सोलापूरच्या गप्पा

Submitted by admin on 5 May, 2008 - 22:50

सोलापूरातल्या मायबोलीकरांच्या गप्पा

प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, लांबोटी आहेच (मला कधीही तिथे खादडायला जायची संधी मिळालेली नाही). पण तिने टेंभुर्णीच्या अलिकडचे हॉटेल विचारलेय ना....

भिगवणच्या ष्ट्यांडावरचा वडापाव हाच नाश्त्याचा एकमेव आयटेम माहित आहे. >> काय आठवण काढली. अह्हाहा... ८-१० वर्षे तरी झाली असतील तो वदापाव खाउन पण अजुन आठवतोय Happy

भिगवणच्या जस्ट आधी उजव्या बाजुला एक आहे चांगले. बैंलाच्या जोडीचा पुतळा आहे. छान होती सव्ह्रीस. नाव विसरलो.

टेंभुर्णीच्या अलिकडे म्हणजे भिगवण किंवा इंदापूर. आता रस्ता इंदापूरच्या बाहेरुन जातो त्यामुळे भिगवण बेस्ट ऑप्शन आहे. सागर हॉटेल म्हणून काहितरी आहे, ते बरं वाटलं होतं.
भिगवणची मिसळपण मस्त होती.

सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!

आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984

SamajikUpakram2016.jpg

Namaskar solapurkar Mandali,

kharetar ya stabhala bharpur pratisadachi apeksha hoti !!!!

mala nakki ya var athvani sangalya avadtil

anand Ghatpande

नमस्कार, इकडे कोणी आहे का ?
रंगभवन भागात जर कामाचे ठिकाण असेल तर जवळपास १ आरके किंवा १ बिएचके रेन्टल फ्लॅट कोणत्या भागात मिळू शकेल ? कोणता भाग चांगला आहे, तसेच भाडे साधारण किती असू शकेल ?

महेश , तुम्हाला सात रस्ता , विजापुर रोड एरियामध्ये फ्लॅट / घर मिळुन जाईल , OLX / QUIKR वर बर्‍याच अ‍ॅड मिळतील , किंवा एखादा इस्टेट एजंट गाठा , कामाच्या ठिकाणचे लोक पण मदत करु शकतील. भाडे अंदाजे ५-६ असावे. पण पाणी येतं का बघुन घ्या. आधीच सोलापुरात पाण्याची बोंब आहे.

नमस्कार सोलापूरकर ,
मला लेझीम (सोलापुरी पद्धतीची) शिकायची इच्छा आहे. अर्थात प्रत्यक्ष तिथे जाणे शक्य नसल्याने कुणी online शिकवू शकेल का ते शोधतोय. आपल्याकडे काही माहिती असल्यास सांगाल का ?
धन्यवाद !