Submitted by वर्षा_म on 30 August, 2010 - 00:35
इडलीच्या धाग्यावर इतक्या छान टिप्स पाहुन मला हा धागा सुचला. चला सगळ्यांनी आपापले आवडते टॉपिंग लिहा. आणि रेसिपी माहित असेल तर योजाटा आणी इथे लिंक द्या
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबौ!>>>>>> काकडी अन बटाटा
बाबौ!>>>>>>
काकडी अन बटाटा मी अजुन कधी केलं नाहिये.. पण घरात जी चव आवडेल ती बनवणं अपरिहार्य असतय.. त्यामुळे सोया सॉस चालतो.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याकने पिझ्झ्यात फरसबी ऐकल्यावर माझंही सेम असच झालेलं... पण आता काही वाटत नाही...
इथल्या पिझ्झा पाककृती वाचून
इथल्या पिझ्झा पाककृती वाचून एकाद्या इतालियन माणसाला भोवळ आली तर फरसबी हुंगायला द्यावी लागेल..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
.
.
आमच्या एका अमेरिकन मित्राने त्याच्या हाफिसातल्या चिन्याला ... 'अरे त्या मिंग (Oak Tree Road) सारखं चाननीज करायला शिका रे...' असं सांगितलं होतं, त्याची आठवण आली..
.
.
उद्या चिन्यानी श्रीखंड करतो असं सांगून त्यात गोगलगाई घालून केलं तर आश्चर्य वाटायला नको...
गोगलगायी??????????????????? इ
गोगलगायी???????????????????
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
पिझ्झा बेस दोन्ही बाजुने
पिझ्झा बेस दोन्ही बाजुने ब्राउन हवा असेल आणि तव्यावर करणार असाल तर आधी बेस दोन्ही बाजुने भाजुन घेता येइल.
बाकी रेसिपीज डबल ट्रिपल फ्युजन आहेत :प
गोगा
गोगा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
https://pcsitaly.wordpress.co
https://pcsitaly.wordpress.com/2011/03/11/common-pizza-toppings-in-italy/
इथे वाचा, बटाटा ओरिजिनल पिझ्झा टॉपिंग आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजपर्यंत पिझ्झ्यावर पाहिलेली, न आवडलेली टॉपिंग्जः शिजवलेला एल्बोपास्ता, पालक, पिकल्स (म्हणजे काकडी आली), अननस, अँच्योव्हीज, फ्रेश क्रॅनबेरीज.
हॅम-अननस काँबोमुळे हवाइयन पिझ्झा भयाण वाटतो.
समहाऊ बेसिलची ताजी पानं पिझ्झाटॉपिंग म्हणून चांगली लागली.
भारतात पिझ्झाहट सुरू झाल्याझाल्या मिळणार्या टॉपिंग्जमध्ये मिरचीच्या चटणीत मुरवलेलं पनीर असायचं. तेपण आवडलं.
माझी लेक मटकीचा ... कोबीचा
माझी लेक मटकीचा ... कोबीचा असे सर्व पिझ्झे खाते...whole wheat असल्याने मी पण खुश!!
कामाचा धागा आहे, आमच्याघरी
कामाचा धागा आहे, आमच्याघरी नुकतेच पिज्झाक्रांती घडत आहे, अन्यथा आधी बाहेरच खाणे वा ऑर्डर करणे व्हायचे, माझे दर महिन्याचे फूड कूपन्स फक्त पिझ्यातच जायचे. सध्या बेससाठी जवळच्या दोनचार बेकर्या आणि माँजिनीस ट्राय करून झालेय पण अजून चांगल्याच्या शोधात आहे.
मी खरे तर नॉनवेज लव्हर पण पिझ्झा मात्र वेजच हवा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आणि चीज तर कमालीचे नावडीचे, पण ते पिझ्झ्यातच शोभते या ठाम मताचा.
