अंगण - वाडी - सिताफळ

Submitted by एक पाकळी on 10 August, 2010 - 01:58

सिताफळ

सिताफळ हे माझे सर्वात आवडते फळ. अत्यंत गोड.

sitaphal1.jpg

सिताफळाच्या झाडाला प्रथम फुले येतात.

phul2.JPGphul3.JPG

उमललेले फुल
sitaphalphul.jpg

ह्याच फुलाला मग फळे धरतात.
sitaphal2.jpgphal.JPGphal2.JPGsitaphal3.jpg

पाने
sitaphalpane.jpgpane.JPG

गुलमोहर: 

लहानपणी आम्ही सिताफळीचे फुल खायचो काजु खातो करत. कारण त्याची पाकळी साधारण काजु सारखी असते.
सिताफळाच्या बिया वाटून शिकेकाई सोबत लावतात. त्यामुळे केसांची वृद्धी होते. सिताफळ हे थंड फळ आहे.

खुप छान वाटले photos पाहुन. माझ्या आजोबान्चि सिताफळाची शेति आहे रांजणगावाला. तिथे फिरुन आल्या सारखे वाटले. धन्यवाद!

सिताफळाच्या बिया वाटून शिकेकाई सोबत लावतात. त्यामुळे केसांची वृद्धी होते.

जागु, माझ्या माहितीप्रमाणे सिताफळांच्या बियांमुळे केशवृद्धी होत नाही तर केसातल्या उवा/लिखा मरतात. उवांसाठीचे जे औषध असते त्यात बहुतेक वेळा सिताफळांच्या बिया वापरलेल्या असतात.

सिताफळ खुप थंड आहे. मी एकदा एपिएम्सीमधुन भरपुर सिताफळे आणली होती. ती खराब होतील म्हणुन फ्रिजमध्ये ठेवली. १५ दिवस सर्दीने आजारी होते नंतर.. Happy

सर्वांना धन्यवाद. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे फळांचे भाज्यांचे औषधी वनस्पतींचे झाडे झुडपे आहेत. पण प्रोब्लेम हा आहे की माझा मोबाइलचा कॅमेरा कधी-कधी साथ देत नाही. तेवढे कृपया समजून घेणे.