मागे एकदा मुलीच्या डेकेअर मध्ये एका मुलाने तलावातून काही बेडकाची डीम्भ आणली होती. मग त्यांच्या शिक्षकेने आणि मुलांनी ती पाळली, अगदी बेडूक होऊन पळून जाई पर्यंत. बेडकाच्या वेगवेगळ्या अवस्था मुलाना आणि मला पण सहज बघायला मिळाल्या. त्यानाच इथे गोष्टीरूप दिलंय
*************
एक होत छोटस तळ. हिरव्यागार रंगाच्या पाण्याच , चहूबाजूला गर्द झाडी असणारं. त्या तळ्यात होती इवलाली लाल कमळे. आणि पाण्यात खालीसुध्दा खूपखूप पान वनस्पती होत्या.
अशाच एका पाण्यातल्या पानाला एक अगदी चिमुकलं अंड चिकटलं होत, पारदर्शक आणि आणि आत एक चिमुकला केशरी बिंदु. आणि त्याच्या जवळच्या दुसऱ्या पानाला अजून एक अंड होत, तेही पारदर्शक पण आतला बिंदु होता काळा. आता बऱ्याच वेळ एकमेकांच्या बाजूला राहिल्याने त्या अंड्याच्या आतल्या केशरी बिंदु ने शेजाऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
अरे तू कोण होणार आहेस रे अंड्यातून बाहेर आल्यावर?
काळा बिंदु म्हणाला, उम्म्म खरतर मला माहीतच नाहीये.
मला वाटत तू पण माझ्या सारखा मासा होणार , काळा मासा. मी केशरी मासा तू काळा मासा आपण दोघ मिळून खूप खूप खेळू मग.केशरी बिंदुने सांगितलेली कल्पना काळ्या बिंदुला पण अगदी पटली.
आपण एकमेकाला काय हाक मारुयात रे? काळ्या बिंदुने विचारलं
ह्म्म्म मी तुला चिका म्हणू? केशरी बिंदुने नाव सुचवले.
बर, मग मी तुला म्हणणार पिका.
मी चिका आणि तू पिका
दोघे मिळून करू खूप खूप मजा
काळ्या बिंदुने लगेच कविता पण केली
थोडे दिवसांनी या चिमुकल्या अंड्यातून इवले इवले शेपटीवाले जीव बाहेर आले.
पिका म्हणाला बघ आपल्या दोघांना शेपटी आहे ना. म्हणजे आपण मासेच. कित्ती छान दिसेल ना काळा मासा केशरी मासा एकत्र पोहोताना?
थोडे दिवस असेच मजेत गेले. चिका आणि पिका दोघे कमळाच्या पानाखाली खेळत चिखलातले किडे खात आणि कमळाच्याच मुळात झोपी जात.
एक दिवस सकाळी उठल्या उठल्या पिका आला आपले नुकतेच फुटलेले नविन कल्ले दाखवायला. आणि बघतो तर काय चिका ला चक्क दोन पाय फुटलेले!
चिकापण विचारात पडला होता. अस कस काय झालं बर?
तेवढ्यात पिका म्हणाला तू ना आता माणूस बनणार आहेस. बघ तुला कसे माणसासारखे पाय फुटलेत ते.
चिका पिकाच्या भोवती गोल गोल फिरत म्हणाला नाहीच मुळी बघ मी कसा छान पोहोतोय ते. मी किनई पायवाला मासा होणारे.
पिकाला हि ते पटल आणि ते दोघे आपले नवीन पाय आणि कल्ले वापरून अजून जोरात पोहायला लागले.
परत काही दिवसांनी बघाव तर पिकाचे कल्ले आणि पर मोठ्ठे छान होत आले होते चीकाला मात्र चक्क दोन हात फुटले होते.
पिका खुपच दुख्खी होऊन चिकाला म्हणाला.
चिका तू खरच माणूस होणार का रे? बघ ना आता तुला त्याच्यासारखे हातपण आले. तू माणूस झालास कि मला पकडशील का? नको ना रे पकडूस. मला इथेच तळ्यात राहायचंय.
चिकालाही जरा शंका यायला लागली होती. पण तस काही न दाखवता चिका परत एकदा जोरजोरात गोल गोल फिरला आणि म्हणाला छे रे माणूस कित्ती मोठा असतो. मी बघ कित्ती चिमुकला. मी कसा एवढा मोठ्ठा होईन? आणि अजून मला शेपटी आहे, अजूनही मी पाण्यातच राहतो जमिनीवर जायला कुठे येणार आहे मला? मी आपला हातपायवाला मासा.
आपल्या हातांनी पिकाच्या पंखाना टाळी देऊन दोघ आपल्या किडे खायच्या उद्योगाला निघून गेले.
अजून काही दिवस गेले आणि पिका सुंदर केशरी,पांढरे पट्टेवाला मोठे मोठे पंखवाला मासा झाला होता. आणि चिकाचा काळा रंग जाऊन तो चक्क ठिपकेदार हिरवा झाला होता. त्याच शेपूट सुध्दा गायब झालं होतं.
मग मात्र पिका म्हणाला. चिका तू नक्कीच मासा नाहीयेस अस मला वाटत. तुला हात पाय आहेत. खरतर पाण्यात पोहायला हात पाय नसले तरी चालत. म्हणजे तुला कदाचित जमिनीवरपण चालता येईल. बघतोस का प्रयत्न करून? अगदी तळ्याच्या काठावर कर म्हणजे नाहीच जमल, किंवा गुदमरलास तर तुला लग्गेच परत पाण्यात येता येईल.
चिकाला पण आता मोठ्ठी उडी मारायची इच्छा होत होती. पिकाच सांगण ऐकून बघाव अस त्यानेहि ठरवलं.
झालं दुसऱ्या दिवशी दोघे तळ्याच्या काठाजवळ गेले. चिकाने जोर लावून उडी मारली आणि काय आश्चर्य चिका चक्क जमिनीवर बसला होता. त्याला आजिबात गुदमरल्यासारख झालं नाही.स्वच्छ हवा , उबदार उन पाहून मजाच वाटली.
इथे पिका पाण्यातून पहात होताच. चिका ठीक असल्याच पाहून पिकाला पण बर वाटलं.
तेवढ्यात तलावाजवळ दोन लहान मुल आली आणि चिकाला बघून म्हणाली अरे तो बघ पिल्लू बेडूक. त्याच्या त्या आवाजाने चिका दचकला आणि परत पाण्यात पळाला.
तिथे पिकाचा पंख पकडून गोल गोल नाचत म्हणाला अरे मी बेडूक आहे. मासा नाही. आणि मला किनई पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे रहाता येत.
मग तेव्हापासून चिका कधी कधी जमिनीवर येतो, आणि परत पाण्यात जाऊन पिकाला जमिनीवरच्या गमतीजमती सांगतो. आणि दोघे मिळून त्यांच गाण सुद्धा गातात.
मी चिका आणि तू पिका
दोघे मिळून करू खूप खूप मजा
*****
या गोष्टी इथेहि वाचता येतील
गंमत गोष्टी
http://gammatgoshti.blogspot.com/
*****
काय सुंदर गोष्ट सांगितली
काय सुंदर गोष्ट सांगितली आहेस, खरचं मस्त बालकल्पना विस्तार ! जाम आवडली. बेडकाची ओळख किती सुंदर करून दिली आहेस
फार छान गोष्ट लिहिली आहेस!
फार छान गोष्ट लिहिली आहेस!
खूप छान आहे गोष्ट ! आजच
खूप छान आहे गोष्ट ! आजच लेकीला सांगते
गोड आहे गोष्ट (माशाचं अंड)
गोड आहे गोष्ट
तू ह्या किंवा अशा इमेजेस गोष्टीत अॅड केल्यास तर मुलांना अजून मजा वाटेल आणि कळायलाही सोप्प जाईल लक्षात पण पटकन राहिल
कविताला अनुमोदन!
कविताला अनुमोदन!
सावली, झक्कास गं. खरंच मस्त
सावली, झक्कास गं. खरंच मस्त आहे तुझा कल्पनाविस्तार.
मस्तच!! कविता - तु दिलेले
मस्तच!! कविता - तु दिलेले फोटो पण सही.
खूपच छान गोष्ट! तुमच्याकडून
खूपच छान गोष्ट! तुमच्याकडून प्रेरणा घेउ सध्या मीही मुलाला गोष्टी तयार करून सांगतेय.
~साक्षी
मस्तच !!! सावली लगे रहो. अजून
मस्तच !!!
सावली लगे रहो.
अजून येउदेत ग अश्याच छान छान गोष्टी.
आणि कविता म्हणते त्याप्रमाणे चित्र अॅड करता आली तर सोने पे सूहागा.
