मायबोलीत मोठा चमत्कार आहे!

Submitted by मंदार-जोशी on 21 August, 2010 - 16:15

ह.बा. यांना स्वप्नातही वाटले नसेल की त्यांची ही रचना ह्या अशा कामासाठी वापरली जाईल Proud

पुढील रचनेची प्रेरणा सगळे सुज्ञ आहेत तेव्हा आपल्याला समजली असेलच.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मायबोलीत मोठा
चमत्कार आहे
अघोरी असा रोज
काव्यात्कार आहे

जरी शुद्धलेखनाची
बोंब तरीही
गुलमोहरात रोज
टायपात्कार आहे

कित्येक समजूत
घालून गेले
तरी निर्मिती रोज
भंगार आहे

दिसताच काव्यकमोड
बसता तयावर
होतो मग रोज
काव्यातिसार आहे

toiletsmiley.gif

जरी मारती रोज
बाटा तरीही (म्हणजे सुजाण मायबोलीकर रोज शाब्दिक चपला-बूट मारतात, तरीही...)
म्हणती टाटाचा
पुरस्कार आहे

जरी 'संघर्ष' संपला
एक तरीही
अशांशी रोज मायबोली
'झुंज'णार आहे

कवी हा नवा रोज
उगवे कसा हो
नवीन आय.डी. चा
अवतार आहे Light 1

स्वगत

हे माझ्या मित्रा

ही मंडळी तुझियावर का कोपीष्ट झाली आहेत हे मजला ठाऊन नाही. माझी तुझ्याचरणी प्रार्थना आहे , धैर्य सोडू नये, चिकाटीने लिहीत रहावे..

आपण दर मिहिन्यास चांदोबाचे वाचन करीत असाल तर त्यामधे प्रेतात बसलेल्या वेताळाची आणि राजा विक्र्मादित्याची जशी चिकाटी आहे अशीच वृत्ती मजला तुझिया ठायी दिसून येत आहे.. एक दिवस हे सर्व दुष्ट जन पराभूत होतील, चारी मुंड्या चीत होतील. तोपर्यंत हा मारा असाच चालू ठेव..

टाटांना सांग किरण आठवण काढत होता. ट्रकच्या मागे लिहायची वाक्ये (यमक जुळवून) लिहून दिली त्याचं पेमेंट कधी मिळेल तेव्हढं विचार... असं एखाद्याचं पेमेंत बुडवून दुस-याला कामावर ठेवणं टाटांना शोभतं का ?

किरण Biggrin

दिसताच काव्यकमोड
बसता तयावर
होतो मग रोज
काव्यातिसार आहे >> वा मस्तच .... काव्यातिसाराची साथच आली होती मागल्या आठ्वड्यात ... Happy

जमली बॉ

मंदारभौ, तुमची कविता मस्तच! Happy वास्तवावर मार्मिक भाष्य! दोन पैसे माझेही...

कुणी निंदा वा वंदा
जोशीयांचा मंदार हा
निद्राविग्रही कर्कश्य
एक चीत्कार आहे
Light 1 Proud

-गा.पै.

जरी शुद्धलेखनाची
बोंब तरीही
गुलमोहरात रोज
टायपात्कार आहे>>>>>आम्हीही त्यातलेच.

बेडकं हजारानी अंडी घालतात.. त्यातली एक दोनच चांगली निघतात.

वाघ सिंह गरुड मात्र एखादेच पिल्लु देतात, पण चांगले देतात..

आता सगळेच वाघ, सिंह, गरुड कसे होतील नै का? बेडूकदादा, तुझे मायबोलीवर स्वागत असो. Proud

नवकविंना नावे ठेवुन
स्वताचा वाहवाकार आहे

प्रतिसाद वाढवण्यासाठी
डोके चालवणार आहे

सर्वांनी वाचले नसतील समजुन
कविता वर आणायचा हट्टाकार आहे..

Pages