केसरीया बालम आवोनी,
पधारोनी म्हारे देस रे,
पधारोनी म्हारे देस...
राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार करणार्या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि ईमानी चेतक ह्याच मातीतले...
चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...
अरावली पर्वतरांगांनी राजस्थानचे दोन भाग केले आहेत. पुर्वेला मेवाड आणि पच्शिमेला मारवाड. मेवाडचे लोक लढवय्ये होते तर मारवाडचे लोक हे धंद्यात अतिशय हुशार...
आपल्याला वाटतो तेव्हढा रा्जस्थान रूक्ष नाहिये. मेवाड पट्टा बर्यापैकी हिरवा आहे. थर चे वाळवंट हे जैसलमेर आणि बिकानेर (मारवाड) च्या भागात आहे. ईथे फार प्राचीन काळी समुद्र होता. आजही ह्या वाळवंटात समुद्रजिवांचे जिवाश्म मिळतात.
भटकंतीस योग्य काळ : नोव्हेंबर ते जानेवारी. डिसेंबर-जानेवारी मध्ये दिवसाचे तपमान अतिशय छान आणि आल्हाददायक असते. डिसेंबर मध्ये जैसलमेर भागात रात्रि अतिशय कडाक्याची थंडी असते. ईथे ऊन्हाळा अतिशय तीव्र असतो.
आम्ही पाहिलेली स्थळे: उदयपुर, चित्तौडगढ, माऊंट अबू, जोधपुर, जैसलमेर, तनोट, अजमेर आणि जयपुर.
दिवसः १० ते १२
उदयपुर :
उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्यावर बांधला. ह्या महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर, उपहारगृह असे बरेच काही आहे.
लेक पॅलेस हे हॉटेल पिचोला सरोवराच्या मध्ये एका लहान द्विपावर स्थित आहे. हा महाल/हॉटेल महाराणा जगत सिंग दुसरा याने १६४६ - १७४३मध्ये बांधला. ईथे बर्याच चित्रपटांचे चित्रिकरण होते. गाजलेला बाँडपट "ऑक्टोपसी" त्यातलाच एक.
उदयपुर मध्ये महाराणा प्रताप यांचे एक स्मारक आहे. उदयपुरमध्ये "सहेलियो की बाडी" म्हणून एक ऊद्यान आहे. ह्या ऊद्यानात बरीच कारंजी आहेत. हे ऊद्यान महाराणा भुपाल सिंग ने त्याच्या राणी साठी बांधले. ह्या ऊद्यानाची एक खासियत अशी कि ईथली सर्व कारंजी गुरुत्वाकर्षणाच्या बलावर चालतात.
प्रचि १
एका उद्यानातली मिनी ट्रेन
-
-
-
प्रचि २
सहेलियों कि बाडी
-
-
-
प्रचि ३
सिटि पॅलेस प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि ४
सिटि पॅलेस
-
-
-
प्रचि ५
राजमुद्रा
-
-
-
प्रचि ६
लेक पॅलेस आणि पिचोला सरोवर
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ११
सिटि पॅलेस पिचोला सरोवरातुन
-
-
-
प्रचि १२
सिटि पॅलेस मध्ये रहाणार्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यासाठी खास गाड्या. पहा ओळखता येता आहेत का ते.
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १५
महाराणा प्रताप
-
-
-
चित्तौडगढ:
चित्तौडगढउदयपुर पासुन ६० किमी अंतरावर आहे. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजुला सरसोंची समृद्ध शेती लागते. सरसों चे शेत पाहिल्यावर आम्हां सर्वांतला "सारूख खान" जागा झाला आणि DDLJ effect सुरु झाला. शेतात घुसुन मनसोक्त फोटोज् काढुन घेतले. आपल्या शेताचे फोटोज् काढतायत म्हणुन तो शेतमालकही खुष झाला..
चित्तौडगढकिल्ल्याबद्दल माहिती प्रचि २० मध्ये दिलेली आहे.
ह्या किल्ल्यात सुंदर शिल्पकला असलेली बरीच देवळे आहेत. पण मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी ईथल्या मंदिरांची आणि मुर्त्यांची बरीच तोड्फोड केली आहे. ह्या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे "विजयस्तंभ" (प्रचि ६५).