तुर्तास धाग्यात स्वतातर्फे भर टाकू शकणार नाहीच, पण येथील आयडीयाजचा लाभ उचलेन, त्या देणार्या सर्व आयडीजचा आभारी आहे
उद्या चिन्यानी श्रीखंड करतो
उद्या चिन्यानी श्रीखंड करतो असं सांगून त्यात गोगलगाई घालून केलं तर आश्चर्य वाटायला नको... >>>> यक्क.. आता श्रीखंड खाताना नेमक हे आठवणार..
फ्युजन रेश्पी लै डेंजर दिसत
फ्युजन रेश्पी लै डेंजर दिसत आहेत. इथे ठाण्यात पिझा एक्स्प्रेस म्हणून आहे. तेथील डो बॉल्स व पिझा पोलो फोर्जा म्हणून आहे तो फारच लिप्स्मँकिंग टेरिफिक अस्तो. थिन क्रस्ट. वूड अव्हन कि काय ते वापरतात. बरोबर पेस्तो, गार्लिक बटर आणि दोन प्रकारची ऑइल्स देतात. एक चिली व एक गार्लिक. ऑस्सम माउथ फील. वर बेसील ची पाने ही टा़कतात. ह्या ठिकाणी बरोबरीने मस्त कॉकटेल्स मिळतात व नंतर उत्तम आइस्क्रीम विथ मिंट. एकुणात एक संपूर्ण सुखी करणारा अनुभव.
इथे इतर पास्ता वगैरे पण चांगले मिळते पण पिज्जा रॉक्स. मी तर हे भेटल्या पासून चेनचे पिज्झ खाणे सोडलेच आहे. अडीनडीला डोमिनो. घरी मागवतो. पण तो अगदी पुअर रिप्लेसमेंट आहे पोलोफोर्जाची.
त्यात समोरच आयमॅक्स आहे त्यामुळे तुम्ही आधीच एक तास जेवणाचा गृहित धरून मग पुढचे सिनेमाचे तिकीट काढू शकता. पर्फेक्ट फन डे.
पिझ्झचे रेट काय आहेत ?
पिझ्झचे रेट काय आहेत ?
उद्या चिन्यानी श्रीखंड करतो
उद्या चिन्यानी श्रीखंड करतो असं सांगून त्यात गोगलगाई घालून केलं तर आश्चर्य वाटायला नको...>>>> गोगा .. ईईई .. आणि वर चारोळी बदामासारख काय झूरळ कुस्करून घालणार
.
पिझ्झा एक्स्प्रेस्स साठी अनुमोदन . तिथला चीजकेक पण मस्त आहे .
बनाना पाय मात्र अजिबात आवडला नाही . केळ्याच्या चकत्या होत्या त्यात . बनाना फ्लेवर्ड नव्हता .
आमचा घरी फेव. मार्गारिटा .टॉमेटो सॉस , बटर आणि भरपूर चीझ ( ब्रिटानिया ( की अमुल) च चेलिझा म्हणून मिळत .
रच्याकने , अमुलचा गार्लिक बटर मिळतो . चांगला आहे अस म्हणतात , मी अजून वापरला नाही.
गोगा आणि स्वस्तिला हकला बरं
गोगा आणि स्वस्तिला हकला बरं इथुन
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
गोगा , पुरणपोळ्या किन्वा
गोगा , पुरणपोळ्या किन्वा सुरळीच्या वड्या केल्या की काय काय घालता येइल बर ???? !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अय्याई ग! गोगांच्या कल्पनेला
अय्याई ग! गोगांच्या कल्पनेला स्वस्तिने अगदी चार चांद लावले....
सांगितलं असतं पण हाकलून
सांगितलं असतं पण हाकलून देण्याची शक्यता आहे..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
इथे seattle (usa ) मध्ये
इथे seattle (usa ) मध्ये canam पिझा ची chain आहे तो पिझ्झा कोणी try केला आहे का ?? भयानक tasty आहे
माँजिनीज चा 'मसाला कुल्चा'
माँजिनीज चा 'मसाला कुल्चा' नामक एक प्रकार २० रुपयांत मिळतो.
