाला ते एक गूढ, एक कोडे होते. पण तो झालेला होता हे खरे.
बुध, गोड वाणीचा ग्रह हरपला. लोकांचा संवादावरचा विश्वास उडाला.
या दिवसांत जी बालके जन्मली ती सगळी आश्चर्यकारक होती.
गुरू नव्हता. कुणी कुणाचे मार्गदर्शन घेईनासे झाले. आशावाद नाहीसा झाला. पुस्तके फेकली जावू लागली
काही दिवस गेले....
मुंग्यांची लय विसरलि गेली. पक्ष्यांचे थवे वेडेवाकडे उडू लागले. मधमाशा फुलांतून रस काढायला विसरल्या.
एव्हाना शास्त्रज्ञांचा अहवाल आला व तो टि.व्ही. वरून जाहीर व्हायला लागला. लोक आश्चर्यचकीत होतच होते. अवकाशातली ग्रहरचना बदलल्याचे टि.व्ही. वर जाहीर झाले. बहुतेक ठीकाणी लोक हींसक झाले होते. काही व्यक्तींवर कुंडलीतल्या सध्याच्या ग्रहस्थितिप्रमाणे होत होता...
एकमेकांचे हितशतत्रू असलेले देश, त्यांचे संरक्षणमंत्री यांच्या डोक्यात युद्धाच्या कल्पना साकारू लागल्या. त्या अंमलात आणल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली. काही देशांनी युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण होवू लागली.
सगळे बघून आत्मघातकी प्रवृत्ती वाढल्या.पुरुष स्त्री एकमेकांशी लढायला लागले. हॉटेलमधले, घरातले स्वयंपाकाचे पदार्थ कसेही वाढण्यात येवू लागले. त्यातली चव नष्ट झाली.
काहीतरी विचित्र घडत होते.
डॅन : "राहु तुला निघायला हवं"
राहुल : "काही तरी करायला हवे, लोकांना वाचवायला हवे, काय करता येईल..?"
डॅन : "राहु, वेडा आहेस का? आपल्याला उशीर झाला आहे. तू यात गुंतू नकोस, तू ग्लोबल व्हेरीएबल आहेस हे लक्षात ठेव. तुला आपल्या मुक्कामाला निघायला हवं..."
राहुल: "मी बघतो, पोहोचण्याचा प्रयत्न करतो...तिथपर्यंत!"
विशिष्ट चष्मा लावला तरच स्क्रीनवरचे दिसेल अशा प्रकारचा तो लॅपटॉप होता. म्हणजे ते ‍इतरांना दिसू शकत नसे.
राहुल समोर आता अव्हान होते. या सगळ्यातून वाचून "त्या" मुक्कामाला पोहोचण्याचे. तेथून सुरु होणार होता आणखी एक प्रवास..तो कारमध्ये बसला.
...त्याची कार रस्त्यावरून धावू लागली. रस्त्यावर अपघात होत होते. काही दिवसांपूर्वी जन्मलेली बालके दोन वर्षाच्या मुलांसारखी दिसत होती. आणि ती रस्त्यावर उतरून तोडफोड करू लागली. ती दिसायला अद्भूत होती. डोके वेगळेच होते. ते एक प्रकारे एलियन दिसत होते. म्हणजे माणसांची पुढची पिढी म्हणजेच एलियन आहेत?नवी उत्क्रांती? तेच तर उडत्या तबकड्यांद्वारे "आताच्या पृथ्वीवर येण्याचा प्रयत्न करत नसावेत? त्यांच्यात प्रचंड ताकत होती. ती बालके कार, मोटारसायकल आपल्या चार हातांनी उचलून फेकून देवू लागली. एका बालकाने राहुलची गाडी उचलली आणि आकाशात भिरकावली.....
-निमिष सोनार, पुणे

गुलमोहर: