आपल्या सांगा विचारे कोण?(२)
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥ध्रु॥
आई तुझी मांगल्य घराचे
पण बाप,पप्पा अस्तित्व हो तुमचे
कळते तुम्हा दु:ख आईचे
पण आईस धीर असते बापाचे
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥१॥
आई मुलाला जन्म जेव्हा देते
सर्वथा कौतुक तीचेच होते
हॉस्पिटल बाहेर धावपळ ज्याची होते
त्या व्यस्त बापाची दखल कोण घेते
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥२॥
म्हणे जिजाईने शिवाजी घडवला
पण शहाजीने जिवाचा रान केला
राम जेव्हा वनवासी गेला
पुत्र शोकाने दशरथ हो मेला
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥३॥
मर-मर करुनी पैसे तो कमावतो
पण मुलगा सारे पार्टीत उडवतो
मुलींसाठी मान खाली घालतो
पण पोरीला बापाचा मान कुठे कळतो
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥४॥
आई जेव्हा सोडुनी जाते
आसवे त्याची जातात विरुनी
पोरांना तो पोटाशी धरुनी
रडतो बिचारा आतुन-आतुनी
कर्तव्याची ठेऊनी जाण,मनी त्याच्या असे भान,करतो एकाचे दोन...॥५॥
"लक्षात नसलेला बाप"
Submitted by निलेश उजाल on 23 August, 2010 - 08:30
गुलमोहर:
शेअर करा
वा! वा! छानच कवीता. फार
वा! वा! छानच कवीता. फार सुरेख!!!
चांगला प्रयत्न आहे.. छान.
चांगला प्रयत्न आहे.. छान.
आशय छान. जरा अधिक परिश्रम
आशय छान.
जरा अधिक परिश्रम हवेत. कविता फुलण्यासाठी.
थोडे व्याकरणाकडेही लक्ष द्या.
खुपच छान ...आवडली
खुपच छान ...आवडली
धन्यवाद
धन्यवाद