मायबोलीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by मंदार-जोशी on 21 August, 2010 - 16:15

ह.बा. यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांची ही रचना ह्या अशा कामासाठी वापरली जाईल Proud

पुढील रचनेची प्रेरणा सगळे सुज्ञ आहेत तेव्हा आपल्याला समजली असेलच.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मायबोलीत मोठा
चमत्कार आहे
अघोरी असा रोज
काव्यात्कार आहे

जरी शुद्धलेखनाची
बोंब तरीही
गुलमोहरात रोज
टायपात्कार आहे

कित्येक समजूत
घालून गेले
तरी निर्मिती रोज
भंगार आहे

दिसताच काव्यकमोड
बसता तयावर
होतो मग रोज
काव्यातिसार आहे

toiletsmiley.gif

जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे

जरी 'संघर्ष' संपला
एक तरीही
अशांशी रोज मायबोली
'झुंज'णार आहे

कवी हा नवा रोज
उगवे कसा हो
नवीन आय.डी. चा
अवतार आहे Light 1

मायबोलीत मोठा चमत्कार आहे>>>>>>>>>>>>> वाह

ही ओळ तरही साठी घेवून या कविराजाचा योग्य तो सत्कार व्हायलाच हवाय

>>बंडल भिक्कार कविता..... असली भिक्कार कविता गेल्या १०० वर्षात झालि नसेल.
एवढे उष्ण होऊ नका तुम्ही करून दाखवा एखादी शीत कविता पर्गोलॅक्सवाली

भिक्कार कविता.......... यानी लिहिलेलं सगळं तसं रद्दडच असतं... कंपू आहे म्हणुन चार प्रतिसाद मिळतात, झालं

शुद्धलेखनाची बोंब तर ...खरंच अगदी वाचवत नाही.

अहो असे चालायचेच. पूर्वी कुणितरी शुद्धलेखनाचे नियम घालून दिले ते आम्ही का पाळणार? आता आम्ही स्वतंत्र झालो आहोत, दुसर्‍या कुणाचे वर्चस्व आता आम्ही चालू देणार नाही. मनात येईल तस्से वागू, बोलू, लिहू!! आमच्या 'आन्त्रीक वेदनेचा हूम्कार', आमच्या कल्पना महत्वाच्या! त्या समजून घ्या जरा!!

Proud Proud

Pages