Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला सांगा, नेटवर दिसणार्या
मला सांगा, नेटवर दिसणार्या फोनच्या किंमती आणि डीलरकडे असलेली किंमत यात फरक असतो का? महाग असतात का डीलरकडे? असतील तर किती?
अहोंची नवीन फोनची खरेदी झाली काल, आणि मग नेटवर बघितलं तर चांगलाच महाग मिळालाय डीलरकडे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
कार्बनचा आहे. १००००.
एरवी बर्याच गोष्टी आधी नेटवर बघून मग आणतो आम्ही, पण कालच कशी काय कोण जाणे, खरेदी करूनच आलो. अहोंच्या मित्राने एका दुकानातून कॅनव्हास लाईट ९००० ला घेतला म्हणून आम्ही त्या दुकानात गेलो. फसलो की काय असं वाटतंय आता. चिडचिड
डिलर ला एमआरपीच्या २० - २३ %
डिलर ला एमआरपीच्या २० - २३ % कमी किंमतीत मिळातो
आता सोनी आयओन २२३००/- आहे एमआरपी परंतु २०५०० हजारात पर्यंत सहज उपलब्ध होईल
मुख्य डिस्ट्रीब्युटरल ला तो १७६०० +१ १२.५% व्हॅट = १९८००/- या किंमतीमधे आला..
आता तो डिलर ला देताना किमाल २०० ते ३०० रुपये वाढवुन सांगेल म्हणजे डिलर ला तो २०००० पर्यंत येईल
डिलर लहान दुकानात देताना जास्तितजास्त १००- १५० रुपये वाढवणार ( कारण लहान दुकानदारनांकडे लगेच विकला जात नाही ) त्यामुळे मार्जिन कमीच असते.. याचा अर्थ दुकानदाराला२०३०० पर्यंत येतो
मग तो दुकानदार समोरचे कस्टमर बघुन एमआरपी वरुन किती सवलत द्यायची आहे हे बघतो
प्रॉब्लेम असा आहे की डीलरने
प्रॉब्लेम असा आहे की डीलरने कॅटलॉगमधून सांगितलेली किंमत ११३०० होती. आम्हाला १०००० ला दिला. नेटवर ७५०० पासून किंमती दिसतायत. रिलायन्स डिजिटलमधे ८००० की ९००० ला आहे. मग नक्की काय असेल?
नेटवर ७५०० पासून किंमती
नेटवर ७५०० पासून किंमती दिसताय >>>>>>>>> मॉडेल वेगवेगळॅ असते ...... एकाच प्रकारात दोन तीन मोडेल असु शकतात
आता सॅमसंग ग्रँडचे दोन मॉडेल आहे एक छोटा एक मोठा साईज चा आहे
कॅनव्हास चे २ -३ मॉडेल आहे एकात मेमरी कमी आहे दुसर्यात एचडी नाही आहे ..तिसर्यात सगळॅ काही आहे
ओके.
ओके.
@समिता Karbonn A15 (rs.5300)
@समिता Karbonn A15 (rs.5300) वर मायबोली पाहता येते ,रिव्ह्यु येथे आहे "http://www.gogi.in/karbonn-a15-review.html". A11(rs.7500) . नोकिआ , ,सोनी यांचे फोन महाग आहेत पण काम चोख .चायनिज फोनची RAM खोटी असते आणि डाउनलोड मेमरी काडवर जात नाहीत .
डाउनलोड मेमरी काडवर जात नाहीत
डाउनलोड मेमरी काडवर जात नाहीत . <<<<<<<<<< अहो त्यासाठी ३.५ नंतरचा अँड्रोईड व्हर्जन लागतो
२.३ व्हर्जन मधे सिलेक्टेड अप्लिकेशनच मुव्ह करु शकतो आपण ...
४.० नंतर बहुतेक सगळे अॅप्लि मुव्ह करु शकतो आपण
धन्यवाद.... पण Karbonn /
धन्यवाद....
पण Karbonn / मायक्रोमॅक्स चांगलेआहेत का? म्हणजे हे फोन घ्यायला भिती वाटते
शाहिर, मायक्रोमॅक्स कॅन्व्हास २ कितीला आहे?
तसेच नेट्वर घेणे चांगले कि दुकानात?
मी मायक्रोमॅक्स कॅनव्हास२
मी मायक्रोमॅक्स कॅनव्हास२ १०,५०० ला घेतला. ७ महिने झाले. छान सुरु आहे. कस्टमर सर्विस सेंटरवर सर्विस व जेलीबीन अपडेटही कंपनीने दिले.
दुकानातून घ्या. पक्की पावती घ्या.
धन्यवाद इब्लिस..... पण नेटवर
धन्यवाद इब्लिस.....
पण नेटवर रिव्हु चांगले नाहित
ब्लु टुथ चांगले चालते का?
Samsung galaxy s duos कसा आहे?
इब्लिस, फोन तापतो का? चार्ज
इब्लिस,
फोन तापतो का? चार्ज केल्यावर, सतत जास्तवेळ वापरल्यावर?
खुपच प्रश्न पडलेत ना.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चार्ज केल्यावर बॅटरी थोडी गरम
चार्ज केल्यावर बॅटरी थोडी गरम होते.
सतत वापरून प्रोसेसर गरम होतो.
कॉम्प्युटर वा लॅपटॉप सारखेच आहे ते.
हे सग्ळ वाचल्यावर मला मी
हे सग्ळ वाचल्यावर मला मी आदिवासी असल्यासारखे वाटते आहे.
धन्यवाद..... घेतला कि कळवते
धन्यवाद.....
घेतला कि कळवते ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कार्बन आणि मायक्रोचे रिवह्यू
कार्बन आणि मायक्रोचे रिवह्यू गोगी राणा याने केले आहेत त्यात त्यांचे खरे स्पिड आणि रैम दिलेले आहेत तसेच कोणते व्हिडिओ बघू शकतो ते पण लिहिले आहे . यांचे महागडे फोन पैसा वसूल नाहीत .सहा ते आठ हजारातले ४.० अॅन्डरॉइड घ्यायला काहीच हरकत नाही . एकमात्र चांगली गोष्ट त्यांनी किंमती उतरवायला भाग पाडले .तसे चांगल्या कंपन्यादेखील काही बटाटे बनवतात .
तसे चांगल्या कंपन्यादेखील
तसे चांगल्या कंपन्यादेखील काही बटाटे बनवतात .
<<
सहमत.
नोकिया इज वर्स्ट.
रंगीत मोबाईल यायच्या काळातली गोष्ट आहे.
कॅमेरा असेल, तर रेडिओ नाही. रेडिओ असेल तर कलर नाही. हे असेल तर फ्लॅशलाईट नाही. तो असेल तर एमपी३ वाजणार नाही. असल्या रेस्ट्रिक्टेड नोकिया फोन्सची किम्मत १०-१० हजारात होती. कारण एकच. भारतीयांची ब्रँड लॉयल्टी अन इंपोर्टेडचे खूळ.
त्याच वेळी चायनाचे 'इंपोर्टेड' टच स्क्रीन फोन, टिव्ही देखिल दाखवत ६-८ हजारात मिळायला लागले होते. मी स्वतः बिगर ब्रँड वाला चायना ३ वर्षे वापरलेला आहे, अन तो फोन अजूनही उत्तम चालतो. वापरात नसल्याने कुठेतरी ड्रॉवरमधे पडलेला असेल इतकेच.
फायनली काल माझ्या नोकियाने
फायनली काल माझ्या नोकियाने पाण्यात अंघोळ केल्यावर जीव सोडला![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आता मला नवा घ्यावा लागणारेय पण मला अजुनही आशा आहे की हा दुरुस्त होईल
माझा सॅम्संग घासायच्या
माझा सॅम्संग घासायच्या डब्यांबरोबर सिंकमधे पडला व नंतर८ तास तो जलसमाधीत होता. दुसर्या दिवशी त्याने हे राम म्हटले. मग (लाज वाटून) मी नवीन स्वस्तातला सेलफोन घेऊन आले. ४ दिवसांनी गेलेला सेल गंमत म्हणून परत चालू करून पाहीला तर तो परत पुनरुज्जीवीत झाला व आता ४ महिने उत्तम चाललाय.
रिया., अवांतर सल्ला. पाण्यात
रिया., अवांतर सल्ला. पाण्यात पडलेला सेल पॉवर बंद करुन, बॅटरी बाहेर काढुन बाहेरुन पुसावा आणि तांदळाच्या डब्यात ठेवावा. सुरु होऊ शकतो.
परवा मायक्रोमॅक्स कॅनव्हास
परवा मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी घेतला. फोन आवडला. खुप फास्ट वाटयोय ( क्वाड कोअर असल्याने) आधीच्या सॅमसंगच्या तुलनेत फोनची व्हाईस क्लॅरीटी खुपच छान वाटतेय.
कॅनव्हास ४ आणि यात हार्डवेअर सारखेच आहे फक्त ४ मधे १२ मेगा पिक्सेल कॅमेरा, इंटर्नल मेमरी जास्त आणि अॅल्युमिनीयम बॉडी आहे. पण किंमतही बरीच जास्त आहे.
