शब्द भाग १ नाट्य्.....जयनीत दिक्षित

Submitted by जयनीत on 12 August, 2010 - 12:25

वकिला च्या ओफिस चा सेट,
(वकिल काम करतोय,इतक्यात दोन माणसे धाड्कन दरवाजा ढकलून आत येतात आणि खुर्च्या ओढुन बसतात, न विचारता)
वकिल -(त्रासिक चेह-यानी)अ
एक माणुस्-आम्ही सावरगाव हून आलो.
वकिल- ह बोला.
दोन-आमची केस आहे ना तुमच्या कडे?
वकिल -तुमची केस कोणती?
एक -तीच कब्जा ची प्रोपरटी ची.
वकिल - हो. पण तुम्ही कोण?
दोन-अहो त्या केस मधे तुम्ही आमच्या विरोधात आहात.
वकिल- मग तुम्ही इथे कसे?
एक- ही भेट आणलीय तुमच्या साठी आमच्या साहेबानी पाठ्वलीय्?(एक लिफाफा टेबल वर ठेवतो)घ्या बघुन.
वकिल - ही भेट माझ्या साठी,कशाला?
दोन - जरा आमच्या केस च बघा कमी जास्त करा काही तरी.
वकिल - कमी जास्त?
दोन - हो आमच्या फेव्ह्रर मधे निकाल लागेल अशी काही तरी तोड काढा.
वकिल- त्या साठी ही भेट?
एक - हो(दोघही हासतात)
वकिल -नाही. हे मला जमणार नाही.
एक -अहो जमउन टाका वकिल साहेब.बघा तर एकदा भेट कशी अन किती मोठी आहे ती.अन काही कमी जास्त वाटले तर तेही सान्गा.ते ही जमउन देउ,पण नाही म्हणु नका.
वकिल - कमी जास्त चा प्रश्न्न नाहीय्,पण खरच सान्गतो ,मला जमणार नाही.मी माझ्या अशीलाला फसवू शकणार नाही,मोठ्या विश्वासानी त्यानी केस सोपवलिय माझ्या कडे,शक्य नाही.
दोन -अहो आपण काम कशासाठी करतो वकिल साहेब पैश्या साठीच ना,मग जिन्कण्या साठी असो की हारण्या साठी पैश्या शी मतलब्.बघा जमउन द्या एवढ काम.
वकिल - पुन्हा एकदा सान्गतो,शक्य नाही.
(क्रमश:)

गुलमोहर: