B.E. FINAL EXAM झाली. ती ची ही exam झाली होती. पण तो जरा tense च होता. त्याला एक पेपर फारच अवघड गेला होता. CAD/CAM हा पेपर तसा सगळ्यांनाच अवघड गेला होता. तो ने ती ला ते सांगितल तर ती
"नालायका तुझा पेपर राहाण हे अशक्य आहे..!! बघ तुला त्यात नक्की चांगले मार्क्स मिळतील मला विश्वास आहे..!!"
असं म्हणुन त्याला थोडा धीर देत होती.
"अरे ४० मिळाले तरी खुप आहेत रे..!! पण यार मी एक ठरवलं होतं की काहीही झाल तरी B.E. त mark list वर theory त ४० आकडा येऊन नाही द्यायचा..!! जाउ दे यार बघु येईलच काहीतरी चांगला आकडा..!!"
अन ती नक्की याला सांत्वनेची गरज आहे का? म्हणून स्वताशीच विचार करत होती. त्याच्या मते त्याला कुणाचीच गरज नव्हती कारण त्याच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे होती. त्याच्या या वाक्यावर ती फार वैतागायची. clg संपलं तसं दोघांचा संपर्क ती घरी असल्यामुळे फारसा होत नव्हता. पण रोजचे रोज sms चालुच होते.
"आता clg संपलं..!! आपण फार कमी भेटणार..!! job मुळे फार कमी वेळा आपलं बोलणं होईल. विसरणार नाहीस ना मला मग...?" दोघांच्या मनात हे एकच वाक्य एकाचवेळी..!!
अन दोघही "नाही विसरणार रे तुला..!!" म्हणत एकमेंकाना सांभाळून घ्यायचे.
२२ जुलै २००८ तो चा company त join होण्याचा दिवस.
आदल्या दिवशी दोघही फोनवर तासभर बोलत होते. ती त्याला
"job ला गेल्यावर फोन तर नको करु मला मग बघते तुझ्याकडे..!!"
असा दम भरत होती. अन तो ही भारावून गेला..!! ती च्या त्या जीव लावण्यामुळे..!! खरतर त्याला या कशाचीच सवय नव्हती. पण आता त्याला जीव लावायला त्याच्या आयुष्यात त्याची एकुलती एक मैत्रीण आली होती. देवावर त्याचा फारसा विश्वास नव्हता,पण ती च्या सहवासामुळे त्यालाही देवाचं अस्तित्व स्विकारावं असं वाटायचं..!! दोघंही आता आपापल्या personal life मधे busy झाले होते. तो चं job schedule पहिला एक महिना training असल्यामुळे म्हणावं इतक hectic नव्हतं. नव्या वातावरणात जुळवून घ्यायला तो थोडा वेळ घेत होता. ती चं ही clg routine व्यवस्थीत चालु होतं. परिक्षा तर मस्त दिली होती,त्यामुळे result तर मनासारखाच लागणार याची खात्री होतीच.. नेहमीप्रमाणे..!! या सगळ्यातुनही वेळ काढुन दोघं एकमेकाना फोन करायाचे. अन तो जुनियरलाही फोन करायचा. जुनियर ला मात्र त्याचं फोन घेणंही नकोसं वाटायचं. अन ते त्यालाही कळायचं ..!! पण तरीही तो फोन करायचा थांबला नव्हता.
१३ सप्टेंबर २००८.. तो चा result out होणार होता. cad/cam राहणार की निघणार याचंच tension तो ला सतावत होतं. cad/cam निघाला तर first-class नक्की होता. ११ वाजता result हातात आल्यावर तो चाटच पडला होता. शेवटच्या sem मधे त्याने ७० % score केला होता..!! अन aggregate ६५.२७%..!! फक्त ११ मार्क्स ने distinction हुकला होता... अन cad/cam मधे ४० नाही तर ५० चा score घेतला होता. B.E. MARK LIST वर orals सोडुन कुठेच ४० हा आकडा दिसत नव्हता..!! तो खुपच खुष होता. आयुष्यातलं आणखी एक स्वप्न पुर्ण झाल्याचं समाधान त्याच्या चेहर्यावर झळकत होतं. तो ने लगेच ती ला फोन करत ही आनंदाची गोष्ट कळवली.
ती ही ते ऐकुन सुखावली होती.. अन त्याच्या आणखी एका पुर्ण झालेल्या स्वप्नाची सा़क्षीदार होत होती. त्याच्या त्या आनंदात तितकीच सामील होत त्याला ती म्हणाली
"वेळ मिळेल तेव्हा आठवणीने थेऊरला जाऊन ये..!!"
"का..?" नेहमीच्याच style मधे त्याचा आडवं लावण्याचा प्रयत्न..!!
"मी म्हटल होतं त्याला, पोराला चांगल्या मार्काने पास कर त्याला घेऊन येइल तुझ्या दारी.. मला जमेल की नाही पण तु नक्की जाऊन ये बप्पाकडे..!!!!"
"कोण..? मी जाऊ..? एकटा..? शक्य नाही..!! आजवर कधीच स्वताहुन मी कुठल्याही मंदीरात गेलेलो नाही.. गेलो तर तुझ्याबरोबरच जाईन..!!" तो चा नेहमीप्रमणेचा आडमुठेपणा.
"कसं शक्य आहे ते..? तुला कुठे वेळ असतो..?" ती चा तितकाच संमजसपणाचा स्वर.
"गेलो तर तुझ्याबरोबरच जाईन नाहीतर जाणारच नाही.. बघ बाबा नवस तु केला होता मी नाही..!!माझा हट्ट समज नाहीतर दुसरं काही समज..!!"
"ठीक आहे रे जाऊ आपण..!!"
ती ही त्याच्या त्या हट्टापुढे अखेर नमली.
५ ऑक्टोबर २००८.. हा दिवस तो कधीच विसरणार नव्हता. हा दिवस तसं पाहिलं तर खुप आधी यायला हवा होता,पण तो च्याच अनाठायी हट्टापुढे तो जरा लांबला होता. आजही तो ने जुनियरला फोन केला होता. जुनियर त्याच्या सततच्या येणार्या फोन्स मुळे खुपच वैतागली होती.आज तर तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. तो ला तिनं असं काही झिडकारलं होतं की आपण का आलो इथं याचाच त्याला प्रश्न पडला होता..!! ती च ते निष्ठुर बोलणं तो च्या जिव्हारी लागलं होतं. बस्स आता कुठल्याच मुलीला फोन करणार नाही..! कुणालाच माझ्या जवळ येऊ देणार नाही.. कधीच नाही..!! रागाच्या त्या आवेषात तो ने जुनियर ला लगेच तसा sms केला. तो त्यावेळी इतका भावनाविवश झाला होता की आपल्या mbl च्या recently sent item मधे शेवटाचा sms कोणाला पाठवला होता ते ही त्यान पाहिलं नाही. अन चुकुन तो sms ती ला send झाला. तो sms बघुन ती खुपच disturb झाली होती. ती ला राहवल नाही. ती न लगेचच तो ला फोन केला. रात्रीचे ११.३०. अन कोणाचा फोन..? तो नंबर बघुन तो ला वाटलं असाच केला असेन हिने फोन..!! असं मनात पुट्पुटुन त्याने तो फोन कट केला. ती अजुनच विचलीत...!! पुन्हा फोन लावला!! कट!! दोन तीन वेळा फोन येऊन गेल्यावर काहीतरी serious असेल म्हणून तो ने ती चा फोन एकदाचा उचलला.
"कोण समजतोस रे तु स्वताला..? तुला जेव्हा हवं तेव्हा एखाद्याला जवळ करतोस अन वाटलं तेव्हा झिडकारतोस.. काय msg पाठवलायस..? "
पलीकडुन एकदम आर्त स्वर. घरात सगळेच झोपले असल्याने तो ला काहीच बोलता आलं नाही.
"उद्या lunch break मधे १ वाजता फोन कर ...!! "
एव्हढच बोलुन तो ने फोन ठेवला.दोघंही उद्याच्या १ वाजण्याची आतुरतेने वाट पाहत होते. दोघांचीही रात्र कशीबशी विचार करत संपली. तो आपल्या कामात busy असल्याने ती च्या फोन बद्दल काहीच लक्षात नव्हतं. दुपारी सव्वाला कामातुन थोडी उसंत मिळाल्यावर तो ला ती ची प्रकर्षाने आठवण येऊ लागली पण ती ने अजुनही तो ला फोन केला नव्हता..!! फोनवरच त्याची नजर खिळली होती. शेवटी दुपारी १.३५ ला ती चा फोन आला..!!
"ठीक आहे तुला असच वाटतं तर.. मी ही तुला फोन करुन त्रास नाही देणार..!! बोल कशाला करायला लावला होतास फोन..?"
ती चा तक्रारयुक्त स्वर..!!
तो ने ती च सगळ म्हणन ऐकुन घ्यायच्या आधीच
"तो msg मी तुला पाठवला नव्हता..!! चुकुन गेला तो तुला..!! पण हे खरयं की मी नाही करणार कुठल्याच मुलीला फोन.. कधीच नाही..!! मी फक्त त्रास देऊ शकतो एखाद्याला.. म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय.. माझी मी स्वताला दिलेली ही commitment आहे..!! अन ती कोणीच नाही तोडु शकत..!! "
असं म्हणत तिची समजुत घालत होता. पण आज तो च्या बोलण्यात काहीच आक्रमकता दिसत नव्हती. फरच down वाटत होता. पण तरीही तो आपला हेकेखोरपणा काही सोडायला तयार नव्हता. त्याला खरी गरज होती ती कुणाच्या तरी सांत्वनाची..!! पण "मला कुणाचीच गरज नाही.. मी माझा समर्थ आहे..कारण माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत.. मला पटणारी..!! " या त्याच्या igo मुळे तो आणखीनच स्वताला त्रासवत होता. अन ती ला तर त्याहुन जास्त..!! शेवटी कसबस त्याचं ते बोलण ऐकुन
"ok तु नको करुस मला फोन, पण मी तर करु शकते ना तुला..? तुझी एक चांगली मैत्रीण म्हणुन..!! " असं म्हणत तिनं त्याला सावरुन घेतलं.
पहिल्यांदाच त्याला कुणाच्या तरी बोलण्याचा फरक पडत होता.
"तुला त्रास द्यायचा नव्हता रे..!! पण मी आता स्वताला शब्द दिलाय रे..!! अन तो बदलण खुप अवघड आहे रे..!! ठीक आहे पण मी तुला sms नक्की करत जाईन..!! माझी एकुलती एक मैत्रीण म्हणून..!! "
तो चा स्वताभवती ती अभेद्य चौकट उभारण्याच्या फुटकळ प्रयत्नांना आत्ताच कुठे सुरुंग लावायला ती ने सुरुवात केली होती. झालं दोघही आता समाधानी होते. अन पुन्हा पहिल्यासारखच त्यांच daily routine चालु झालं. आता तो त्याच्या project मधे involve होत होता. सुरवातीला त्याला इथं settle व्हायला खुप त्रास झाला. त्याच्याबद्दल बर्याच complaints ही वर पर्यंत जात होत्या. पण एव्हढं सगळ होऊन सुध्दा तो चिकाटीने काम करत होता. दरम्यान त्यान त्याचं आणखी एक स्वप्न पुर्ण केलं होतं..!! clg संपलयापासुन त्यान त्याची bike सोडली होती. आता चालावायची ती स्वताच्या पैशाने घेतलेलीच गाडी..!! अन तीही त्याची dream bike ROYAL ENFIELD 350 CC BULLET ELECTRA..!! तब्बल पाच महिने पी एम. टी चे धक्के खाल्ल्यावर त्यानं ते त्याच स्वप्न पुर्ण केलं होतं. त्याचं प्रत्येक स्वप्न तो एक ध्यास म्हणुनच पुर्ण करत होता. अन ती तो च्या प्रत्येक स्वप्नांची साक्षीदार होत चांगल्या मार्कांचे ओझे घेऊन बेरोजगारीशी एकहाती लढत होती. आतापर्यंत ती ने जवळ्पास clg ला आलेल्या प्रत्येक company ची apti crack करत H.R. ROUND पर्यंत मजल मारली होती. पण प्रत्येकवेळी तिच्या पदरी निराशाच येत होती. त्या अपयशापेक्षा ती ला लोकांकडुन मिळणार्या सहनभुतीचा अन नकोश्या सल्ल्यांचा , interview tips चा अन त्या चांगल्या मार्कांच्या ओझ्याचाच जास्त त्रास होत होता. हे सगळ तो निरखुन पाहत होता. तटस्थपणे..!! ती च्या ह्या problem वर काहीतरी solution काढलच पाहिजे. अन असच काहीतरी तो ठरवत होता. त्यानं ती ला कधीच तिच्या अपयशाबद्दल सांत्वना दिली नाही. कारण त्याला माहित होतं ती ला सात्वंनापेक्षा inspiration ची गरज होती, पण कुणाकडुन उसनी घेतलेली नाही तर स्वताच्या आतुन आलेली अंतप्रेरणा..!! ती जागवण्यासाठी तो ती ला मुद्दामच desperate करायचा. ती प्रत्येक interview ला जाताना तो चा एक मस्त inspiration वाला sms ती च्या mbl inbox मधे असायचा. अन interview झाल्यावर कारल्याहुन कडु शब्दातल त्याच ते desperate करणारं बोलण.
"काय मग आज कुठं दिला interview..? काय यार लावलयस तु..? रोज सकाळी मस्त तयार होऊन जायचं अन संध्याकाळी तोच टवटवीत चेहरा पाडुन यायचं..!! यार तुला इतके interview face करायला मिळतायत.. अन आम्हाला आमचा basic criteria च नसल्याने बर्याच कंपन्या सोडाव्या लागल्या..!! "
असच काहीतरी ती रडवेला करणार तो बोलायचा..!! अन ती निमुटपणे सर्व काही ऐकुन घ्यायची. त्याच्या बोलण्यावर खुप रडायची. अन तो फक्त म्हणायचा "प्रयत्नांती परमेश्वर..!! बस प्रयत्न करत रहा मनापासुन..!! मी नाही तुला कुठलीच सहानभुती देणार कारण तुला ती द्यायला खुप जण तुझ्या कृष्णाने तुझ्या आयुष्यात पाठवलेत.. अन मला त्या अश्रुंमागची हजारों कारणं शोधायला..!!"
त्याच हे विचित्र वागण ती ला पटायचं म्हणुनच तर ती त्याला आता आपला true friend मानायला लागली होती. हळुहळु तो आता आपल्य project वर रुळत होता. पुर्वी जो project त्याचे ३ seniors पहायचे आता तिथं तो एकटाच सगळं पाहत होता. project execution, planning, estimation,material management,billing,measurement, on site R&D, vendor development,installation , commissioning, client feedback ही सगळीच कामं तो मोठ्या शिताफीने करत होता. मागच्या ३ महिन्यात त्याची झालेली ती negative image तो हळुहळु पुसत होता. त्याचीच पावती म्हणून company च्या first quarter मधे तो च नाव सगळेच best performer म्हणून घेत होते. पण सुरवातीच्या negative reporting मुळे त्याला third best performer म्हणून समाधान मानाव लागल होत. recession असुन सुद्धा तो ने तिथं चांगलाच जम बसवला होता. तो एकटाच २.७५ करोड चा project handle करत होता. त्याच्यासाठी त्याचं caliber दाखवण्याचीच ही संधी होती. इथं तो त्याचं ते caliber expose करत होता अन ती तिथं बेरोजगाराशी लढत होती. recession मुळे ती ला म्हणावी तशी संधी मिळत नव्हती. तो हे सर्व पाहत होता. तीची चाललेली तडफड पाहुन त्याला खुप वाईट वाटायचं. आपण काहीतरी करायलाच पाहिजे, अस सारखच वाटायचं. पण अस वाटुनही काहीच होत नव्हतं. तो ची अंतप्रेरणा जागवण्यात त्याला म्हणाव तितक यश येत नव्हतं. त्याच कारण म्हणजे ती न तिच्याभवती बनवलेली ती अभेद्य चौकट..!! तो तस तिला बोलुनही दाखवायचा. अन ती प्रत्येक वेळी
"मला life भरभरुन जगायला आवडत..!! कुठल्याही चौकटीशिवाय..!! अन ती मी जगते up to max limit..!!"
असं म्हणत सारवा सारव करायची. ती च्या या वाक्यावर तो खुप हसायचा अन म्हणायचा
"infinitely long cylinder माहिती आहे का रे तुला..? त्याच्या height ला कुठलच limit नसतं.. पण त्याच्या width च काय..? तुझंही तसच आहे रे..!! तुझ उभ्या चौकटतीतल जगणं..!! तुला ती उंचीची चौकट नाही म्हणत..!! त्या आडव्या चौकटच्या बाहेर येऊन बघ..!!life up to max खरं तिथ मिळेल रे तुला.. त्या उभ्या चौकटीत नाही..!!"
अन सगळं कळुनही ती त्याला फक्त म्हणायची "ऐ आडवी चौकट..!!"
अन मग तो ही कधीच ती चौकट तोडायचा प्रयत्न नाही करायचा..!!!
बघता बघता दोघांच्या मैत्रीला आता वर्ष होत आल होतं..!! पण त्यांच्या बोलण्यावरुण ते दोघंही बालपणापासुन एकमेंकाचे मित्र असावेत असच काही ती च्या सर्व मैत्रीणींना वाटायचं..!!सततच्या येणार्या अपयशापेक्षा ती ला तिच्यासाठी येणार्या लोकांच्या सहनभुतीचा खुप ताप व्हायचा..!!
तो ला सतत ती ला भेटुन inspire करावस वाटायचं. पण ती तो ला भेटायचं टाळायची..!! त्या चौकटीच्या आत रहाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नच ती करायची. त्यामुळे दोघांच्यातही खुप वाद व्हायचे.
असच एकदा तो च्या एका निष्फळ प्रयत्नावरुन दोघांच्यात खुप भांडण झालं. भांडणाच्या शेवटी तो तिला सहज बोलता बोलता ती चौकट कोण तोडु शकतो हे सांगत होता.
"तु मला ती चौकट कधीच तोडु नाही देणार..!! का माहिती आहे..? कारण ती तोडण्याचा हक्क तु फक्त एका माणसाला दिलाय..!! अन ते फक्त त्यालाच जमु शकतं..!! तो म्हणजे तुझा life partner..!!"
ती ही त्याच्या बोलण्यात हो ला हो मिळवत होती. तो बोलतच होता, ती ऐकत आहे का नाही याची तमा न बाळगता..!!
"तुझा life partner कसा असावा ना या बद्दल मी तुला सांगतो.. बघ तुला पटतय का..? तो प्रत्येक गोष्टीत तुझ्या पप्पांची बरोबरी करणारा असायला पाहिजे..!! अन तुही तुझ्या नकळत आपल्या life partner ची तुलना तुझ्या पप्पांशी करतेस.. हा.. पण हे सर्व तुझ्याबाजुने..!! माझं मत म्हणशील तर तु ना mechanical engineer चं बघं..!! अॅ.. मी पण mechanical engineer आहे म्हणून असं म्हणतोय अस नाही रे..!! पण प्रत्येक mechanical engineer self made, self contend असतो..!! एक वेगळीच आग असते त्यांच्यात.. वेगळाच spark..!! RHTDM पाहिलास ना..? मग तुला जास्त काही सांगायची गरज नाही..!! पण मला असं वाटत याचं कारण फार वेगळ आहे तुलाही पटेल..!! mechanical म्हणजे definitely male.. !! no females in our branch..!! बस्स सगळेच साले भुक्कड..!! पण आतुन फार हळवे..!! अन कुणाची तरी वाट पाहणारे..!! अन तुलाही असच कोणीतरी पाहिजे. स्वतापेक्षाही जास्त जीव लावणारा. अरे आम्हाला फक्त कुणीतरी जीव लावणारं पाहिजे असतं..!! मग तिच्यासाठी आपला जीव ओवाळुन टाकण्याची सुध्दा तयारी असते रे..!! नेहमी मला काय वाटतं यापेक्षा माझ्या partner ला काय वाटतं याचाच ते जास्त विचार करतात..!! कारण ते फक्त आपल्या terms वर life जगत असतात.. अन फक्त आपल्या partner साठी ते बदलण्याचीही त्यांची तयारी असते..!! अगदी हसत हसत..!! पप्पांना सांग माझ्यासाठी mechanical engineer च बघा..!!"
त्याची ही वायफळ बडबड ती मात्र तल्लीन होऊन ऐकत होती. शेवटी कसबस त्यांच भांडण आटोपत होत. तो ने आपल्या mobile चे incoming calls पाहिले..!! ती तब्बल दोन तास तो शी फोन वर बोलत होती. आपल्या त्या महत्वकांक्षी commitment मुळे.. "मी कुठल्याच मुलीला फोन करणार नाही.. कधीच नाही..!!" ही बोच तो ला फरच सलत होती. आपण कुठतरी चुकलोय अस त्याला पहिल्यांदा वाटत होतं.पण ती सगळच सांभाळुन घेत होती आपल्या मुळच्या "संमजसणामुळे"..!!
एप्रिल महिना जवळ येत होता.. अन तो ला त्याचा मागचा birth-day आठवत होता. किती विचित्र वागला होता ती शी तो..!! त्याची काहीही करुन भरपाई करायची असाच काहीसा तो चा plan होता. ती चा फोन आल्यावर त्याने ती ला तिन तो साठी केलेल्या नवसाची.. थेऊरच्या चिंतामणीला जाण्याची आठवण करुन दिली अन तो चा जवळ येणार्या birth-day ची ही..!! पण ती काही केल्या तो बरोबर वाटत असुनही जायला तयार नव्हती. पण आपल्या birth-day gift च्या नावाखाली तो नं तिला कसबस तयार केलं. तो च्या project चं आता काम थोड थंडावलेल होतं. पण site-in-charge असले कारणाने तो ला रविवार शिवाय सुट्टी मिळणं तस खुपच अवघड होतं. कशीबशी त्यान रविवारी सुट्टी मिळवण्याची तजवीज केली.
रविवार ५ एप्रिल २००८..!!
ती पहिल्यांदाच तो बरं कुठ बाहेर जाणार होती..!! एकटीच..!! तो चा हट्ट म्हणून..!!
तो त्याची intense-desire (आपली बुलेट) घेऊन ती ला भेटायला मोठ्या ऐटीत निघाला. दोघांनीही चिंतामणीच व्यवस्थीत दर्शन घेतल. दर्शन झालं. आता ती ला परत होस्टेलवर सोडायच होतं. पण तो ला ती अजुन थोडावेळ आपल्या बरोबर असावी असच वाटत होतं. तस तो तिला म्हटलाही. अन चांदणी चौकात जाऊ म्हणून गळ घालत होता.अन ती त्याला नको म्हणत होती. पण तो ऐकेल तर शप्पथं..!! गाडी सरळ ८० च्या स्पीड वर घेत fly-over अवघ्या १० मिनिटातच त्याने क्रॉस केला. ती चा काहीच ईलाज नव्हता. अन तो आपल्याच धुंदीत..!! त्याच्या या असल्या अंतरंग वागण्यामुळे ती ला तो आपल्यापासुन दुर जाईल याचीच भिती वाटायची. आणी म्हणुनच ती त्याला एका चौकटीत बांधायचा प्रयत्न करायची. good friend, best friend या चौकटीही आता तो साठी अपुर्या पडु लागल्या होत्या.तिन तो साठी बनवलेल्या प्रत्येक चौकटीला तो शिताफीन तोडत होता.अवघ्या २५ मिनिटात दोघांनीही चांदणी चौक गाठला होता. तिथल्या प्रत्येक होटेलची खासियत तो तिला मोठ्या कौतुकाने सांगत होता. जुनियर ला जिथ तो ने propose केला होता ते "निवांत" ही दाखवत होता. अन जुनियर ला इथ कस आणल होतं त्याचीही स्टोरी ही सांगत होता. तो एकटाच बडबडत होता. त्या नादात त्याने पौड गावाच्याही पुढे मजल मारली होती. कसं काय पण तो च लक्ष गाडीच्या मीटर कडे गेलं. तब्बल १०० किमीचा टप्पा दोघांनीही काहीच न खाता गाठला होता. अन त्याचाच परिणाम म्हणुन ती ला चक्कर येऊ लागली होती. तो न लगेच गाडी वळवली अन पुन्हा ८० च्या स्पीड ने निवांत गाठलं. पण आज ७ एप्रिल नव्हता. तो तिला इथल्या सगळ्या आठवणी सांगत होता. त्या दिवशी दोघं बसलेली जागा, south Africa आणी Bangladesh ची world cup मधली match, milk shake. Chinese.. सगळ जसंच्या तसं तो च्या डोळ्यांसमोर तराळत होतं. पण त्यान लगेच स्वताला आवरल अन ती कडे मागच्या birth-day च्या वेळेसच्या वागण्याची माफी मागितली. ती ला मात्र याच्या इतकं लक्षात राहु शकत म्हणुन कुतुहुल वाटत होतं. तो तिला आपल्या job tension बद्दलही बोलत होता पण बेतानं..!! पण मी सगळ tension handle करेन..!! निदान एका वर्षा साठी तरी..!! कोणाला तरी दिलेली commitment म्हणुन..!! त्याच्या चेहर्यावरचा तो निर्भेळ आनंद पाहुन ती पुर्ण blank झाली होती.
"आता ह्याच्यासाठी कुठली चौकट बनवायची..?" याचच ती ला tension आलं होतं.
अन याच दरम्यान ती job साठी जंगजंग पछाडत होती. पण कुठेच यश मिळत नव्हतं. पण बिचारी सगळच निमुटपणे सहन करत होती. तो ला हे सहन होत नव्हतं. ती ला फोन करावं असच त्याला वाटायचं..!! पण ती ला सहानुभुतीची गरज नाही हे त्याला माहीत होतं. पण ती च्या जास्तीत जास्त जवळ जाऊन धीर देण तेही ती ला ते जवळ येणं म्हणजे सहाननभुती दाखवण्यासारख न वाटता, हे खरोखरच अवघड होतं. पण त्यानं तेही करुन दाखवलं. job tension च्या नावाखाली "मला कुणाच्या तरी support ची गरज आहे" अशीच जाणीव ती ला करुन देऊन त्यान आपला शब्द मोडण्याचं समर्थण केलं. त्यान ती ला फोन केला. स्वताला दिलेला शब्द मोडला. फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणींसाठी..!! पण त्याचा तो एक जाणीवपुर्वक प्रयत्न होता ती भोवतालची ती अभेद्य चौकट तोडायचा..!! आता सगळच पुर्ववत चालु झालं होतं. ती ची B.E. final exam ही आता संपली होती. ती घरी जायच्या आधी दोघही मनोसोक्त बोलत होते.
"आता नाही एव्हढं बोलण होणार पहिल्यांसारख..!! तु माझी आयुष्यभराची मैत्रीण नाही रे राहु शकत..!!"
हे वाक्य तसं तिन या आधीही त्याच्याकडुन ऐकलं होतं. तेव्हा ती तो वर जाम उखडली होती.
"तुला हे आधी नव्हतं का रे माहित.. एक मुलगा अन मुलगी कधीच आयुष्यभर मित्र मैत्रीण म्हणुन नाही राहु शकत..!! मैत्री करायच्या आधी नाही कधी असं वाटल तुला..?"
असच काहीसं तेव्हा तिन तो ला झापलं होतं. पण आज ती ला तो च्या त्या बोलण्यातली बोच समजु लागली होती. किती सरळ बोलायचा तो. पण ती ला व्यक्त व्हायला कधी जमायचच नाही. पण तो ला ती च्या मौन रहाण्यातुनही बरच काही उमजायच. पण ती नं व्यक्त व्हावं म्हणुन तो जाणुन बुजुन न कळल्यासारख वागायचा. अन ती "तुला सगळचं कसं रे सांगायला लागतं रे..!!" म्हणुन तो ची फिरकी घ्यायची.
तो आता companyत बर्यापैकी settle झाला होता. company चा सगळ्यात critical project तो ने व्यवस्थीत handle केल्यामुळे तो आता पुढच्या मोठ्या project साठी नवीन site वर जाणार होता. खुप खुष होता तो. त्याच्या hard work अन dedication ची पावती म्हणुन तो या मोठ्या project कडे पाहत होता. पण तो ला याही पेक्षा काहीतरी मोठं मिळणार होतं. नवीन project वर त्यान २ आठवड्यातच छान पकड मिळवली होती. त्याचं ते skill पाहुन senior project manager आणी branch head दोघांनी त्याला नवीन service manager म्हणुन पुण्यासाठीच offer दिली होती. वर्षभर केलेल्या कष्टाची यापेक्षा कुठली मोठी पावती मिळणार होती..? पुणे branch चा service manager..!! ते ही वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी..!! अतिशय खराब academics असुनसुध्दा..!! त्याच्या आनंदाला तर आता पारावर उरला नव्हता..!! आता उद्यापासुन office बाहेर ford fusion (branch head ची, वय ४९ वर्षे,), santro (senior project manager ची, वय ५६ वर्षे ) या दोन गाड्यांबरोबर royal enfield bullet 350 cc (नवीन service manager ची.. वय २३ वर्षे..!!) मोठ्या ऐटीत लागणार होती. सगळ्यात आधी ही बातमी तो ने ती ला कळवली होती. अन त्याच वेळीस ती त्याच्या current project building समोरुन कुठल्याश्या company त interview देऊन परत होस्टेलला चालली होती, त्या दोघांच्या common friend बरोबर.ती खबर ऐकुन ती ही खुप सुखावली होती. त्याचा आनंद आपला म्हणुनच ती celebrate करत होती. आपलं सगळ दुख घेऊन..!! तो पासुन लपवुन..!! recession खरच खुप लांबल होतं...!! त्याचाच ती ला फटका बसत होता. अन तो ला आपल्या आनंदातही ती च ते दुख अगदी ठळक पणे दिसत होतं. गेली वर्षभर ती न तब्बल १२ हुन अधिक interview देऊनही ती ला नशीब काही साथ देत नव्हतं. यशाच्या त्या शिखराहुन त्याला तिला समजावण खुपच अवघड जात होतं. आपल यश ती ला त्रास देणारं नसावं असच त्याला मनोमन वाटायचं. पण तो आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीला खुप चांगल ओळखत होता..!! आपलं यश ती ला कधीच खुपणार नाही याचा तो ला ती पेक्षा ही जास्त विश्वास होता. त्याच ते यश ती आपलच मानुन त्यात सामील होत होती.
४ august २००९ तो आपल्या मुबंई branch ला पुण्यातला charge घेण्यासाठी जाणार होता. आदल्या दिवशी ती ने तो ला दोन blank msg पाठवले होते. त्याला हे खुपच अनपेक्षित होतं. " ती ची अवस्था फारच अनाकलनीय अशीच झालीय की ती न मला blank msg करावेत. "ती घरी असल्याने फोन वर बोलण शक्य नव्हतं..!! आणी नेमकं त्याच दिवशी तो च्या घरी एक छोटेखाणी कर्यक्रम असल्याने ती च्या त्या blank msg reply करायला त्याला थोडावेळ लागला. ती न लगेच त्या blank msg ला reply करत तो ला झापलं.
"काही तरी बोलायच होतं.. पण म्हटल जाऊ दे..!! वाटलं माझ्या मित्राने मला इतकच ओळखल का..? I am so depressed ..!! माझ्या शिक्षणाचा काय उपयोग जर मी एक job मिळवु शकत नाही तर..!! डोक्याचा भुगा झालाय विचार करुन. माझा स्वतावरचा विश्वास कमी व्हायला लागलाय..!! मला वाटल तुला एकदा तरी कळेल.. पण नाही.. म्हणुन ते blank msg केले होते..!! "
तिच्या या msg ला तो ने मुद्दामच थोडा अंतरंग अन तिला अनपेक्षीत असाच reply पाठवला..
"come on dear.. you are a mature girl now.. you can handle this situation very well.. त्यात एव्हढ् blank होण्यासारख काय आहे..? "
त्याचा तो अभद्र reply पाहुन ती ला वाटल याला काहीच फरक नाही पडत. पण तस नव्हतं तो ला त्याचा खुप फरक पडत होता. तसे ती ला आता बरेच मित्र मिळालेले होते. प्रत्येक जण वेगळा..!! अन त्या सर्वांमधे हा नमुना..!! ती च्या मैत्रीच्या अंगणात तो सारखे कैक तारे चमकत होते, अन त्याचवेळेस आपल्या तो कडे मात्र जिवाभावाची त्याच्या आयुष्यातली एकुलती एक मैत्रीण त्याच्या मैत्रीच ते सुनं आभाळ आपल्या अस्तित्वामुळे उजळवुन टाकत होती,अन मग त्याला फरक पडणार नाही अस कसं होईल..? पण त्याला इतर तार्यांसारख राहताच येत नव्हतं. आपली ती originality जपताना तो ती ला कमीत कमी त्रास होईल याची नेहमीच काळजी घ्यायचा. ज्याचा जन्म फक्त इतरांना त्रास द्यायलाच झाला होता तो त्या व्यतिरिक्त तरी काय करणार होता म्हणा..? पण प्रत्येक वेळी ती तो ला सांभाळुन घ्यायची, आपल्या मुळच्याच संमजसपणामुळे..!! पण खरं तर ती या संमजसपणाला कंटाळाली होती..!! अन हे सर्व तो ला माहीत होतं. पण इतका प्रयत्न करुनही ती च्या आत दडलेला तो न्युनगंड बाहेर काढुन त्याला ठेचणं तो ला काही केल्या जमत नव्हतं..!! आता त्याच्याकडे शेवटचा पर्याय उरला होता. ती भवतीची ती महत्वकांक्षी चौकट तोडण्याचा..!! पण तो फार सावध होता, कदाचित त्यामुळे तो ची एकुलती एक मैत्रीण तो पासुन कायमची दुरावण्याची शक्यता होती.फार विचारांती तो न हा धाडसी निर्यण घेतला होता होणार्या सर्व परिणामांची जाणीव असुनही..!! service manager होऊन तो ला आता महिना होत आला होता. तो चा pick-up ही चांगला होता. पण तो समाधानी नव्हता..!!
१६ august २००९ ती चा आज B.E. चा RESULT लागणार होता. पण ती घरी होती.
result छान लागला होता. ती च्या आधीच तो ला तिचा result आपल्या network through कळाला होता..!! तो जाम खूष होता..!! आपली एकुलती एक मैत्रीण college topper झाली होती. या आनंदात त्याने आपल्या सार्या office staff ला पेढे वाटले होते. ती चा आनंद तर गगनात मावत नव्हता. सततच्या येणार्या नोकरी शोधण्याच्या अपयशात हे सुख नक्कीच ती ला सुखावत होतं. सगळ दुख ती विसरली होती. सगळ्यात आधी ती न तो ला हे कळवल अन मी उद्या पुण्यात येणार आहे असही..!! तो न त्याचा उद्याचा सगळा plan reshuffle केला. मुद्दामच आपल्या college जवळच्या आपल्या client असलेल्या software company च्या facility manager बरोबर tender आणी billing संदर्भातली meeting ठेवली. तशी meeting दीड -दोन तासातच उरकायला हवी होती,पण ती लांबली. ती ला त्याच दिवषी संध्याकाळी परत घरी जायच होतं. पन तो ने मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस मी clg च्या जवळ्च meeting मधे आहे अस म्हणत ती ला गळ घातली होती.३.३० झाले तरी तो चा पत्ता नव्हता. ती अन त्या दोघांचा common friend जाम वैतागले होते, अन भरीस भर म्हणुन पावसाने ही आगीत तेल ओतल होतं. कसाबसा पावसात भिजत आपली intense desire (bullet) घेत तो ४.०५ ला ते दोघ थांबलेल्या त्या होटेलात पोहचला. सगळ्या शिव्या मोठ्या निर्लज्ज पणे ऐकुन तो ने "आजच जाणं गरजेच आहे कारे ..?" म्हणत ती ला जाउ नकोस अस indirectly सांगितल. पण "आई-पप्पांनी लगेच यायला सांगितलय , मगाच पासुन ४ फोन झालेत स्वारगेट ला पोहचलीस का म्हणुन." असं म्हणत तिनं जानं किती गरजेचं आहे हेच त्याला पतवुन दिलं. त्यान ती चा result अगदी निरखुन पाहिला."११२८/१५०० first-class with distinction. 75.23% माझा guess फक्त ३ % ने चुकला..!! ठीक आहे याचा अर्थ ट्रीट मला द्यावी लागणार.. आठवतय का तसं आपल ठरलं होतं..!! " त्याची ती sharp memory ती ला चांगलीच ठाऊक होती. त्याच ती ला फार कौतुक वाटायचं. अन तो मात्र प्रत्येक गोष्टीत आपलच घोडं पुढ दामटावयाच म्हणुन "माझी memory खुप strong आहे..कुणीच तिला challenge करु शकत नाही..!!" असं म्हणत तिला खिजवायचा. ५ वाजले होते तरी पावसाचा जोर काही थांबत नव्हता. ती ला खुपच उशीर झाला होता. तो ने मी सोडतो तुला स्वारगेटला म्हणत तिला आपल्या intense desire वर बसायला सांगितलं. दोघही त्या common friend चा निरोप घेत भर पावसात निघाले. स्वारगेटला लगेचच तिला कराडची गाडी मिळाली. त्यात ती ला त्यानं बसवल खरं पण तो चा पाय काही केल्या तिथुन निघत नव्हता. त्याला पहिल्यांदाच track change करणं अवघड जात होतं. अन तिलाही हे सगळ जाणवत होतं. खरतर माझ्याकडे इतका चांगला मित्र आहे याची जाणीव तिला सुखावत होती.पण तो चे डोळे आज खुपच गहिर्या विचारात गुंतले होते.त्याला त्याचाच त्रास होत होता. "आज जशी ही मला सोडुन चालली आहे तशीच कधीतरी कायमची जाणार आहे,पुन्हा कधीच न परतण्यासाठी, अन मी तिला नाही थांबवु शकणार..!! मी जे करणार आहे त्यामुळे..!! पण माझा स्वतावर विश्वास आहे.. ती जेव्हा माझ्या आयुष्यातुन जाईल तेव्हा मी तिच्या अगोदरच्या त्या दोन मित्रांसारखाच निघालो असं ती नक्कीच म्हणणार नाही. कारण मी तिचा true friend आहे. अन तिच्यासाठी माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी मी काहीही करु शकतो.अगदी मनापासुन. तिच्या इतकच pure राहुन. पण कदाचित तिला हे सार कळण्यापलिकडे असेल..!" तिचं आजच जाणं अन तिच "तेव्हाच" जाण हेच जणु तो च्या डोळ्यासमोर तराळत होतं. अन त्याचमुळे त्याचं track change करण तो ला अवघड जात होतं. अन ती ही त्याला सांभाळुन घेत "मी कायमची नाही चललिए.. परत येणार आहे रे.. नको एव्हढा senti होऊस रे.. " कुठतरी शुन्यात नजर लावत "माझा मित्र किती येडा आहे.. आतुन हळवा आहे..अन ते हळवपण किती बेमालुमपणे आपल्या रुक्षपणाच्या कातडी खाली लपवतोय..!! कसं होणार रे देवा याचं..!!" असाच विचार करत होती. कसबस स्वताला आवरत तो न तिचा निरोप घेतला. ती आज जाम खुष होती. तिच्या त्या एकमेवव्द्वितीय सख्याने , तिच्या कृष्णाने, तिच्या आयुष्यात किती छान मित्र दिले होते म्हणुन..!! अन सगळ्यांच्या सोबतीला एक शापित तारा जो सदैव देवाच्या अस्तित्वाला आपल्या खराब ATTITUDE अन POTENTIAL च्या जोरावर नेहमीच CHALLENGE करणारा..!! सारं कसं balanced होतं. एका बाजुला तिन मिळवलेले सगळे छान मित्र मैत्रीणी अन दुसर्या बाजुला तो..!! सगळ्यांपेक्षा वेगळा अन pure..!!