बाकी याच रेंज मधले एक्पेरीया / डिझायर एक्स वगैरे बघितले पण त्यांची रॅम कमी आहे आणि ड्युअल कोअर आहेत त्यामुळे ते घेतले नाहीत
मस्त अहे एच्डी. कितीला पडला?
मस्त अहे एच्डी. कितीला पडला?
१४हजार. फोनचे फ्लिप कव्हरही
१४हजार.
फोनचे फ्लिप कव्हरही चांगले वाटतेय.
लुक्स अन फील एकदम स्लीक आहे.
लुक्स अन फील एकदम स्लीक आहे. मी कॅन्व्हास२ घेतला तेवा हा लाँच झालेला नवता.
मी मोबाईल बॅटरी वगैरे काढुन
मी मोबाईल बॅटरी वगैरे काढुन पुसलाही. तांदळाच्या डब्यात नव्हता ठेवला..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
दुकानदार म्हणतोय डिस्प्ले गेलाय
अजुनही तांदळाच्या डब्यात ठेवला तर नीट होऊ शकेल का?
तांदळाचा डबा पण तांदूळ कोणते
तांदळाचा डबा पण तांदूळ कोणते ? चहा पाउडरचे माहीत आहे .पूर्वी सर्द झालेली काडेपेटी चहापाउडरच्या डब्यात ठेवल्यास चार तासांनी कोरडी ठक्क होत असे .
तांदूळ मॉईस्चर शोषून घेतात.
तांदूळ मॉईस्चर शोषून घेतात. थोडे भाजलेले असलेत तर जास्त चांगले.
हॉटेल्स मधून मिठाच्या 'शेकर' मधे मिठात तांदूळ मिक्स करून ठेवलेले असतात.
फोन पाण्यात पडला, तर आपली सगळ्यात मोठी चूक ही होते, की फोन चालू आहे की बंद पडला ते तपासून पहाण्याचा अधीर पणा आपल्याला तो फोन ताबडतोब ऑन करण्यास भाग पाडतो. मग आतले पार्ट्स ओले असल्याने विजेमुळे डॅमेज होते.
यासाठी फोन आतून बाहेरून कोरडा होण्यासाठी किमान १-२ दिवस धीर धरणे गरजेचे असते.
एकदा झालेले डॅमेज नुसत्या तांदूळाच्या डब्याने भरून येणे अशक्य वाटते. चुकून झालेच, तर अक्षता व त्यांचा मोबाइल्सवर वैदिक इफेक्ट असा धागा पाडायला हरकत नसावी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
#उदयन आणि #इब्लिसशी सहमत
#उदयन आणि #इब्लिसशी सहमत .नोकिआची काही चांगले हैंडसेट ओपरा मिनी ब्राउजर असलेले आहेत .यामध्ये नेट पाहाणे सफाइदार होते(१)६३०३ मध्ये आटोफोकस ३एमपि कै पण १०एमबी मेमरी(२)३६०० स्लाईड ३एमपि कै .आटोफोँ ८एक्स झूम .(३)५१३० एक्सप्रेस म्युझिक .(४)२७०० कलासिक .नवीन मॉडेलस (१)C2 -01 ,३एमपि कै ,+३जी(२)X2 -00 ,५एमपि कै +फ्लैश +शटर बटण,६०एमबी मेमरी +चांगला म्युझिक प्लेअर +बटणस ,परंतु छोटी ८६०एमेएच बैटरी ,(३)आशा ३०१ ,३एमपि कै ,३जि .,पण ओपमिनी नाही .नोकिआच्या फोटोच्या प्रिन्टस ,अगदी २एमपिच्याही सुरेख येतात .
#इब्लिस अक्षता व त्यांचा
#इब्लिस
अक्षता व त्यांचा मोबाइल्सवर वैदिक इफेक्ट
असा धागा आला नं , त्यावर किती मारामारी होइल... अर्ध सनातनी आणि विज्ञान निष्ठ यांचे भावी स्टेट्मेंट इमॅजिन करून हसू येते आहे
ते जाऊ देत आता तांदळाच्या
ते जाऊ देत आता तांदळाच्या डब्यात ठेवला तर डिस्प्ले परत येईल का ते सांगा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
रिया., फोनची बॅटरी भिजल्यावर
रिया.,
फोनची बॅटरी भिजल्यावर लगेच काढली असेल तर चालेलही. हेअरड्रायरने थोड्या गरम हवेचा झोत मारुन बघ. त्याने पावसाळ्यातल्या फॉगी स्क्रिन्स ठिक होतात.
सावली ठिकेय मी करून पहाते
सावली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठिकेय
मी करून पहाते
हेअरड्रायरने थोड्या गरम हवेचा
हेअरड्रायरने थोड्या गरम हवेचा झोत मारुन बघ. >> हे कधिच करु नये
डीस्प्ले असा जाणार नाही ,एक
डीस्प्ले असा जाणार नाही ,एक आठवडाभर उनात ठेव, वरचे कॅबिनेट काढून ठेवता येत असेल तर बघ. ठीक होईलच.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
समजा खपलाच तर त्याच्या आत्म्याला गती मिळो.
