उरलेल प्रेम... भाग ३

Submitted by किश्या on 6 August, 2010 - 01:30

http://www.maayboli.com/node/18410 भाग १ साठी.
http://www.maayboli.com/node/18421 भाग २ साठी.

"मला झोप येत नाही."
"अरे पण मला झोपु दे ना."
"उठ ना, आपन छान गप्पा मारु"
"ये बाई, जाउन झोप आता. आजोबांनी पाहील ना, तर मग माझी चंपी करतील. तुला काय होतय म्हणायला? जा गपचुप, अनं झोप."
ती थोड्या तनक्यातच निघुन गेली.
'च्यायला काय पोरगी आहे. काळ वेळ काही कळतच नाही. झोपीच पार खोबरं करुन टाकल.'
"हं.... अवघड आहे."
मग मी माझ्या मनालाच बोलत होतो.
'काय विज्या कशी आहे, आणी म्हणे तुला आवडली आहे, रात्री अपरात्री फीरते, बीनधास्तच आहे'
'अरे मग काय झालं? अरे ती मुंबईची आहे, ह्या सवयी असणारच तीला'
'एक काम कर'
'काय'
'तिच्या नादी लागु नकोस'
'का?'
'अरे तु तीच्या type चा नाहीस'
'तुझही म्हणन बरोबर आहे. '
'मग माझच ऐक, तिचा नाद सोड'
'जा तु आता, झोपु दे मला'
****************************************************
सकाळी चहा झाल्यवर लगेच प्पपाचा आवाज आला.
"आज रसीकाला शेत दाखवायला घेउन जा"
"ठीक आहे."
मी आज घरीच आंघोळ करुन. पटकन आवरुन बसलो होतो. रसीका अजुन आवरतच होती. एकदाच तीच आवरुन झालं.
"चलं"
थोडस गावाबाहेर गेल्यावर तीने बोलायला सुरवात केली.
"सॉरी. काल रात्री राग आला का तुला?"
"नाही."
"नाही रे. थोडस माझच चुकत आहे, तुझी अनं माझी ओळख नसताना मी तुझ्याशी जास्तच.......free वागत आहे. अरे काय करु एक तर मला खेड्याच वातवरण माहीत नाही, ही माझी पहीलीच वेळ आहे."
"रसीका तुझ खर आहे, पण तुला खर सांगु का, एकदम खरं"
"हं"
"मला हे तुझे कपडे घालेणे. तुझा हा जास्तच मोकळेपणा आवडत नाही. पण हा माझा problem असु शकतो. कारण मी कधीही या गावाच्या बाहेर गेलो नाही. मला बाहेरच जगं माहीत नाही. please गावात असे पर्यंत असे कपडे वापरु नकोस."
"तु ना......"
"मी असाच आहे. तुला राग आला असेल तर सॉरी. पण गावात असलं काही चालत नाही."
"बरं बाबा ठीक आहे. बरं आपन चांगले friend आहोत ना?"
"माहीत नाही."
"बरं. मला सांग तुझ्या बद्द्ल सगळं खरं खर"
"ओके"
"मी B.Sc.(IInd) year ची exam दिली आहे. आणी... आत्ता.... टाईमपास करत आहे. आणी मला एक I.T. developer बनायच आहे."
"plan छान आहे"
"तुझ काय"
"मी ना. ईंनटेरीअर डीझायनींक करते."
"खुप friends असतील ना तुला?"
"हो आहेत की पण जवळच अस कोणी नाही."
"का? कोणी boyfriend वगैरे कोणी?"
"का? असं का विचारलस?"
"असच"

बोलता बोलता आमच शेत आलं. शेतात अस काहि खास नव्हतं. उगाचच इकडे तीकडे भटकत दिवस काढला. बराच वेळ मी शांत होतो. काय बोलनार? डोक्यात विचारांची गर्दी वाढली होती. का कुणास ठाउक. पण काही तरी होत होत, मनात. सारख तीच्या कडेच बघावस वाटत होत.
खरं तर अस कधी झाल नव्हत मला. तिच बोलन, तीच चालन, तिची lifestyle एक वेगळीच होती. कधी ही न पाहीलीली न अनुभवलेली. तीच एक वेगळच विश्व होत. मला तर भरपुर प्रश्न पड्ले होते.
मला त्या विश्व डोकवायला मीळेल का? काय असेल हीच्या मनात? काय विचार करत असेल ही. माझ्या बद्द्ल? मला तिच्या सारख वागता येईल का? अजुन बरेच काही.........

"अरे वीजु,समोर बघ ना किती मोठा साप आहे, अन तु कुठे बघत आहेस?" जोरात ती ओरडली अन माझ्या मागे आली. मी चपापुन पाहील तर खरच एक मोठा साप होता समोर अगदी २ फुटावर.
"शांत उभा ठाक, तो नीघुन जाईल."
आणी खरच तो नीघुन गेला.
"मी तर घाबरलेच होते. मला सवय नाही याची. कधी नाही पाहीला असा साप उघड्यावर. बाप रे."
"अग काही नाही हे दररोचच आहे. शेवटी त्यांनाही भीती असते आपली."

ती नुसतीच बघत होती माझ्याकडे. का ते माहीत नाही.
नंतर थोड पुढ गेल्यावर नांगर टीच रान लागल. अन तीला चालताच येईन. तीचे नाजुक पाय पार सोलवतुन गेले होते. मी तरी काय करनार? तीलाच भारी उत्साह शेतात येण्याचा.
"मला बीलकुल चालता येत नाही काही तरी कर ना रे"
"ठीक आहे."
गड्याला बैल गाडी जुंपायला सांगीतली अन गाडी घेउन गावाकडे तिला घेउन नीघालो.

