मावळतीची निरोपाची किरणं
क्षणभर विश्रांतीसाठी विसावली पानाफुलांवर
जणू सांगत होती सगळ्यांना
प्रकाश देत नसू आम्ही पण रात्रभर जगण्याची उब नक्कीच देतो
अन फुलही त्या उबदार सहवासात
डोलून थकलेली दिवसा होती तिन्हीसांजेचा नखरा पाहत
कळ्यांचं कुजबुजणं वाढलं होतं एव्हाना
खट्याळ डोळ्यांनी एकमेकीकडे पाहत मंद हसत होत्या त्या
पक्षी रमले होते एकमेकांना निरोप देण्यात
अन दिसत होती घरट्याची ओढ अधीर पंखांच्या हालचालीत
चांदण्याची चालली होती लगबग शृंगाराची
चांदवाही नादमय संथ लयीत सरकत होता स्वतःच्याच नादात
रातराणी साज सावरत गंधाळली अलवार
मोगऱ्याची नशा भिनू लागली भोवतालच्या वातावरणात
निशेच्या गर्दनिळ्या आगमनाची चाहूल आली
तेवढ्यात सर्रकन सरकली डोळ्यासमोरून अस्मानी ओढणी
पाहून खळ्ळकन फुटला डोळ्यातला पारा
किरणांनी क्षणार्धात निरोप घेतला
फुलांनी चटकन माना टाकल्या
कळ्या एकदम चिडीचूप स्तब्ध झाल्या
पक्षांनी घट्ट मिटून घेतलं घरट्यात
धूसर धूसरच होत गेलं चांदणं
चांदवाही लपला कोणत्याश्या ढगाआड
बदलत गेलं ते सारं सारं.. थरथरलं वारं वारं..
डोळ्यांचं ठीके, मनाच्या दृष्टीचंही भिजलं पान कोरं कोरं
पूर्वीसारखा मावळतीचा रंग म्हणावा तसा अता खरंच भिडत नाही
आत्ताच जन्मलेल्या अनाथ स्वप्नाची शपथ.. मी खोटं बोलत नाही!
वाह.. शेवट तर अप्रतिम.
वाह..
शेवट तर अप्रतिम.
अप्रतिम.
अप्रतिम.
!!!!!!!!!
!!!!!!!!!
क्या बात है... जोशी बहरलेयत
क्या बात है... जोशी बहरलेयत एकदम !!!
अहा. क्या बात है.. !! गिरिश
अहा. क्या बात है.. !! गिरिश ला मोदक..
आत्ताच जन्मलेल्या अनाथ
आत्ताच जन्मलेल्या अनाथ स्वप्नाची शपथ - व्वा! सुरेख!
मनःपुर्वक आभार मित्रांनो!
मनःपुर्वक आभार मित्रांनो!
क्या बात है? पुढची कविता लवकर
क्या बात है? पुढची कविता लवकर येऊ देत..
माणिक, जबरी आहे ही
माणिक, जबरी आहे ही कविता
घाणेरड्या अर्थाच्या आणि अर्थहीन छंदबद्ध कवितांमधे थोडा दिलासा देणारा सुंदर मुक्तछंद. खूप खूप शुभेच्छा, लिहीत रहा.
छान!
छान!
भाऊ.... केवळ अप्रतिम
भाऊ.... केवळ अप्रतिम !
श्यामलीताईंशी १००% सहमत !
खूपच छान.... शब्दांची मांडणी
खूपच छान....
शब्दांची मांडणी एकदम छान आणि शेवट तर एकदम जबरदस्त.
खूप हळवी आहे कविता.
खूप खूप धन्यवाद मित्रांनो!
खूप खूप धन्यवाद मित्रांनो!
श्रीमंत.. तुमचं नाव वाचलं कि 'विस्फोट..' आठवते अन मनात परत रेंगाळतात त्या अप्रतिम ओळी तुमच्या! 
श्यामली.. फक्त प्रतिक्रियाच? काहीतरी छानसं वाचायला नाही देणार?
विशाल..भावा.. तू पण फक्त प्रतिक्रियाच देणार का रे? लिहा की राव एकदम गुलाबी काहीतरी!
झक्कास..... श्यामली ना
झक्कास..... श्यामली ना अनुमोदन... आजकाल येत असलेल्या भंगार कविता नि त्या वर चालणारा काथ्याकूट पाहून नकोसं झालं होतं इकडे येणं..... पण आज आलो नसतो तर या छान कवितेला मुकलो असतो...
अहा...... सुरेख !! अलवार
अहा...... सुरेख !!
अलवार कविता माणक्या........मजा आली
उत्तम, आवडली कविता.
उत्तम, आवडली कविता.
श्यामली, सहमत! सुरेख कविता!
श्यामली, सहमत! सुरेख कविता!
वा.. डोळ्यांचं ठीके .. सुंदर!
वा.. डोळ्यांचं ठीके .. सुंदर!
धन्यवाद दोस्त्स! अहा!... जया
धन्यवाद दोस्त्स!
अहा!... जया आणि मेघधारा... अरे किती दिवसांनी पहातोय मा. बो. वर तुम्हाला.
तुमच्याकडूनही फक्त प्रतिसादच? लिहित रहा.