सावलि, मस्तच! खुप गोड
सावलि,
मस्तच! खुप गोड गोष्ट.
कविता,
ते अंड्यांचे फोटो पेस्ट केल्याबद्दल खुप आभार.
सावली, छाने गोष्ट. कविताची
सावली, छाने गोष्ट. कविताची आयडियाही छानच.
छान आहे ही पण गोष्ट
छान आहे ही पण गोष्ट
खुप छान गोष्ट. साधारण अशीच
खुप छान गोष्ट.
साधारण अशीच गोष्ट असलेली Scholastic ची cd मी पहिली होती.
http://www.amazon.com/Fish-fish-Scholastic-big-books/dp/0590624458
मला पण तुझा शेवट आवड्ला.
धन्यवाद सगळ्यांनाच कविता तु
धन्यवाद सगळ्यांनाच

कविता तु टाकलेले फोटो छान आहेत. या विकांताला मी या गोष्टीचि अशि चित्र टाकुन पीडीएफ बनवायचा विचार करतेय. झालि कि इथेपण टाकिन तुमच्या पिल्लांसाठि
साक्षी तुम्हि पण अशा सुचलेल्या गोष्टी लिहुन काढा ना. मजा येईल वाचायला.
nilima_v, अरे वा. मला माहितच नव्हत या सिड्यांबद्दल. तुम्हि दिलेल्या पानावर पण खाली बरिच मजेदार चित्र दिसताहेत. बघायला पाहिजेत ति पुस्तक पण धन्यवाद.
nilima_v , त्या पुस्तकाच लुक
nilima_v , त्या पुस्तकाच लुक इन्साईड मधे वाचल पण त्या पुस्तकाचा एकुण सुर वेगळा वाटतोय. तुमच्याकडे असेल तर इथे थोडस लिहाल का त्याबद्दल?
सावलीची गोष्ट अन कवे तू
सावलीची गोष्ट अन कवे तू टाकलेल्या चित्रातून हि गोष्ट पुन्हा पुन्हा वाचायला मजा येते आहे.
गोड गोष्ट.
गोड गोष्ट.
लेकीला तुझी गोष्ट खुप आवडली
लेकीला तुझी गोष्ट खुप आवडली
http://chhotyanchya-duniyet.blogspot.com/ सावली ही रिक्षा बघ माझी. रिक्षा अशासाठी फिरवतेय की इथे मी माझ्या लेकीसाठी म्हणून ब्लॉग सुरु केलाय. तिच्या करताच्या गोष्टी वगैरे. तू पण अस काही करु शकशील (आधीच केल असशील तर मला लिंक दे विपुत) आणि तुझ्या गोष्टी तिथे पण पोस्ट कर.
सध्या तिच्यासाठी प्रोजेक्ट असतो ना शाळेचा तसा मीच प्रोजेक्ट करतेय (तिच्या शाळेत नाही आहे अजून तरी प्रोजेक्ट प्रकरण). वेगवेगळ्या किटकांची माहिती चित्रासकट गोष्टीरुपात तयार करतेय. वरच्या लिंक मधे अशी फुलपाखराची माहिती दिसेल तुला. तसच घरी सध्या मधमाशीची, हाऊसफ्लायची माहिती तयार करुन ठेवलेय त्यात कलरिंग पेजेस घातल्याने तिला खुप मजा वाटली बघताना आणि त्यातून माहीतीही मिळाली तिला. तशी फाईलच तयार करतेय तिच्यासाठी. ही कल्पना शेअर करायचं कारण कल्पना शेअर केल्या की इतरांनापण "अरेच्चा! आपण पण करुयात" अस वाटू शकत आणि ते ही काही करत असतील तर त्यांनाही तस शेअर करावस वाटून मलाही नवीन काय करता येईल ते कळू शकेल.
