अतुल्य! भारत - भाग ६: कुतुब मिनार, लोह स्तंभ, ईंडिया गेट. दिल्ली

Submitted by मार्को पोलो on 11 June, 2010 - 04:38

कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित असुन ह्याची ऊंची २३७.८ फूट आहे. विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार आहे. ह्याच्या बांधकामाची सुरुवात ईसवी सन ११९३ मध्ये कुतुबुद्दिन ऐबक ह्याने सुरु केली. पण तो कुतुब मिनार चा फक्त पाया पुर्ण करू शकला.त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश ह्याने आणखिन ३ मजले चढविले. सर्वात शेवटचा पाचवा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने कोरलेली आहेत.
कुतुब मिनारच्या निर्मिती आधी ह्या परिसरात लाल कोट ही दिल्ली (त्यावेळी धिल्लीका) चे शेवटचे हिंदू राजे तोमर आणी चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या परिसरात आधी २७ हिंदू आणी जैन मंदिरे होती.
ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड - विटांपासुन कुतुब मिनार ची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर एका ठिकाणी "श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता" असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे.
(स्त्रोत : http://wikipedia.org/)
कुतुब मिनार. vertical panorama

--
--

--
--


--
--
कुतुब मिनार परिसर

--
--


--
--


--
--

लोह स्तंभ : लोह स्तंभाची ऊंची २२ फूट असुन हा कुतुब मिनार च्या परिसरात स्थित आहे. ह्याचे वजन ६ टनांपेक्षा जास्त असुन हा चंद्रगुप्त विक्रमादित्य (ईसवीसन ३७५-४१३) च्या काळातिल आहे असे मानण्यात येते. काही जाणकारांच्या मते हा स्तंभ ख्रिस्तपूर्व ९१२ काळातील आहे. हा स्तंभ ९८% शुद्ध ओतिव लोखंडाने बनलेला असुन १६०० वर्षे ऊन - पाण्याला तोंड देत न गंजता ऊभा आहे.
हा लोह स्तंभ आधी विष्णूपादगिरी (सध्याच्या भोपाळच्या पूर्वेला ५० किमी) येथे स्थित होता. ह्याची ऊभारणी अशी होती की फक्त वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी (२१ जुन, summer solstice) ह्याची सावली अचुकपणे विष्णु च्या मुर्तिच्या पायावर पडावित. हा स्तंभ १६०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रगत धातुकलेची आणी खगोलशास्त्राची साक्ष देतो.

(स्त्रोत : http://wikipedia.org/)


--
--
कुतुब मिनार आणी लोह स्तंभ एका वेगळ्या अँगल ने...

ईंडिया गेट :
ईंडिया गेट चे डिजाईन सर एडविन ल्यूटेन ह्यांनी केले. ईंडिया गेट वर ज्या ७०,०० सैनिकांनी ब्रिटिशांसाठी पहिल्या महायुध्धात व १३५१६ सैनिकांनी १९१९ मध्ये अफगाणिस्तान च्या युध्धात प्राणाहुति दिली त्यांची नावे कोरलेली आहेत.
(स्त्रोत : http://wikipedia.org/)
--
--

-----------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः

आगामी आकर्षणः आग्रा, फतेहपुर सिक्री.

मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेला दुवा पहा-
http://www.maayboli.com/node/15407

गुलमोहर: 

ऐ चंदन, आयफेल टॉवर खरचं फेल रे कुतूबमिनाराला तुझ्या क्लिक मधे पाहून. आयफेल टॉवर पेक्षा कुतूबमिनाराची उंची कईक जास्त रे , त्यावरच्या कोरीव नक्षीकामाच्या तूलनेने. बाकी हे माझे मत आहे. वैयक्तिक स्वातंत्य !

चंदन, कुतुबमिनारच झक्कास. कोरीवकाम केवळ अप्रतिम.

आम्हांला दिल्लीतल्या खाण्याचे पण फोटो चालले असते. Wink दिल्ली तिथल्या खाण्यासाठी फेमस आहे म्हणून म्हटलं.

चंदन, दिल्ली ला फार थोडक्यात गुंडाळलस की. (माझ्या दिल्लीकर मित्रांना पाठवतो हि लिंक)
प्रत्यक्षातही इतका सुंदर दिसला नव्हता मला कुतुब मिनार.
त्या लोहसतंभाची तूलना आपल्या रायगडवरच्या स्तंभाशी करायला हवी. मि कुठेतरी वाचले होते कि तो घडवण्याचे एक वेगळेच तंत्र होते. इतकी वर्षे उघड्यावर असून त्याला गंज चढलेला नाही !!
(याच स्तंभाला पुर्वी पाठमोरी मिठी मारत असत ना ? )

छान, कुतुबमिनारावरची नक्षीकाम मस्त आहे.
>>(याच स्तंभाला पुर्वी पाठमोरी मिठी मारत असत ना ? )<< होय तोच स्तंभ आहे. चिनी कम या चित्रपटात आहे असा प्रसंग. अजूनही पाठमोरी मिठी मारतात वाटत हौशी पर्यटक.

छान.... चंदन, तू अपेक्षा खूप वाढवल्या आहेस पहिल्या ३ भागांमधून.. त्यामुळे पंजाब आणि हा पण भाग गुंडाळल्यासारखे वाटले. इंडियागेट च्या १ च फोटो ने अजिबातच समाधान झालं नाही.

मागे पण कोणीतरी कुतुबमिनारचे फोटो टाकले होते (प्रकाश काळेल ??). अप्रतिम होते.. Happy

चंदन, ही सर्व माहिती माहितीच नव्हती. खूप सुंदर वर्णन आणि फोटो फार स्वच्छ आले आहेत. मला हा भाग आवडला.

सुर्यकिरण, आयफेलही महान आहे रे....

सही रे चंदन. Happy
कुतूबमीनाराच्या दुसर्‍या फोटोचे फ्रेमींग क्लासिक आहे !
मीपण तुझ्यासारखाच स्टीच करुन कुतुबमीनाराचा एक फोटो काढला होता.:P
माझ्या लेखात तो नव्हता टाकला....त्यामुळे इथेच झब्बू देतो...Please bear with it !

मित्र आणी मैत्रिणींनो,
प्रतिसाबद्दल धन्यवाद.
आणी हो, अर्बिट तुझा झब्बु तर मस्तच आहे. आणखिन येऊ देत...

आता त्या लोह स्तंभास मिठी मारू देत नाही पुरातत्व विभाग .त्याच्या भोवती गजांचे कुम्पण आहे.
ते बनण्या आधी मी या युवतीला आलिन्गन दिले आहे.
Happy