प्रचि १७
सरसों के खेत
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
DDLJ effect
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
किल्ल्याची तटबंदी
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३३
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
किल्ल्याचा परिसर
-
-
-
प्रचि ३८
-
-
-
प्रचि ४०
-
-
-
प्रचि ४१
-
-
-
प्रचि ४३
-
-
-
प्रचि ४६
-
-
-
प्रचि ४७
-
-
-
प्रचि ४८
-
-
-
प्रचि ४९
-
-
-
प्रचि ५०
-
-
-
प्रचि ५१
-
-
-
प्रचि ५२
-
-
-
प्रचि ५३
-
-
-
प्रचि ५७
-
-
-
प्रचि ५८
-
-
-
प्रचि ५९
-
-
-
प्रचि ६०
-
-
-
प्रचि ६१
-
-
-
प्रचि ६३
-
-
-
प्रचि ६४
-
-
-
प्रचि ६५
विजयस्तंभ राणा कुंभा ह्याने ईसवीसन १४४२ - १४४९ मध्ये मालवा आणि मेहमुद खिलजी ह्यांच्यावर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणुन बांधला. ह्याची उंची ३९.१९ मीटर असुन हा ९ मजली आहे.
-
-
-
प्रचि ६६
किल्ल्याचे मागील प्रवेशद्वार
-
-
-
प्रचि ६७
-
-
-
प्रचि ६८
किल्ल्यावरून दिसणारा भोवतालचा परिसर
-
-
-
माउंट अबू :
माउंट अबू उदयपुर पासुन ४-५ तासांच्या अंतरावर अरावली च्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. ईथे पहाण्यासारखी ठिकाणे म्हणजे गुरु शिखर, प्रजापिता ब्रम्हकुमारी आश्रम व दिलवाडा मंदिरे.
गुरु शिखर हे अरावली पर्वतरांगांमधले सर्वोच्च शिखर आहे. ह्याची उंची १७२२ मीटर आहे. ईथे दत्तात्रेयांचे मंदिर आणि पाऊलखुणा आहेत. ईथे समोरच एक ऑब्झरव्हेटरी आहे. ईथुन समोरच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दॄष्य दिसते.
प्रचि ७०
दत्तात्रेयांच्या पाऊलखुणा
-
-
-
प्रचि ७१
ऑब्झरव्हेटरी
-
-
-
प्रचि ७२
-
-
-
प्रचि ७३
टोड रॉक
-
-
-
दिलवाडा मंदिरे :
दिलवाडा मंदिरे हि जैनांची ११व्या ते १३ व्या शतकातली मंदिरे आहेत. हि मंदिरे चालुक्य राजवटित बांधली गेली. ईथे एकूण पाच मंदिरे आहेत. ईथे आपल्याला संगमरवरातले (बहुदा जगातील) अत्युच्य कोरीव काम पहायला मिळते. माझ्या मते ईथले कोरीव काम हे ताज महाल पेक्षाही सरस आहे (माझ्या मते ताज महाल फक्त भव्य आहे.). मी आजपर्यंत पाहिलेल्या शिल्पकलांमध्ये सर्वश्रेष्ठ कोरीव काम मी ईथे पाहिले. दुर्दैवाने ईथे फोटो काढण्यास मनाई आहे. खाली जे फोटोज् दिले आहेत ते मी काढलेले नाहियेत. ईथे मिळणार्या पुस्तकातुन स्कॅन केलेले आहेत. हे फोटोज् फक्त आपणांस ईथल्या शिल्पकलेची कल्पना यावी म्हणुन दिलेले आहेत.
प्रचि ७४
-
-
-
प्रचि ७५
-
-
-
प्रचि ७६
-
-
-
प्रचि ७७
-
-
-
प्रचि ७८
-
-
-
प्रचि ७९
-
-
-
प्रचि ८०
-
-
-
प्रचि ८१
-
-
-
प्रचि ८२
-
-
-
प्रचि ८३
-
-
-
प्रचि ८४
-
-
-
प्रचि ८५
-
-
-
प्रचि ८६
-
-
-
प्रचि ८७
-
-
-
प्रचि ८८
-
-
-
प्रचि ८९
-
-
-
प्रचि ९०
-
-
-
प्रचि ९१
-
-
-
प्रचि ९२
-
-
-
प्रचि ९३
-
-
-
प्रचि ९४
-
-
-
प्रचि ९५
-
-
-
प्रचि ९६
-
-
-
प्रचि ९७
-
-
-
प्रचि ९८
-
-
-
प्रचि ९९
-
-
-
प्रचि १००
-
-
-
प्रचि १०१
-
-
-
-------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - राजस्थान (जैसलमेर व तनोट)
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
-
-
-
सही फोटोज !! मागे
सही फोटोज !!
मागे म्हटल्याप्रमाणे माझा झब्बू! खू...प फोटो काढलेत.. पण इतकेच सापडले..
उदयपुर पॅलेस :
आत कॅमेरा नेला नव्हता. त्यामुळे डोक्यातच आहेत पॅलेसची चित्रं..
चित्तोढगड :
माउंट अबू, फार पूर्वी केले.
पण एकंदरीत तो सगळा भाग किती ऐश्वर्यसंपन्न आहे ! असं काही आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही.. (चुभुद्यघ्या) आपले लोक साधे सुधे राहणीचे होते का?
अप्रतिम वास्तू आहेत सगळ्या.
अप्रतिम वास्तू आहेत सगळ्या. प्रकाशचित्रे इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
बस्के, झब्बु मस्तच आहे.
बस्के,
झब्बु मस्तच आहे. झक्कास... धन्यवाद.
पण एकंदरीत तो सगळा भाग किती ऐश्वर्यसंपन्न आहे ! असं काही आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही.. (चुभुद्यघ्या) आपले लोक साधे सुधे राहणीचे होते का? >>>>
माझ्या मते त्याला ३ कारणे असावीत :
१) आपल्या ईथला जो खडक आहे (काळा बेसॉल्ट) तो ज्वालामुखीच्या ऊद्रेकातुन तयार झालेला आहे. हा खडक अतिशय कठीण असतो. ह्यावर फारसे नाजुक खोदकाम करता येत नाही.
२) छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि पेशव्यांचा काळ सोडला तर (१६०० व्या शतकाच्या आधी) महाराष्ट्र तसा पारतंत्र्यातच होता.
३) प्रशासनाची आणि जनतेची उदासिनता. तिथे राजस्थानात सरकार अतिशय जागरुकतेने हा ठेवा जतन करते. तसे ईथे काहिच दिसत नाही.
माबोवरचे जाणकार अधिक माहिती देतीलच.
खुप छान फोटो आणी माहिती . पण
खुप छान फोटो आणी माहिती . पण माझ्याकडे प्रचि ८,९,१०,१४,१६,२२,२५,२६,२८,३२,३४,३५,३९,४२,४४,४५,५४,५५,५६,६२,६९ का दिसत नाहीत ,का ते प्रचि नंबरच तुम्ही दिले नाहीत ?
८,९,१०,१४,१६,२२,२५,२६,२८,३२,३
८,९,१०,१४,१६,२२,२५,२६,२८,३२,३४,३५,३९,४२,४४,४५,५४,५५,५६,६२,६९ का दिसत नाहीत ,का ते प्रचि नंबरच तुम्ही दिले नाहीत ?>>>>
त्या प्रचिच नाहियेत. फायनल एडिटिंग करताना त्या प्रचि उडविल्या. जर का प्रचि दिसत नसतील तर छोट्या चौकोनात "X" अशी एक लाल फुली येते.
वाह...! क्या बात
वाह...! क्या बात है.....!
सरसो च्या फुलाचा वेगळा फोटो मस्त आला आहे. चित्तोडगढ खूप वर्षांपूर्वी बघितला होता. दिलवाडा मंदीरांचे कोरीव केवळ अद्वितिय !
तुझे प्रचि बघुन वाटते अजुन आपला भारतच बघायचा आहे. बाकी देश नंतर..!
चंदन अप्रतिम फोटो,
चंदन अप्रतिम फोटो, पहाण्यासारखे राजस्थान मधे बरेच काही आहे, वेळ कमी पडतो.
उदेपूर चा सिटी पॅलेस मला नाही तितकासा आवडला, किंवा मी गेलो तो सिझन चुकीचा होता. प्रचंड गर्दी होती तिथे आणी जाम घुसमटायला होते.
नगदा, एकलिंगेश्वर, हल्दीघाटी, रजसमंद आणि कुंभालगडावर नाही गेला का ??
चंदन मस्तच, राजस्थानची सफर
चंदन मस्तच, राजस्थानची सफर घडवुण आणलीत छान पैकी ...
लेक पॅलेस काय सुंदर आहे ... वा !
"सारूख खान" ... पण आवडला
वाह सुंदरच , आणखीन काय
वाह सुंदरच , आणखीन काय बोलणार. बघतच रहावस वाटत.
लेक पॅलेस किती सुंदर दिसतोय पाण्यात...
सरसों के खेत तर मस्तच... सरसोंच्या फुलाचा फोटो मस्तच...
त्या शेतात तर मला शाहरूख खान एकटाच दिसतोय... काजळ नव्हती काय ?
प्रचि ३८ , ४१ , ४६ ,चितौडगढ किल्ल्याच्या परिसरातील प्रचि ३८ , ४१ , ४६ मस्तच...
दिलवाडा मंदिर किती सुंदर.. कलाकुसर एकदम खासच
पु.ले.शु.
khup chan lihaka aahe
khup chan lihaka aahe lekha.......photo hi kup chan aahet..
क्लास मित्रा!!!!! पुन्हा एकदा
क्लास मित्रा!!!!!
पुन्हा एकदा सिक्सर!!!
खरंच तुझ्या नजरेतुन अतुल्य भारत बघताना खुप आनंद होतोय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!!!
वृषा, तुझे प्रचि बघुन वाटते
वृषा,
तुझे प्रचि बघुन वाटते अजुन आपला भारतच बघायचा आहे. बाकी देश नंतर..! >>>
अगदी खरे. आपल्याच देशात पहायला खुप काही आहे.
सचिन,
नगदा, एकलिंगेश्वर, हल्दीघाटी, रजसमंद आणि कुंभालगडावर नाही गेला का ??>>>
नाही रे. वेळ कमी पडला...
जुई,
त्या शेतात तर मला शाहरूख खान एकटाच दिसतोय... काजळ नव्हती काय ? >>>
काजळ नंतर भेटली.
प्रकाशचित्र नेहमी प्रमाणेच
प्रकाशचित्र नेहमी प्रमाणेच सुंदर !
(पण ३३ नं. च्या प्र. चि. मध्ये पॅसेज मध्ये काय आहे बर ?)
अतुल्यच !
अतुल्यच !
अतिशय सुंदर फोटो.. माझी
अतिशय सुंदर फोटो.. माझी उदयपुर ट्रिप आठवली
दिलवाड्याचे मंदिर पाहुन राणकपुर मंदिराची आठवण झाली. बरेचसे तसेच वाटले. पण तिथे फोटो काढायला परवानगी आहे. सकाळी १०.३० ला मुख्य मुर्तीचा दरवाजा उघडा ठेऊन बाकीच्या मुर्त्यांचे दरवाजे बंद करतात. मुख्य मुर्तीसमोर २-३ माणसे उभी राहतात. त्या मुर्तीचे फोटो सोडुन बाकी सगळीकडे फोटोग्रफी करायला देतात. १०.३० ते ३ हवे तेवढे फोटो काढा.... मुख्य मुर्तीवर कुठेही उभे राहुन कॅमेरा रोखला तरीही लगेच ओरडुन फोटोग्राफरला थांबवतात
३३,४६ मधील पोटोतील स्वच्छता पाहून थोड आच्छर्य वाटल कारण आपल्या इथ
अशी स्वच्धता किल्यात पहायला मिळत नाही.
मला जयपुर\उदय्पुर मध्ये खुप स्वच्छता दिसली. त्यांनी 'बाहेरचे लोक आपले गाव बघायला येतात, आपले पोट त्याच्यावरच चालते आणि म्हणुन आपले गाव सुंदर दिसले पाहिजे' याचे भान ब-यापैकी राखलेय.
पण एकंदरीत तो सगळा भाग किती
पण एकंदरीत तो सगळा भाग किती ऐश्वर्यसंपन्न आहे ! असं काही आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही..
राजपुतांनी खुप लवकर हार मानली मोगलांपुढे, त्यामुळे त्यांचे ऐश्वर्य टिकुन राहिले. मराठे इंग्रज येईपर्यंत मोगलांशी लढत होते, नंतर इंग्रजांशी लढले. नाहीतर रायगडवरचा महाराजांचा महाल आजही तसाच राहिला असता.
सुंदर फोटो आहेत सगळे. मी
सुंदर फोटो आहेत सगळे.