सावली, एक सजेशन पिडिएफ तयार केलीस तरी बहुतेक इथे ती अपलोड कशी करशील? मी लेकीसाठी तिच्या गेल्या वाढदिवसाला एक बुकलेट कम ग्रिटिंग कार्ड तयार केलेलं त्यात तिच्या आवडत कॅरेक्टर "पिंकू परी" होती, ती स्वतः होती त्यात मी इमेजेस पण इंसर्ट केलेल्या. गोष्ट दर्जाच्या दृष्टीने भलेही यथा तथाच असेल पण तिच्या चेहर्यावरचा आनंद अवर्णनीय होता. पण मी वर्ड फाईल डिलिट केली आणि पिडिएफ काही मला ब्लॉग वर आता अपलोड करता येत नाही आहे. कन्व्हर्ट केली फाईल तर मराठी फाँट चे बारा वाजतायत. तेव्हा केलीस जरी पिडिएफ तरी वर्ड फॉर्मॅट डीलिट करु नकोस आणि जमत असेल त्यावर काही उपाय तर मलाही सांग
कविता धन्स ग वॉव तुझा ब्लॉग
कविता धन्स ग

तो पहिला फोटो छान आहे तीचा.
वॉव तुझा ब्लॉग मस्त आहे. सगळ्या गोष्टि अजुन वाचल्या नाहित पण चाळल्या. छान वाटताहेत
तुझि लेक एकदम गोड आहे
मी पण माझ्या या गोष्टी ब्लॉग वर टाकल्यात बघ इथे
http://gammatgoshti.blogspot.com/
अजुन खुप आहेत त्या टाइप करायलाच वेळ नाहिये हळु हळु करेनच.
तु ते प्रिंटच म्हणालीस ना, तशि मी काहि पुस्तक तयार केलित. स्वताच चित्र काढुन स्कॅन केली. मग मजकुर वर्ड / टेक्ट मधे टाइप केला. नंतर फाँट चा प्रॉब्लेम येउ नये म्हणुन सरळ त्यच्या इमेजेस केल्यात. म्हणजे चित्र आणी मजकुर दोन्हिचि मीळुन एक इमेज तयार केली. मग तिचे छोटे प्रिंट केले आणी ब्लँक बोर्ड बुक वर चिकटवले .
ब्लँक बोर्ड बुक इथे बघ http://www.amazon.com/Ready-Blank-Board-White-Ready/dp/157120993X/ref=sr...
http://www.amazon.com/Blank-Slate-Board-Books-author/dp/0976525402/ref=s...
मग त्यावर चिकटवायला एक लॅमिनेशन पेपर मिळतो तो चिकटवुन टाकला. आता खराब हात लागले तरि चालत.
हे सगळ करण फारच वेळ खाउ आहे. त्यावर मला एक सोपा उपाय पण सापडला आहे.
सरळ त्या प्रिंट हार्ड बाउंड फोटो अल्बम मधे चिकटवायच्या. त्यात आपोआपच एक पातळ प्लॅस्टीकच कव्हर पण असत फोटोसाठि, त्याने लॅमिनेशन पण होत
हार्ड बाउंड फोटो अल्बम हा असा > http://www.photoalbumshop.com/prod18.htm
माझ एक स्वप्न आहे ग की अशी हार्ड बाउंड, सुंदर रंगातली, पुस्तक किन्वा बोर्ड बुक मराठि मधुन पण बनावी. कस साकर होणार ते माहित नाहि.
हि बघ टेस्ट फाइल अप्लोड
हि बघ टेस्ट फाइल अप्लोड test.pdf (23.05 KB)
इमेजेस अपलोड करायला जे करतो तेच करायच.
सावली धन्स ग ब्लॉगकरता,
सावली धन्स ग ब्लॉगकरता, तुझ्या लिंक्स करता आणि पिडिएफ फाईलबद्दलच्या माहिती करता
सगळ टायपायचा कंटाळा येतो>>सेम पिंच. आळसुल्या राक्षस अंगात शिरतो
काल तर टाईपकेलेल सेव्ह करायच्या आधीच ओम फट स्वाहा झाल आणि मी पुन्हा टायपायचा नादच सोडला 
खुप गोड गोष्टी ...
खुप गोड गोष्टी ...
अप्रतिम, लहानांसाठी काहीतरी
अप्रतिम, लहानांसाठी काहीतरी लिहीण खूप अवघड असतं असा माझा अनुभव आहे. आणि एवढं चांगलं लिहीण तर ग्रेटच ग्रेट... खूप छान!!!
गोष्ट आणि कविताने जोडलेले
गोष्ट आणि कविताने जोडलेले फोटोपण आवडले .
सावली आणि कविता- अतिशय छान.
सावली आणि कविता- अतिशय छान. जियो !
सावली, लई भारी गोष्ट ! अशी
सावली,

लई भारी गोष्ट !
अशी लाईफ सायकल पहिल्यांदाच बघायला मिळाली !