मी आता बर्‍यापैकी मोकळा झालो होतो तिच्या सोबत. परकी वाटत नव्हती आता. तीची मात्र बडबड रस्त्याने चालु होती. ती सगळ मुंबईच वर्णन सांगत होती आणी मी तिच्या डोळ्यातुन मी मुंबई बघण्यात दंग होतो.
"विज्या अरे ये विज्या" मोठा आवाज आल अन मी भाना वर आलो.
अभय होता. खेळ चालु होता.
"काय रे कुठे गेला होतस?"
"मी का?"
"नाही मी" सगळे त्या बरोबर हसले. रसीका सुद्दा. थोड कसतरीच वाटलं.
"अरे काही नाही शेत दाखवायला घेउन गेलो होतो हिला?"
"हिला?? कोण ही?"
"अरे प्पपाच्या मीत्राची मुलगी आहे. मुंबई ची आहे. रसीका हिच नाव."
"hi"
"हा अभय चल नंतर भेटु"
"घरुन लवकर ये, मला तुझ्याशी बोलयच आहे" अभय पटकन म्हणाला.
त्याच्या नजरेतुन त्याला काय विचारायच आहे हे मला कळाले.
"चल भेटु नंतर"
संध्याकाळी गेलोच नाही बाहेर. गच्चीवरच बसुन होतो. रसीका सोबत गप्पा मारत.
"तुला रात्री झोप का येत नाही? नीशाचर आहेस का?"मस्त हसली.
"नाही रे, टि.व्ही. बघायची सवय आहे."
"ok. चल आपन एक challenge. लावु."
"काय?"
"आज रात्री दोघांनीही झोपायच नाही. जो पहील्यांदा जो झोपेल तो सकाळी दुसर्‍याला चहा करुन देईल,ओके?"
"ओके"

जेवन झाल्यावर मी आणी ती दोघही गच्ची वर गेलो. अन मग काय गप्पा सुरु झाल्या. खुप खुप खुप नुसतीच बडबड करत होती. एक वेळ अशी आली की कोणीच बोलल नाही.
"एका प्रश्नाच उत्तर देशिल का? पण खर खर सांगायच हं?"
"हं....."
"तुला boyfriend आहे का?"
"तुला काय वाटतं?"
"असावा"
"....."
"होता."
"होता.कस काय?"
"मेला"
"मेला?" मी अस दाखवल की मी खुप दुखी: आहे. खर तर मी खुप खुश झालो होतो. चला वाट मोकळी झाली.
"नाव काय होत त्याच?"
"आनंद. घराच्या जवळच रहात होता. एके दिवशी कॉलेज वरुन येता येता बाईक वरुन पडला आन जाग्यावरच गेलां." तीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आता मात्र मला थोडस वाईट वाटलं. मी तो वीशय तीथेच सोडुन दीला. ५ मिनीट सगळच शांत होत. रातकीड्यांचा आवाज आन वर आकाशात टीपुर चांदण. बस.........
रात्रीचा १ वाजुन गेला होता. गुलाबी थंडी सुरु झाली होती वर आकाश्यात आकश गंगा सुद्दा दिसायला सुरुवात झालि होती. पण आमच्या गप्पा सुरुच होत्या. मी प्रथमच एका मुलीशी इतका वेळ गप्पा मारत होतो. हे तीला सांगितल्यावर ती खळखळुन हसली. ती आता परकी वाटतच नव्हती. अस वाटत होत की ती बरीचशी मझ्या सारखी आहे. सगळे विषय चघळुन झाले होते. नंतर मझ्याच ल़क्षात आले की हीला जरी सवय असली तरी आपल्या घरी वातावरण तेवढस मोकळ नाही. प्पपा मलाच बोलले असते. शेवटी मीच म्हाणालो,
"चल मीच हरलो. खाली जा अन झोप."
"का रे"
"हे बघ तुला खर खर सांगु का?"
"हं......"
तीची हि स्टाईल मला फार आवडायची.
"अरे सांग ना."
"हे बघ तु आमच्या कडे पहील्यांदा आलीस. तु खुप मोकळ्या स्वभावाची आहेस. पण घरच वातावरण तस मोकळ नाही. तुझ bad impression मला आवडनार नाही. तु जा आता मी सकळी तुला चहा करुन देईल."
"बरं ठीक आहे. पण एक promiss कर."
"काय?"
"हेच की तु मला सकाळी नदीवर घेउन जाशील."
"नाही."
"हे बघ बर्‍याबोलाने ऐक नाहीतर मी आता जोरात ओरडेल."
"महाराणी, जशी आपली आज्ञा. पण क्रपया आता झोपा...."
आणी आम्ही दोघही खुप जोरात हसलो. मी सहजच रेडीओ लावला तर गाणे चालु होते.
'अभी ना जाओ झोडकर के दील अभी भरा नही...........'

क्रमश............................
*****************************************************
टीप :- माझी पहीलीच वेळ आहे कथा लिहण्याची. ही कथा थोडीशी काल्पणीक आसुन बरेच काही सत्य आहे. जर तुम्हाला ही कथा रटाळ वाटली किंवा भरकट आहे असं वाटल तर क्रपया आपल्या सुचनांच स्वागत आहे. अपेक्षा ठेवतो की तुम्ही मार्गदर्शन कराल.

गुलमोहर: 

जबरदस्त यार..........................
पुन्हा भेटु पुढच्या सदराला.

एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स.....................
मस्त मान्डणी आहे कथेची....... Happy पुढचा भाग आता....

मला हे तुझे कपडे घालेणे(?????)तुझा हा जास्तच मोकळेपणा आवडत नाही.:अओ:
>>>>मला हे तुझे असले कपडे घालेणे, तुझा हा जास्तच मोकळेपणा आवडत नाही.

बाकी कथा मस्त.. पु. ले.शु.