धन्यवाद सर्वांना!! आता
धन्यवाद सर्वांना!! आता घेतल्यावर लिहीते इथे!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला एक सांगा ऑनलाईन मोबाईल
मला एक सांगा ऑनलाईन मोबाईल खरेदी साठी कोणती साईट रिलायबल आहे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कुणाला काही अनुभव?
दक्षे, एवढ्यातच घेतलेलास ना
दक्षे, एवढ्यातच घेतलेलास ना मोबाइल![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
दुकाने आहेत ना
दुकाने आहेत ना
मी, ebay वरुन घेतला होता माझा
मी, ebay वरुन घेतला होता माझा एक्स्पेरिया
फ्लिपकार्ट सर्वात रीलायबल आहे
फ्लिपकार्ट सर्वात रीलायबल आहे !
@रिया : मोबाईल ची बॅटरी , मागचे कव्हर काढून तो एका बशी मधे ठेव त्या वर अर्धा फूट उंची वर एक १०० व्होल्ट चा बल्ब लावून ठेव .. ४ तासा मध्ये मोबाईल पुर्ण ड्राय होइल ..
उब मिळेल आणि वारा येणार नाही असा कोपरा शोधून तिथे ही प्रक्रिया करावी ..मोबाईल गरम होतो ..काळजी करू नये ..
( बाकी ओव्हन ला लावून गरम करु नका )
१०० व्होल्ट >> १०० वॅट्स
१०० व्होल्ट >> १०० वॅट्स
माझ्या बाबांनी दुकानात दिला
माझ्या बाबांनी दुकानात दिला पण नवा डिस्प्ले टाकायला![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
म्हणाले एकदा नुकसान केलं ना? आता डोकं चालवू नका
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर
विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या की.. उगिचच बाकीचे सल्ले![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी फक्त माहितीसाठी सुद्धा विचारू शकते ना?
आणि इतक्यातच मोबाईल घेतला असला तरि लग्गेच घेऊ शकतेच की
दक्षिणाताई, भारतात
दक्षिणाताई,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भारतात फ्लिपकार्टची सर्विस सगळ्यात चांगली आहे.
पण, तिथून घेतलेल्या वस्तूस काही प्रॉब्लेम आला, तर गॅरंटी/वॉरंटी वसूल करण्यात लै वैताग येतो बघा. त्यापेक्षा शे दोनशे जास्त देऊन समोरच्या दुकानदाराकडून घेतला, अन प्रॉब्लेम आला तर किमान त्याची शेंडि पकडता येते
*
रियातै,
अक्षतांचा मोबाईलवरील वैदिक इफेक्टच्या धाग्याला मायबोली पारखी झाली आता
अक्षतांचा मोबाईलवरील वैदिक
अक्षतांचा मोबाईलवरील वैदिक इफेक्टच्या धाग्याला मायबोली पारखी झाली आता
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>
मग मायक्रोमॅक्स २ + घेवु कि
मग मायक्रोमॅक्स २ + घेवु कि नको?
समिता, इथे -->
समिता,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे --> http://justflipacoin.com/ जा. आधी हेड्स की टेल्स ते डोक्यात ठेवा. मग ठरवा
मस्त आयडिया आहे. टेल्स आलं
मस्त आयडिया आहे.
भारतात फ्लिपकार्टची सर्विस
भारतात फ्लिपकार्टची सर्विस सगळ्यात चांगली आहे.
पण, तिथून घेतलेल्या वस्तूस काही प्रॉब्लेम आला, तर गॅरंटी/वॉरंटी वसूल करण्यात लै वैताग येतो बघा. त्यापेक्षा शे दोनशे जास्त देऊन समोरच्या दुकानदाराकडून घेतला, अन प्रॉब्लेम आला तर किमान त्याची शेंडि पकडता येते >>> majhya 2 mitranna flipcartne replace krun dila mobile ..dukandarane service centarla pathaval asat.. Kami kimatit mialat asel tar flipcart best...
मला बाबांसाठी एक फोन घ्यायचा
मला बाबांसाठी एक फोन घ्यायचा आहे..
कीपॅड असलेला , दणकट , आणी बॅटरी लाइफ चांगला हवा आहे ..
नोकिया मध्ये शोधणे चालू आहेच..
इतर कोणते ऑप्शन आहेत का ?
एस ४ .... सेमसन्ग
एस ४ .... सेमसन्ग ....... बेस्ट ....
Pages