पुन्हा दोघांच routine सुरु झालं. त्या दिवसा नंतर तो ला आपल्या job च खुपच tension येऊ लागलं होतं. २.५ करोडचा project handle करणारा आज १० करोडचे 40 छोटे मोठे projects एकटाच पाहत होता. work load खुपच वाढला होता. अन त्यामुळेच तो खुप tension मधे असायचा. तो हे सर्वकाही तिला sms through कळवत होता,मुद्दामच ..!! तो आता job सोडण्याच्या गोष्टी करत होता. पण इतकं potential असणार्या आपल्या मित्राच हे वागण ती ला काही पटत नव्हतं. तिचा B.E. चा result लागल्या नंतर तर तो रोजच तिला "मी हा job सोडतोय.. कारण इथ मला मझ्यासाठी वेळच मिळत नाही, अन इथं राहुन तो मला कधीच मिळणार नाही" अस म्हणत आपल्या त्या गोष्टीच समर्थण करायचा. अन ती "दुसरा job मिळाल्याशिवाय हा सोडु नको " असच त्याला समजावयचा प्रयत्न करायची. पण तो मात्र "मी इथं किती uncomfortable आहे..!!" हेच तिला दाखवण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान तिचा नोकरी मिळवण्याचा आटापिटा चलुच होता. तो ही मिळेल तिथुन ती साठी job openings ची माहिती काढुन तिला कळवत होता. पण म्हणावं तस काहीच घडत नव्हत. तो तिला धीर देत होता.यात तिला तोचा possessiveness ठळकपणे जाणवयचा. अन त्याच्या या अचानकपणे आलेल्या possessiveness मुळे हा आपल्या पासुन कायमचा दुर जाईल याची भिती तिला वाटायची. त्याच्या या possessiveness मुळे दोघांत खुप भांडण होऊ लागली होती. ती ला सतत हा मैत्रीची प्रत्येक limit cross करतोय असच वाटयचं. तो ला या सर्वाचीच जाणीव होती.. अन हे सगळ तो जाणुनबुजुन करत होता. एकदा अशाच त्याच्या बेबंद वागण्यामुळे दोघांनी ही आपली मैत्री थांबवण्याचा निर्यण घेतला होता. त्याच्या त्या extra attitude अन possessiveness मुळे ती न तो ला अगदी कडक शब्दात सुनावल होतं.
"don`t you think you are expecting more in our friendship..? कुठतरी तु चुकतोयस..!! मला हल्ली असं वाटायला लागलय की तु आपल्या मैत्रीकडुन जरा जास्त अपेक्षा ठेवतोय.तुला आपण भेटावं अस वाटतं.. पण मैत्री असायाला सारखं भेटणं गरजेच आहे हे मला नाही पटत. तुझ्या बोलण्यातला तो possessiveness मला आवडत नाही. मी तुला इथपर्यंतच समजुन घपर्यंतच, यापेक्षा जास्त नाही..!! you are not comfortable in our relationship. you are not stable..!! माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला respect कमी होईल अस वागु नकोस..!! plz i beg you my friend..!! मी म्हटल होतं मैत्री करण खुप सोप्पं असत रे पण ती निभावन खुप अवघड असतं रे..!!"
तिच हे आतापर्यंतच सर्वात कटु बोलण होतं. त्याच्या काळजावर तर अक्षरशा घर्रे पडत होते. पण हे सर्व घडणं त्याला अपेक्षित असच होतं. पण तरीही तो आपल वागण काही बदलत होता. कारण तिची ती अभेद्य चौकट तोडल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती. पण आज ती च ते बोलण तो ला खुपच लागल होतं. त्या बोलण्याचा तो ला खुपच त्रास होत होता,तो त्याला सहन होत नव्हतं. अन त्यामुळेच तो ने ती पासुन काही दिवस दुर रहण्याचा निर्यण घेतला होता. तो घेताना त्याला होत असलेला त्रास कदाचित ती ला जाणवतही नव्हता की की तो दाखवत नव्हती, हेच त्याला कळत नव्ह्तं. अन ती ही त्याच्या निर्यणायावर काहीच आक्षेप घेत नव्हती.असच सुमारे ३ दिवस सगळं अबोल चालु होतं कुणीच कोणाला फोन / sms करत नव्ह्तं. पण दोघही एकमेंकांच्या फोनची sms ची आतुरतेने वाट पाहत होते. तो ने एक गोष्ट मात्र ठरवली होती अन ती पुर्ण करण्यासाठी त्याला आपण दिलेले शब्दही त्यापुढे तोकडे पडत होते. त्याचं जाण त्याला माहित होतं, पण यावेळी मात्र तो बरोबर गोष्ट चुकीच्या वेळी करणार नव्हता. या क्षणाला ती ला कुणीतरी समजुन घेणार्याची गरज होती. या servicing center ला ही servicing ची गरज होती. अन यावेळेस तो च तिच्या आयुष्यातुन जाणं म्हणजे ती ला एकटीला कुठल्यातरी खोल दरीत लोटुन देण्यासारख होतं. पण ती चौकट तोडल्याशिवाय तिचं servicing करणं खरच खुप अवघड होतं. आता पर्यंत घडलेली प्रत्येक गोष्ट त्यानं आपल्या मनासारखीच घडवली होती. तो खरं तर आपली एक philosophy ची theory implement करत होता. त्यान कुठतरी त्याच्या engineering मधे metallurgy मधे शिकलेल्या quenching process या metal property improvising process वरुन तो ला ती theory सुचली होती. अन त्याच theory चा प्रयोग तो करत होता. ती च्या नकळत..!! ३ दिवसाच्या अबोल पर्वानंतर तो ने स्वताहुन ती ला फोन करत "मी इतक्या सह्ज तुझ्या आयुष्यातुन जाणं शक्य नाही. अन तुझ्यासारखी मैत्रीण मी इतक्या सहज गमावेण..? माझं वागणं कितीही वाईट असलं तरी तु मला संभाळुन घेतेस..!! माझ्या आयुष्यात मला समजणारी तु एकमेव आहेस रे..!! तुला गमावणं माझ्यासाठी अशक्य आहे. मी कितीही चुकलो तरी मला track वर परत कस आणायच हे फक्त तुलाच जमु शकत रे..!! माफ नाही करणार तुझ्या या येड्या मित्राला..?" असं म्हणत "मी अजुन नाही जाणार.. हातात घेतलेलं ते काम पुर्ण करुनच जाणार आहे" असच काही स्वताला समजावत आपल्या आणखी एक शब्द मोडण्याच्या कृतीचं समर्थण तो करत होता. ती ला नोकरी मिळेपर्यंत तरी तो ती च्या आयुष्यातुन जाणार नव्हता. पण हे सगळं त्याला पटण्यासारख तिला कधीच पटणार नव्हतं, आपल्या मुळच्या संजसपणामुळे असेल कदचित..!!
अन त्या कठीण अशा प्रसांगातुनही त्यांची मैत्री सही सलामत बाहेर पडत होती..!! फक्त ती च्या समजुतदार पणामुळे..!! ती ला ही आपला मित्र पुन्हा आलाय याचा खुप आनंद होत होता. पण या दरम्यान ती च patience संपत आलं होतं. result लागुन आता २० दिवस उलटुन गेले होते, अन पहिला interview देऊन तब्बल १ वर्ष ३ महिने..!! फारच खचली होती ती. अन तो.. तो तर आपल्या job tension मधे फारच depress झालेला. रोज तिला मी job सोडतोय असच सांगायचा. ती ला तिच्या job न मिळाल्याचं tension असुन देखील..!! मुद्दामच..!! फक्त मी इथला job सोडतोय ते मला इथलं tension bear होत नाही हे तिला दाखवायच होतं म्हणुन..!! अन प्रत्येक वेळीस ती तो ला समजावण्याचा वेडा प्रयत्न करायची. आता जवळ पास तो ने job सोडायचा निर्णय घेतला होता. ८ September ०९ तो ने आपला resign type करुन ती ला मी job सोडतोय असा sms केला. त्याच्या या निर्णयावर ती बिलकुल खुश नव्हती..!! पण त्याच्याकडे आपण केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठीचं समर्थण असायचा त्याला पटणारं..!! पण यवेळेस प्रथमच तो कोणाला तरी आपल्या गोष्टीचं समर्थण पटवुन देत होता..!! माहीत नाही का..?
या सर्वांदरम्यान तो चा ती बरोबर contact होत नव्हता. ती घरीच होती अन कुठल्या तरी family problem मधे अडकल्यामुळे ती त्याच्याशी म्हणावं तसं बोलु शकत नव्हती. अन तो मी किती frustrate आहे असच तिला कळवत होता. तो ला तिला घरी काही problem असेल याची काहीच कल्पना नव्हती. अन त्याचमुळे तो तिला "माझं तुझ्या आयुष्यात काहीच importance नाही राहिलं" अस sms करुन कळवत होता ते फक्त ती भवतीच्या चौकट तोडण्यासाठी...!! पण त्याच्या या प्रयत्नामुळे ती खुपच hurt होत होती. त्याचा तो msg पाहुन तिला राहवलं नाही, अन ती ने तो ला जळजळीत असाच sms केला.
"वाईट वाटलं तु तुझ्या मैत्रीणाला ओळखु शकला नाहीस म्हणुन. जगात problems काय फक्त तुलाच नाही, बाकीच्यांनाही असतात. मी जेव्हा घरी आले तेव्हा माझे मामा ICU त admit होते . घरी इतकं tension चालु आहे. now being a responsible girl i have to handle many situations. thousands of difficulties i can see in my family`s eyes. no friend can support you in each moment.स्वतापुरताच विचार करायचा नसतो नेहमी."
स्वताचाच विचार..!! ते शब्द पाहुन तो ला खुप hurt feel होत होतं. अन त्याला फक्त एका गोष्टीवर ठाम विश्वास बसत होता. "आपला जन्म फक्त त्रास देण्यासाठी झालाय..!!". का देव अशी मानसं बनवतो त्यालाच ठाऊक..!! पण त्याला हे ही जाणवत होत की आपण पुन्हा एक बरोबर गोष्ट चुकीच्या वेळी करतोय. पण त्याला ते वेळीच जाणवल होतं. तो इतक्या सह्ज ती च्या life मधुन जाणार नव्हता. तो नं आता थोड्यावेळा साठी आपली quenching theory थांबवण्याच ठरवलं होतं. ती पुण्यात परत येईपर्यंत त्यान ती ला sms न करण्याच ठरवलं होतं. थोड्या दिवसांनी ती पुन्हा interview देण्यासाठी पुण्यात आली. असेच काही दिवस गेल्यावर ती ने तो ला फोन केला अन घरी काय situation होती ते सांगितलं.
दोघही बराच वेळ बोलत होते. बोलता बोलता ती सहज बोलुन गेली.
"तु ना कधी कधी खुप dominating होतोस.. समोरच्याला भीती वाटावी इतका dominating."
"तुला ही असच वाटतं, की मी तुला भिती वाटावी इतका dominating आहे..?"
"हो .. कधी कधी तुझ्या त्या dominating nature ची मला खुप भिती वाटते रे..!!"
"तु म्हणावस हे.. तु..? मला बाकींच्याच देणंघेणं नाही..!! कारण ते कुणीच मला ओळ्खत नाहीत.. पण तु..!! तु मला आतुन बाहेरुन ओळखतेस.. अन तु हे म्हणावं.."
आयुष्यात पहिल्यांदा त्याला कोणाच्या तरी बोलण्याच इतकं वाईट वाटत होत.अन पहिल्यांदा ती समोर तो रडवेला झाला होता. ती ला मात्र हा आपल्या पुढेही रडु शकतो यावर विश्वास बसत नव्हता.
"hurt झालं ना.. बरं वाटलं..!!at least तुला कुणाच्या बोलण्याचा फरक तरी पडतो..!! कधी करावं माणसाने दुसर्याला hurt..! बरं वाटल मला..!!"
असच काहीसं त्याला म्हणत तिनं त्याला त्याच्याच style मधे सावरायचा प्रयत्न केला.खरंतर तो hurt झाला म्हणुन ती ला बरं वाटत नव्हतं.. तर ह्याला माझ्या बोलण्याचा फरक पडतो म्हणुन बरं वाटत होतं.. खुप सुखावणारा क्षण होता त्याच रडणं तिच्यासाठी..!! अन पुन्हा त्याला normal करत ती त्याला सांगु लागली.
"तुझ्या मैत्रीणीला समजुन नाही घेऊ शकत का रे..? i am tired of being understanding, matured..!! i need to be understood by others..!!"
पण ती चौकट तुटल्याशिवाय ती ला कुणीतरी समजुन घेणं खुपच अवघड होतं. अन तो चा ती ला समजुन घेण्याचा प्रयत्न चालुच होता, यात त्याला आपले किती शब्द मोडावे लागले होते, किती गोष्टी बदलाव्या लागणार होत्या हे सर्व त्याला माहीत होतं. अन तो ते विना तक्रार सर्व करणार होता, फक्त आपल्या एकुलत्या एक मैत्रीणीसाठी..!! आता ती ने ही त्याच ते कुठल्याही चौकटीत न बसणार रुप अनुभवल होत. सगळ्या नात्यांच्या चौकटी त्यासाठी अपुर्या पडु लागल्या होत्या. पण ती ला फक्त चौकटीतलच जगणं कबुल होतं, अन म्हणुनच तो साठी तिन आता एक नविन चौकट बनवली होती. अखंड चौकट ज्या चौकटीला कुठलीच सीमा नव्हती. TRUE FRIEND ची चौकट..!! आता हा कधीच ही चौकट सोडुन आपल्या पासुन दुर जाणार नाही म्हणुन निर्धास्त होती. आता तो तिचा good friend/best friend नव्हता तर true friend होता..!! ज्याच्या साठी फक्त ज्याच्यासाठी तिनं ती अखंड सीमा नसलेली चौकट बनवली होती..!! असा तिचा एकमेव true friend..!! आता हे मैत्रीच नातं वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहचल होतं. एव्हढं असुनही अजून पर्यंत ती पुर्ण व्यक्त होत नव्हती. अन हे सारं तो ला जाणवत होतं. ती नेहमी त्याला "तुला सगळच सांगव लागतं.. का रे..?" अस म्हणायची..!! पण खर तर तिन न सांगताच तो ला बर्याच गोष्टी कळायच्या, पण फक्त तिनं स्वताहुन व्यक्त व्हावं म्हणुन तिला ते कधीच जाणवुन देत नव्हता. आज मात्र ती ला तो हे सर्व काही सांगणार होता."needs to be understand by others..? म्हणजे..? एक सांगु.. मी तुला म्हणायचो..!! की तु खुप expressive आहेस..!! पण खरंतर तु तुला जे काही वाटतं ना त्याच्या १०% पण व्यक्त होत नाहीस. तु खुपच formal वागतेस माझ्याशी..!! बाकीच्यांना ते १०% महत्वाच असेल किंवा त्यांना फक्त तेच दिसत असेल. पण मला ते ९०% बघायचय..! मला तेच दिसतय अस म्हण हवं तर..!! अन मला फक्त त्या ९०% unexpressed emotions दिसतात. पण खर तर तु स्वता ते share केले पाहिजेस रे..!! अन तुला ते वाटत ही.. पण problem काय आहे माहितिये का..? ती तुझी चौकट..!! त्या चौकटीमुळे नाही तुला जमत ते ९०% express होण. तु माझी चौकट अगदी सहज तोडली रे..!!मला न विचारता..!! माझ्याही नकळत..!! तु अशी कुणाचीही चौकट तोडावी अन तुझी चौकट कुणीच तोडु नये असं तुला वाटतं. अन तसा प्रयत्न केला की hurt होत."
एव्हढा वेळ अगदी समरसुन त्याच ते बोलणं ऐकणारी ती उसळुन एकदम बोलु लागली.
"प्रत्येकाकडेच ती चौकट असते रे..!! ती त्याच्या आतल्या हळव्या मनाला जपायला. या बाहेरच्या unprotected world पासुन protect करायला..!! अन माझी चौकट मी तोडु न देण्याविषयी म्हणशील तर मी काही कुणाला बंदी नाही केली. ज्याच्यात हिम्मंत असेल त्यान यावं अन तोडावी..!! अन ते फार अवघड काम आहे. कुणाचही नाही."
तिच हे बोलण ऐकुन त्याला जे साधायचं होतं ते त्यान साधलय हे त्याला जाणवत होत. चौकट आता खिळीखिळी होऊ लागली होती. ती आता त्याच्याकडे जेव्हढं व्यक्त होता येईल तेव्हढं होण्याचा प्रयत्न करु लागली होती. दरम्यान ती चे मामा expire झाल्यामुळे तिला पुन्हा घरी जावं लागणार होतं. जेव्हढे जमतील तेव्हढे कष्ट करत ती प्रत्येक प्रयत्न आपला job मिळवण्यासाठी करत होती. अन नियती पुन्हा पुन्हा तिला कुठल्या ना कुठल्या अडचणीत टाकत होती. घरच वातावरण तस तंगच होतं. पण त्यातही लोक तिला येऊन तिच्या job बद्दल विचारुन त्रासवत होते. "अजुन कशी नाही मिळाली नोकरी तुला..? मार्क्स तर किती छान आहेत..!! मग तरीही काय problem आहे..!!"
"काय अजुन अधांतरीच का? आता market open होतय..!! recession संपत आलय..!! बघ पुढच्या वेळी नक्की job मिळव..!!" असे किती तरी taunt तिला बेजार करत होते. अन ती मात्र सगळ कसं हसत हसत सहन करीत होती, कुठलीही कुरबुर न करता..!! मधुन मधुन ती त्याला आपला हाल हवाल ही कळवत होती. घरी किती ताप होतो आहे हे ही सांगत होती. पण तो खुप काही वाटत असुनही काही करु शकत नव्हता. खोटी सात्वंना देणं त्याला कधीच जमणार नव्हतं. तो ही कुठुन कुठुन तिच्या साठी job openings शोधत होता. कस बस तिन ते घरच्या शोकाकुल वातावरणातुन बाहेर पडत पुन्हा पुण्याला यायची तयारी करु लागली. ती पुण्यात आल्या आल्या तो ने ती ला फार विचित्र प्रश्न्न विचारुन चकित केलं होतं. त्यान तिला विचारल होतं
"माणसाने जेव्हा मन आणी डोकं या दोघांच्यात दुमत होतं तेव्हा काय करावं.? why we get confused? becoz there is battle between mind and brain? or our mind is not ready to accept reality. i am confused. tell me which way i should go? the way which my mind thinks or the way the brain guides me.?"
अन तिचा यावर अगदीच अपेक्षीत असाच reply आला.
"when there is battle between mind and brain, always listen to your brain.. b`coz, brain checks the all possible solution for particular situation and then applies it. while mind has already decide that i want this solution so it follows only what it want ignoring the all effects..!! मनाच ऐकलं की कायम घोळ होतो रे. डोक्याच ऐकायला त्रास होतो कारण ते नेहमी मनाविरुद्ध जाणार असतं.. पण at last when result comes out you will be satisfied by your decision..!!."
किती सहजतेने ती आपल्या येड्या मित्राला हे सारं समजावीत होती. पण आज हा प्रश्न त्यान विचारायच कारण काही वेगळच होतं. तो ला काहीतरी सापडलं होतं. काहीतरी ज्याच्यामुळे परिस्थिती बदलणार होती अस् काहीतरी. आजपासुन तो तिला तिच्या मनाला जे वाटतं तेच करायला लावणार होता. तस तिला तो म्हणायचाही "बघ एकदा मनाला काय वाटतं, तस वागुन बघ.. खुप मज्जा येते रे मनासारखं वागलं की..!!" अन ती ही यावर विचार करायची. पुण्याला आल्या आल्या तिचा कुठल्या तरी company त interview होता. तेव्हा त्याने तिला मुद्दामच एक suggestion दिलं.
"अरे तुझ्याकडे sandles नाहीत का रे..?"
"त्याचा काय संबध..?"
"अरे आपण जितक्या वेळा भेटलोय तितक्या वेळा तु floaters च घातले होते. तुझ्या एका फोटो मधे मी ते पाहिले होते. बहुतेक तुझा तो T.E. त असताना चा फोटो असावा..!! हं.. आता तो फोटो माझ्याकडे कसा हे विचारु नकोस.. काय आहे आम्ही mech वाले किती येडचाप आहोत ते सांगायची गरज नाही तुला. तर सांगायचा मुद्दा असा की गेले २ वर्षे तु floaters वापरतेस..!! अरे यार काय हे..!! interview ला सुध्दा floaters..!! उद्याच्या interview साठी एक tip माझ्याकडुन..!! उद्या sandles घाल floaters ऐवजी..!!"
"अरे माझ्याकडे ते heel वाले sandles आहेत. खुप दिवस मी ते घातले नाहीत. आता सवय नाही रे. उगाच पाय मुरगळेल माझा..!"
"ते मला काय माहित नाही. बिना heels वाले sandles घाल."
"ठीक आहे रे..!! बघेन एखाद्या मैत्रीणीचे..!! तेच घालुन जाईन उद्या..!! बस्स..!! खुष..!!"
त्याची प्रत्येक सुचना ती नाही म्हटलं तरी ऐकायची. मग ती कितीही बालिश असली तरी, अन आपल्याकडे आपली काळजी करणारा एक इतका सच्चा मित्र आहे म्हणुन तिचा उर भरुन यायचा. असेच तिचे interview वर interview देणं चालुच होतं. पण यश काही हाती येत नव्हतं. एका रविवारी असेच दोघ बोलत होते. ती आज खुपच frustrate वाटत होती. बोलता बोलता रडत होती. सुमारे अर्धा तास आपलं frustration त्याच्याजवळ काढत होती. अन तो तिला समजावत होता.एव्हढ्या लवकर हरण्यात काय अर्थ आहे म्हणुन धीर देत होता. आज पहिल्यांदा तो तिला व्यवस्थित अगदी वडीलधार्यांसारखा समजावत होता. एव्हढं frustration येण्याचं कारण विचारत होता. अन ती फक्त रडत होती. आपल्या एकमेव true friend कडे त्याच्या आधाराच्या आशेने. कोणीतरी मला समजुन घेणारा आहे म्हणुन. मनातलं हे दुख ती तिच्या समजुतदारपणामुळे कोणापुढेच बोलत नव्हती. पण आज त्याच्यापुढे आपलं मन मोकळं करीत डोळ्यांतुन ते अश्रुरुपी बाहेर येऊ देत होती. त्याला ही हेच हवं होतं.बर्याच वेळानंतर तो ने तिला message पाठवला.
"आता बसं पुरे रडणं, की अजुन रडायचय..!! तु रडलीस ना की मला फार बरं वाटतं."
"गप्प..!! नालायका..!! मघापासुन एव्हढ रडतेय पण एकदाही म्हटला नाही नको रडु नकोस म्हणुन. एक सांगु a good friend is one who is with you when your eyes are filled with tears, but the best friend is one who don't let a single drop to be rolled out of your eyes..!! अन नालायका म्हणे झालं रडुन? तु रडल्यावर मला बरं वाटतं..!! कसलायेस रे..!! मंद..!! नालायक..!! hopeless..!!"
तिच्या त्या सर्व शिव्या ऐकुन घेत तिला तो आता काहितरी सांगणार होता, त्याने त्याच्या engineering मधे पाहिलेली एक philosophy. तो बोलत होता अन ती अगदी एखाद्या शहाण्या मुलाने आपल्या शिक्षकांच ऐकाव तस ऐकत होती.
"अरे तुला माहिति आहे का..? आम्हाला S.E. त असताना metallurgy नावाचा एक subject होता. म्हणजे सगळ्या metals property and their behavior for certain conditions म्हणुन आम्ही शिकत होतो. त्यात एक metal property improvement ची process होती. QUENCHING PROCESS.तर त्यात काय होतं, एखादं metal घेतात अन त्याला त्याच्या melting point पर्यंत तापवतात, until it get red hot, मग ते असं लाल तापुन झालं ना की त्याला थंड करतात. पाण्यात किंवा एखाद्या oil मधे बुडवतात.
थोडक्यात लगेच तापवायचं अन लगेच थंड करायचं त्यामुळे त्यात काही internal stress develop होतात, ज्यामुळे त्या metal ची एखाद्या certain environment मधे काम करण्याची sustainability वाढते. metal hardness quenching process मुळे वाढते. हा.. तर म्हणशील एव्हढं सगळ रामायण का सांगतोय..? त्या quenching process चा इथं काय संबध आहे..? अरे नक्कीच आहे. मी तुला hurt होईल असं बोलतो, आपण सारखं भांडतो, एव्हढच काय सारख्या येणार्या अपशाला कंटाळतो, कधी कधी सपशेल हार पत्करतो...!! पण कधी विचार करतो का रे की हे सगळ का घडतयं..!! या येणार्या परिस्थितीच आपल्याला strong बनवत असतात. मग आपण ही त्या metals सारखेच आहोत. परिस्थिती रुपी उष्णतेने का तापतो रे आपण..? फक्त ह्याच कारणामुळे..!! अन आजवर मी तेच करत होतो. तुझी quenching..!! कळलं का मी असं का वागायचो ते किंवा असं का वागतो ते..? अन आनखी एक..!! काय रे good friend / best friend लावलयं..? मी तुझा true friend आहे.. एकदम वाईट..!! अन अश्रुंच म्हणशील तर पुन्हा तेच सांगतो की ते जिवंतपणाच लक्षण आहे. तुझे अश्रु थांबवायला , ते पुसायला तुझ्या त्या कृष्णाने खुप जण दिलेत..!! अन काय guarantee रे की ते थांबलेले अश्रु पुन्हा येणार नाहीत? त्यापेक्षा येऊ देत ना त्यांना बाहेर... बघ किती हलकं वाटतं ते. मी आहे ते तुझ्या अश्रुंमागची हजारो कारणे शोधायला..!! पटलं का..? नाही म्हणुच नाही शकत तु.."
त्याचा तो confidence पाहुन ती ही मग खुदकन हसली. तासाभरा पुर्वी रडवेली झालेली ती आता परत खुलली होती. किती सहज जमायच तो ला हे. या servicing center लाही आता कुणीतरी servicing करणारं भेटलं होतं. त्या दोघांचही बोलणं ती च्या मैत्रीणी ऐकायच्या..!! तस आजचही बोलण त्या ऐकत होत्या. पण या पोरीं पण..!! लईच येडचाप असतात. कुठल्या गोष्टीचा कुठे संबंध जोडतील त्याच जाणो..!
आजचं ती च फोन वर बोलणं, रडणं, अन मग एकदम मनमोकळं झाल्यासारखं वागणं हे ती च्या कोणा मैत्रीणीला पटत नव्हतं. त्याच दिवशी ती च्या रुममेट ला तिच्या एका best friend ने propose केलं होतं. तो त्या रुममेट चा खुप चांगला मित्र होता. काहीसा आपल्या तो सारखाच. अन त्या मैत्रीणीच्या मते आपण मुली मुलांशी फार मोकळीकीने वागतो ना त्याचा ते असा वेगळा अर्थ काढतात. अन तसच काहीस ती आपल्या "ती" ला समजावत होती. बघ तुझ्या रुममेट वर काय वेळ आली आहे कदाचित उद्या तुझ्यावर ही ही वेळ येऊ शकते अस म्हणुन ती मैत्रीण दोघांच्या मैत्री बद्दल शंका व्यक्त करत होती. अन हे सर्व ती ला काही सहन होत नव्हतं. ती ला हे पटत च नव्हतं. आपण तो ला जर हे direct विचारलं तर त्याला खुप लागेल. म्हणुन ती खुपच भिर्र झाली होती. त्या दिवशी रात्री १ वाजेपर्यंत दोघ एकमेंकाना sms करुन आपल्या मैत्रीचा असा शेवट नाही होणार याचीच ग्वाही देत होते. संध्याकाळी तो चा एक sms आला तेव्हाच तो ला काहीतरी बिनसलं आहे हे कळलं होतं.पण आपल्या एका मित्रा बरोबर बाहेर असल्यामुळे तो ला लगेच reply करण जमलं नाही. पण आपल्या sms चा reply नाही म्हणुन ती ने पुन्हा एक sms पाठवला.
"please answer this question honestly: do you think i don`t obey the limits of friendship? do you think i don`t behave correctly with my friends. specially with all my male friends..!!"
"नाही .. your not crossing your limits in friendship..? का? आज का विचारतेस असं..?बाकीच्यांच माहित नाही पण मला तरी माझ्याशी योग्यच वागतेस अस वाटतं." त्याचा अगदीच संक्षिप्त reply.
"नाही रे मला वाटतं मी माझ्या मित्रांची काळजी करण ,त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं, कमी करायला हवं..! अतिपरिचित अवद्णा नाही होऊ द्यायला पाहिजे. sometimes i make you people irritate by my stupid things, I give importance to small things which don't have practical importance in this world."
"तु का असा विचार करतेस तुला कुठं मी चुकल्या सारख वाटतय का.? कोण तुला काही बोललं का..? अन कुणाच्याही बोलण्यावरुन आपण आपल्या मैत्रीला तडे जाऊ द्यायचे का? तुला पटतं का हे..? विश्वास नाही का तुला तुझ्या true friend वर..? का छळतेस..? माझ्याकडे फक्त तुच एक मैत्रीण आहे रे..!! तुझ्याकडे माझ्यासारखे असतील खुप मित्र..!! पण माझ्या बाजुने कधीतरी विचार कर..!"
"तसं नाही रे.. i believe in friendship more than anything else. but when i think from your side i feel i am wrong. खरं तर when i talked with my friends i never made partition as for girls and boys. i am like open book to all my friends. i care equally for them as i care for my all female friends. is it wrong dat i care for all you all as much as my female friends..? is that mean i am crossing some limitations of friendship? should i stop sharing with boys?someone said that i should not cross the limits of friendship. and that hurt me a lot i take care of my friendship`s boundary much more than any one else. i have applied some restriction to myself related to my friendship. when i talked with you i think 100 times that i should not be against the true friendship. then also some says like this."तिचा हा reply पाहुन तो खुपच भडकला.
अन "कोणत्या मुर्खाने तुझ्या डोक्यात हे खुळ भरवलय रे.."अस्म म्हणत तिच्यावर कावत होता. तो तिला खुप खोदुन खोदुन विचारत होता.तो sms बघुन तो जाम चिडला होता. इतके दिवस तो ती व्यक्त व्हावी म्हणुन प्रयत्न करत होता. त्यात तो यशस्वी ही होत होता पण कोणाच्या तरी सडलेल्या विचारांमुळे ती पुन्हा व्यक्त होण्याच थांबणार होती.
"आपली मैत्री इतकी का कमकुवत आहे रे की कोणीतरी संशय घेतला म्हणुन ती कोलमडुन जाईल..? तुला तरी हे पटतय का? कुठल्या तुझ्या मैत्रीणीने तुला sandles घाल म्हणुन सल्ला दिलाय का रे..? i take care of you as my special friend..!! तुझ्या मैत्रीणीला सांग एका मुलात अन मुलीत निखळ मैत्री असु शकते..!! नाही पटलं तर माझे सगळे sms दाखवुन सांग बघ हा माझा मित्र ज्याच्या आयुष्यात कोणीच मुलगी नाही. जी होती तिन त्याला नाही म्हटलं..!! तिला तो sandles चा किस्सा सांग..!! माझ्या birth-day चा किस्सा सांग..!! तो तु पहिल्या interview नंतर माझ्याकडे मन भरुन रडल्याचा किस्सा सांग.. !!तिला सांग माझा मित्र तसा नाही.. तिला सांग खुप काही अस असतं जे इतरांना पटत नाही पण तुला अन मला ते पटत..!! हो ना..? मुलं फार हळवी असतात..!! आतुन्..!!अन plz आता हा topic इथच थांबव..!! खुप त्रास होतोय रे तुझ्या मित्राला. एक लक्षात ठेव जो चांगला आहे त्याच नेहमीच चांगल होतं."
"माझे पप्पा म्हणतात तसं. so being a good girl i should expect good things to happen with me..!!"
त्याच्या त्या शेवटच्या वाक्यावर त्यांचा त्या दिवसाचा संवाद संपला, पण तिला खुप छान वाटत होतं. आपला true friend आणी पप्पा दोघं किती सारखे आहेत. एकदम सरळ, स्वताला जे वाटत ते निर्भीडपणे सांगणारे. तसं ती बर्याच गोष्टीत तो ला आपल्या पप्पांशी compare करायची. पण आज तिला आपला मित्र आपण pure आहोत हे पटवण्यासाठी किती बारिक सारिक गोष्टींची उदाहरणे इतक्या आक्रमकतेने देत होता हे अनुभवता आलं होतं. ती त्याच्या sharpness पुढे, खरं तर अस्सल पुणेरी sharpness पुढे हरली होती. दुसर्या दिवशी लगेच तिचा सकाळी सकाळीच फोन आला. पण तिला काहीच बोलवत नव्हतं. तो ला ते जाणवत होतं. पण कालच्या गोष्टीमुळे थोडी upset असेल असंच त्याला वाटलं. पण ती मधेच बोलता बोलता गप्प झाली होती. तिला जे काही बोलायच होतं ते व्यक्त होत नव्हती. कालच्या घडलेल्या त्या घटनांनी ती व्यक्त व्ह्यायला घाबरत होती. खुप काही वाटत असुनही ती बोलत नव्हती.
"मझ्यामुळे माझ्या मित्रांना कुठलाच problem नको व्हायला अस मला वाटतं." एव्हढंच वाक्य ते धडपणे त्याच्याशी बोलु शकली होती.
"कुठला problem..? काय बडबडतेस..? जे आहे ते पटकन सांगुन टाक...!" त्यानही लगेच तिची गोची ओळखत तिला विचारलं.
"मला अत्तापर्यंत असं वाटायच की मी कुठलीही गोष्ट मझ्या मित्रांबरोबर share करु शकते, पण काही गोष्टी तुम्हा मुलांना कधीच नाहीत कळणार..!! and that's the truth..!!"
एव्हढच म्हणुन तिन फोन cut केला. त्याला ते फार लागलं.खरंतर तिला आपल्या commitment मुळे खुपच tension आलं होतं.
"दिवाळीत घरी जायच्या आधी माझ्याकडे job असेल. " या तिच्या commitment मुळे तिला खुप त्रास होत होता. पण तोच तिला सांगता येत नव्हता. त्याने ते बरोबर हेरलं.
अन "मी आता तुझ्या hostel जवळ येतोय. मला वाटत तुला कुणीतरी तुझ्या जवळ असणं खुप गरजेच आहे. मी १५ मिनिटात तिथं पोहचतोय. plz ये मी वाट पाहतोय..!" असा sms ती ला केला.
ती न लगेच reply केला "काही नको रे मला असच वाटलं तुला call करावा, सहज..!! सहज फोन नाही करु शकत का तुला? अन मी येणार नाही.. plz येऊ नकोस please."
"ते मला काही माहीत नाही .. यावेळेस तुला सर्वात जास्त गरज माझी आहे .. मी येतोय ..plz आपण भेटुयात रे.. फोन वरुन नाही होत सग्ळ्या गोष्टी solve.. i have to be there as your true friend.. let me do my duty.." त्याची तिच्याविषयीची ती काळजी तो जमेल तितकं आपल्या रुक्ष वागण्याखाली दडपवुन टाकायचा प्रयत्न करायचा. पण आज सगळं उलटच घडत होतं.
"plz.. don't come i don`t want to meet you. " ती फोन करुन त्याला विनवत होती. पण तो ऐकेल तर शप्पथ..!! निम्म्या रस्त्यावर पोहचल्यावर गाडीवरुनच त्याने ती ला फोन लावला..!! hands free वरुन बोलत बोलत तो ती च्या hostel खाली पोहचला. तिथच उभा राहुन तो तिच्याशी बोलत होता. अन ती मुसमुसुन रडत होती. आपल्याला अजुन job नाही म्हणुन..!
"मी तुझ्या hostel च्या खाली उभा आहे..!! ठीक आहे नको येऊस मला भेटायला खाली. पण मी इथचं उभं रहुन बोलणार आहे. मला माहिती आहे इथं माझी image किती negative आहे. पण तु बोल तुझा true friend तुला ऐकायला कायमच तुझ्याबरोबर असेल तो कसाही असला तरी."
तो मुर्खा सारखा ती च्या होस्टेलकडे तोंड करुन बोलत होता. अन ती तशीच हुंदके देत रडत होती. तिला ही त्याला भेटावं अस वाटत होतं. तो एव्हढ्या लांबुन फक्त तिच्यासाठीच आला होता. पण तिच ते समजुतदार मन तिला आडवत होतं. तरीही तो तिथच खाली उभ राहुन तिला समजावत होता. आपली वेगळी उदाहरणं देऊन फक्त जिंकण्यात नाही तर हरुन जिंकण्यात मजा असते हेच पटवुन देत होता. तासाभरात ती पुन्हा normal झाली होती. तो ने मग लगेच आपला मोर्चा पुन्हा घराकडे वळवला. फोन अजुनही चालुच होता. तो घरी पोहचेपर्यंत तिच्याशी बडबडत होता. तिला खुप छान वाटत होतं. आपला मित्र आपली एव्हढी काळजी करतो की फक्त आपल्याला बरं वाटावं म्हणुन तो इतक्या लांब फक्त मी तुझ्या जवळ आहे इतकच दाखवायला तासभर माझ्या hostel खाली उभा होता. मी येणार नाही हे माहीत असुनही. तो तिथ वेड्यासारखा माझ्याशी फोन वर बोलत होता. अन मी त्याला भेटले नाही. खरच या सगळ्या मुळे ती भारावुन गेली होती. पण त्याच्या मनाच अजुनही समाधान होत नव्हतं. कारण काही गोष्टी समोरा समोर बोलल्यावरच लवकर clear होतात, असाच त्याचा विश्वास होता. तसं त्यान ती ला मला न भेटण्याच कारणही विचारलं होतं पण ते कारण त्याला पटत नव्हतं. तिचं उत्तर मात्र काही वेगळच होतं.
"i have decide मी माझ्या कुठल्याच मित्राला एकटी भेटणार नाही. i don`t want any one to get problems due to me..!! truly speaking i don't want to get any of my friend emotionally involved with me. i have experienced the pain of my friend which they had faced due to me. i don't want the condition of my room-mate will be my future condition..!!"
असच् काहीसं तिन तो ला समजावलं. पण किती वेडी होती ती. फक्त भेटल्यानेच माणसं emotionally involved होतात, अस तिला वाटायचं. पण खर तर दोघही एकमेंकात गुंतले होते, पण फक्त मित्र आणी मैत्रीण म्हणुन..!!