तो आणून डायरेक्ट तव्यावर वा मावेत थोडा गरम करून, थोडं टोमॅटो केचप व पिझ्झा मसाला भुरकवून खाऊन पहा.
हा अती स्वस्तातला पिझ्झा आहे, सुंदर चव.
केपि, Canam चा पिझ्झा एकदम
केपि, Canam चा पिझ्झा एकदम मस्त! देशी टॉपिंग्स - तंदुरी चिकन, पनीर वगैरे
हो खरे आहे. Seattle CAN AM चा
हो खरे आहे. Seattle CAN AM चा Pizza हे जगवेगळे प्रकरण आहे. आत्तापर्यंत आयुष्यात खाल्लेला चविष्ट pizza. पनीर बटर मसाला, चिकन टीका मसाला, पनीर आले लसूण मसाला पिझा. वा रे वा.
एका इटॅलियन signor ने पंजाबी कुडी शी लग्न केले तर त्यांच्या स्वयंपाक घरात जो पिझा बनेल तो अगदी हाच. Yum yum.
http://www.yelp.com/biz/can-am-pizza-bellevue
हो Canam चा पनीर बटर मसाला
हो Canam चा पनीर बटर मसाला माझ्या लेकीला खूप आवडतो. तो पिझ्झा आणुन पुन्हा १० मिनिट अव्हन मध्ये टाकायचा मस्त क्रिस्पी बेस होतो. जास्ती छान लागतो. बाकी व्हेजी पनीर, पालक पनीर पण छान आहेत
खरच!!मराठी कुडी ,अनुश्री
खरच!!मराठी कुडी ,अनुश्री sonuli इंडिया च्या बाहेर असताना असा tasty indian style pizza मिळणे हि spl treat आहे
इकडे पापा पाँचो नावाच्या
इकडे पापा पाँचो नावाच्या दुकानात पण असे ईंडियन फ्लेवरचे छान पिझ्झे मिळतात. ओक ट्री रोडवर
अंजली_१२ , papa panch (Oak
अंजली_१२ , papa panch (Oak Tree road ) चा पनीर माखनी पीझ्झा खाल्लाय, पण एवढा खास नाही वाटला . ठीकठाक आहे . पण तुमी कधी seattle ला जाल तर canam पिझ्झा नक्की taste करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जरूर
जरूर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केपि - मी seattle ला शिफ्ट
केपि - मी seattle ला शिफ्ट होतेय!!
नक्की हा पिझ्झा ट्राय करेन.
सीमंतिनी, पिज्झ्झेरिया मोझ्झा
सीमंतिनी, पिज्झ्झेरिया मोझ्झा म्हणत आहेस का? तिकडे जाणे टूडू लिस्ट मध्ये कधीचे आहे. गेले की लिहीन इथे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धनश्री ^^ all the best
धनश्री ^^ all the best
आणि तुमचा अभिप्राय पण सांगा ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे कोणी ब्रेडचा पिझ्झा केलाय
अरे कोणी ब्रेडचा पिझ्झा केलाय का? म्हणजे साधा ब्रेड स्लाईस तव्या वर भाजुन त्यावर किसलेले चीज व टॉपिन्ग्ज्स टाकुन वगैरे? पिझ्झा बेस मिळतोच इथे, कारण मॉन्जिनीज आणी पुना बेकरी दोन्ही जवळ आहेत, पण सहज गम्मत म्हणून करुन बघायचा आहे.
पाव आणि चीज आणि भाज्या हा
पाव आणि चीज आणि भाज्या हा प्रकार कोणत्या ही स्वरुपात खाल्ला तरी आवडतो...यम यम.फक्त स्वतःपुरता जेवण अजेंडा असेल तेव्हा व्हिट पिझ्झा बेस आणून बनवून खाते.
गेल्या ३ महिन्यात पिझ्झा खाल्ला नाही. क्लासिक वाला कुटुंबियांना आवडत नाही त्यामुळे आम्ही सगळे डॉमिनोची गादी खातो. ती पण आवडते.
Pages