शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ३

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:29

बाजारात गेलो की भाजीविक्रेत्याने नीट शिस्तीत लावून ठेवलेली भाजी पाहून घेण्याची इच्छा बळावते. एखादी झाडावरची अक्कडबाज मिरची पाहून तिचा फोटो घ्यायचा मोह आवरत नाही. एखाद्याला भाज्या नीट कापून ट्रेमध्ये सॅलड डेकोरेशन म्हणून रचायची आवड असते. काढा असे काही सुंदरसे फोटो तुमच्या पोतडीतून झब्बूसाठी.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भाज्या

झाडाला लागलेल्या किंवा कलात्मक पद्धतीने मांडलेल्या भाज्यांचे फोटो इथे टाकावेत. भाज्या स्वत:च्या अंगणातल्याच हव्यात असा नियम नाही

2010_MB_Zabbu-Bhajya-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरचे पोस्टर मस्त आहे! रंगीबेरंगी मिरच्यांचा गुच्छ काय छान आहे.

ही माझी मिरची
IMG_0333.JPG

pumpkins.jpg

अर्रर्रर्र आज खतखतं करायला घेतलंय त्या आधी ओट्यावर मांडून ठेवल्या होत्या सगळ्या भाज्या..
आता गेल्या ना कुकरात शिजायला... उशीर करता राव विषय सांगायला... Happy

जागू, तुमच्या वरच्या पोस्टमध्ये दोन वेगवेगळे फोटो आहेत. ते एका पोस्टमधे एकच फोटो ठेवून दुसरा फोटो दुसर्‍या पोस्टमध्ये टाकाल कां?

नीधप, मी काढून ठेवला होता फोटो, कापलेल्या भाज्यांचा. (संध्याकाळी टाकतो.) काय आहे ना आपण सगळ्याचे फोटो काढून ठेवायचे. कधी कुठला विषय देतील, ते सांगता येत नाही !!

सगळ्यांचे फोटो झक्कास!

भाग्य, काय मस्त मस्त भाज्या आल्यात तुमच्या बॅकयार्डात. दुधी तर फारच छान दिसतोय.

काय आहे ना आपण सगळ्याचे फोटो काढून ठेवायचे. कधी कुठला विषय देतील, ते सांगता येत नाही !! >>> खरं आहे दिनेशदा! असचं केलं पाहिजे आता. Happy

सावली.. पोर्ट्रेट नाही.. टॉप व्ह्यू.... Happy

गिरी.. ते वरून लटकलेले हिरवे साप वाटतायेत..

आल्हाद.. मस्त फोटो..

Pages