मी लहानपणी जाऊन आलोय या ठिकांणी. त्यामुळे बघायला अजून छान वाटले. त्या सगळ्या खांबांवरची कलाकृती काय सुंदर आहे!
धन्यवाद रे चंदन.
सुंदर फोटो .धन्यवाद .
सुंदर फोटो .धन्यवाद .
३३,४६ मधील पोटोतील स्वच्छता
३३,४६ मधील पोटोतील स्वच्छता पाहून थोड आच्छर्य वाटल कारण आपल्या इथ
अशी स्वच्धता किल्यात पहायला मिळत नाही.
मला जयपुर\उदय्पुर मध्ये खुप स्वच्छता दिसली. त्यांनी 'बाहेरचे लोक आपले गाव बघायला येतात, आपले पोट त्याच्यावरच चालते आणि म्हणुन आपले गाव सुंदर दिसले पाहिजे' याचे भान ब-यापैकी राखलेय.>>>
अगदी खरे आहे. ईथल्या लोकांना पक्के ठाऊक आहे कि आपले पोट हे पर्यटकांवरच चालते. संपुर्ण राजस्थानच सुंदर आहे. अजमेरचा दर्गा सोडुन.
-------------------------------------------------------------
पण एकंदरीत तो सगळा भाग किती ऐश्वर्यसंपन्न आहे ! असं काही आपल्या महाराष्ट्रात दिसत नाही..
मराठे इंग्रज येईपर्यंत मोगलांशी लढत होते, नंतर इंग्रजांशी लढले. नाहीतर रायगडवरचा महाराजांचा महाल आजही तसाच राहिला असता.>>
>>>
मला नाही असे वाटत. With all due resepct, १६०० ते १९०० ह्या ४ शतकांत (जेव्हा महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य/भूप्रदेश अशी ओळख होती) तरी अशा कितीशा वास्तुंची, शिल्पांची, मंदिरांची निर्मिती झाली?
पेशव्यांच्या काळात शांति, समृद्धी, सुबत्ता असे सर्व काही होते.
मला असा वाटते कि आपले लोक साधे होते आणि कलेला जे प्रोत्साहन मिळायला पाहिजे ते मिळाले नाही.
कदाचित माझी माहिती चुकिचीही असेल. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा हि विनंती.
राजपुतांनी खुप लवकर हार मानली मोगलांपुढे, त्यामुळे त्यांचे ऐश्वर्य टिकुन राहिले. मराठे इंग्रज येईपर्यंत मोगलांशी लढत होते, नंतर इंग्रजांशी लढले. नाहीतर रायगडवरचा महाराजांचा महाल आजही तसाच राहिला असता.>>
हे खरे नाहिये. मेवाड ने पण खुप लढाया आणि रक्तपात पाहिला पण तिथले शिल्पवैभव डोळे दिपवुन टाकते. मेवाड चे लोक अतिशय कडवे आणि लढवय्ये मानले जातात. लश्करात राजपुताना रायफल्स चा स्वतंत्र आणि दैदिप्यमान असा ईतिहास आहे.
मारवाड ने लवकर शस्त्रे टाकली.
-------------------------------------------------------------
मस्तच.
मस्तच.
शिल्पकलांमध्ये सर्वश्रेष्ठ
शिल्पकलांमध्ये सर्वश्रेष्ठ कोरीव काम... दिलवाडा मंदिरे... २०० टक्के अनुमोदन.. सर्व प्रचि एक नंबर... लेक पलेस सहीच.. एकदा जाऊन राहणारच
चंदन मेवाड-मारवाड माहितीबद्दल
चंदन मेवाड-मारवाड माहितीबद्दल धन्यवाद.
आम्ही उदयपुरला एका जुन्या फॅमिलीला भेटायला गेलो होतो त्यांनीही बरीच माहिती दिली होती. मला राजस्थानचे मारवाडीच माहित होते. मेवाडबद्दल फारसे ऐकले नव्हते. त्यांच्याकडुन मेवाडाबद्दल पहिल्यांदा ऐकले होते.
सहा वर्षापुर्वि आम्ही माउंट
सहा वर्षापुर्वि आम्ही माउंट अबु- गुजरात अशी ट्रिप केली होती. ती कलाकुसर वगैरे जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहिले. तिथे फोटो काढु देत नाहित ह्याचच वाईट वाटते.
फोटो एकदम झकास!
Pages