या स्पर्धेसाठी संयोजक मंडळाकडून दोन व्यक्तींची नावे देण्यात येतील. त्यावरून प्रश्नोत्तरे स्वरूपात काल्पनिक संवाद लिहायचा आहे. जोडीतील व्यक्ती एकमेकांना प्रश्न विचारतील, म्हणजे सुरुवातीला व्यक्ती क्र.१, व्यक्ती क्र.२ ला ५ प्रश्न विचारेल. व्यक्ती क्र.२ या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल आणि त्यानंतर व्यक्ती क्र.१ ला ५ प्रश्न विचारेल.
नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. हा प्रश्नोत्तरे स्वरुपातील संवाद ही एखाद्या विशिष्ट विषयावरील चर्चा किंवा इतर काहीही काल्पनिक विषयावरील चर्चा असू शकते.
४. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
५. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
६. संवादासाठी दोन्ही मिळून कमीत कमी ५ आणि जास्तीत जास्त १० प्रश्नांची मर्यादा आहे. दिलेल्या विषयातील एका व्यक्तीने कमी आणि दुसर्याने जास्त प्रश्न विचारले तरीही चालेल.
७. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जास्तीत जास्त ३ ओळींपेक्षा जास्त नसावे. [कमी चालेल]
८. सगळे संवाद खुसखुशीत/चटकदार असावेत. प्रश्नोत्तरांमधून कोणतेही वाद अपेक्षित नाहीत. सामाजिक वाद निर्माण करणार्या प्रवेशिका बाद ठरवून, स्पर्धेच्या धाग्यावरून काढून टाकण्यात येतील
९. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
१०. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.
..
..
>>> सामाजिक वाद निर्माण
>>> सामाजिक वाद निर्माण करणार्या प्रवेशिका बाद ठरवून, स्पर्धेच्या धाग्यावरून काढून टाकण्यात येतील >>> अर्ध्या माबोकरांच्या कोअर कंपीटंन्सीवर घाला आहे हा..
मस्तं स्पर्धा आहे
मस्तं स्पर्धा आहे
संयोजक, हे चालेल का? नसेल तर
संयोजक, हे चालेल का? नसेल तर काढते इथून.
शाहिदः ए काय रे, मला तुझा चेहरा असा पडलेला का वाटतोय? ह्याचे कारण काय बरे असु शकेल? (सैफ कडे पाहून दात दाखवत डिचवत हसत)..
सैफः हि पोझ आहे कळले ना. उगीच दात दाखवायचे कारण नाही, समजलास ना. हसायचे दिवस माझे का तुझे हे तुला मी सांगायची गरज नाही. तु कशाला हसतोस रे? मला तर हे हसणे म्हणजे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट प्रकार वाटतो....
शाहिदः मी कशाला हसतोय? (पुन्हा जोरात हसत) कमाल आहे तुझी. अरे मित्रा फोडलस ना... (स्वःताच्या डोक्याकडे हात नेत) .. डोकं ....(थोडं थांबून म्हणतो) माझे नाही तुझे. (खूप हसतो). आ बैल मुझे मार हे ही एकले असशीलच. हे बघ देर आये पर दुरुस्त आये असे आहे माझे. मग आता काय पुढे विचार आहे?
सैफः (खाली मान घालत स्वःताशी पुटपुटत.. कसला विचार.. ह्म्म.. मी कशाला उत्तर देवू ह्याला माझ्या प्लॅन विषयी). ते राहु दे, सध्या तुला कसे वाटतेय?
शाहिदः कशाबाबत? मित्रा सुधार जरा... अरे झेपत नसताना आगीत उडी घेतलीस तू. बरं ..आजकाल ते 'वजन' घटवण्याच्या चर्चा खूप चालल्यात. ते तिथपर्यन्त ठिक आहे पण हे 'वजन'(पैशाचे पाकिट दाखवत) कधी घटलं तुला कळणार नाही , तेव्हा सावध रहा. बरे तुझा प्रश्ण काय होता विचार बघु परत जरा. नीट खुलासा कर तुला नक्की काय विचारायचे आहे.
सैफः सध्या तुला कसे वाटतेय? म्हणजे कुठल्याच चर्चेत नाहीस तू सध्या?(खालच्या आवाजात पुटपुटत..आधी तरी असा काय होतास कि चर्चा करतील लोकं म्हणा. ती होती म्हणून... होतं...)
शाहिदःकाय बोललास.. कसे वाटतेय मला? हलका फुलका... एकदम. (स्वःताच्या फोनवर स्टोरी रीडींगचा कॉल आला असे दाखवत..) चल सोड. निघतो मी. एका स्टोरी रिडिंगला जायचेय. तुला खूप शुभेच्छा. कधी गरज लागलीच तर आहे मी. भरपूर टिप्स आहेत.. (खालच्या आवाजात)छुटकारा मिळवण्यासाठी.
