ही सगळी म्हातारी माणसे ……!

Submitted by प्रकाश१११ on 19 August, 2010 - 09:48

ही म्हातारी माणसे पक्की चालू असतात
कुणाकडून कसे काम करवून घ्यावे यात पक्के तरबेज असतात
तुमच्या चहाच्या टायमाला येतात
नि गपचीप चहा पिऊन निघून जातात

तुम्ही बाहेर निघालाल कि हे तुम्हाला बरोबर गाठतात
तुह्मी भाजी आणायला चाललात की हे थोडी भाजी आणायला सांगतात
खिशात हात घालून पैशे काढल्याचा बहाणा करतात
नि विसरलो विसरलो म्हणत छान सोर्री म्हणतात

एकदा हार्ड वेअरच्या दुकानात एक म्हातारा गेला
एक वायर ,होल्डर ,नि पिन द्या म्हणाला
दुकानदार पोराने हसत हसत सगळे दिले
म्हातारा केविलवाणे बघत पोराला म्हणाला
हे सगळे जोडून दिले तर बरे होयील रे बाळा

पोरगा वैतागून 'ना' म्हणाला
म्हातारा म्हणाला :-जरा कमी दिसतेय नाहीतर तुला सांगेल कशाला ?...
देवाचे पाय सोडून आजकाल तुमचेच पाय लागतात धरायला ../
म्हातारा वैतगला मस्त मस्त वैतागला
नि पोराला व्यवस्थित कामाला लावला

म्हातारा डगमगत डगमगत चालू लागला
त्याने किल्लीने कुलूप काढले ,दरवाजा उघडला हलकेच आत प्रवेश केला
दिवंगत पत्नीच्या फोटोकडे बघून केविलवाणे हसला
"बरे वाटतेना माझी गंमत बघायला ..?
किती किती लावतेस तोंड वेंगाडायला
माझ्या अगोदर जावून माझी गंमत बघतेस ..?
नि म्हातारा ढसाढसा रडू लागला
त्याला भास झाला : त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला
म्हातारा सावध झाला हलकेच म्हणाला
:रडायची सुद्धा एक सवय होऊन गेलीय बरका
तसा मी बेरकी नि बदमाश आहे पक्का
तुमची सहानुभूती मिळावी म्हणून हे सगळे सोंग करतो
नि कोणी बघत नाही असे बघू हलकेच डोळे पुसतो

म्हातारी माणसे काळोखात डोळे बुडवून बसतात
खोल खोल काळोखात हलकेच बुडून जातात ?
सांगा हि म्हातारी माणसे खरेच चालू असतात..?
कि जगण्याचे कसेबसे सोंग करतात ..????

गुलमोहर: