किलबिल : लहान मुलांसाठी गुणदर्शनाचे कार्यक्रम

Submitted by संयोजक on 18 August, 2010 - 19:47

Kids-Activity-Poster_2010.jpg

मायबोलीच्या गणेशोत्सवाची जशी मोठे मायबोलीकर वाट बघत असतात तशीच आपली छोटी दोस्तमंडळी म्हणजेच भावी मायबोलीकरही वाट बघत असतात. अहो का म्हणून काय विचारताय? हीच तर वेळ असते ना त्यांना आपले कलागुण जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत दाखवायची. अर्थात मायबोली ही ह्या बच्चेकंपनीला कधी निराश करत नाही. आबालवृद्धांपासूनच सगळेच उत्साहाने सर्व स्पर्धा, कार्यक्रमात सहभागी होतात.

यावर्षी आम्ही या छोट्या मायबोलीकरांकरता स्पर्धा न ठेवता निरनिराळे कार्यक्रम ठेवले आहेत. यात या चिमुकल्यांनी म्हटलेलं गणपतीचं स्तोत्र/गाणं/आरती तसंच बाप्पाचं चित्रं किंवा निबंध असं काहीतरी आमच्याकडे नक्की पाठवा.

कार्यक्रमासंबंधी काही नियम:

१. ह्या कार्यक्रमात फक्त मायबोलीकरांची वय वर्षे १५ पर्यंतची मुलेच भाग घेऊ शकतात. इतर नातेवाईक नाहीत. (पुतण्या, भाचा इ.)

२. कार्यक्रमात भाग घेताना सगळ्या विभागात भाग घेऊ शकतात परंतु एका विभागात फक्त एकदाच भाग घेता येईल. उदाहरणार्थ - एकच निबंध किंवा एकच चित्र.

३. कार्यक्रमात आपल्या पालकांच्या आयडीनेच भाग घ्यायचा आहे.

४. चित्राबरोबर मुलाचे/मुलीचे संपूर्ण नाव आणि वय लिहावे. ज्यांना आपल्या पाल्याचे संपूर्ण नाव जाहीर करायचे नसेल त्यांनी फक्त पहिले नाव लिहिले तरी चालेल. गाणी/स्तोत्र पाठवताना ऑडिओ फाईल (mp3 फॉरमॅटमध्ये हवी) sanyojak@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. त्यावर पाल्याचे नाव, वय लिहावे तसेच पालकांचा मायबोली आयडी लिहावा.

५. चित्राचे माध्यम देणे अपेक्षित आहे. (स्केचपेन, वॉटरकलर, पेंटब्रश इ.)

६. चित्र रंगवलेले नसेल तरी चालेल.

७. चित्र काढताना पालकांनी मदत केली असेल तर तसे स्पष्ट लिहावे.

८. गाणी/स्तोत्र/आरती पाठवताना फक्त ऑडिओ स्वरूपातच पाठवावे (फक्त mp3फॉरमॅट मध्येच पाठवा). व्हिडिओ अपेक्षित नाहीत.

९. हे प्रोत्साहनपर कार्यक्रम आहेत, स्पर्धा नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
*****************************************************

कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काय कराल?

१. आपल्या पाल्याने काढलेले चित्र/निबंध स्कॅन करावे लागेल.

२. "मायबोली गणेशोत्सव २०१०" ह्या ग्रूपचे सभासद व्हावे लागेल आणि नविन लेखनाचा धागा उघडावा लागेल. तसेच शब्दखुणा मायबोली, मायबोली गणेशोत्सव २०१०, किलबिल सांस्कृतिक कार्यक्रम ह्या टाका. नंतर धाग्याला सार्वजनिक करा. या नवीन धाग्यावर आपल्या मायबोली आयडीनेच चित्र/निबंध टाकायचे आहे.

३.स्पर्धेमध्ये चित्र/निबंध पाठवण्यासाठी आपल्याला माझे सदस्यत्व मध्ये जाऊन 'खाजगी जागेत' चित्राची/निबंधाची इमेज फाईल अपलोड करावी लागेल. त्या फाईलचे आकारमान १५० kb इतकेच असावे. छायाचित्राची लांबी रुंदी ५०० x ५०० पिक्सेल्स अशी हवी.

४. आता प्रतिसाद देतो त्या चौकटीत चित्राची इमेज अपलोड करा. खाली पाल्याचे नाव आणि वयोगट लिहा.

५. प्रतिसाद तपासून सेव्ह करा.

प्रवेशिका स्वीकारण्यास गणेश चतुर्थीला सुरूवात होईल व अनंत चतुर्दशीपर्यंत स्वीकारल्या जातील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीच्या परिवाराला सामावून घेण्यासाठी तसेच त्यांच्या अंगी असलेल्या कलांची झलक इथल्या इतर मायबोलीकरांनाही दिसावी यासाठीच छोट्या भावी मायबोलीकरांकरिता हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्याला या बच्चेकंपनीने छान प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्यासाठी या बच्चेकंपनीला व त्यांच्या पालकांनाही संयोजक मंडळाकडून मनापासून धन्यवाद आणि त्यांनी केलेलं गुणदर्शन सगळ्यांच्याच पसंतीस उतरलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

Pages