शब्दांकुर : पर्ण- ३

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 23:30

2010_MB_kavyasphurti-3.jpgस्पर्धेचे नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
३. ह्या स्पर्धेसाठी एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका (चारोळी/कविता) पाठवण्याची मुभा आहे.
४. आपली कविता २१ सप्टेंबर २०१० पूर्वी इथेच लिहा.त्यानंतर नविन विषय देण्यात येईल.
५. आपली कविता ही स्वतः लिहिलेली असावी.तसेच पूर्वप्रकाशित नसावी.
६. स्पर्धेचा निकाल परीक्षकांमार्फत लावण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मर्यादा सहनशिलतेची

तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो
तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो
तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो
तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो

माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे... आता काही... देणे घेणे.... उरले नाही

- गंगाधर मुटे

वा मुटेजी... चटका लावणारी कविता...... कविता हृद्य आहे,पण कल्पना असहनीय आहे.

आयुष्याची दोरी

आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार
माझी मला दिसायला लागली
जीव घाबरा अन नाडी मंदावून
श्वासेही घरघरायला लागली

बराच पुढे निघून आलोय मी आता
रामनाम सत्याशिवाय काही उरले नाही
मोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी
मला आता काही देणे घेणे उरले नाही

-गंगाधर मुटे

आत्मप्रौढी

मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणुन मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!
..........................................

आला राग
दिला राजीनामा
मिळाली रीलीव्हिंग डेट
चालू झाला नोटीस पीरीयड
भरला क्लीअरन्स फॉर्म
मिळाले रीलीव्हिंग आणि एक्सपीरीअन्स लेटर
लिहिला गुडबाय मेल
आता काही देणे घेणे उरले नाही

Proud

फ़टाकडी

तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ....... हृदयाच्या केंद्रस्थानी

तू असतेस..... तेंव्हा तू असतेस
तू नसतेस..... तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू

त्यामुळे.. हो त्याचमुळे....."त्या फ़टाकडीशी"
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही.....!!
..........................................................

तृप्ततेची चमक

तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे

जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही.....!!

- गंगाधर मुटे
..................................................

Pages