हे सदया गणया तार : उपासक (प्रीती ताम्हनकर)

Submitted by संयोजक on 24 August, 2010 - 20:17

2010_MB_Ganesha2_small.jpg

मंडळी, स्वा. सावरकर यांच्या मार्सेलिस मधील ऐतिहासिक उडीला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली.
भारतातील एका सावरकर प्रेमी ने, ’सावरकर प्रतिष्ठान’ च्या अनुमतीने, सावरकरांना श्रद्धांजली च्या स्वरूपात त्यांच्या काही कविता स्वरबद्ध करून घेऊन, त्यांची गीते बनवून लोकांसमोर आणण्याचा संकल्प सोडला आहे. आणि ही जबाबदारी त्यानी माझ्यावर सोपविली आहे, हे माझे भाग्य!

स्वा. सावरकरांनी वेगवेगळ्या प्रकारांची काव्य/गीत रचना केलेली आहे. देशभक्तीपर गीतांबरोबरच समाज प्रबोधन पर ’लावणी’ देखील त्यात आहे, फटका आहे, आरती आहे, श्लोक आहेत, विविध वृत्तांचा वापर आहे.

पारतंत्र्यात समाजाच्या विविध घटकांची झालेली दयनीय अवस्था पाहून, १९०२ साली नाशिक येथे त्यांनी लिहिलेला ’हे सदया गणया तार’ हा धावा गणरायाला संबोधून आहे. लवकरच प्रकाशित होणा-या या गीत संग्रहात हे गीत असून त्याचे कामदेखील सुरू झाले आहे. वाद्ये वगैरे याचं सगळं रेकॉर्डिंग अजून व्हायचे आहे.

गीत-संग्रहामधे हे गीत पुरुष- आवाजात असेल, पण खास गणेशोत्सवा निमित्त, मायबोलीकरां समोर सादर करण्यासाठी आम्ही हे गीत प्रीति ताम्हनकर च्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आहे. अगदी थोडक्या वेळात हे रेकॉर्डिंग आम्हाला करावे लागले आहे. त्यामुळे त्यात काही त्रुटी आहेत त्यांच्या कडे आपण कानाडोळा कराल आणि ह्या गीताचं स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. पण निश्चितच प्रतिक्रिया जरूर कळवा.

श्री. अजय जोगळेकर यांनी वेळात वेळ काढून याचे संयोजन आणि तबला/keyboard/हार्मोनियम recording/mixing चे काम केले आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद!

गीत: स्वा. सावरकर
संगीत: उपासक
संयोजन: श्री. अजय जोगळेकर
गायन: कु. प्रीति ताम्हनकर

हे सदया गणया तार , तुझ्यावरी भार
तू मायबाप आधार ॥ धृ ॥

किती देशशत्रू भूतली
हृच्छत्रु सहाही परी
शापें वा सुशरे जाळी
तो ब्राम्हण आता खाई परक्या लाथांचा बा मार ॥१॥

देशावर हल्ला आला
पुरुष तो लढोनी मेला
स्त्री गिळी अग्नीकाष्ठाला
रजपूत्त परी त्या परवशतेचे भूत पछाडी, तार ॥२॥

अटकेला झेंडा नेला
रिपु कटका फटका दिधला
दिल्लीचा स्वामी झाला
तो शूर मराठा, पाही तयाचे, खाई न कुत्रे हाल ॥३॥

सावरकरांच्या संकलित कविता इथे उपलब्ध आहेत:
http://www.savarkar.org/content/pdfs/mr/savarkaranchi-kavita-mr-v002.pdf

धन्यवाद,
जय हेरंब!
-उपासक
http://www.jayheramb.com


विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपासक, सगळ्यात पहिले तुमचं मनापासून अभिनंदन Happy
इतकी मोठी जबाबदारी तुम्ही पार पाडताय......तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
प्रीतिच्या गाण्याबद्दल काय बोलायचं.....खूप खूप छान !!
संगीतही सुरेख झालंय !

वा, फारच सुंदर. उपासक, प्रीती, अजय, अनेक आभार आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

वा! मस्तच. गीत तर छानच आहे. चाल सुद्धा छान आहे. प्रीती सुरेखच म्हणते गाणी.
उपासक, प्रीती आणि अजय, सर्वांना धन्यवाद. Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद मंडळी..
अल्बम चं काम झालं की निश्चितंच कळवू आणि गाणी शेअर करायचा प्रयत्न करू..
तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवायला हरकत नसावी! Happy
जय हेरंब!!
उपासक, अजय, प्रीति.

फारच छान. Good Composition+Lyrics+Singing (त्रिवेणी संगम). उपासक, प्रीती आणि अजय तुम्हा सर्वांचे अभिनंदन!

वा! चाल सुंदर आहे आणि प्रितीनेही ती खूपच समजून गायलेय.
उपासक आणि प्रिती..तुम्हा दोघांचेही अभिनंदन!

धन्यवाद प्रमोद!
गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवातलं हे गाणं.. योगायोगाने मलाही ब-याच दिवसानी मायबोली वर यायला वेळ झाला आणि तुमची आजची प्रतिक्रिया आज वाचली!
गणरायाच्या आशिर्वादानं गीत संग्रहाचं काम आता पूर्ण झाले आहे आणि ३ सप्टेंबर ला त्याचं प्रकाशन होत आहे पुण्यात आणि अमेरिकेत एकत्र... (Thanks to Skype)..
गीत संग्रहात हे गाणं श्री. रविंद्र साठे यांच्या आवाजात record केले आहे. प्रीति दुसरं एक गाणं गायली आहे.. 'हिंद सुंदरा ती'.
गीत संग्रहा विषयी अधिक माहिती आणि झलक : http://www.jayheramb.com वर...
सर्व मायबोलीकरांना धन्यवाद! आणि लवकरंच या वर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात भेटू/बोलूच....
उपासक..

आपले मनःपूर्वक अभिनंदन.
या वर्षी टाकाल ना प्रीतिचे एखादे गाणे? तिची दरवर्षीची प्रगती पाहुन फार छान वाटते.

पुन्हा ऐकले आज. प्रसन्न वाटले. Happy