सैफ आणि शाहिद आउटडोअर शुट ला
सैफ आणि शाहिद आउटडोअर शुट ला गेले असताना सैफ च्या रुम ची किल्ली हरवते आणि मजबुरीनी त्याला थोडा वेळ शाहिद च्या रुम मधे थांबावं लागतं.
बराच वेळ दोघं काही बोलत नाहीत शेवटी शाहिद संवाद सुरु करतो:
शाहिद : सैफ, अता अलाच आहेस तर नुसती सिगारेट फुंकण्या ऐवजी काही संवाद साधला पाहिजे असं नाही वाटत तुला ?
सैफः गुड आयडिआ, व्हॉट अबाउट सवाल जवाब गेम ?
शाहिद : एक्स्प्लेन.
सैफ : मी तुला ५ प्रश्न विचारणार आणि तु मला ५ प्रश्न विचारायचे पण अट अशी कि उत्तर मुद्द्दाम धडधडीत खोटं द्ययचं, मनात जे असेल त्याच्या विरुध्द, मुद्दाम !
जर चुकुन दोघां पैकी एकानी खरं उत्तर दिलं तर तो हरला, त्याला दुसरा जे मागेल ते द्यावं लागेल.
शाहिद : अॅग्रीड, मी जिंकलो तर आय वाँट माय बेबो बॅक.
सैफ : ओके, मला काय पाहिजे एत मी विचार करून सांगीन.
शाहिदः डन !
सुरवात शाहिद करतो :
.......................................................................................................................
शाहिद :
अमृता सिंग आणि रवी शास्त्रीचं अफेअर होतं का?
सैफ: नाही, दे वेअर जस्ट गुड फ्रेन्ड्स !
शाहिद :
इटलिअन मॉडेल रोजाला तू करीनासाठी सोडलस का ?
सैफः नाही, रोजा वॉज जस्ट अ गुड फ्रेन्ड्, यु नो!
शाहिदः
करीना चा टॅटू काढून घेतल्याचा तुला पश्चात्ताप होतो का ?
सैफः नाही, करीना मला कधीच सोडणार नाही.
शाहिदः
अमृता सिंग आणि तुझ्या वयात किती फरक होता?
सैफः अमृता माझय पेक्षा १२ वर्षानी लहान आहे.
शाहिदः बेबो आणि तुझ्या वयात किती फरक आहे ?
सैफ : मी तिच्या पेक्षा १२ वर्षानी लहान आहे .
शाहिदः माझी आणि बेबोची जोडी तुझ्या आणि बेबोच्या जोडी पेक्षा चांगली दिसते का?
सैफ : हो .
शाहिदः ( खो खो हसत) " हा सहावा प्रश्न होता !!
सैफ चा चेहरा पडतो.
...................................................................................................................
पण अता सैफ ची टर्न असते.
सैफः
करीना तुझी ताई वाटायची का?
शाहिद : नाही.
सैफः अमृता राव बरोबर तुझी जोडी जास्त चांगली वाटायची का?
शाहिद : नाही.
सैफः विद्या बालन सारख्या 'काकु' बरोबर बेबोनी डंप केल्यामुळे फ्रस्ट्रेट होउन अफेअर केलस का ?
शाहिदः नाही
सैफः बेबोशी ब्रेक अप तुझ्या करिअर ला लकी आणि मला अनलकी ठरला का?
शाहिदः नाही.
सैफ ( शाहिद च्या नजरेत रोखून पहात) : माझी रुम ची किल्ली हरवल्याचं नाटक करून मुद्दाम तुझ्या रुम मधे बहाणा करून आलोय असं नाही वाटत तुला ?
शाहिद ( घाबरून) : नाही!
सैफ : आजची रात्रं मी इथेच घालवु ?
शाहिद : हो !
सैफ (छदमी हसत): हा सहावा प्रश्न होता !!
..............................................................................................................................
उसके बाद ... सेन्सॉर कट !!
नीट नियम वाचून मगच प्रवेशिका
नीट नियम वाचून मगच प्रवेशिका पाठवा/पोस्ट करा.
दीपांजली धमाल.
दीपांजली धमाल.
दोन्ही संवाद भारी
दोन्ही संवाद भारी
एकदम भारी
एकदम भारी
@दीपांजली>>>> सही
@दीपांजली>>>> सही
दीपांजली.... ग्रेट ! अगदी
दीपांजली.... ग्रेट ! अगदी कोपरापासुन नमस्कार
(No subject)
(No subject)
:p
गणेशोत्सव २०१० अंतर्गत
गणेशोत्सव २०१० अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी आहोत.
दिपांजली, __/\__
दिपांजली, __/\__
बापरे!!! दीपांजली... कसलं
बापरे!!! दीपांजली... कसलं लिहितेस.....ब्रिलियंट
मनःस्विनी, तुझे संवाद पण छानेत हं
दिपांजली.......... भन्नाट
दिपांजली.......... भन्नाट