मैत्र जीवांचे.....

Submitted by पार्थ देसले on 18 August, 2010 - 01:59

चार क्षणांचा संवाद
दोन मित्रांना जोडतो
सातजन्माचा आनंद
एका मैत्रीत मिळतो

कधी रुसवा-फुगवा
कधी हास्याची लकेर
केवळ मैत्रीत साधतो
संवादाचा पूल

जेव्हा काळोखाचे ढग
येता जीवनी दाटुनी
मैत्री बनते आधार
पावलो पावली

मैत्री नसावी कापूर
क्षणार्धात जाळणारी
मैत्री असावी एकज्योत
जळता जळता उजळणारी
- पार्थ देसले 1280602026.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे अमित, तू न विटता प्रत्येक कवितेवर प्रतिसाद देतोस ना; म्हणून तसे म्हटलेय त्यांनी! अमित..अविट.
बरीय. कमलाकर देसलेंचे तुम्ही कोण?

छान.