अन अजुनही तिचा आपल्या मैत्री वर विश्वास नाही म्हणुन तो पुन्हा पुन्हा तिला फटकारत होता. अन ती माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणत, सगळ्याच संशयाच्या मुळावर थेट घाव घालत आपल्या "न येण्याच" समर्थण करत होती. पण एव्हढं होऊन त्याला समाधान नव्हतं. त्यान ती घरी जाण्या आधी भेटुनच जा म्हणत तिला गळ घातली. पण ती काही तयार होत नव्हती. पण आपले हट्ट तिच्याकडुन कसे पुरवायचे हे त्याला चांगलच माहीत होतं. शेवटी ती ज्या दिवशी घरी जाणार होती त्या दिवशी तिन त्याला स्वारगेटला भेटायला बोलावल. फक्त त्याच्या हट्टा पायी! स्वारगेटला फक्त ५ च मिनिटे दोघांची भेट झाली. पण त्याच्या नजरेने ती ला जे काही समजावयाचं होतं ते समजलं होतं. तो सारखा मित्र असताना तिला जगातल्या कुठल्याच संकटाची भिती का असावी असच काहीस ती नजर तीला सांगत होती. अगदी भेदकपणे अन ती ही स्थिरावलेल्या नजरेने "हो तु आहेस..!!" असच म्हणत मनोमन सुखावत होती.
दिवाळी ही आता उलटुन गेली होती. तिच्यासाठी रोजच नवा दिवस नवी उमेद घेऊन उगवायचा अन संपताना मनी एका कोपर्यात एक उदासीनतेच वावटळ सोडुन जायचा. आयुष्यात आतापर्यंत मोठ्या जिगरीने तिने प्रत्येक नकार पचवला होता. आता तर त्याला सवय व्हायला लागली होती. तिच ते आतलं उदासीन वावटळ तो ला नेहमीच खिजवायचं. "तु असताना मी इथं आहे..!!" म्हणत ते वावटळ तो च्या so called potential ला challenge करत होतं. अन त्यानही ते स्विकारल होतं. ती या सगळ्यांना मात्र तो चा possessiveness म्हणायची. याच possessiveness मुळे दोघांत खुप भांडण व्हायची. होणार्या भांडणामुळे दोघांच्यात दुराव्या ऐवजी जवळीकच वाढत होती. तो ती व्यक्त व्हावी यासाठी आपल्या स्वताला जितकं व्यक्त होता येईल तितकं व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा. तो जरा जास्तच व्यक्त व्हायचा. अन तिला फक्त तु किती कमी व्यक्त होतेस हेच जाणवुन द्यायचा. असच कधीतरी त्यान तिला आपल स्वप्न व्यक्त होण्याच्या नादात सांगितल होतं. संदीप खरे चा "आयुष्यावर बोलु काही.." फक्त तिच्या बरोबर पाहण्याचा.
पण तिचा मात्र "तु मला न विचारता तु मला तुझ्या स्वप्नात घेतलस..!!" म्हणुन याला आक्षेप होता. पण संदीप खरे चा शो रात्री ९.३० ला असतो अन ती च होस्टेल तर ९ ला च बंद होतं हे माहीत असुन ही तिला त्या शो साठी येण्याची गळ घालण्याच त्याकडे वेगळच कारण होतं. ते म्हणजे काही गोष्टी आपल्याला हव्या असल्यातरी त्या घडत नाही पण म्हणुन काय त्यांची अपेक्षा करण सोडुन द्यायच नसतं एव्हढच दाखविण्याचा तो चा खटाटोप असायचा. अशी त्याची बरीच स्वप्न तो मुद्दामच सांगायचा. अन पुर्ण झालेली स्वप्न तर अगदी जस काही मी काहीतरी जगावेगळच केलय या आविर्भावात सांगायचा. बघितलेली स्वप्न पुर्ण करायचा प्रयत्न करायचा असतो हेच दाखविण्यासाठी. मन मारुन जगण्या पेक्षा मनाला काय वाटत ते जगण्यासाठी ती ला उद्युक्त करण्याचा त्याचा प्रत्येक प्रयत्न ती साठी फक्त "हा माझ्यापासुन दुर जाईल" हीच भावना देऊन जायचा. पण त्याच्या hopeless nature मुळे अन ती च्या समंजसपणामुळे तो ती पासुन दुर जाणं कदापीच शक्य नव्हतं. दोघांची ही फुलणारी मैत्री मात्र त्यांच्या आजुबाजुच्या लोकांना काहीशी न पटणारी होती. पण त्याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. अनेक खाच खळग्यातुन , भांडणातुन दोघही जात होते, पण त्या दुराव्यामुळे दोघही आणखीनच जवळ येत होते. तो ला आपला job सोडुन आता जवळ जवळ दोन महिने होत आले होते.
job सोडताना त्यान ती ला "बघ एका महिन्यात मला दुसरी नोकरी मिळालेली असेल" असं म्हटल होतं. ती च्या हे सार लक्षात होतं, अन त्याच्याही..!! ती ला सतत वाटत राहायच की त्याच्या या commitment मुळे तो ला खुप त्रास होत असेल. म्हणुन ती त्याला धीर द्यायचा प्रयत्न करायची. अन तो ती ची प्रत्येक सांत्वना "मला कुणाची गरज नाही ..!!"म्हणुन धुडकावुन द्यायचा. अन ती मात्र आपल्या मित्राची प्रत्येक गोष्ट मोठ्या मनाने स्विकारायची. एकदा असच त्यान ती ला "दगड" म्हणुन हेटाळलं होतं. खुप hurt झाल होतं तिला. तिच ही बरोबर होतं, तिच्यासारख्या emotional मुलीला दगड म्हणण म्हणजे आहे ला नाही करण्यासारखंच होतं. पण तो मात्र आपण दिलेल्या त्या विषेशणाच समर्थण करत होता. ती चा कुठलाच decision तिन कोणासाठीच विशेषत: तो साठी बदलु नये म्हणुनच तो तिला दगड म्हणायचा.. स्थितप्रद्ण म्हणुन..!! त्या "दगड" म्हणण्यामागे किती मोठा अर्थ होता हे आजवर फक्त तो ला च माहीत होतं. त्याच वागणं कधी कधी ती ला समजायचच नाही..!! दगड म्हणुन ती ला हिणवणारा, "तु काही माझी आयुष्यभराची मैत्रीण राहणार नाहीस अस म्हणुन तीला hurt करणारा" कधी "मी तुला म्हणायचो ना तु माझी आयुष्यभराची मैत्रीण नाही राहणार..!! पण यावर मी एक उपाय शोधलाय. तु माझी आयुष्यभराची मैत्रीण रहावीस म्हणुन मी माझ्या मुलीच नाव तुझ्या नावावरुन ठेवणार आहे..!! माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीच्या नावावरुन..!! चालेल ना तुला..!! कशी वाटली माझी idea तु माझी आयुष्यभराची मैत्रीण रहावीस म्हणुन ...?" अस म्हणुन कोणता तो खरा तो अगोदरचा सर्वस्वी अहंभावी की हा भाबडा..? असाच प्रश्न ती समोर पडायचा. ती ला त्याच्या या बोलण्यावर तो ला काय प्रतिक्रिया द्यावी हेच सुचायचच नाही.
"तुझ्या मुलीच नाव काय ठेवाव हा तुझा प्रश्न आहे.. अन तु ठेऊ शकतोस तुझ्या मुलीच नाव माझ्या नावावरुन..!!"
असच काहीस बोलुन त्याच्या त्या हळव्यावर मनावर अलगद फुंकर घालायची. दोघांची ही sharing आता वाढत होती. पण ती म्हणावी इतकी अजुनही व्यक्त होत नव्हती अन म्हणुनच ती च्या या अलिप्त राहण्याला एक दिवस वैतागुन तो ती ला बोलत होता अगदी जीव तोडुन
"मी तु व्यक्त व्हावस म्हणुन इतका जीव तोडुन प्रयत्न करतोय अन तुला काहीच फरक नाही पडत.. मग कशाला म्हणतेस रे i need to be understood by others..? का..? मी नाही समजुन घेऊ शकत असच तुला वाटतं..!! माझी तितकी लायकी नाही का..?"
"लायकीचा काय प्रश्न आहे रे इथे..? मला समजुन घेणारा तो एकमेव आहे ना माझा कृष्णा ..!! फक्त तोच मला समजुन घेऊ शकतो..!! बाकी कोणाच ते काम पण नाही..!! मला फक्त तोच समजु शकतो माझा सखा एकमेवव्दितीय कृष्णा..!! मला नाही दुसर्या कोणी समजुन घ्यायची गरज..!! n that's final..!! "
ती च्या बोलण्याने मात्र तो खुपच निराश झाला होता. ती च्या जवळ जाण्याचा प्रत्येक प्रयत्न ती ला वेगळाच वाटायचा. पण त्याच जवळ जान फक्त तिच्यातला तो न्युनगंड बाहेर काढण्यासाठी होतं. पण..!! अजुनही त्याला हव्या त्या गोष्टी त्याला हव्या तश्या घडत नव्हत्या..!! त्याच्या या वागण्याचा ती ला खुप त्रास व्हायचा. पण तरीही त्याला जाऊ देत नव्हती. जितकं शक्य होईल तितका प्रयत्न ती आपला एकमेव true friend ला आपल्यापसुन दुर ठेवत आपली मैत्री pure राहील याची काळजी घ्यायची. अन त्याला मात्र सारखा झरा आठवायचा. तो तिला तस म्हणुन ही दाखवायचा.
"मला ना त्या झर्यासारखं वहायला आवडतं रे..!! मस्त अवखळ..!! कशाचीच तमा न बाळगता..!! त्याच्या सारखं flow less जगायला खुप आवडतं. अन आपली भांडण फक्त या एकाच कारणामुळे होतात. माझं झर्यासारख वाहणे तुला नाही पटत..!! तुला ते स्वछंदी वागण आपल्या मैत्रीत अंतर पाडेल असच वाटत..!! तु कधी झरा निरखुन पाहिलायस का रे ..? जेव्हा तो उंचावरुन एकसंध होऊन दगडावर आपटतो तेव्हा त्या एकसंध धारेचे हजारो तुषारात रुपांतर होतं..!! अन पुन्हा ते हजारो तुषार एकत्र येऊन नवी धारा बनवतात. आपलंही तसच आहे रे..!! माझ्या झर्यासारखं वाहण्याला तुझा संमजसपणाच्या दगडामुळे हजारो तुकड्यात विखराव लागतं.. तु तो दगड आहेस..! माझ्या प्रवाहाला तोडणारा अन पुन्हा एकसंध जोडणारा.. !! तुला समजुन घेणारा तो तुझा कृष्णा असेल रे पण मला समजुन घेणारी तु एकमेव आहेस..!! दगड..!!"
"नालायका एव्हढ सगळं सांगण्यापेक्षा तु हे सरळ एका वाक्यात सांगु शकला असतास..!! तुला हेच म्हणायचय ना की आजवर तुला नाही म्हणणार कोणी नाही भेटलं..!! हो ना..!!"
"कस रे बरोबर ओळखतेस..!! उगाच नाही म्हणत मला समजणारी तु एकमेव आहेस..!!"
असच हे नातं दोघ रोज वेगळ्या उंचीवर नेत होते.. कधी ती च्या संजस्पणामुळे तर कधी तो च्या त्या झर्यासरख्या निर्भेळ वागण्यामुळे. दोघही आपापल्या परीने एकमेंकाना सांभाळुन घेत होते. तो ला मात्र job नसण्याच काहीच वाटत नव्हतं. ती मात्र फारच tense होती. या job च्या tension मधे अजुन ती ला बर्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं.अन त्यात भरीस भर म्हणुन आणखी एक problem झाला होता. ती चा email id bounce झाला होता. job application साठी येणारे reply त्याच mail id वर येणार असल्या कारणाने ती खुपच वैतागली. का तो कृष्णा तिची एव्हढी परिक्षा पाहत होता हे त्यालाच माहीत होतं. तिन सगळ तो ला सांगितलं. अन तो आपल्या नेहमीच्याच खराब attitude ने
"अरे २ दिवसात चालु होईल तुझा email-id . माझा एक मित्र pune cyber cell मधे आहे. बघु त्याची मदत घेऊन नक्की तो bounce id activate करु. don`t worry..!! मी आहे..!! अन मी काहीही करु शकतो. तु फक्त password recovery chances संपवु नकोस. एक दोन attempt माझ्यासाठी ठेव..!! मी करु शकतो तुझा password recover".
तिला धीर द्यायचा प्रयत्न करत होता. त्याच ते बोलण ऐकुण ती ला मात्र या बाहेरगावातही कोणीतरी माझी इतकी काळजी करणार आहे म्हणुन खुप बरं वाटत होतं. अन ती त्याला म्हणत होती
"जाऊ दे रे..!! नको घेऊ tension..दुसरा id आहे माझा..!!"
"अरे तुला विश्वास नाही का माझ्यावर..!! देतो म्हटल ना २ दिवसात id activate करुन... तुझे बर्यापैकी personal details मला माहिती आहेत पण जे मला हवेत ते तु दे.. मी अन माझा मित्र direct rediff and google वाल्यांशी बोलतो.. बघ नक्की होईल तुझा password recover.."
तिन ठीक आहे म्हणत तो पुढे सपशेल हात जोडले. तो मात्र आपल्या त्या cyber cell police मित्राच्या मागे लागुन rediff वाल्यांशी contact करत होता. कसाबसा तिकडुन त्याने password recovery chances gain करण्याची permission घेतली. अन तो mail id पुन्हा activate केला.. फक्त २ दिवसात..!! त्याचं ते potential पाहुन मात्र ती थक्क झाली होती. अन तो मात्र उगीचच computer engineers च्या नावाने खडे फोडत mechanical वालेच कसे हुशार असतात हेच तिला सांगत होता. पण तिला आता त्याच्या या असल्या वागण्याची सवय झाली होती. ती या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत आपल्याकडे असा मित्र आहे म्हणुन त्या कृष्णाचे आभार मानीत होती. एव्हढ सारं होऊन ही त्यांच्यातली भांडण मात्र कायम होती. पण १3 November ह्या दिवशी त्यांच शेवटच भांडण झालं. खुपच अगदी मैत्री तुटण्याच्याही पुढच भांडण..!! त्याच्यांतला वाढत चाललेला तो घरोबा पाहुन तो च्या एका इरसाल मित्राने
"तुमच्या दोघांच काही आहे का..?" म्हणुन तो ला विचारलं..पण या सरावतल्या प्रश्नाला त्यान ही मोठ्या सराईतपणे उत्तर दिलं..
"नाही तस काही नाही.. ती माझी एकुलती एक मैत्रीण आहे.. बस्स इतकच.. अन साल्या तुला माहितेय.. ती पोरगी एखाद्याला जीव लावते.. अन खर सांगु का माझी लायकी नाही रे..!! खुप मोठ्या मनाची आहे माझी मैत्रीण"
त्याला जे उत्तर द्यायच होतं ते त्यान दिलं होतं. आज सकाळीच ते दोघ अन त्यांचा एक common friend outing साठी गेले होते. पण त्यावेळेस तो फारच विचित्र वागत होता. त्याच ते वागण ती ला खटकत होतं. नदीच्या पात्रात पश्चिमेकडे पाहत "का बरं हिला मोक्षाची दिशा म्हणतात..? सुर्य पुर्वेला उगवतो अन पश्चिमेला मावळतो.. माझी अन तिची मैत्री आता मावळतीला आली आहे का..?" असाच स्वताशी विचार करत तो एकटक त्य पश्चिमेकडच्या नारंगी गोलात पाहत त्या दोघांपासुन अलिप्त बसला होता. ती trip आटोपुन तो आपल्या मित्रासाठी त्याला भेटायला म्हणुन त्याच्याकडे गेल्यावर त्याने आज आम्ही outing ला गेलो होतो म्हणुन सांगितलं.त्यावर त्या मित्राने तो वरचा प्रश्न विचारला होता. तो मोठ्या मोकळ्या मनाने त्याला समजावत होता. पण विचारणारा त्याचा खुप छान मित्र होता इतका की त्याच्या group मधे ते सगळे एकमेंकाना boyfriend च म्हणायचे. तर असे तो ला ३ boyfriend होते. अन त्यातल्या एकाने दोघांच्याही मैत्रीत 'तसं काही आहे का?' हे विचारण तो ला पटत नव्हत. इतर कोणी विचारल असतं तर त्याने त्याचेकडे काना डोळा केला असता. तो मग स्वताच विचार करु लागला. आपण खरच का तिच्या जवळ आलोय..!! हो आपल्याला तिच्या जवळ जायचय पण ते वेगळ्या कारणासाठी.. अन आपण तिच्या जवळ जातोय तेव्हा कशावरुन ती ही आपल्या जवळ येणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. तो चा मात्र एव्हढाच प्रयत्न होता के मी तिच्या जवळ जाव पण तिन माझ्यापासुन दुर राहवं. किती वेडा होता तो, पाण्यात उतरुन कोरडं राहण्याचाच प्रयत्न तो करत होता. त्याला मात्र आज घडलेलं पटत नव्हतं. त्याने लगेच तिला तस विचारलही. पण तिने सरळ हे सगळ तुझ्या वागण्यामुळेच घडतय अस सांगत त्याच्यावर चांगलीच खार घेतली."तु खुपच possessive वागतोस मग का नाही दुसर्यांना तसं वाटणारं..!! मला तस college मधे +++++ च्या नावावरुनही चिडवतात.. पण तरीही आम्ही pure friend म्हणुन राहतो. पण तुला नाही तस वाटतं. मैत्री टिकवण खुप अवघड असतं रे..मी तुला कायम माझा चांगला मित्र म्हणुनच पाहिलय रे..!!" त्याच्या त्या प्रश्नाने ती खुप दुखी झाली होती. पण त्याला मात्र आज आपल्या वागण्याचं पहिल्यांदा इतका त्रास होत होता. त्याने थेट त्या दोघांच्या common friend ला फोन लावला. अन त्यालाही तोच प्रश्न विचारला जो ती ला विचारला होता. पण तो ही फक्त त्याच मन राखायच म्हणुन "मला तरी तुम्ही दोघ खुप छान मित्र वाटता बाबा..!!"असच त्याची समजुत घालत होता. त्यावर तो मात्र
"ज्या दिवशी ती ला job मिळेल ना त्यानंतर १० दिवसाच्या आत मी तिच्या आयुष्यातुन निघुन जाईन रे..!! पण आता तिला माझी गरज आहे रे..!! कुणाच्या तरी आधाराची गरज आहे तिला..!! मी इतक्या लवकर नाही जाऊ शकत!! हां पण जेव्हा जाईन ना तेव्हा तिच्या त्या दोन मित्रांसारखा नाही जाणार रे..!! माझ्या एकुलत्या एक मैत्रीणीला माझ्यामुळे खुप त्रास होतोय रे..!! पण मी तरी काय करु? ज्याचा जन्म फक्त त्रासच द्यायला झालाय तो तरी काय करणार रे..? बस तिला job लागला की जाईन मी..!!"
अस सांगुन त्या common friend ला आपल्या purity विषयीची ग्वाहीच देत होता. बोलताना तर त्याला स्वताचे अश्रुही थांबवता येत नव्हते. त्या दोघांशीही बोलुन त्याच समाधान होत नव्हतं,म्हणुनच त्याने त्याच्या दुसर्या boyfriend ला बोलावुन घेत सगळी हकीकत सांगितली. तो ही त्याला समजावत होता. तो चा तो boyfriend म्हणजे त्याचा सगळ्यात जवळचा मित्र होता. तो त्याला आपला true friend मानायचा,इतका की तो तिला म्हणायचा सुध्दा "माझ्याकडे हा आहे माझा true friend तु गेल्यावर मला सांभाळायला..!!". त्या boyfriend ने तो ला सावरल अन "यावेळेस तरी तिला तु सोडुन जाऊ नकोस..!!" अस समजावलं. त्याला ते पटल अन तिला फोन करुन लगेच तिची माफी मागत "मी तुझ्या आयुष्यातुन तुझ्या अगोदरच्या दोन मित्रांसारखा नाही जाणार रे.. अन तुला माहितीच आहे की मी फक्त तुला त्रास देऊ शकतो..!!" असं म्हणत पुन्हा तडे गेलेल्या त्या मैत्रीला छान आकार दिला, अगदी त्याला हवा तसा. त्याच्या त्या फोन ने ती मात्र आपली मैत्री अजुनही सलामत आहे म्हणुन त्या कृष्णाचे आभार मानत होती.पण त्या दिवसांपासुन मात्र तो तिच्याशी थोडा सावधच वागु लागला होता. इतका की त्याचं ते formal वागणं तिलाही खटकत होतं.त्याचा तो hopeless attitude कुठतरी कमी झाल्यासारखाच तिला वाटत होता.एव्हढी गाढ मैत्री असुनही अजुनपर्यंत दोघांनीही कुठलीच movie बरोबर पाहिली नव्हती. तसा तो ने ही तिच्याकडे कधीच आग्रह केला नव्हता,पण तो तिला संदीप खरेंच्या "आयुष्यावर बोलु काही "ला येण्यासाठी खुप पिडायचा, पण शो ची वेळ रात्रीची असल्याने तसा कधी योग आलाच नाही अन येणारही नव्हता. एके दिवशी असाच तो ने आपल्या 'त्या' police मित्राबरोबर movie बघण्याचा plan केला होता.पण त्याच्या त्या पोलिसी ड्युटीमुळे त्याचा सगळा plan flop गेला होता. त्यानं ती ला तसं कळवलही होतं. ती ही त्याच दिवशी कुठल्याशा company त interview देण्यासाठी city त येणार होती. त्याचा फसलेला plan बघुन तिनही मग आज याच्याबरोबर(च!) movie बघायची असच काही ठरवल होतं. त्या plan नुसार ती, दोघांचा तो common friend आणी तिची एक मैत्रीण असे तिघेही inox ला movie बघाणार होते. तिनं काहीतरी कारण काढुन त्या दोघांना " 'तो' ला ही हीच movie पहायची होती पण त्याचा plan cancel झाला. आपण बोलवुयात का त्याला आपल्या बरोबर movie बघायला" असं आपल्या त्या मित्राला अन मैत्रीणीला सांगत तो ला लगेच बोलावुन घेतल्. तो आला पण बरेच आढे वेढे घेत. movie houseful असल्यामुळे त्यांना ६.४५ च्या शो शिवाय पर्याय नव्हता, hostel जायला उशीर होणार असला तरी ती त्या 6.45 च्या शो साठी तयार होती. तो मात्र आतुन बराच अलिप्त वाटत होता. आत कुठतरी त्याला insecure feel होतं,कारण पहिल्यांदाच तो कुठल्या मुलीबरोबर movie पाहणार होता. अन तिच त्यान movie ला यावा हा हट्ट फक्त कशाची तरी भरपाई म्हणुन होता. ते सगळ तो ला माहीत होत्,अन तरीही फक्त आपली एकुलती एक मैत्रीण म्हणुन तो ते उपकार स्विकारत होता. खरतर काहीं दिवसापुर्वी ती तिच्या एका मित्राबरोबर movie पहायला गेली होती. तस तो ला याचं काही वाटत नव्हतं,पण यावरुन तो तिला तिच्या "मी माझ्या कुठल्याच मित्राला एकटी भेटणार नाही असं तु म्हटली होतीस.. मी त्यादिवशी फक्त तुला बरं वाटाव म्हणुन तुझ्या hostel खाली उभा राहुन तुला भेटायला ये अस विणवत होतो.पण तु आली नाहीस..! अन movie बघण्यासाठी..." अस मस्करीत डिवचत होता. अन तिलाही तो किती खरं बोलतोय हे पटत होतं. अन आज movie बघायचा plan हा फक्त "त्या" गोष्टीची भरपाई करण्यासाठी होता. अन हे तो ला माहीत असुनही तो फक्त तिचा तो भ्रमिक हट्ट पुरवण्यासाठी movie बघायला तयार झाला. movie तशी बरी होती पावणे तीन तासात संपली. पण movie संपल्या नंतर मात्र बाहेर धो-धो पाऊस पडत होता.अन तो लवकर थांबेल याचीही काहीच चिन्हे दिसत नव्हती. ८ वाजले होते. कुठल्याही परिस्थीतीत तिला ८.३० च्या आत hostel वर पोहचायच होतं. त्यान सरळ ती ला
"बस मागे , भिजत जाऊ ,काही नाही होत." म्हणत भर पावसात गाडीवर टांग टाकली. त्या जोरदार पावसात दोघही चिंब भिजत होते. तसा तो ला पाऊस फारसा आवडायचा नाही,पण आजचा पाऊस थोडा वेगळाच वाटत होता. अगदी पहिल्या पावसान पान्-फुलं बहरात येतात तसच त्याच मन झालं होत्. अन ती "कधी एकदाची मी hostel ला पोहचेल?" याच विचारात. त्याला मात्र आपलं झर्यासारखं अवखळ वाहणं थांबवताच येत नव्हतं. ती किती विश्वासाने तो च्या गाडीवर बसली होती.अन त्याला याच गोष्टीच खुप अप्रुप वाटत होतं.कोणीतरी या भर पावसात एव्हढा विश्वास टाकुन एव्हढं निर्धास्तपणे तो च्या मागे गाडीवर बसणं म्हणजे तोसाठी एक वेगळाच अनुभव होता. त्याच मन त्याचमुळे प्रफुल्लीत झालं होतं. अन तिला ह्याला पाऊस आवडत नाही तरी आपल्यासाठी भिजत एव्हढ्या लांब येतोय याचच अप्रुप वाटत होतं. आयुष्यातल्या प्रत्येक कडु गोड प्रसंगाला साक्षी होत दोघांचीही मैत्री फुलत होती, पण गुलमोहरासारखी नाही तर सदाहरीत वनातल्या उंच देवदार वृक्षाच्या वनराईसारखी. आता कुठे तिच्या आतला तो न्युनगंड संपत आला होता. अन म्हणुनच तो आता तिच्यापासुन दुर रहायचा प्रयत्न करत होता. आता तो फक्त वाट पाहत होता ते तिला job मिळण्याचीच ! अन तो मिळाल्यानंतर...?
क्रमश :
गोष्ट छान वाटतेय...पण
गोष्ट छान वाटतेय...पण आतापर्यंत विरामचिन्हे अन त्यापुढे उद्गारवाचक चिन्हे , मधेच भरपूर इंग्रजीत लिहिलेले...अन जरा पाल्हाळ लावल्यासारखे झाले आहे...नंतर कधी मूड झाला तर वाचेन.
ही तसदी घेतली हेच खुप
ही तसदी घेतली हेच खुप शिल्पा..!!
खुपच सुन्दर गोश्त आहे.
खुपच सुन्दर गोश्त आहे.