गाव म्हणजे गाव असतं

Submitted by umeshutekar on 25 August, 2010 - 06:30

गाव म्हणजे गाव असतं
शहरात कधि गाव नसतं
सगळ्यांच गाव असलं तरी
तुमचं आमचं सेम नसतं

गाव म्हणजे गाव असतं
गावामध्ये सुखसोइ नसतात
तुमच्या गावी असल्या तरी
आमच्या गावी त्या नसतात

गाव म्हणजे गाव असतं
तिथे प्रेमाला नाव नसतं
तुमच्याकडे लव्ह असलं तरी
आमच्याकडे ते प्रेमच असतं

गाव म्हणजे गाव असतं
खुप मागासलेलं असतं
तेच तर खरं खाव असतं
सुधारलेलं ते शहर असतं

गाव म्हणजे गाव असतं
शहरापासुन लांब असतं
सह्याद्रीच्या कुशीत असतं
'वावे' त्याच नाव असतं

गाव म्हणजे गाव असतं
तिथं सगळ काहि स्लो असतं
जानं येणं पायीच असतं
म्हणून माझं गाव वेगळं असतं .

गुलमोहर: 

आपल्या कवीतेविषयी खूप बोलावं वाटतय पण.... एवढच म्हणेन की.... सॉलिड... खतरनाक... छान कवीता लिवली आहे आपण. असेच लिवत रहा... शुभेच्छा! फार जुने नसले तरी जुने दिवस आठवलेच...